मी लिहितो तेव्हा...

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जे न देखे रवी...
15 Jul 2009 - 1:19 pm

============

मी लिहितो तेव्हा माझी,
लेखणी बासरी होते
मी जिथे सारखा बसतो
ती अशी ओसरी होते

मी लिहितो तेव्हा सगळ्या
सृष्टीचा कागद होतो
शब्दांच्या वर्षावाला
जो टिपतो, ओला होतो

मी लिहितो तेव्हा लिहिणे,
स्वप्नाहून सुंदर होते
कवितेच्या दवबिंदूंनी
पानांची थरथर होते

मी लिहितो तेव्हा तेव्हा,
मी लिहितो ऐसे काही,
जणू धमन्यांमधे माझ्या
वाहते जांभळी शाई..

मी लिहितो तेव्हा मजला,
जाणवते अपुले अंतर
कवितेच्या थोडे आधी,
कवितेच्या थोडे नंतर....!

-ज्ञानेश.
==============

(नमस्कार मिपाकर मंडळी... मी सदस्य म्हणून इथे तसा नव्यानेच आलोय. 'पाहुणा' म्हणून बर्‍याच दिवसांपासून आहे.
मिपाकरांनी या कवितेवर आपला अभिप्राय कळवावा.)

कविता

प्रतिक्रिया

जागु's picture

15 Jul 2009 - 1:23 pm | जागु

शेवटच कडव आवडल.

क्रान्ति's picture

15 Jul 2009 - 1:34 pm | क्रान्ति

सुरेख कविता. शेवटचं कडवं तर खूप खास.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2009 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

झकासच हो ज्ञानेश्वर माउली.

मी लिहितो तेव्हा माझी,
लेखणी बासरी होते

ह्या ओळी एकदम मस्तच.

©º°¨¨°º© परा महानोर ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

15 Jul 2009 - 3:20 pm | विशाल कुलकर्णी

वा ज्ञानेशराव, मस्त ! आवडली :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नितिन थत्ते's picture

15 Jul 2009 - 3:34 pm | नितिन थत्ते

छान कविता. आवडली. =D>

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सुवर्णमयी's picture

15 Jul 2009 - 8:51 pm | सुवर्णमयी

मस्त

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jul 2009 - 8:59 pm | llपुण्याचे पेशवेll

वाहवा.. छानच आहे कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्राजु's picture

15 Jul 2009 - 9:11 pm | प्राजु

कवितेच्या दवबिंदूंनी
पानांची थरथर होते

क्या बात है!!
कवितेचा शेवट खूप आवडला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 11:36 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

15 Jul 2009 - 9:13 pm | धनंजय

कल्पना छान आहेत

चतुरंग's picture

15 Jul 2009 - 10:13 pm | चतुरंग

कविता आवडली. मिपावर स्वागत! :)
(आमचा दुसरा अभिप्राय इथेही वाचता येईल! ;) )

चतुरंग

नितिन थत्ते's picture

16 Jul 2009 - 10:18 am | नितिन थत्ते

रंगाशेठनी किंवा केशवसुमारांनी विडंबन केले तर कविता चांगली असल्याची पावतीच समजावी.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

चन्द्रशेखर गोखले's picture

15 Jul 2009 - 10:26 pm | चन्द्रशेखर गोखले

छानच ! पहिल्याच चेंडुवर चौकार बरका !!

अवलिया's picture

15 Jul 2009 - 11:19 pm | अवलिया

वा ! मस्त !!

--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

ज्ञानेश...'s picture

16 Jul 2009 - 7:58 am | ज्ञानेश...

सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो.

@चतुरंग राव- तुमचा 'दूसरा' ही आवडला. ;)

"Great Power Comes With Great Responssibilities"

दत्ता काळे's picture

16 Jul 2009 - 1:15 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

लिखाळ's picture

16 Jul 2009 - 3:29 pm | लिखाळ

छान !
शेवटचे कडवे छान. मिपावर स्वागत :)
-- लिखाळ.

बेसनलाडू's picture

16 Jul 2009 - 11:59 pm | बेसनलाडू

सुंदर कविता. आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

टुकुल's picture

17 Jul 2009 - 12:43 am | टुकुल

कविता मस्तच....
>>>(नमस्कार मिपाकर मंडळी... मी सदस्य म्हणून इथे तसा नव्यानेच आलोय. 'पाहुणा' म्हणून बर्‍याच दिवसांपासून आहे.
मिपाकरांनी या कवितेवर आपला अभिप्राय कळवावा.) <<<

भौ, तुमचा बिल्ला नंबर १४४६ आहे.. मग तुम्ही नवे सद्स्य कसे? :?
कधी कधी डोक नको त्या गोष्टित चालत म्हणुन विचारले..

ज्ञानेश...'s picture

19 Jul 2009 - 7:10 am | ज्ञानेश...

आपली शंका रास्त आहे.
मी खाते उघडून बरेच दिवस झाले आहेत. पण मी मिपावर खाते उघडले आहे, हे मीच विसरलो होतो.
आता नव्याने खाते उघडले, त्यावेळी 'तुमचा विरोपपत्ता आधीच वापरात आहे" असा संदेश दिसला. पाहिले, तर माझेच नाव!
म्हणून मी नवा ! (जुना म्हटलात तरी हरकत नाही !!) :>

"Great Power Comes With Great Responsibilities"

मदनबाण's picture

17 Jul 2009 - 6:27 am | मदनबाण

छान.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

ऋषिकेश's picture

17 Jul 2009 - 9:18 am | ऋषिकेश

मस्त!
शेवटचे कडवे विशेष आवडले
मिपावर स्वागत

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे