आयुष्याच्या वळणावरचा..
अन्तिम टप्पा सार्थकतेचा!
पुर्णतेचा, परिपुर्णतेचा..
शुचितेचा, सुख-प्राप्तीचा..
उन्नतीचा...निवृत्तीचा !
आयुष्याच्या वाटेवरची...
सर्वोच्च पावती तृप्ततेची!
सुखाची, समाधानाची..
गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची..
जाणीव सुखाची...निवृत्तीची!
मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा..
ऐहिकतेच्या विलोपनाचा!
भौतिकाच्या निरोपाचा..
पारमार्थिक प्रारंभाचा..
वेध तो अद्वैताचा..अनंताचा!
ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव ...निवृत्तिचा !!
विशाल.
प्रतिक्रिया
17 Jul 2009 - 10:24 pm | प्राजु
क्या बात है!!
ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव ...निवृत्तिचा !!
सुंदर आहे हे कडवे.. ज्ञानराज, सोपान, मुक्ता आणि निवृत्ती.. सगळेच आले. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Jul 2009 - 9:05 pm | मनीषा
सुरेख कविता !
18 Jul 2009 - 12:09 pm | ठकू
वाचताना अतिशय शांत शांत वाटत होतं.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
18 Jul 2009 - 9:30 pm | अनिरुध्द
छानच 'निवृत्ती' घेतल्येय तुम्ही. कविता आवडली.
18 Jul 2009 - 11:01 pm | पक्या
सुंदर कविता. समजायलाही सोपी
19 Jul 2009 - 12:07 am | हवालदार
विशालराव,
तरुण वयात एकदम निव्रुत्तिचे वेध का?
कविता मात्र एक्दम झक्कास.
हवालदार
19 Jul 2009 - 9:03 am | विसोबा खेचर
सुरेख रे..!
तात्या.
20 Jul 2009 - 9:43 am | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार!
काही दिवसांपुर्वी, आम्ही माझे वडील ति. आण्णांची एकसष्ठी साजरी केली, त्यानिमित्त ही कविता केली होती आण्णांसाठी.
धन्यवाद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...