बाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबई किती स्वस्त आहे असं वाटतं; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो.
पण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच. जपानमध्ये असताना जरी मला एकदाही भूकंप जाणवला नाही तरी घरी परत गेले असताना मला आणि इतरांना बसलेले भूकंपाचे काही सौम्य धक्के…
मला बसलेला धक्का
स्थळ: हनुमान मार्ग, विलेपार्ले
रिश्टर स्केल: २-३
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी सात वाजता आय. सी. आय. सी. आय. बॅंकेच्या कट्टयावर भेटायचं ठरलं. मी एकटीच मुलुंड नावाच्या परग्रहावरून येणार होते. अशावेळी मर्फीच्या नियमानुसार गाडया हमखास लेट असतात हे लक्षात घेऊन नेहमीपेक्षा चांगला अर्धा तास अगोदर निघाले आणि अगदी सात नाही पण सात पाचला संकेतस्थळी पोचले. माहितीतलं कुणीही उगवलेलं नव्हतं. पण बघण्यासारखी इतरही प्रेक्षणीय स्थळे तिथे असल्याने सव्वा सात कसे वाजले ते कळलंच नाही. मग मात्र न राहवून फोन लावला.
मी: हॅलो, मॅडम आहात कुठे? सातला भेटायचं ठरलं होतं! मी (कितीतरी वेळ सारखेच लोक बघून) किती बोअर होत्येय! लांब राहून सर्वात आधी पोचली आहे याबद्द्ल तुला काही लाज???
ती: थंड घे. दोन मिनिटात निघतेच. तोपर्यंत तू ४९-९९ मधे जाऊन टाईमपास कर.
मी: काssssय??
ह्यावर नॉर्मल माणसं सॉरी म्हणतात पण आमच्या ब्रुटसने मलाच वर एक शामची आई छाप डायलॉग कम टोमणा मारला.
ती: बाळ शाम, शरीराने भारतात आलास तसाच मनानेही येण्याचा प्रयत्न कर हो.
आईला बसलेला धक्का
रिश्टर स्केल आईच्या मते १० वगैरे...
आई: काय गं, परिक्षा कशी झाली?
मी: रिझल्ट लागेपर्यंत उत्तम.
आई: रिझल्ट कधी आहे मग?
मी: नवव्या महिन्यात!
आई: काssssssssssssssssय????? बरी आहेस नां???
मी: ही हा हा हा...
जपानी न येणा-या लोकांसाठी तळटीप
जपानीत महिन्यांना नावे नसतात. जानेवारीला पहिला महिना, फेब्रुवारीला दुसरा महिना असं म्हणतात. त्यामुळे नववा महिना म्हणजे सप्टेंबर ही गोष्ट हुशार वाचकांच्या लक्षात आलीच असेल.
मराठी न येणा-या लोकांसाठी तळटीप
अरे हो! असे लोक मिपावर असण्याची आणि असलेच तर हे सगळं वाचण्याची अजिबात तसदी घेणार नसल्याने प्रश्न मिटलेला आहे.
प्रतिक्रिया
25 May 2009 - 6:50 am | सहज
कवाई!
25 May 2009 - 6:52 am | मीनल
वाचण्याची आणि प्रतिसाद देण्याची तसदी घेतली बर का मी ! :D
तिथल्या श्राईन्स बद्दल लिही आणि ते झाडाला चिठ्ठ्या बांधण्याबद्दल, ते आकाश कंदिल, तो श्राईनच्या बाहेरच्या हौदाबद्दल, तो आमटी घ्यायचा डाव असतो तश्या त्या मोठ्या डावाबद्दल ,तिथली हात धुवायची पध्दत, जपानी टी सेरिमनी, जपानी बाग, शिंकानसेन, ते भूकंप,रोबोट्स चे खेळ ,स्पर्धा आणि बरेच आहे ... लिही सर्वांवर.
माझ्या ट्रीपच सर्व आठवतय आता.
मीनल.
25 May 2009 - 7:07 am | सँडी
इइने!
अवांतरः मीनलशी सहमत.
25 May 2009 - 7:17 am | टारझन
私は好きです。大きく書いてください。
जपाणी ण कळणार्यांसाठी : लेखण आवडले , पुढचे भाग मोठे लिहा .
25 May 2009 - 7:29 am | यन्ना _रास्कला
चान्ग्ल लिहलय तुमी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
25 May 2009 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार
दे धक्का !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
25 May 2009 - 11:00 am | स्वाती दिनेश
सॉलिड्ड,मस्त.. जपानी दुनियेमधले दिवस मी ही विसरु शकत नाही हेच खरे,:)
स्वाती
25 May 2009 - 7:50 pm | लिखाळ
मजेदार :)
आम्ही हुशार नसल्याने पहिल्या तळटिपेचा उपयोग झाला.
लेख मजेदार आहे असे लिहिले त्यामुळे दुसरी तळटिप वाचता आली हे सांगणे न लगे :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
26 May 2009 - 1:25 pm | जयवी
सुबक ठेंगणी......... सही लिहिते आहेस .....!!
नववा महिना......... खी खी खी !!
तुझ्या जपानची अजून मज्जा वाचायला आवडेल :)