चांदन्या!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
23 Jul 2009 - 11:39 pm

"निवेदन -
"अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे"
असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्‍या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्‍या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल."

********

आँ!!! ह्यी म्हनजे पंचाईतच हाये!!!
काय हो? कसली पंचाईत?
आरंच्चा!! कोन हो तुमी? काय वळख नाय देख नाय आनी लागले सवाल-जबाब कराया!!! काय रामराम वगैरे करायला येतं का न्हाय?
हो, हो, चुकलं! राम राम!!!
हां आंगाश्शी!! आमचा बी जय म्हाराष्ट्र!!! आता बोला...
बोला काय बोला? अहो कसली पंचाईत झालीये तुमची?

पंचाईतच नाय तर काय? एकीकडं कुनी जरा णिषेध क्येला तर त्याला चपल्या घाल आन चालू पड म्हनायचं आनी दुसरीकडं आसले आगलावे बोर्ड लावायचे, ह्ये काय बराबर हाय काय?
आगलावेपणा कसला? साधी सरळ घोषणा आहे ती!!!
साधी आन सरळ? मिपावरच्या आमच्या भगिनींना चांदन्या म्हनायचं हे काय आपल्याला पसंद पडल्यालं न्हायी!!
अरेच्चा, अहो पण त्यांनी मिपावरच्या स्त्रियांना कुठं चांदण्या म्हटलंय? ते अवांतर प्रतिसाद पकडून देणार्‍यांना चांदण्या देणार असं म्हणतायत!
त्ये खरं, पन कोनत्या भगिनीनं सर्वात जास्त चांदण्या मिळवून आपलं मुख मिपाच्या पृष्ठावर चमकावलं तर इतर मिपाकर तिला काय म्हननार सांगा की!!!
अहो पण त्याला त्या स्त्रीची हरकत नसेल तर?
तुमी शहराकडले वाटतं? आवो तिची लाख हरकत नसेल, पन आमची हाय ना!!! आमच्यात आसल्या गोष्टी बायकांना विचारून ठरवायची रीत न्हाय!!! व्हटावर या मिशा काय वगीच बाळगल्यात काय?

असं होय! पण बघा आपल्या मिपावर किती बर्‍यापैकी साहित्य येतं...
बर्‍यापैकी? आयला तुमी छुपे नमोगती तर नाय ना? च्यामारी मला सौंशय व्हताच!!!
अहो नाही, मी अस्सल मिपाकरच आहे हो!!!
न्हाय, "बर्‍यापैकी" हा शब्द वापरलांत म्हनून इचारलं!!! हिथं मिपावर काहीच "बर्‍यापैकी" नसतं राव!! हिथं समदं कसं हुच्च आनि गगनभेदी तरी आस्तंय नायतर येक्दम रंपाट इनोदी म्हंजी ठ्यांऽऽऽ करून काफी उडीवनारं आस्तंय!!!!

बरं, आणखी काही?
हां, तसं थोडं हीन आणि हिनकस पन आस्तंय...
खी, खी,खी!!!!
उगीच दात काढून हासू नका, हिनकसराव दात उपटून हातात देत्याल!! आवो म्हेनत करून मिळवल्याली शैली हाय ती!!!! सवता मालकांनी लंगुटी आन ताडगोळा देऊन सत्कार केलाय त्येंचा, काय समजलांत!!!

बरं, बरं नाही हसत! पण ते जाऊद्या, तुमची काय पंचाईत झालिये ते सांगा ना राव?
पंचाईत नायतर काय? हिथं अवांतर मेंबरं पण शेकडोंनी हायेत तर अवांतर प्रतिसादांना काय तोटा?
तेच म्हणतो मी!! अहो अगदी सोपं आहे. येणारे सगळे प्रतिसाद वाचायचे (मूळ लिखाण वाचलं नाहीत तरी चालेल!!), त्यातले अवांतर प्रतिसाद बाजूला काढून ते मालकांना गुपचूप कळवायचे आणि लग्गेच चांदणी मिळवायची!!! आहे काय त्यांत!!! आता लागा बघु कामाला....

आमाला जमनार नाय.....
का जमणार नाही?
आमाला पावर नाय....
तुम्हाला पॉवर नाही? म्हणजे तुम्हीच मिपाकर नाही?
तुझ्या आयला तुझ्या!!! म्या मिपाकर न्हाय तर काय उपक्रमी वाटलो काय रं तुला फोकलीच्या? आयला, हा बिल्ला बघ लंबर ४०१ हाय आपला!!! तुला तव्हां ल्ह्या-वाचाया तरी येत व्हतं का रं फोकलीच्या!!!!

मग तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे?
सांगिटलं ना, आमाला पावर नाय!!!!
अहो पण का?

आमी आदीच घरात येक चांदनी आनून ठेवल्याली हाये. आता नवीन चांदन्या गोळा कराया लागलो तर ती आमाला घरात ठिवून घील का? आन भुकेचं सोडा, कट्ट्यावर मिसळपाव खाता यील, पन रातच्याला निजायला काय तात्या तेच्या घरात जपानी गादी घालून देनाराय का?

