राम राम मायबाप मिपाकरहो,
मिपाच्या संपादक मंडळात काही बदल करण्यात आलेले आहेत. प्रियाली आणि मृदुला यांना हल्ली कामाच्या व्यग्रतेमुळे संपादक पदाला पुरेसा न्याय देता येत नाही. प्रियाली यांनी यापूर्वीच तसे सांगितले होते.
असो..
आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मिपाचे एक सन्माननीय सदस्य, हितचिंतक आणि आमचे मित्र बिपिन कार्यकर्ते यांना मिपाचे संपादक पद बहाल करण्यात आलेले आहे. मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे.
आज दिनांक १ जुलै रोजीचे संपादक मंडळ खालीलप्रमाणे. मिपावर वावरतांना, लेखन करतांना, कुणालाही काही अडचण आल्यास या पैकी कुणा एका संपादकाशी खरडी अथवा व्य नि द्वारा संपर्क साधावा अथवा आम्हाला लिहावे.
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
२) चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त)
३) मुक्तसुनीत (संपादक + विशेष अतिरिक्त भार - साहित्य, काव्य विभाग)
४) बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
६) नीलकांत (संपादक + तंत्रविभाग प्रमुख)
७) विकास (संपादक + विशेष अतिरिक्त भार - राजकीय व वैचारिक लेख/काथ्याकूट)
८) प्राजू (संपादक + विशेष अतिरिक्त भार -काव्य विभाग)
९) चित्रा (संपादक + विशेष अतिरिक्त भार - फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
१०) नंदन (संपादक + विशेष अतिरिक्त भार -साहित्य विभाग, पाककृती )
वरील सर्व संपादक आपल्या व्यस्त दैनंदिन कामकाजातून वेळात वेळ काढून मिपा स्म्पादक पदाची जिम्मेदारी सांभाळतात त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे...
आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
1 Jul 2009 - 12:50 pm | छोटा डॉन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा ...!!!
होऊन जाऊद्यात ...
जय हो !
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
1 Jul 2009 - 12:58 pm | निखिल देशपांडे
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा ...!!!
असेच म्हणतो...
==निखिल
1 Jul 2009 - 1:00 pm | शितल
सहमत. :)
शुभेच्छा रे बिपीनदा. :)
1 Jul 2009 - 5:35 pm | पर्नल नेने मराठे
मन्दी त बढ्ती ...नशिब आहे बाबा ;)
चुचु
1 Jul 2009 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिपीन कार्यकर्ते, संपादकाच्या संघात आपले स्वागत आहे.
>>१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
=))
तात्या, अहो, कोनी नै भेटले का ? शुद्धलेखन आणि व्याकरणावर देखरेख ठेवायला ! :)
(आम्ही कोणत्या तोंडाने त्या शुद्धलेखनावाल्यांना विरोध करणार आता)
-दिलीप बिरुटे
1 Jul 2009 - 7:34 pm | चतुरंग
तुमच्या लक्षात आलेलं नाही असं दिसतंय!
अहो 'लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!! ;)
(अशुद्ध)चतुरंग
1 Jul 2009 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!!
हा हा हा :)
अगदी-अगदी, असाच काही उद्देश असेल तात्यांचा !!!
(किंवा डिलीट वगैरेच्या वाढत्या तक्रारीमुळे दुसरे खाते दिले असेल) ;)
-दिलीप बिरुटे
(वरिष्ठ संपादक +संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभागप्रमुख )
1 Jul 2009 - 9:18 pm | अजय भागवत
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
सुखद धक्का बसला व मिश्कीलपणे हसलो, घ्या आता!-असे मनात म्हणालो.
सर्वांचे अभिनंदन!
2 Jul 2009 - 10:32 am | पर्नल नेने मराठे
:| ह्म्म
चुचु
3 Jul 2009 - 11:28 am | विजुभाऊ
अभिनन्दन.
तात्यानी यावेळेस ठाणे पुणे कोल्हापूर मराठवाडा असा उत्तम समन्वय साधला आहे
1 Jul 2009 - 12:53 pm | घाटावरचे भट
>>विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण
ए क्या चीज है?
