जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.
सध्या काय पाहता?(२०२५)
गाभा:
प्रतिक्रिया
10 Sep 2025 - 11:02 pm | जुइ
हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे. या चित्रपटातील गोल्डन गाण्याचे तिच्याकडून बरेच कौतुक ऐकले आहे. मध्यंतरी तेहरान नावाचा जॉन अब्राहमचा चित्रपट पाहिला, तो मात्र विषेश रूचला नाही.
11 Sep 2025 - 8:22 pm | Bhakti
गोल्डन .. अप्रतिम आहे.
10 Sep 2025 - 11:06 pm | जुइ
वेडनेस्डेचा दुसरा सिझन पाहिला. ओके आहे, जेवढी हवा पहिल्या सिझन अन त्यातील लेडी गागाने गायलेल्या गीताने केली होती त्यामानाने दुसरा अगदीच ठिकठाक आहे.
11 Sep 2025 - 12:11 pm | श्वेता व्यास
इतक्यात काही मराठी चित्रपट शोधून ते पहिले.
अनवट, ७ रोशन वीला, गैर, विकी वेलिंगकर (हा निव्वळ टीपी, पण तरी आवडला)
11 Sep 2025 - 8:22 pm | Bhakti
'दशावतार' मराठी सिनेमाची वाट पाहतेय.
12 Sep 2025 - 1:47 pm | श्वेता व्यास
+१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा प्लॅन आहे, त्याआधी कोणी पाहिला तर कसा वाटला ते नक्की सांगा.
12 Sep 2025 - 3:06 pm | Bhakti
मी आज जाणार आहे, सांगते कसा आहे ते .
12 Sep 2025 - 4:33 pm | श्वेता व्यास
ओक्के :)
13 Sep 2025 - 10:44 am | Bhakti
वय वर्षे ८१ तरीही जेव्हा निळसर पाण्यात मत्स्य अवताराची निरसळ रंगभुषा घेऊन दिलीप प्रभावळकर ट्रेलरमध्ये पाहिले. तेव्हा हा कलाकार काळाची लीला सहज पार करू शकतो हे जाणवले.
दशावतार कोकणची लोककला मान ,कोकणी कलाकारांची ओळख आहे.हे सूत्र धरूनच एक सच्चा दशावतारी कलाकाराच्या विविधांगी रूपातून कोकणची सध्याची दुखरी नसही दाखवली आहे...खाणकाम!
निसर्गाचे वरदान देवराई ची छाया,राखणदाराची माया हळूहळू आधुनिकरणाच्या कचाट्यामुळे लोप जाईल का?हा सुन्न करणारा प्रश्न भेडसावत राहतोच आहे.
सिनेमा अस्सल कोकणी आहे.तिथली साधी माणसं लक्षात राहतात.सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या बापलेकाचे नाते खुप सुंदर भावूक करणारे दाखवले आहे.
पण पुढे अनेक थरारक घटनांमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या असंख्य विविधांगी फ्रेम नजर खिळवून ठेवतात.
भरपूर प्रीडेक्टेबल कथानक असले तरी त्याला दशावतारची जोड आणि कोकणच्या निसर्गाचा प्रश्न यात हाताळण्याचा छान प्रयोग झाला आहे.अजय गोगावले यांच्या आवाजातील भैरवी गीत रंगपूजा गीत विशेष श्रवणीय आहे.
चांगला मराठी सिनेमा आपणच पुढे न्यायला हवा,पाहायला हवा.
बाकी ललित प्रभाकरचाही 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला आहे.त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
अजूनही कुर्ला टू वेंगुर्ले हाही कोकण पर्याटनाची कथा असणारा छान सिनेमा आलाय.
13 Sep 2025 - 10:53 am | Bhakti
*(चि.व.चि.सौ.कां)
15 Sep 2025 - 10:29 am | श्वेता व्यास
धन्यवाद @भक्ती :)
दिलीप प्रभावळकर यांच्यासाठीच पाहायचा आहे हा सिनेमा. शालेय वयात त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता, तेव्हापासून या वरून साध्या पण अस्सल कलाकार माणसाची मी फ्यान आहे.
त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
सेम सेम :) जाऊदेत वय नाही पण मन तर आहे ना ;)
11 Sep 2025 - 3:59 pm | कॉमी
नुकताच ब्लेड रनर पाहिला.
आवडला.
