वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
22 Jul 2009 - 12:05 pm

आमची प्रेरणा धोंडोपंत यांची सुरेख गझल बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले

सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे?
ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे?

दुष्ट सासू आज बघ ही नेमकी आली घरी
झोपण्या आम्हा घरी मग कोपरा उरला कुठे?

ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?

आमची घाईच नडली काल पार्किंगच्यामधे
हात मग तो ठणकणारा वापरा उरला कुठे?

वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले
'केशवा' जाली तुला रे, आसरा उरला कुठे?

----केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

Nile's picture

22 Jul 2009 - 12:25 pm | Nile

हा हा हा हा! लई भारी! =)) =))

दशानन's picture

22 Jul 2009 - 12:26 pm | दशानन

सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे?
ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे?

दुष्ट सासू आज बघ ही नेमकी आली घरी
झोपण्या आम्हा घरी मग कोपरा उरला कुठे?

ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?

ज ब रा !!

+++++++++++++++++++++++++++++
काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)

बेसनलाडू's picture

22 Jul 2009 - 12:26 pm | बेसनलाडू

भन्नाट!
(आस्वादक)बेसनलाडू

चेतन's picture

22 Jul 2009 - 12:28 pm | चेतन

लय भारी गुर्जी

चेतन :))

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 12:34 pm | श्रावण मोडक

जोरदार मालक... जोरदार.

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 12:41 pm | पाषाणभेद

पार्किंगच्यामधे हाताला अपघात होण्याचे काय कारण? हात कुठे घातला होता?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 12:46 pm | बिपिन कार्यकर्ते

आद्यजालविडंबक केसुगुर्जींना साष्टांग नमस्कार!!! एकदम छप्परफाड विडंबन!!!

बिपिन कार्यकर्ते

चित्तरंजन भट's picture

22 Jul 2009 - 1:59 pm | चित्तरंजन भट

हृदयविदारक कविता
सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे?
ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे?

थोडक्यात एखाद्याला मारून मारुती बनवणे!

ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?

काय म्हणू! कविता आवडली असेही म्हणता येत नाही. हे भीषण वास्तव आहे.

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 2:09 pm | श्रावण मोडक

ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?
काय म्हणू! कविता आवडली असेही म्हणता येत नाही. हे भीषण वास्तव आहे.

अगदी अगदी. वास्तव. त्यामुळे कटूच.

चित्तरंजन भट's picture

22 Jul 2009 - 3:58 pm | चित्तरंजन भट

कडू व आंबट आणि नकली व भेसळयुक्त असे भीषण वास्तव का?

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 4:02 pm | श्रावण मोडक

फारच मनकवडे तुम्ही. :)

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 2:20 pm | विसोबा खेचर

जबर्‍या रे केशवा..

तात्या.

लिखाळ's picture

22 Jul 2009 - 5:49 pm | लिखाळ

वा वा वा !
खूपच मस्त :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

चतुरंग's picture

22 Jul 2009 - 5:59 pm | चतुरंग

आज लई दिसांनी एकदम तबियतदार विडंबन झाले!
एकदम छप्परफाड!! :D :D

(नो पार्किंग)चतुरंग

दत्ता काळे's picture

22 Jul 2009 - 6:11 pm | दत्ता काळे

ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?

. . . हे तर वास्तवदर्शी च आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2009 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच ओळी झकास !
और भी आने दो............ :)

टुकुल's picture

22 Jul 2009 - 8:23 pm | टुकुल

धन्य तुम्ही...

--टुकुल.

वेताळ's picture

22 Jul 2009 - 9:27 pm | वेताळ

खुपच बहारदार .......येवु द्या
अजुन. =))
वेताळ

_समीर_'s picture

22 Jul 2009 - 9:31 pm | _समीर_

संकुचित विडंबन आवडले. :)

विजुभाऊ's picture

23 Jul 2009 - 11:43 am | विजुभाऊ

आमची घाईच नडली काल पार्किंगच्यामधे
हात मग तो ठणकणारा वापरा उरला कुठे?

या ओळी काही उमजल्या नाहीत त्यामुळे कवितेची मजा घेता आली नाही

सूहास's picture

23 Jul 2009 - 8:11 pm | सूहास (not verified)

<<<सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे>>>
=)) =)) =)) =)) =)) मारुतीच झालाय की ??

<<<वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले
'केशवा' जाली तुला रे, आसरा उरला कुठे?>>>

आम्ही आहोत की अजुन, सरकार ?
=D> =D> =D> =D> =D>

सुहास

केशवसुमार's picture

24 Jul 2009 - 2:24 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार