संडे स्पेशल (मिंटी मशरुम रोल्स)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
9 Mar 2008 - 12:14 am

मशरुम आणि पुदिनाचा वापर करुन हे रोल्स स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून करु शकतो.
साहित्यः
४ उकडलेले बटाटे (मॅश करुन २ कप)
२ ब्रेडचे स्लाईस कडा काढलेले (ब्रेड क्रम्ब्स)
१/२ टी.स्पून गरम मसाला
१/२ टी.स्पून लाल तिखट
तेल तळण्यासाठी
अंड्यातील पांढरा बलक
थोडे ब्रेड क्रम्ब्स कोटींग साठी
सारणः
१ टे.स्पून बटर
१५० ग्रॅम मशरूम बारीक चिरून (दिड कप)
१/४ कप बारीक चिरलेला पुदीना
१ मोठा कांदा बारीक चिरून ( अर्धा कप)
मीठ, काळी मिरी पूड चवीनुसार

१.बटाटे उकडून घ्या. गरम असतानाच मॅश करुन घ्या नाहीतर थंड झाल्यावर किसून घ्या.
त्यात ब्रेड क्रम्ब्स, गरम मसाला, तिखट, मीठ घाला. चव पाहून बाजुला ठेवा.
२.सारण तयार करण्यासाठी पातेल्यात बटर गरम करून कांदा घालून मऊ होइपर्यंत परतवा. नंतर मशरूम घालून ४/५ मिनिटे परतवा.
त्यांतील पाणी सुकून ते कोरडे व्हायला हवेत. पुदीना, मीठ, मिरीची पूड घालून चांगले परतवा व सारण थंड होउ द्या.
३.बटाट्याच्या मिश्रणाचे सारखे ८ भाग करा.प्रत्येक भागाचा लांबट पोळीप्रमाणे आकार करून त्यात एक एक चमचा वरील सारण भरा व त्यांचे रोल्स बनवा.
४.अंड्यातील पांढरे, १ मोठा चमचा पाण्यात फेटून त्यात हे रोल्स बुडवून लगेच काढा व ब्रेडक्रम्ब्स मध्ये घोळा.
५.तेलात सोनेरी/ब्राउन होईपर्यंत तळा.

टोमॅटो सॉस, पुदिना किंवा खजुराच्या आंबट गोड चटणी बरोबर वाढा.

मांडणी

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Mar 2008 - 12:24 am | प्राजु

हे तर एकदम सोप्पं आहे मस्ताड (गुड्-बेटर्-बेस्ट.. तसे मस्त- सह्ही-मस्ताड)आहे....
उद्या सन्डे आहे न.. उद्याच याचा प्रयोग होईल घरी.

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 8:45 am | विसोबा खेचर

बरं का स्वातीताई,

आज मात्र आम्ही तुमच्या पाकृला दाद देऊ शकत नाही कारण आम्हाला मशरूम हा प्रकार आवडतच नाही! :(

असो, आज आमची आवडती पाकृ न दिल्यामुळे तुम्हाला आम्ही खालील शिक्षा फर्मावत आहोत -

ओल्या जवळ्याची किंवा सुक्या जवळ्याची जेवताना तोंडी लावायला करतात त्या चटणीची पाकृ द्यावी.

तसेच ओला जवळा हा प्रकार बघून घ्यावा लागतो. तो जरा जरी खराब असेल तर पोट बिघडतं असं म्हणतात. तरी बाजारातून चांगला जवळा कसा बघून घ्यावा ह्या बद्दलही दोन ओळी लिहिण्याची शिक्षा आम्ही तुम्हाला फर्मावत आहोत! :)

तात्या.

आळंबीच्या मश्रूम कोकणात वर्षातून १५एक दिवस मिळतात. त्या फार चविष्ट असतात. पण बाजारात, हवाबंद डब्यांतून मिळणार्‍या "बटण" मश्रूम तशा कंटाळवाण्या असतात हे मान्य.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 9:46 am | प्राजु

हे काय असतं? धान्य आहे की आणखी काही? आणि त्यात ओला आणि सुका असे दोन प्रकार असतात का?
स्वाती, प्रकाश टाकावा.
- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 2:06 pm | स्वाती राजेश

याला काही दुसरे नाव आहे का? तात्या गुगली नाही ना टाकला?:))

तसेच जावळी/जावली म्हटले शिवाजी/अफजलखान आठवले.:))))

बाकी मी या बाबतीत अज्ञानी आहे तेव्हा आपणच सांगा. आमच्या ज्ञानात भर पडेल.
वाट पाहात आहे अर्थाची..