11 Sep 2025 - 8:21 pm | Bhakti
साय -फाय नक्की पाहणार.
11 Sep 2025 - 4:56 pm | स्वधर्म
लाय टू मी ही अमेरिकन वेब सिरीज अॅमेझॉनवर पहात आहे. खोटे बोलणे ओळखण्याचे कौशल्य वापरून संशयितांमधून नेमका अपराधी शोधणे अशा वेगवेगळ्या कथांची थ्रिलर मालिका. सुरूवात तरी चांगली वाटत आहे.
11 Sep 2025 - 8:20 pm | Bhakti
+१
11 Sep 2025 - 6:44 pm | जुइ
The Thursday murder club हा जेष्ठ कलाकारांना घेऊन तयार केलेला सिनेमा रंजक आहे, आवडला!
11 Sep 2025 - 7:33 pm | कंजूस
एक कोरियन चानेल होता त्यात खूप वेगवेगळे कार्यक्रम असत. कोरियन हेल्थ, व्यायाम, बालकथा, सायन्स, पॉप किंवा इतर संगीत आणि मालिकासुद्धा असायच्या. आता ते सर्व काढून फक्त मालिका ठेवल्या आहेत.
11 Sep 2025 - 8:24 pm | Bhakti
"गोल्डा" या युद्धातील गोल्डा मीर यांच्या नेतृत्वावर केंद्रित आहे. चित्रपटात दाखवले आहे की कशा प्रकारे गोल्डा मीर यांनी सुरुवातीच्या धक्क्यांनंतर इस्रायलला एकत्र आणले आणि अमेरिकेच्या मदतीने विजय मिळवला. हेलन मिरेन यांनी साकारलेली गोल्डा मीर यांची भूमिका युद्धातील नेतृत्व आणि दबावपूर्ण निर्णयांना ठळकपणे दाखवते.गोल्डा कर्करोगाशीही या काळात झुंज देत असते,खरोखर आयर्न लेडी होती.पण खुप संथ सिनेमा आहे.
11 Sep 2025 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली
ब्रेकींग बैड च पाचवा सीझन चालू केलाय!
11 Sep 2025 - 8:48 pm | मारवा
Better call Saul चा पहिला season संपवून दुसरा सुरू आहे.
अत्यंत उत्कृष्ठ सिरीज आतापर्यंत तरी
ब्रेकिंग bad मध्ये जेव्हा saul चे पात्र बघितलेले होते तेव्हाच तो मनात रुतलेला होता. आता संपूर्ण series नेमक्या आपल्या आवडत्या पत्रावर बेतलेली म्हटल्यावर मोठा आनंद झाला.
मानवी भावनांचा खोलवर वेध, उत्कृष्ठ निर्मिती मूल्ये, सर्व कलाकारांचा लाजवाब अभिनय. किती तरी बाबी
सर्वात महत्त्वाचे script आणि फिलॉसॉफिकल स्टाईल फारच आवडली.
आणि किती ती वैविध्यपूर्ण महाभारत style पात्रे.
खूप आवडण्यात आलेली आहे.
ब्रेकिंग बॅड चे आणि vince gilligan चे फॅन असाल तर बेटर कॉल सॉल निव्वळ मेजवानी आहे
11 Sep 2025 - 10:36 pm | श्वेता२४
घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे. ज्यांना कौटुंबिक चित्रपट आवडतात त्यांनी जरूर हा चित्रपट पहावा . मला आवडला .
जारण - या चित्रपटाबद्दल बरेच बोलले लिहिले गेले आहे. अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट आवडला. पण कथा थोडी कमकुवत वाटली. प्रेडिक्टेबल वाटला.
कुबेरा- हा साउथ इंडियन मूवी आवडला. बऱ्याच दिवसांनी टिपिकल एंटरटेनिंग चित्रपट पाहायला मिळाला.
15 Sep 2025 - 10:59 am | चौथा कोनाडा
घरत गणपती :} मी पण सुरुवातीस घरात असंच वाचत होतो...
एकंदरीत सिनेमा छान आहे, गाणी छान आहेत.
पहिला अर्धा तास मराठी टीव्ही मालिकेसारखा वाटल्याने बंद करणार होतो .. पण कथानकाने योग्य वळण घेऊन मला रोखले.
12 Sep 2025 - 11:17 am | कुमार१
लघुपट
गजरा
खऱ्या सुगंधाचा अर्थ . . .