बाकी बि३कांना 'बढती' बद्दल बहुत बहुत बधाई!!
1 Jul 2009 - 12:54 pm | प्रसन्न केसकर
बिपिनजींचे! फौजदारीची जबाबदारी सांभाळताना जरुर वाटली तर पम्या नक्कीच आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. काय आहे, क्राईम रिपोर्टिंग करताना त्याने बर्याच ट्रिका शिकल्यात....
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
1 Jul 2009 - 12:58 pm | कुंदन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन !!!
1 Jul 2009 - 2:35 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म
चुचु
1 Jul 2009 - 12:58 pm | नंदन
>>> मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे.
- सहमत आहे, अभिनंदन :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Jul 2009 - 1:10 pm | सहज
सहमत आहे.
बिकाकाका झिंदाबाद!!
1 Jul 2009 - 12:58 pm | कुंदन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन !!!
1 Jul 2009 - 8:29 pm | प्राजु
बिपिनदा... खूप खूप अभिनंदन!!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jul 2009 - 1:06 pm | Nile
बिकांचे अभिनंदन.
मिपा वर शीस्त आणि आपुलकीचे वातावरण ठेवणार्या सर्व संपादकांचे आम्हीही ऋणी आहोत.
1 Jul 2009 - 1:10 pm | नितिन थत्ते
अभिनंदन बिपिन!!!
खवतले ते लालभडक चित्र जाणार तर.... :?
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 1:51 pm | अवलिया
बिपिनशेटचे मनःपुर्वक अभिनंदन :)
अवांतर - तात्या, एक ओळ धागा नियमनाचा अतिरिक्त भार कुणावर आहे रे ?
--अवलिया
1 Jul 2009 - 1:26 pm | ऋषिकेश
अरे वा! अभिनंदन! :)
मिपाचे असे संपादक हे जगजाहिर व अप्रोचेबल असल्याने मिपा आपलेसे वाटायला अजून एक कारण मिळते.
चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
1 Jul 2009 - 1:42 pm | छोटा डॉन
>>चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी
=))
क्या बात है ऋष्याभाई क्या बात है....
मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो,
हम तुम्हारे साथ है ...
------
(अभिनंदनाच्या फलकात अनुदान ढापणारा ग्रास रुट लेल्व्हलवरचा कार्यकर्ता )छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
1 Jul 2009 - 1:46 pm | सहज
नक्कीच, सर्वात जास्त मताधिक्य घेउन निवडून येईल असा खात्रीचा हा संपादक.
मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो,
हम तुम्हारे साथ है ...
1 Jul 2009 - 3:54 pm | दशानन
सहमत.
अभिनंदन.
थोडेसं नवीन !
1 Jul 2009 - 1:49 pm | बिपिन कार्यकर्ते
ऋष्या, लेका पहिला तुझाच प्रतिसाद संपादित करतो. ;)
बिपिन कार्यकर्ते
1 Jul 2009 - 1:38 pm | मेघना भुस्कुटे
अरे! हाबिणंदन!
1 Jul 2009 - 1:40 pm | पर्नल नेने मराठे
अभिनंदन!
चुचु
1 Jul 2009 - 1:42 pm | नितिन थत्ते
प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख
हे हो काय वाचतोय, तात्या?
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 1:45 pm | बिपिन कार्यकर्ते
हापिसात आहे. जरा वेळ बाहेर गेले होतो. परत आलो तर पब्लिकचे अभिनंदनाचे मेसेजेस आणि खरडी. काहीच कळेना. मग मिपाचे मुपृ रिफ्रेश केले तर हा धागा दिसला. आज एक तारीख आहे हे आठवत होते, पटकन महिना चेक केला. जुलै. चला, म्हणजे एप्रिल फूल तर नक्कीच नाही.
ही जबाबदारी गळ्यात घातल्याबद्दल तात्यासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ;) आणि धन्यवाद. :) सर्व सदस्यांनाही धन्यवाद. यापुढे सहकार्य करा हीच विनंती.