अस्सं होय!!
मंग! न्हाय ते पालथे धंदे कराया कुनी सांगिटलेत? आपल्याच्यानं जमायचं न्हायी!!
बरोबर आहे तुमचं!

तर काय!! आपुन जातो बाबा आपल्या घरला!! आलो गं शेवंत्ये, आलो बिगीबिगी.......
:)
(संपूर्ण)

(आभारः पुलंचे पावरबाजपणासाठी!)

विनोद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 11:46 pm | विसोबा खेचर

अहो अगदी सोपं आहे. येणारे सगळे प्रतिसाद वाचायचे (मूळ लिखाण वाचलं नाहीत तरी चालेल!!), त्यातले अवांतर प्रतिसाद बाजूला काढून ते मालकांना गुपचूप कळवायचे आणि लग्गेच चांदणी मिळवायची!!! आहे काय त्यांत!!! आता लागा बघु कामाला....

डांबिसा, मानला रे बाबा तुला. लेख जबरा..! :)

एक निवेदन -

डांबिसाच्या या लेखाला अवांतर प्रतिसाद न देण्याचे बंधन नाही.. चालू द्या.. :)

आपला,
(काही कठोर निर्णय घेणारा परंतु मूळचा वाईट नसलेला) तात्या.

बेसनलाडू's picture

23 Jul 2009 - 11:48 pm | बेसनलाडू

लंगोटी नि टाडगोळा दिउन सत्कार, भगिनींचे मुख मिपाच्या पृष्ठावर झळकावणे वगैरे वगैरे ... हसू आवरत नाहीये. बे एरियात लवकरच होऊ घालणार्‍या स्नेहसंमेलनाच्यावेळी यावर जोरदार गप्पा झडणारसे दिसते आहे.
(लोटपोट)बेसनलाडू

प्राजु's picture

23 Jul 2009 - 11:51 pm | प्राजु

बाकी.. चांदन्या जोरदार करणार आहेत आता सगळे मिपाकर असं दिसतं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2009 - 12:28 am | बिपिन कार्यकर्ते

पिडां.... अहो लेखाला डिस्क्लेमर टाकत जा हो.... खरंच ठ्याँ झालं च्यायला. "लंगुटी आन ताडगोळा" =)) महान आहात!!!!

अवांतर: च्यामारी या चांदन्या घेऊ घेऊ लोकं पार चांदनी बार करतात का काय आता हितं?

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

24 Jul 2009 - 12:52 am | रेवती

लेख मस्त! भरपूर हसवलं पिडांनी!
बघूया आता टारू पुढचा लेख कोणता लेख लिहितोय!
'सहजीवनात.......' नंतर 'चांदण्यात फिरताना......' असे शिर्षक असलेला लेख आल्यास आश्चर्य वाटायला नको. ;)

रेवती

अनामिक's picture

24 Jul 2009 - 1:19 am | अनामिक

'चांदण्यात फिरताना....' ऐवजी 'चांदण्यात (लंगोटी घालून) फिरताना...' असे वाचावे का?

-अनामिक

घाटावरचे भट's picture

24 Jul 2009 - 2:09 am | घाटावरचे भट

काकानु, खरच ठ्ठ्याऽऽऽ करून हसलो. क लिवलय, क लिवलय!!!
= )) =)) =))

सहज's picture

24 Jul 2009 - 9:53 am | सहज

=))

नंदन's picture

24 Jul 2009 - 10:37 am | नंदन
Nile's picture

24 Jul 2009 - 11:48 am | Nile

=))

केशवसुमार's picture

24 Jul 2009 - 2:22 am | केशवसुमार

डांबिसशेठ,
"लंगुटी आन ताडगोळा" खी खि ख्खि
काय खरा णाय अता तुझा.. खी खि ख्खि
कोनीतर्री दिव्सा चांडन्या दाकवनार तुला..
बाकी चालू दे..
(पावरभाझ)केशवसुमार

हर्षद आनंदी's picture

24 Jul 2009 - 9:29 am | हर्षद आनंदी

ऐसाच बोल्त्या है . संभालके रहनेका, कुछ भी लोच्या हुवा ना तो पतली गली के साईड वाले कॉर्नरपैच रहता है परबुभाय....

वैसे चांदनी बोले तो शीरीद्येवी होने को मम्गता बाप!!!

चतुरंग's picture

24 Jul 2009 - 2:25 am | चतुरंग

लंगुटी आन ताडगोळे लई ब्येक्कार!!! :D :D

बरं झालं घरी येऊन वाचलं म्हणून! ;)

(ताडगोळा)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

24 Jul 2009 - 3:19 am | पिवळा डांबिस

काही प्रतिसाद वाचून हे निवेदन करणे आवश्यक वाटले की वरील लिखाणाचा फोकस हा हिणकसरावांवर नसून काही मिपाकरांच्या चांदण्या जमवायला धावण्याच्या संभाव्य भविष्यकालीन स्पर्धेवर आहे!!!