मोलकरणीच्या भूमिकेत मयुरी मोहिते यांचा सुंदर अभिनय !
https://www.youtube.com/watch?v=EdRa-3sqVqI&t=1s
. . .
अपरिचित (हिंदी)
आपल्याला फक्त फेसबुकी मैत्री हवी आहे की प्रत्यक्ष माणसांना भेटण्यात रस आहे ?
शिशिर शर्मा चांगल्या भूमिकेत
https://www.youtube.com/watch?v=sbMkZSHA5UY
. .
मुलाखत
गुलजार
खुसखुशीत, हास्यविनोदाने भरलेली, अर्थपूर्ण आणि राष्ट्रीयत्वाचे भान देणारी मोजक्या अर्ध्या तासाची सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=PKU9pQC5fSE
. . .
अनेक भारतीय भाषांमध्ये पारंगत असलेले भाषांतरकार आणि भाषाशिक्षक वासुदेव डोंगरे
सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=g9Gw1U_aMaI
12 Sep 2025 - 7:00 pm | सिरुसेरि
रिचर , शेरलॉक , क्राउन , रॉयल्स , कराटे किडस - लिजंडस , कोब्रा काय -- गेल्या काही महिन्यांमधे इत्यादी बघितले .
12 Sep 2025 - 11:00 pm | जुइ
किर्तनकार आफळे बूवांचे किर्तन ऐकण्याचा योग येथे गेल्या आठवड्यात आला. औलोकिक अनुभव होता त्याचबरोबर अविराज तायडे हे पंडित भिमसेन जोशींचे शिष्य यांचेही गायन ऐकायची संधी मिळाली. दोन्ही कार्यक्रमासांठी तुलनेत वेळ कमी होता त्यामुळे मनाला चुटुपूट लागून राहिली. अर्थात तूनळी सगळे पाहायला ऐकायला मिळतेच, प्रत्यक्ष अनुभूती निराळीच.
15 Sep 2025 - 10:30 am | श्वेता व्यास
वाह ! +१
15 Sep 2025 - 11:21 am | Bhakti
बोन एपेटिट, युअर मेजेस्टी" Bon Appetit, Your Majesty
कोरियन ड्रामा,५०० वर्षे भूतकाळात पोहचलेल्या शेफ मुलीची आणि तेव्हाच्या राजाची हलकी फुलकी रोमॅंटिक, कॉमेडी सिरीज आहे.ही कथा पाककृतींच्या विविध आविष्काराने सजली आहे.अधिक तर मांसाहारी पाककृती आहेत.तरीही ती शेफ ज्या पद्धतीने अनेक पदार्थांचा शोध लावते ते दरवेळी पाहायला खुपच मस्त वाटते.एकंदरीत खुप्पच गोड सिरीज आहे.
15 Sep 2025 - 2:37 pm | चंद्रसूर्यकुमार
विकांताला मुंबई पोलिसांमधील प्रसिध्द इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्यावरील 'इन्स्पेक्टर झेंडे' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला.
16 Sep 2025 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालीधर लापता पाहिला. अभिषेक बच्चनचा सहज सुंदर अभिनय आवडला.
कथा साधीच आहे. लहान मुलाचा अभिनय, छायाचित्रणही भन्नाट. मस्तच.
-दिलीप बिरुटे
19 Sep 2025 - 12:25 pm | कुमार१
१. एक्सचेंज ऑफर ( हिंदी)
निवृत्त मुख्याध्यापक - जुना संगणक ते नवा संगणक - कसाबसा स्वीकारलेला बदल - इच्छा नसताना लादलेले फेसबुक सदस्यत्व - माजी विद्यार्थ्यांची अकस्मात भेट - आणि . . .
सुखद शेवट पण आनंदाश्रू आणणारा .
एम के रैना : अविस्मरणीय भूमिकेत.
https://www.youtube.com/watch?v=EqCLjvxKPko
. . .
२. LOVE BY CHANCE (मराठी)
हलकाफुलका छान आहे.
प्रियदर्शनी आणि विराजस दोन्ही आवडले.
https://www.youtube.com/watch?v=vcmhPt22wso
. . .
३. आस (हिंदी )
गरीबी- सोशिकता आणि . . . आशा. . . निराशा. . . .
