संडे स्पेशल (पानगी)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
5 Mar 2008 - 3:37 am

विजुभाउनी विचारलेली "पानगी "ची रेसिपी.
पानावर थापून करायची ती पानगी.

१ वाटीभरून तांदळाचे पीठ
१/२ टी.स्पून मीठ
२ टी.स्पून साखर
१/२ ते पाऊण वाटी दुध
केळीची पाने
१टे.स्पून तूप

पातेल्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, साखर वथोडे दुध घालून हाताने कालवावे. हे मिश्रण सैलसर असावे.
त्याचे ३भाग करून, एक भाग केळीच्या पानावर गोलाकार पसरावा. वरून दुसरे पान झाकावे व गॅसवर तवा ठेऊन त्यावर ही तयार केलेली पानगी पानासकट ठेऊन दोन्ही बाजुंनी भाजून घ्यावी. पानगी शिजली कि पानापासून सहज निघून येते. पाने करपतात, काढून टाकता येतात. दोन्ही बाजुंनी भाजून पानगी ताटलीत काढावी. वर थोडे साजूक तूप घालून खाण्यास द्यावी. दुसरी पाने घेऊन उरलेल्या पिठाच्या पानग्या करून घ्याव्या.
न्याहरी साठी हा चवदार, पोटभरीचा पदार्थ होतो.
लोणचे किंवा कोरडी चटणी पानगी बरोबर वाढावी.

मांडणी

प्रतिक्रिया

वरदा's picture

5 Mar 2008 - 5:46 am | वरदा

खरंच मस्त लागते पानगी....एकदम गावी गेल्यासारखं वाटंलं.....मस्त रेसिपि.. ह्यातली मजा येते ती त्या पान भाजलं गेल्याने येणार्‍या वेगळ्या चवीमुळे...

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 6:48 am | सृष्टीलावण्या

हळदीच्या पानात शिजवली तर ते स्वर्गसुख की काय म्हणतात त्याचा अनुभव मिळतो कारण हळदीचा वास इतका अनोखा असतो की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते...

पाकृबद्दल आभार. ह्यापुढे सुद्धा तुमचा ह्या खजिन्याची पुरचुंडी वेळोवेळी उघडत जा अशी विनम्र विनंती.

>
>

परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 8:57 am | विसोबा खेचर

धन्यवाद स्वातीताई,

पानगीची पाकृ देऊन डायरेक्ट देवगडात पोहोचवलंत! :)

आपला,
(पानगीप्रेमी) तात्या.

प्राजु's picture

5 Mar 2008 - 9:32 am | प्राजु

आत्याकडे खाल्ली आहेत ही पानगी. माझी आत्या हळदिच्या पानांत करते. तिची पद्धत थोडी वेगळी आहे.
ती हळदीच्या पानावर हे धिरडे घालून, त्याच्या मधोमध गूळ आणि ओल्या नारळाचे सारण भरते आणि एका बाजूने ते पान भाजले गेले की मधोमध घडी घाऊन दुसर्‍या बाजूने भाजून घेते (बहुतेक)..:(((
पण त्याची चव काय असते महाराजा.......... उम्म्म....!
- (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ's picture

5 Mar 2008 - 1:33 pm | विजुभाऊ

धन्यवाद
तुमच्या या त्वरीत प्रतिसादामुळे मला अगदी घरी असल्या सारखे वाटले.....असेच अगत्य राहू दे...( तुझे गीत गाण्यासाठी मिसळपाव खाउ दे)
आपला मस्त खवैय्या
विजुभाऊ

shrikantsv's picture

5 Mar 2008 - 8:58 pm | shrikantsv

धन्यवाद स्वातीबाई

आपल्या पाक कृती बद्दल आभार