नाटक्या's picture

24 Jul 2009 - 3:48 am | नाटक्या

हे बाकी चांगले हो काका. आधी लेख लिहायचा नंतर निवेदन लिहायचे!!! पण तुम्हाला ती म्हण माहिती आहे का "लोक बदनामी वाचतात पण खुलासा वाचत नाहीत".

पण लेख छानच. ** "लंगुटी आन ताडगोळा" असं न वाचता "लंगोटीच्या आत ताडगोळा" असेच मी आधी चुकून वाचले **

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

श्रावण मोडक's picture

25 Jul 2009 - 6:11 pm | श्रावण मोडक

हे निवेदन वाचलेच नव्हते... मग त्यामुळं पुन्हा लेख वाचला. लिखाणाचा फोकस समजून घेताना
साधी आन सरळ? मिपावरच्या आमच्या भगिनींना चांदन्या म्हनायचं हे काय आपल्याला पसंद पडल्यालं न्हायी!!
अरेच्चा, अहो पण त्यांनी मिपावरच्या स्त्रियांना कुठं चांदण्या म्हटलंय? ते अवांतर प्रतिसाद पकडून देणार्‍यांना चांदण्या देणार असं म्हणतायत!
त्ये खरं, पन कोनत्या भगिनीनं सर्वात जास्त चांदण्या मिळवून आपलं मुख मिपाच्या पृष्ठावर चमकावलं तर इतर मिपाकर तिला काय म्हननार सांगा की!!!

या वाक्यांनी एका जुन्या जोरदार वादाची आठवण झाली. तो वाद हवाई सुंदऱ्यांवरून झडला होता. इथे नाही, तिथे!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jul 2009 - 9:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

काका, बर्‍याच दिवसांनी बोर्डावर (म्हणजे मिपाच्या मुखपृष्ठावर हो!) दिसलात आणि एकदम शेंचुरी!! दिवसाची सुरूवात एकदम एक लंबर झाली!

अदिती

अवलिया's picture

24 Jul 2009 - 9:35 am | अवलिया

=)) =))

लै दिवसांनी दर्शन ... झक्कास !

--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

पाषाणभेद's picture

24 Jul 2009 - 10:47 am | पाषाणभेद

:-)

अवांतर: हा अप्र नाही.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

श्रावण मोडक's picture

24 Jul 2009 - 10:55 am | श्रावण मोडक

माझी इतक्या उशीराची सकाळ सुंदर झाली. वा.

निखिल देशपांडे's picture

24 Jul 2009 - 11:26 am | निखिल देशपांडे

अरे आज काय हसवायचे ठरवले आहे की काय संगळ्यांनी
अदीती चे विडंबन आणी आता पिडा काकांचा लेख मस्तच आहे हो ;)
लंगुटी आन ताडगोळे
=)) =))

निखिल
================================

सुप्रिया's picture

24 Jul 2009 - 11:33 am | सुप्रिया

एक नंबर लेख!
=)) =)) =)) =))

विनायक प्रभू's picture

24 Jul 2009 - 11:53 am | विनायक प्रभू

श्रावणात लेखणी विराम सोडावा ह्या विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद.
ह्या विषयावर साधारण ४ व्य. नी मधे पि.डां बरोबर जे संभाषण झाले ते त्यांनी काकुला पण दाखवले.
तुम्हा दोघांचे 'बॉड्'(डोके) फिरल्याचा निर्वाळा काकुंनी दिला.
डांबिस आला
हर्ष मानसी
प्रतिसाद दाटे चोहीकडे
(पुढच्या ओळी रंगा शेठ विमानात बसुन पुर्ण करतील)

यशोधरा's picture

24 Jul 2009 - 11:56 am | यशोधरा

=))

शाल्मली's picture

24 Jul 2009 - 1:06 pm | शाल्मली

=))
एक नंबर

--शाल्मली.

इनोबा म्हणे's picture

25 Jul 2009 - 5:57 pm | इनोबा म्हणे

हे हे हे... लय भारी :)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2009 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

___/\___ आपण धन्य आहात.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

टारझन's picture

25 Jul 2009 - 9:25 pm | टारझन

सवता मालकांनी लंगुटी आन ताडगोळा देऊन सत्कार केलाय त्येंचा, काय समजलांत!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
काय बोलणार ? मागचा बदला घेतलाय :(

@रेवती : ............................................................... चांदण्या घसघशीत चांदण्या देणारा आणि चपला खपवणारा लेख लिहू म्हणताय ?

अवांतर :
नविन नियम लागू झाल्याने मनमोकळा प्रतिसाद लिहू शकत नाही काका !
ह्या विभागात एक लय भारी प्रतिदास टाकणार होतो !!
पण असो .. तुमचे दुर्दैव .. लेट काढलास धागा !!

(सुतकी चेहर्‍याचा मिपाकर) टारझन
नको करू कुटाळक्या || धर पंथ हाय्,हॅलोचा ||