परिणामकारक शोकांतिका !
https://www.youtube.com/watch?v=0WgYgdi6G1Q
19 Sep 2025 - 2:34 pm | Bhakti
एक्सचेंज ऑफर ( हिंदी)-छान विशेष!
20 Sep 2025 - 5:37 am | चित्रगुप्त
'एक्सचेंज ऑफर' आत्ताच बघितला. सुंदर आणि र्हदयस्पर्शी.
-- पूर्वी ९० च्या दशकात दिल्लीतल्या आमच्या ऑफिसात - USIS मधे एम. के. रैना अधूनमधून गप्पा करायला येऊन बसायचा ते आठवले. इतक्या वर्षांनंतर त्याला बघूनही खूप छान वाटले आणि त्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. अनेक आभार.
19 Sep 2025 - 2:34 pm | Bhakti
मारीसन-Maareesan
या दक्षिण भारतीय सिनेमाबद्दल खुप ऐकलं होतं.एक सिरीयल किलरची गोष्ट आहे.सामान्य माणूस असलेला माणूस सिरीयल किलर होतो.पण कथेत दोन नायकांची मैत्री होते.अनेक ट्विस्ट आणि टर्ननंतर शेवट क्लायमॅक्स रहस्यभेद चांगला जमलाय.फास्ट फॉरवर्ड करून पाहिला तर वेळ वाचेल ;)
7 Oct 2025 - 8:14 pm | असंका
वॉव,स्पॉयलर!
अलर्ट.....???
:(
हा पिच्चर गेल्या आठवड्यात दहा दहा मिनिटं करत सुमारे एक पाउण एक तासाचा बघून झाला आहे. ओके ओके मजा येत होती. आता हे काही तरी वेगळंच कळलं. आता वेग्ळ्या नजरेने बघितला जाइल!! (बघितला तर!)
(जर मी फास फोर्वर्ड न करता, अख्खा उरलेला पिच्चरच न बघता वेळ वाचवला, तर क्रेडिट आपल्याला... :D)
7 Oct 2025 - 9:46 pm | Bhakti
हम्म,मला नाही आवडला हा सिनेमा.खुपच ओव्हररेटेड वाटला.वेळ वाया गेला.
19 Sep 2025 - 3:24 pm | स्वधर्म
पार्किंग हा तामिळ सिनेमा काल अॅमेझॉनवर पाहिला. रोजच्या जीवनातील घटना कशा अंगावर काटा आणणार्या असू शकतात आणि चित्रपट हे काय ताकदीचे माध्यम आहे याची प्रचिती आणून देणारा. परीधी या वयस्कर व्यक्तीरेखेचा अभिनय अतिशय आवडला. अनेक दृष्टीकोन समोर ठेवत कथा अत्यंत उत्कंठावर्धक पध्दतीने पुढे जाते. खरे तर सिनेमा किंवा कोणतीही कला म्हणजे उत्कंठा कशी ताणली व पेलली जाते आणि ती कशी अनपेक्षित प्रकारे पूर्ण होते हेच आहे. अगदी शास्त्रीय संगीतातही समेवर येणे हा उत्कंठा पूर्ण होण्याचाच आनंद देते. ते या सिनेमात जमले आहे. बाकी थोडे सिनेमीकरण आहेच, तामिळ असल्याने पण जरूर पहा.
आता रामकुमार बालकृष्णन या दिग्दर्शकाचे सिनेमे शोधून पहावे असे वाटू लागले आहे.
19 Sep 2025 - 10:39 pm | NiluMP
ज्यांना डॉकमेंटरी आवडतात त्याचसाठी
नेटफ्लिक्स :
Take Care of Maya
Terrorism Close Calls
20 Sep 2025 - 7:44 am | Bhakti
Chernobyl
ही सिरीज मी खूप पूर्वी पाहिली होती.पण ज्यांना विज्ञान,इतिहास यांची आवड आहे त्यांच्यासाठी Must to watch सिरीज Hotstar वर आहे.सोवियेत युनियन -अमेरिका शीतयुद्धाच्या कालावधीत हे घडते.सोवियेत युनियनच्या कुचकामी रिॲक्टर धोरणाने हा कांड होतो.अनेक जीवांचा बळी घेणारा चर्नोबिल आणि राजकारण ,पाहण्यासारखे आहे.
