consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,”
एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का? कारण कामेऱ्याला जाणीवा consciousness नाहीत. अजून एक, ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना आपल्या प्रिय पत्नीच्या मनात येत असतील काय?आपल्या मनात आणि तिच्या मनात काय विचार येतात हे तिला काय किंवा मला काय शब्दात सांगता येत नाहीत. कारण आम्ही दोघेही रोबो नाही आहोत.
1996 साली त्यावेळच्या जागतिकविजेत्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला गुगल DeepBlue ह्या प्रोग्रामने हरवले. समजा DeepBlue ज्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटले असते? त्या संगणकाला काय वाटले असेल.
David Chalmers ह्या तत्ववेत्याच्या मताप्रमाणे प्रत्येक कणाला गुणधर्म असतात उदाहरणार्थ रंग रूप तापमान घनता विद्युतभार स्पिन इत्यादि त्याप्रमाणे त्याना जाणीवही असते. अगदी रस्त्यात पडलेल्या दगडालाही जाणीवा आणि भावना असतात.
यंत्रांना जाणीव आणि भावना असतात काय? हा प्रश्न मानवी इतिहासात वेळेवेळी चर्चिला गेला आहे. अलन ट्युरिंग ह्या संगणक शास्त्रज्ञाने १९५० साली ह्यावर “Computing machinery and intelligence” हा शोध निबंध प्रसिद्ध केला. ह्याचेच रुपांतर पुढे Turing Test.मध्ये झाले.
जो पर्यंत मशीन कविता कथा लिहित नाही , किंवा स्वरावली बनवत नाही, ह्याशिवाय, केवळ लिहितच नाही तर हे काव्य “मी” लिहिले आहे ही जाणीव त्याला होत नाही, तो पर्यंत त्याची माणसाशी बरोबरी होणार नाही. हा अहं भाब जेव्हा जागृत होईल तेव्हा यंत्र आणि मानव यातला फरक संपेल. तेव्हा त्या यंत्राला यशाचा अभिमान, यंत्रातला एखादा पूर्जा किंवा ट्रांझिस्टर फेल झाल्यावर वाटणारे दुखः, दुसरया यंत्रा बद्दल असूया, कुणी खोटी स्तुती केल्यास धोक्याची घंटी, चुकी केल्यास होणारा मनस्ताप ह्या भावना अनुभवास येतील.
हे लिहिणे सोप आहे पण मशीनला भावना आहेत की नाहीत हे आपण जोपर्यंत आपण स्वतः मशीन बनत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील एक टप्पा.
१३.८ बिलियन वर्षांपूर्वी महाविस्फोट big bang झाला आणि विश्वाची सुरवात झाली. तेव्हा अवकाशात केवळ मूळ कण होते. तिथून सुरवात होऊन प्रथम उदजन hydrogen वायू निर्माण झाला. त्यानंतर अवकाश अनेक स्थित्यंतरातून गेले आणि आजच्या बुद्धिमान माणसाचा उदय झाला. सरते शेवटी आपण सर्व हे “माती” पासून आलो. ह्या निर्जीव मॅटरला जाणीव. भावना. अहंकार. स्वत्व. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, प्रेम हे भाव कसे निर्माण झाले? हे जर आपल्याला समजले तर आपणही असे जीवन निर्माण करू शकू. आज जी ठायी ठायी आपल्याला “कृबु” दृग्गोचर होते आहे तो ह्या प्रवासातला अत्यंत सोपा टप्पा आहे. ह्यात Deepblue आणि तत्सम प्रोग्राम येतात. ह्याच संगणकाने गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला होता. बुद्धीबळाच्या खेळात हे संगणक माणसापेक्षा कैक पटीने हुशार आहेत, पण हाच प्रोग्राम चार वर्षांच्या मुला समोर tic-tac-toe. खेळताना नांगी टाकेल! अश्या प्रोग्रामला आज लोक “कृबु” समजत आहेत, शास्त्रीय भाषेत ह्याना संकुचित “कृबु” Narrow AI म्हटले जाते. पण आता शास्त्रज्ञ सर्वंकष “कृबु” General AI AGI विकसित करण्यात आपले लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वंकष “कृबु” म्हणजे जर एखाद्या मुलाला शिकवले तर त्याला अनेक खेळ खेळता येतील, अनेक कौशिल्ये शिकता येतील. तर माणूस हा असा आहे. तो गणित सोडवू शकेल, बाजारहाट करू शकेल, नकला करू शकेल, विनोद सांगून लोकांना हसवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो कधी काळी अधे मध्ये आत्मचिंतनही करेल म्हणजे मी कोण आहे. कुठून आलो आहे? ह्या माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? इत्यादि.
ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे. पण का? का?