खरं तर संपादक म्हणजे काय हेही माहित नाहीये. कधी ही अपेक्षा पण केली नव्हती. त्यामुळे आता काय काय करायचे असते त्याची माहिती करून घ्यावी लागेल. माझ्या वतीने एवढेच सांगतो,
इथे वावरताना टिंगलटवाळी मधे कुठेही कमी पडणार असा प्रयत्न करेन. ;) निष्पक्षपातीपणे वागायचा पूर्ण प्रयत्न करेन. आपल्या पैकी कोणाला कधी कधी माझे एखादे मत अथवा कृत्य आवडणार नाही. पण त्यामागे माझ्या माणूस म्हणून असलेल्या मर्यादा असतील, कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आकस / राग / लोभ असले कारण असणार नाही. काही सांगायचे असले तर स्पष्ट आणि थेट संपर्क साधावा. सहकार्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सांभाळून घ्या. :)
बिपिन कार्यकर्ते
1 Jul 2009 - 1:48 pm | घाटावरचे भट
चला, आता ऑफिशियली शपथविधीसुद्धा झाला. काही विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे ऐकतो. असो.
1 Jul 2009 - 2:03 pm | नितिन थत्ते
विरोधक चहापानावर बहिष्कार घालतात. आपल्या कुणावर बहिष्काराची वेळ येणार नाही कारण बिपिनरावचंद्रजी कार्यकर्ते बहुधा 'चहा'पानाला बोलावणार नाहीत.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 1:47 pm | यशोधरा
अभिनंदन बिपिनदा :)
>>विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदा>>>> हे काय आहे हो? ;)
1 Jul 2009 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते
ही तयारी आहे... बांबू वगैरे... ;)
बिपिन कार्यकर्ते
1 Jul 2009 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेहेहे कल्जि घेने.
अवांतरः अभिनंदन.
अतिअवांतरः बिकांचे नवीन नाव: बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब.
बोला, बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेबांचा, विजय असो.
1 Jul 2009 - 1:55 pm | कपिल काळे
बिप्स
अभिनंदन!!
1 Jul 2009 - 1:58 pm | अनंता
बिकांचे त्रिवार अभिनंदन.
आजपासून बिपिनजी आमचे नेते.
आम्ही त्यांचे कार्यकर्ते :)
तात्या, हे काय...?
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
या धाग्यापासूनच सरांना कामाला लावलेत तर!!
असो. हलकेच घ्यालच.
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
1 Jul 2009 - 2:04 pm | प्राची
मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब (बिपीनदा) यांचे अभिनंदन!!!!:)
1 Jul 2009 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार
अरे रे !
असो..
अभिनंदन हो कार्यकर्ते साहेब.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 Jul 2009 - 2:45 pm | टारझन
आर्रार्रार्रा ... काय खरं नाही ... एक मावळा फितुर झाला ;)
असो , बढती मिळालेल्या मावळ्याचे (लोकालाजे) अभिणंदण !!
तात्या आगे बढो !! बिका आप भी आगे बढो !! (आता आमच्या मागे कोण?)
- टारझन
अध्यक्ष , मिपा राडा-कल्ला मित्र मंडळ
1 Jul 2009 - 2:45 pm | आपला अभिजित
बिपीनरावांचे जाहीर सांत्वन!! :D
असंख्य टवाळ, पोटदुखे, विघ्नसंतोषी, जळू, कुरापतखोर, रिकामटेकड्या मिपाकरांच्या (छे! असे मिपाकर आहेत? अब्रह्मण्यम्!) खरडी नि व्यनि झेलण्यासाठी शुभेच्छा!! :H
बाय द वे तात्या,
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
२) चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त)
३) मुक्तसुनीत (संपादक + विशेष अतिरिक्त भार - साहित्य, काव्य विभाग)
४) बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
६) नीलकांत (संपादक + तंत्रविभाग प्रमुख)
७) विकास (संपादक + विशेष अतिरिक्त भार - राजकीय व वैचारिक लेख/काथ्याकूट)
८) प्राजू (संपादक + विशेष अतिरिक्त भार -काव्य विभाग)
९) चित्रा (संपादक + विशेष अतिरिक्त भार - फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
१०) नंदन (संपादक + विशेष अतिरिक्त भार -साहित्य विभाग, पाककृती )
बहुतांश संपादकांपुढे कंसात `अतिरिक्त भार' असे लिहिले आहे. म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? ;)
1 Jul 2009 - 5:31 pm | विकास
>>>म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? <<<
=))
एकदम मस्त! कदाचीत तात्यांनी दोन्ही अर्थांनी म्हणले असेल फक्त ते इतक्या खुबीने म्हणले आहे की ज्याला/जीला जो हवा तो अर्थ त्याने/तिने घ्यावा. माझ्यापुरता मी पहीलाच अर्थ घेत आहे. ;)
बाकी "आदरणीय माननीय बिपिनजीरावजी कार्यकर्तेसाहेबांचे" अभिनंदन.