20 Sep 2025 - 5:50 pm | सन्जोप राव
जिओवर ही अप्रतिम मालिका बघितली. एडी रेडमाईन (किंवा जो काही उच्चार असेल तो) जबरदस्त काम करतो. लाशाना लिंचला मुद्दाम जरा जास्त कळकट दाखवले आहे काय कुणास ठाऊक. उर्सुला कॉरबेरो (किंवा जो काही उच्चार असेल तो) काही वेळा छान दिसते. मूळ कादंबरीशी या मालिकेचा फारसा संबंध नाही, पण दुसर्या सीझनची वाट बघावीशी वाटावी अशी मालिका आहे.
21 Sep 2025 - 2:08 am | कॉमी
पाहिला. ठीक ठाक.
पहिला अर्धा भाग छानच होता.
त्यानंतर ताळतंत्र सुटले असे वाटले. अतर्क्य पण अनेकदा पाहिलेले होते पुढचे सगळे.
सगळ्यांचा अभिनय छानच. नवीन अभिनेत्री खूप सुंदर आहे.
गाणी चांगली आहेत.
21 Sep 2025 - 9:46 am | सुधीर कांदळकर
एक्स्चेन्ज ऑफर छान.
गजरा पण चांगला. त्यातले बांसरीचे गाहिरे सूर गारुड करणारे, प्रभावशाली वाटले.
@ स्वधर्मः
अगदी खरे.
21 Sep 2025 - 1:03 pm | Bhakti
TRIAL चा दुसरा सिझन आला !
काजोलवरची नजर हटत नाही.अप्रतिम अभिनय केलाय.कथा देखील एका कणखर महिलेची आहे.हिंदी सिरीज पाहणे मी बंद केलंय.पण काजोलची ही सिरीज पूर्ण पाहावीत लागेल.
25 Sep 2025 - 12:37 pm | कुमार१
पुस्तकविषयक
दीपा देशमुख
‘जग बदलणारे ग्रंथ’ या त्यांच्या माहितीपर ग्रंथाचा परिचय.
https://www.youtube.com/watch?v=mR1GpaxXLO8&t=1433s
सुंदर मुलाखत
. . .
पुस्तकांवरची पुस्तकं आणि धमाल किस्से
सुरेख परिसंवाद !
नितीन रिंढे, सौमित्र कदम, गणेश विसपुते, इ. मान्यवर.
. . .
सचिन कुंडलकर
https://www.youtube.com/watch?v=Gy3kb1HabFY&t=81s
कोबाल्ट ब्लू पासून मोनोक्रोमपर्यंतचा लेखनप्रवास
पुस्तकांची अन्य भाषात झालेली भाषांतरे
पुस्तक भाषांतर यंत्रणा स्थापन करण्याचा मनोदय.
26 Sep 2025 - 5:33 pm | Bhakti
+१
26 Sep 2025 - 5:47 pm | Bhakti
JOY -The Birth of IVF
जगातली पहिली आयव्हीएफ लुईस जॉय ब्राऊन हिचा जन्म १९७८ मध्ये झाला.
परंतू आयव्हीएफ तंत्रज्ञानावर १९६८ -१९७८ या दहा वर्षे स्टेप्टो, एडवर्ड्स आणि पर्डी यांनी मध्ये मानवी आयव्हीएफ संशोधनात सुरुवात केली.
डीएनए स्ट्रक्चरविषयी शोध लावणाऱ्या वॅटसन यांनीही चक्क या संशोधनाला विरोध दर्शविला होता हे पाहून खूप आश्चर्य वाटले.
मानवावरच्या पहिल्या टप्प्यातील संशोधनात त्यांना यश मिळवण्यात अनेक अडचणी आल्या.पण दुसऱ्या टप्प्यातील संशोधनात स्त्रीच्या फर्टीलायजेशनच्या सायकलनुसार सर्व प्रोसीजर केल्यावर त्यांना यश मिळाले.
पण फार उशीरा रॉबर्ट एडवर्ड्स यांना " इन विट्रो फर्टिलायझेशनच्या विकासासाठी " २०१० चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला . [ 29 ] स्टेप्टो आणि जीन पर्डी यांना मरणोत्तर नोबेल पुरस्कार दिला जात नसल्याने ते विचारात घेण्यास पात्र नव्हते.
यातूनच ख्रिश्चन धर्म तसेच समाजाचा अशाप्रकारच्या गर्भधारणेविषयीचे दुषित मत कारणीभूत आहे का हे वाटले.