Moravec ह्या शास्त्रज्ञाने ह्याबद्दल प्रथम विचार केला, म्हणून ह्याला Moravec’s Paradox असे म्हणतात. त्याच्या म्हणण्या प्रमाणे माणसांच्या साठी अवघड असणारे गणित किंवा तर्कशास्त्र ह्यासारखे विषय संगणकाला शिकवणे सोपं आहे पण मानवांसाठी सोपे असणारे टास्क म्हणजे चालणे, चेहरे ओळखणे किंवा जीव्हज प्रमाणे बर्टीला सगळ्या आणि कुठल्याली गोष्टीत सल्ला देणे असा संगणक बनवणे सोपे नाही,
Teaching computers hard things being easy and teaching them easy things being hard. शास्त्रज्ञाच्या मते कारण असे आहे की माणूस हा उत्क्रांतीच्या फेऱ्यामधून गेला आहे. डबक्यातल्या एक पेशी पासून उत्क्रांती होत होत अखेर त्याची परिणीती आजच्या मानवात झाली आहे. जीवनातल्या संघर्षात टिकून रहाण्यासाठी त्याच्या मेंदूत अनेक कौशल्ये कोरली गेली आहेत. त्याचा आपल्याला आपसूकच फायदा झालेला आहे, पण संगणकाला ह्या संघर्षातून जावे लागलेले नाही, परिणामतः ३७२६१८ गुणिले ३१५३७७८ हे गणित आपल्यासाठी अवघड आहे पण संगणकासाठी सोप आहे. तोल सांभाळून चालणे आपल्यासाठी सोपे आहे पण संगणकासाठी अवघड आहे. तुम्ही रोबोचे विडिओ बघितले असणार. जरा पहा ते कसे उभे रहातात, हसू येईल बघून.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
प्रतिक्रिया
19 Nov 2025 - 4:33 pm | युयुत्सु
<पण संगणकासाठी अवघड आहे. तुम्ही रोबोचे विडिओ बघितले असणार. जरा पहा ते कसे उभे रहातात, हसू येईल बघून.>
आपण रोबो ऊठून उभा राहताना धडपडतो म्हणून हसत राहणार की माणूस जे करू शकत नाही ते करतो त्याचे कौतूक करणार्? खालील व्हीडीओत रोबो स्वतःचा तोल कसा सांभा़ळतो ते पहा, तोंडात बोटे घालाल.
https://www.youtube.com/watch?v=tF4DML7FIWk
https://www.youtube.com/watch?v=HMhl45eCfDU
<ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे. पण का? का?>
या अशा प्रश्नांची चर्चा करण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा सध्या उप्लब्ध असलेला ए०आय० जी विषमता निर्माण करणार आहे, त्यावर विचार करू या.
20 Nov 2025 - 9:19 am | भागो
प्रथम प्रतिसादाबद्दल आणि दुव्या बद्दल आभार.
१ मी "moravec paradox" बद्दल बोलत होतो. चेहरे ओळखणे मानवाला शिकवावे लागत नाही, पण रोबोट ना शिकवावे लागते. अश्या काही गोष्टी आहेत. त्याला moravec paradox ase म्हणतात.
२ ए०आय० जी विषमता निर्माण करणार आहे, त्यावर विचार करू या.>>> मुद्दा समजला नाही, चर्चा अवश्य करा. वाचायला आवडेल. BTW The Second Intelligent Species
How Humans Will Become as Irrelevant as Cockroaches ह्या बद्दल आपण https://marshallbrain.com/second-intelligent-species
इथे जाऊन वाचू शकता. विषमतेचे पुढे लाऊन काय होणार आहे त्याची थोडी चुणूक मिळेल.
21 Nov 2025 - 8:59 am | युयुत्सु
चेहरे ओळखणे मानवाला शिकवावे लागत नाही,
या विधानाशी मी तितकासा सहमत नाही. मांणूस किंवा कोणताही जीव त्याच्या नैसर्गिक क्षमतेनुसार त्याला मिळणार्या संवेदनांचे विश्लेषण करून शिकतच असतो. कारण ती माहिती/ज्ञान चेतापेशीच्या जोडण्यामध्ये साठवली जाते.
Key brain areas involved in facial recognition
Fusiform Face Area (FFA)
Located in the right fusiform gyrus.
Damage here → classic prosopagnosia.
Occipital Face Area (OFA)
Superior Temporal Sulcus (STS)
या मेंदूच्या क्षेत्रात माहिती नोंदवली जाते तेव्हा शिकणे होतच असते.
21 Nov 2025 - 9:39 am | भागो
या मेंदूच्या क्षेत्रात माहिती नोंदवली जाते तेव्हा शिकणे होतच असते.>>> शिकणे आणि स्मरण करणे ह्यात गल्लत होते आहे अस्र वाटत नाहीये का? मग आपली सध्याची शिक्षण पद्धती जी धोकंपट्टीवर
आधारित आहे ती काही वाईट नाही.