ज्यांच्या नावात "कार्यकर्ते" हा शब्द आहे, त्यांच्याकडून हे सार्वजनिक काम चांगलेच होईल याततिळमात्र शंका नाही :)
1 Jul 2009 - 5:39 pm | चतुरंग
चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त)
हे म्हणजे 'विडंबकाहाती काव्यदालनाच्या किल्ल्या' असंच झालं की!!! B) :D
(जमादार)चतुरंग
1 Jul 2009 - 2:59 pm | सूहास (not verified)
खा॑दे भक्कम करा...कारण दिवस अतिरिक्त भाराचे आहेत..फक्त " "अतिरिक्त भारनियमन"" होउ देउ नका...
अभिन॑दन........
सुहास
1 Jul 2009 - 3:52 pm | सुनील
बिकांचे अभिनंदन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Jul 2009 - 4:06 pm | नितिन थत्ते
कार्यकर्त्यांचे नेते होतात तेव्हा जो बदल घडतो तो घडणार नाही अशी खात्री आहे. :) :D
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 4:43 pm | चतुरंग
ह्म्म ...शेवटी मध्यपूर्वेलामिपाच्या जागतिक नकाशात स्थान मिळालं तर! B)
(खुद के साथ बातां १ - बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे) हे म्हणजे दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय?);)
(फौजदार)चतुरंग
1 Jul 2009 - 4:57 pm | श्रावण मोडक
तुमच्या खुदके साथा बातांशी अगदी सहमत.
1 Jul 2009 - 7:23 pm | चित्रा
दांडगटांना फौजदारी देण्याचा हेतू असला तर मग मला तात्या नक्की काय समजतात? :(
1 Jul 2009 - 7:26 pm | मस्त कलंदर
हार्दीक अभिनंदन!!!
दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय? ;)
माझ्या मनात अगदी हेच आलं होतं..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jul 2009 - 4:45 pm | शुभान्गी
अभिनंदन बिपिनभाऊ!!!
1 Jul 2009 - 4:47 pm | शुभान्गी
अभिनंदन बिपिनभाऊ!!!
1 Jul 2009 - 4:54 pm | हरकाम्या
अभिनंदन बिपिनभाउ, आपल्या कार्यकाळात " कामानंद विद्यापीठ '
यासारखे यंगारभ लेख काथ्याकुट मध्ये वाचायला मिळणार नाहीत
अशी अपेक्षा करतो.
1 Jul 2009 - 5:42 pm | मुक्तसुनीत
बिपिनचे मन:पूर्वक अभिनंदन.
1 Jul 2009 - 6:00 pm | तर्री
हार्दीक अभिनन्दन.
ह्या निमित्त काही विचार.
हल्ली मजकुरापेक्षा मथळे महाग आहेत.
सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे संपवाल्.....
संपाद़क मंडळी मधील सुरू होतील ह्याची काळजी घ्यावी.
आपली प्रसिध्दी करणे / दुस्र्याची बदनामी करणे ह्या एकाच नण्याच्या दोन बाजू " नाहीत."
1 Jul 2009 - 6:00 pm | विनायक प्रभू
एक कंपुबाज कमी झाला.
आता माझ्या लेखाचे काय खरे नाही.
1 Jul 2009 - 7:00 pm | रेवती
बिपिनभाऊंचे अभिनंदन!
कृपया ते एक ओळींचे निरर्थक कौल काढून टाका बुवा!
