लगाम

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
26 Jun 2009 - 11:58 am

त्याचा आणि माझा
संवाद तसा जुनाच आहे
संवाद तरी कसे म्हणायचे
बर्‍याचदा फक्त तोच बोलतो
मी नेहेमीच फक्त श्रोता असतो
नाही म्हणायला शंका असतात माझ्या
परवाच विचारले त्याला
हा कॅनव्हास बघितलास?
पांढराशुभ्र ..... रंगवायचाय मला !
हंसला ..... हळुवारपणे म्हणाला
वेड्या ....! अरे आत्माच तो जणु ...!
निर्लेप असतो .... निर्विकार
ना रंग, ना रुप, ना कसल्या अभिलाषा
त्या फलकाची चौकट आहे ना...
तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना?
हा ... आता त्याला कुठले रंग द्यायचे
हे मात्र सर्वस्वी तुच ठरवायचंस
तुझ्या मनातला अंधारही ...
सार्थपणे उमटेल बघ त्याच्यावर,
पण त्या अंधारालाही..
प्रकाशाची छटा द्यायला विसरू नकोस!
तुझ्या मनातला विषय ... वासना रेखाट हवे तर..!
पण त्यात मिसळ आठवणीने...
रंग माणुसकीचा आणि ....
सद्सदविवेक बुद्धीचे फिलर्सही....
बंधने नको घालुस रे कुंचल्याला,
सोड रे... कशाला हवा संयमाचा अहंकार....
सुटू दे.., बेफ़ाम हवा तसा...
नेहेमीच भरकटणार्‍या मनासारखा...
मी आहे ना .... त्याचा लगाम आवळायला !

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

तुझ्या मनातला अंधारही ...
सार्थपणे उमटेल बघ त्याच्यावर,
पण त्या अंधारालाही..
प्रकाशाची छटा द्यायला विसरू नकोस!
तुझ्या मनातला विषय ... वासना रेखाट हवे तर..!
पण त्यात मिसळ आठवणीने...
रंग माणुसकीचा आणि ....
सद्सदविवेक बुद्धीचे फिलर्सही....

अतिशय सुंदर ..

चन्द्रशेखर गोखले's picture

27 Jun 2009 - 8:18 am | चन्द्रशेखर गोखले

केवळ अप्रतिम !! एक दर्जदार काव्यरचना वाचल्याचा आनंद मिळाला !!

क्रान्ति's picture

27 Jun 2009 - 6:31 pm | क्रान्ति

कविता आवडली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा