आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :(
सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :)
(हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( )
बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा!
किती उच्च कॅमेर्याने फोटो काढले की तो निसर्ग कॅमेर्यामधे आणणे आणि जसे डोळे कॅप्चर करतात तसंच फोटो मधे येणे कधी जमेल??
(Flickr Link)
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 2:20 pm | सोनम
किती अप्रतिम फोटो आहेत. :)
छान्,सुंदर फोटू. =D> =D> =D>
19 Jun 2009 - 2:22 pm | विसोबा खेचर
सगळीच चित्र छान परंतु दुसरं चित्र जबर्याच!
आपला,
(भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.
19 Jun 2009 - 4:16 pm | सूर्य
सगळे फोटो लय भारी.
सूर्य.
19 Jun 2009 - 4:32 pm | मराठमोळा
सुरेख छायाचित्रे आहेत. आवड्ली :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Jun 2009 - 9:19 pm | प्राजु
फोटो आणि वर्णन दोन्ही खास!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2009 - 9:48 pm | विनायक प्रभू
आवडली
19 Jun 2009 - 10:08 pm | घाटावरचे भट
बेष्ट!!
19 Jun 2009 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिलं अन दुसरं लैच आवडले.
=D>
-दिलीप बिरुटे
19 Jun 2009 - 10:19 pm | संदीप चित्रे
सगळे फोटो आवडले.
19 Jun 2009 - 10:35 pm | रेवती
सगळी चित्रे छानच!
लग्गेच लाँगड्राइव्हला बाहेर पडावसं वाटलं.
रेवती
19 Jun 2009 - 10:55 pm | भाग्यश्री
धन्यवाद लोकहो! :)
http://www.bhagyashree.co.cc/
20 Jun 2009 - 12:42 am | अनामिक
मस्तंच आहेत फोटू
-अनामिक
20 Jun 2009 - 7:59 am | क्रान्ति
फोटो आवडले.
=D> =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
20 Jun 2009 - 10:37 am | शितल
भाग्यश्री,
तु एक उत्तम फोटोग्राफर आहेस. :)
20 Jun 2009 - 11:07 am | सहज
सर्व फोटो छान आहेत.
20 Jun 2009 - 12:01 pm | जागु
वा फोटो छान आहेत.
24 Jun 2009 - 12:25 am | राघव
छान फोटू! एकदम आवडलेत. :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
24 Jun 2009 - 12:55 am | ऋषिकेश
सगळेच फोटू मस्त आहेत.. शेवटून दुसरा लै आवडला
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
24 Jun 2009 - 11:59 am | अश्विनि३३७९
तुमचा हेवा वाट्तोय ..
मुंबई मध्ये लाँग ड्राईव्ह कसलं :S
सगळे फोटो छान !!
24 Jun 2009 - 12:36 pm | नंदन
सगळेच फोटो आवडले, मात्र दुसरा फारच सुरेख आलाय. (तिसरा पाहून दोनेक वर्षांपूर्वी लागलेल्या वणव्याचं दृश्य आठवलं प्रथम)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Jun 2009 - 12:58 pm | बेसनलाडू
त्याचे चित्र (जीप सोडून) जलरंगात कागदावर उतरवायचा प्रयत्न करावासा वाटतो आहे.
(चित्रकार)बेसनलाडू
24 Jun 2009 - 4:49 pm | श्रावण मोडक
देखणी छायाचित्रे.
24 Jun 2009 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते
छायचित्र म्हणून दुसरं आवडलं. पण शेवटच्या दोन चित्रातला वातावरण जबरदस्त आहे. एकदम फंटाष्टिक.
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2009 - 8:47 pm | भाग्यश्री
थँक्स सगळ्यांना !!
बेला, चित्र नक्की काढ, बघायला आवडेल..! :)
http://www.bhagyashree.co.cc/