आणि जे सदस्य कथेचा एखाद दुसरा भाग प्रकाशित करून क्रमश: म्हणून पळून जातात त्यांच्याकडेही पहा.
(लगेच कामांची लिष्ट दिल्याबद्दल स्वारी! ;))
रेवती
1 Jul 2009 - 7:17 pm | श्रावण मोडक
आणि जे सदस्य कथेचा एखाद दुसरा भाग प्रकाशित करून क्रमश: म्हणून पळून जातात त्यांच्याकडेही पहा.
हे कुणाला सांगताहात रेवतीताई? बिकांना? याला म्हणतात, चोराच्या हाती जामदारखान्याच्या चाव्या... :)
आणि हे सांगताना तुमचा त्यांनाही टोला द्यायचा हेतू असेल ना तर, तुमच्यात मला संपादकाचे उत्तम गुण दिसताहेत... :)
1 Jul 2009 - 7:17 pm | धनंजय
बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन. (आणि सर्वच संपादकांनी अतिरिक्त भार सांभाळल्याबद्दल त्यांचे आभार.)
1 Jul 2009 - 7:30 pm | संदीप चित्रे
म्हणजे आता बिपिनभौशी बोलताना जपून बोलायला लागेल की काय !:)
1 Jul 2009 - 7:43 pm | प्रकाश घाटपांडे
बिका सारखा संपादक वाचक व लेखक यांच्यात 'जवळीक' निर्माण करण्याइतपत सुज्ञ व विवेकी आहे याची अंमळ खात्री वाटते. मिपाचे वातावरण खेळीमेळीचे राहील , विवेक व विद्रोह यात उत्तम संतुलन राहील असे भाकीत वर्तवतो.
ज्योतिर्प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
1 Jul 2009 - 10:41 pm | विसोबा खेचर
प्रकाशमामांचा प्रतिसाद अतिशय आवडला..
मी देखील,
बिका सारखा संपादक वाचक व लेखक यांच्यात 'जवळीक' निर्माण करण्याइतपत सुज्ञ व विवेकी आहे याची अंमळ खात्री वाटते. मिपाचे वातावरण खेळीमेळीचे राहील , विवेक व विद्रोह यात उत्तम संतुलन राहील
नेमका हाच विचार करून बिपिनभावजींना ही जिम्मेदारी दिली आहे!
तात्या.
1 Jul 2009 - 8:42 pm | llपुण्याचे पेशवेll
बिपीनशेठ हार्दिक अभिनंदन. . :P
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
1 Jul 2009 - 9:16 pm | अनिल हटेला
अभिनंदन...:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
1 Jul 2009 - 9:15 pm | भाग्यश्री
बिपिनचंद्र कार्यकर्तेजींचा विजय असो!
खूप अभिनंदन !!
http://www.bhagyashree.co.cc/
1 Jul 2009 - 9:18 pm | सुचेल तसं
अभिनंदन बिपिनराव....
1 Jul 2009 - 11:21 pm | शशिधर केळकर
बिपिनशेट
अभिनंदन!
बहुतेक तात्यांच्या मनात अल्पसंख्यांकांबद्दल काळजी असावी, म्हणून बिपिन खांसाहेबाना बढती मिळाली!:D
कार्यारंभी अनेक उत्तम शुभेच्छा!
1 Jul 2009 - 11:52 pm | लवंगी
:)
2 Jul 2009 - 8:28 am | क्रान्ति
अभिनंदन बिपिनदा!
मुबारक हो!
=D> =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
2 Jul 2009 - 9:50 am | वेताळ
बाकी सर्व माननिय संपादक मंडळाला देखिल हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
2 Jul 2009 - 11:24 am | देवदत्त
अरे वा....
अभिनंदन :)
2 Jul 2009 - 11:35 am | दत्ता काळे
श्री. बिपिन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन.
2 Jul 2009 - 12:06 pm | अश्विनि३३७९
=D> बिपिन कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन !!
2 Jul 2009 - 10:55 pm | अन्वय
बरं झालं सगळ्या संपादकांची नावं कळाली. यांच्यापासून आता सावधच राहावं लागेल
नाही का?
3 Jul 2009 - 10:26 pm | सँडी
त्रिवार अभिनंदन !!!