आज मला असे का भासले?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
27 Jul 2009 - 6:20 am

किंचीत अनुवाद. कवी-जावेद अख्तर

आज असे मला भासले
अघडीत घडण्या सरसावले
आज असे ही मला भासले
मन माझे कुठेतरी हरवले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?

चेहरा करी कुणाच्या नजरेची छाननी
कुणी आता रोजच येई स्वप्नी
नव्या ऋतूमधे लालसा येई मनी
भ्रमर गुंजन करी फुला भोवती फिरूनी
आज असे मला भासले
मन माझे नशेमधे डुबले
आज असे ही मला भासले
शुद्धितूनी मी कुठेतरी विसावले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?

धुंद मंद भोंवताल कुस वळुनी घेई
नीळ्या काळ्या ढगांची पडे सावली
थंड थंड वार्‍याची झुळूक तृप्ती देई
गूंज गूंज शहनाई मालकंस आळवी
आज असे मला भासले
कुणीतरी माझेच जहाले
आज असे ही मला भासले
दोघांमधेले अंतर कायमचे मिटले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

बेचवसुमार's picture

28 Jul 2009 - 1:18 pm | बेचवसुमार

ऐसा लगता है..अब दिल मेरा खोने को है..(रेफ्युजी मधले) ह्याच गीताचा अनुवाद आहे ना सामंत सर..?
(मी शिवाजीराव भोसले च्या परिक्षणानंतर ह्या टॉपिकवर नजर गेली आणि मी चुकुन "आज मला असे का भोसले?" असेच वाचले .)

सागर's picture

28 Jul 2009 - 1:42 pm | सागर

श्रीकृष्णराव,

सुंदर कविता
फक्त एक महत्त्वाची सूचना...
ते "चीत्त" तेवढं "चित्त" असं करा बघू...
त्या चीत्याने रसभंग होतोय . अगदी चीत्ता माझ्या हृदयात धडधडतोय असे वाटते आहे ;)
आणि हे गाणे ऐसा लगता है या गाण्याचा अनुवाद असेन तर दिल साठी हृदय हा सुंदर शब्द आहे ना राव.... का हे चीत्ता गृहीत धरुन गाण्याचे विडंबन समजायचे =))

कल्पना, मांडणी आणि कवितेचे वेगात भावनांनी उचंबळणे फार आवडले....

~~~सागर~~~