21 Nov 2025 - 10:35 am | युयुत्सु
<शिकणे आणि स्मरण करणे ह्यात गल्लत होते आहे अस्र वाटत नाहीये का?>
मी नम्रपणे सांगू इच्छितो की चेहेरे ओळ्खणे पूर्णपणे 'इनेट' किंवा पूर्णपणे ' अक्वायर्ड' नाही. कोणत्याही शिकण्याच्या प्रक्रियेत माहीती साठवणे (तुम्ही ज्याला स्मरण), संबंध लावणे (असोसिएशन) आणि उजळणी (रिन्फोर्समेण्ट) अंतर्भूत असते.
21 Nov 2025 - 2:50 pm | भागो
ओके.
मला एव्ह्शेच म्हणायचे आहे
Neurons in newborn chicks’ brains respond to face-like patterns, supporting innate face recognition.
The study suggests that vertebrate brains are predisposed to recognize face-like shapes from birth.
This innate mechanism may also explain pareidolia, seeing faces in inanimate objects.
Source: University of Trento
ह्या उलट गणित आदी आपल्याला शिकावे लागते.
21 Nov 2025 - 6:15 pm | युयुत्सु
The study suggests that vertebrate brains are predisposed to recognize face-like shapes from birth.
हे समजण्यासारखे आहे. पण प्रत्येक संगोपन करणारी व्यक्ती आपले आई-बाबा नाही हे ज्ञान आपोआप येत नाही. ते शिकवले जाते तेव्हाच येते.
उदा० बाब्बा दाखव, बाब्बा! आता मम्मा दाखव!! - अशा संवादातून ते शिक्षण होत असते.
21 Nov 2025 - 7:18 pm | भागो
सर माझे चुकले. तुमचे म्हणणेच बरोबर आहे,
20 Nov 2025 - 9:21 am | भागो
लावून नाही जावून असे वाचावे.
20 Nov 2025 - 10:09 am | कर्नलतपस्वी
ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे.
२०५० हा खुपच कमी वेळ आहे. हे शक्य नाही या मताचा मी आहे पण शक्यच नाही या बद्दल साशंक आहे.
सध्याची तंत्रज्ञ मुले ज्याप्रमाणे काम करत आहेत त्यातून अंधूकसा किरण दिसतो.
असे झाले तर मानव देव होईल. जर मानवाने मशीनला षड्रिपू संपृक्त बनवले तर मानवाचे आयुष्य आणी निसर्ग दोन्ही विनाशाच्या कगारावर उभे असतील.असे माझ्या अल्प बुद्धीला वाटते.
तसे मला या विषयात जास्त गती नाही पण लेख डोक्यात काही विचार सोडून गेला.
22 Nov 2025 - 4:31 pm | भागो
कर्नल साहेब, आपल्याशी संवाद साधण्याचे राहून गेले.
मानवाने कृ बु मध्ये बरेच काही साध्य केले आहे. प्रतिमा ओळखणे
वाहका शिवाय चालणाऱ्या गाड्या, भाषांतर करणे, ECGचा अर्थ लावणे पण हे सगळे मिळून AGI होत नाही. असे प्रोग्राम हे AGI च्या भात्यातले बाण आहेत, AGI साठी अजून काय लागणार आहे त्याची आपल्याला किंचितही जाणीव नाही. आणि ते आपल्याला समजले तरीही तो "भाता" कसा असेल. त्यात ते बाण कसे सामवायचे त्याचीही कल्पना आपल्याला नाही. थोडक्यात आपण AGI पासून बरेच दूर आहोत.
दुसरा काही मार्ग नाही का ?
आहे, तो म्हणजे जीव शास्त्राची कास धरणे. मी जर इथे असे लिहिले कि शास्त्रज्ञ १७/१८ वयाच्या तरुणाची त्रिमिती छपाई करण्याच्या प्रयत्न करत आहेत, तर तुम्हाला काय वाटेल?
तुम्ही "ब्लेड रनर " किंवा "सिक्स्थ डे" हे सिनेमे अवश्य पहा,
22 Nov 2025 - 5:35 pm | युयुत्सु
श्री० भागो
मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही एव्हढे AGI साठी का झुरताय? मी बुचकळयात पडलो आहे.
22 Nov 2025 - 7:09 pm | भागो
हाच प्रश्न मी duck.ai ला विचारला, त्याचे उत्तर जसेच्या तसे डकवत आहे.
AGI, or artificial general intelligence, is pursued because it has the potential to match or exceed human intelligence across a wide range of tasks, which could lead to significant advancements in technology, economy, and scientific discovery. However, it also poses risks that need careful management to prevent misuse and societal disruption. Wikipedia waitbutwhy.com