निशब्द - भाग १

सँडी's picture
सँडी in जनातलं, मनातलं
27 May 2009 - 8:32 am

माझा एक प्रयत्न.

तो: अगं मी सहज काढला होता चिमटा.

ती: सहज? रात्रभर हात दुखलाय माझा!

तो: बरंsss! सॉरी बाई!

ती: का छ्ळतोस?

तो: छ्ळतो?

ती: ....

तो: चल कॉफी पिऊ...

ती: नको.

तो: (हात धरुन) चल, तुला बरं वाटेल..

ती: (डोळे मिटलेले)....

तो: काय झालं? किती राग?

ती: ....

तो: आता डोळ्यात पाणी कशाला?

ती: ....

तो: मनमोकळं कधी बोलणार तु?

ती: ....

तो: काय झालं?

ती: वेदना हाताला झाल्या असत्या तर ठीक होतं!

तो: थोडं स्पष्ट बोलशील तर बरं होईल.

ती: तुला समजतयं सगळं!

तो: असं काही नाही!

ती: हात अजुन तुझ्याच हातात आहे!

तो: (हात सोडुन)....सॉरी!

ती: कशामुळे?

तो: कळलेच नाही!

ती: मलाही.

तो: तुला काय म्हणायचं?

ती: जे तुला वाटतयं!

तो: (हसत)घरच्यांना आपल्या मैत्रीचा खुपच अभिमान आहे नाही?

ती: मलाही.

तो: ह्म्म्म!

ती: तु बरोबर असला की आईबाबांना काळजी नसते.

तो: त्यांचं मोठेपण...

ती: नाही! विश्वास.

तो: ....

ती: तुला आठ्वतं, कॉलेजच्या ट्रीप्स?

तो: हो.

ती: तु आहेस बरोबर म्हटले की सगळ्यांना घरुन लगेच परवानगी.

तो: ....

ती: आता इकडे असुनही आईबाबांना कसलीच काळजी नाही.

तो: ह्म्म्म!

ती: का करतोस इतकं?

तो: आता भिती वाटतेयं!

ती: तुला आणि भिती! कसली?

तो: त्यांच्या विश्वासाची.

ती: जगाची?

तो: शक्य नाही.

ती: तु कधी कुणाचं वाईट नाही करणार याची खात्री आहे.

तो: तेच तर!

ती: तु नको जास्त विचार करु...सगळं ठीक होईल.

तो: असं आपल्याला वाटतं.

ती: सगळे नक्की समजुन घेतील आपल्याला.

तो: ह्म्म! आपली माणसं महत्वाची.

ती: मी बाबांशी बोलु का?
.........................

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

27 May 2009 - 8:34 am | विनायक प्रभू

पुढच्या भागात कळणार?

अभिरत भिरभि-या's picture

27 May 2009 - 8:45 am | अभिरत भिरभि-या

सुरूवात चटपटित आहे. पुढे काय ??
पुढचा भाग टाका लौकर

अवलिया's picture

27 May 2009 - 9:01 am | अवलिया

सुरवात चांगली जमली आहे. अभिनंदन !!
पुढचा भाग लवकर टाकणे :)
नाहीतर आम्ही खवमधे येवुन चिमटे काढु :)

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 9:16 am | भडकमकर मास्तर

चांगली सुरुवात.
मात्र फार छोटा भाग...

अवांतर :
रात्रभर दुखण्याएवढा चिमटा काढणारा हा विश्वासू मित्र .. तेही सहज... हम्म्म्म्म्म्म्म्म्म ( कदाचित ती लटक्या रागाने बोलत असेल तरी ...!!!)

शम्मी कपूरसुद्धा त्याच्या समकालीन आणि कनिष्ठ नायिकांचे शूटिंगदरम्यान सहज गंमत म्हणून हात पिरगाळत असे , याबद्दल लीला चिटणिस यांच्या आत्मचरित्रात वाचल्याचे आठवते...बिच्चार्‍या नायिका...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

हर्षद आनंदी's picture

27 May 2009 - 9:55 am | हर्षद आनंदी

अघोषित प्रेम?
http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/silly.gif
निखळ मैत्री [रात्रभर दुखणारा चिमटा काढणारी]

http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/timeout.gif

ती: आता इकडे असुनही आईबाबांना कसलीच काळजी नाही.
तो: आता भिती वाटतेयं!
तो: त्यांच्या विश्वासाची.

ती: तु नको जास्त विचार करु...सगळं ठीक होईल.
तो: असं आपल्याला वाटतं.
ती: सगळे नक्की समजुन घेतील आपल्याला.
तो: ह्म्म! आपली माणसं महत्वाची.
ती: मी बाबांशी बोलु का?

काय चाललय काय?
पुढचा भाग लवकर टाका
:T

मराठमोळा's picture

27 May 2009 - 11:42 am | मराठमोळा

मस्त सुरुवात सँडी .....
पुढचा भाग लवकर येऊ दे..

(अवांतर: हा भाग वाचुन मला "चीनी कम" सिनेमा का आठवतोय.. ;) )

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!