इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ नि:शब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर
ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर
विशाल
प्रतिक्रिया
16 Jul 2009 - 12:08 pm | बेसनलाडू
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर
या ओळी फार आवडल्या. चित्रदर्शी कविता - चित्रातल्यासारखीच!
(आस्वादक)बेसनलाडू
16 Jul 2009 - 12:14 pm | मदनबाण
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर
व्वा.
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
झक्कास्स...
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
16 Jul 2009 - 8:58 pm | क्रान्ति
सुंदर कविता. खास त्या चित्राचीच कविता! दोन्हीही मनापासून आवडलं.
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
16 Jul 2009 - 9:06 pm | प्राजु
सुरेख!
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
अप्रतिम!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 9:47 pm | अनिरुध्द
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
यामधे असा नि:शब्द हवा होता. बाकी कविता झकासच.
अजून येऊद्यात.
17 Jul 2009 - 9:36 am | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार! :-)
अनिरुद्धजी अपेक्षित बदल केलाय, धन्यवाद! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...