सिनेमात प्रामुख्याने जीन पर्डी यांचे काम विशेष हे दाखविण्यात आले.त्या स्वतः सिविएर एंडोमेट्रियोसिसशी झगडत होत्या.त्यामुळे त्यांना एका अनफरटाईल स्त्रीसाठी मातृत्व किती महत्त्वाचे आहे हे जाणवत असेल.
छान संथ शीतल सिनेमा आहे.मानव हा मानवी जीवनाचा विज्ञानाद्वारे कसा शिल्पकार झाला हे पाहणं खुप रोचक वाटले.
3 Oct 2025 - 10:51 am | Bhakti
https://youtu.be/JZ5H9fEP2LU?si=vx-QBfiZ-Woe412i
हे तू नळीचे एक चॅनेल आहे.यात फिजिक्सचे सिद्धांत खुप मनोरंजन पद्धतीने सांगतात.पण हे चॅनल, फिजिक्स समजून घेण्यासाठी चिक्कार वेळ पाहिजे :)
3 Oct 2025 - 10:55 pm | श्वेता२४
एकदा बघायला छान आहे . ट्रेलर वरून स्टोरी काय असेल हे नक्कीच सांगता येत नाही. चांगली इंटरटेनमेंट ...साउथ चे एक्झॅगेरेशन आवडत असेल तर अशा लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल.
4 Oct 2025 - 1:31 pm | अमरेंद्र बाहुबली
काल परवा “रामचंद पाकिस्तानी” हा २००२ च्या खर्या घटनेवर आधारित पाकिस्तानी सिनेमा युट्युबवर पाहिला, या आधी २०१० लाही पाहिला होता पण तेव्हा इतका समजला नव्हता, एका पाकिस्तानी मुस्लिम व्यक्तीने पाकिस्तानी हिंदू कुटुंबावर सिनेमा बनवला हीच मोठी गोष्ट वाटली, सीमेपलीकडील वातावरण खासकरून थारपारकर जिल्हा, तिथले दलित हिंदू कुटुंब, एक लहान ७ वर्षांचा मुलगा कुटुंबावर नाराज होऊन बॉर्डर पार करून भारताच्या हद्दीत येतो, त्याच्यामागे त्याला शोधत त्याचे वडिलही भारतीय हद्दीत येतात, त्याना भारतीय सैन्य धरते, पुढे दोघांचा तुरंगवास, तुरुंगातील परिस्थिती, तिकडे त्या मुलाच्या एकट्या राहिलेल्या आईचे हाल सुंदरपणे चित्रित केलेत. भावनिक खेळ. आवडला सिनेमा. नक्की पहा.
https://youtu.be/q5SlisJJyNI?si=DyYFk0JHcFE6cnDV
सिनेमा पाहून झाल्यावर दिग्दर्शक मेहरीन जब्बार ह्याना मेल करून सिनेमा खूप छान बनवला, आवडला, फार बारकावे टिपलेत असे कळवले, आज मेलला त्यांचे उत्तर आले.
तुझ्या प्रेमळ आणि मनापासून आलेल्या संदेशासाठी खूप आभार. तुला माझा चित्रपट भावला याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या विभागलेल्या काळात आपली समान मानवता सांगणाऱ्या कथा महत्त्वाच्या आहेत. आपल्याला वेगळं करणारं जितकं आहे त्यापेक्षा आपल्याला एकत्र आणणारं खूप जास्त आहे. सरहद्दीपलीकडून तुझ्यासारख्या लोकांचे संदेश मिळणे खूप मोलाचं वाटतं, आणि अशी आशा आहे की आपल्या देशांमध्ये सहकार्य व प्रवास करणे लवकरच सहज शक्य होईल.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!
Thank you so much for your kind and thoughtful message. I’m delighted the film resonated with you. In these divided times, telling stories of our shared humanity matters. There’s far more that unites us than divides us and hearing from people like you across the border means a great deal, and I hope for the day when collaboration and travel between our countries is easy.
Wishing you all the best !
6 Oct 2025 - 8:00 am | Bhakti
वाह,थेट कलाकाराची पोचपावती खुप आनंद देते.
मी भारत पाकिस्तान यांच्यातील नातेसंबंधांवरचे कर्मशिअलच सिनेमे पाहिलेत -पिंजर, बजरंगी भाईजान,गदर.
7 Oct 2025 - 3:58 pm | सोत्रि
आहाहा....काय आठवण करून दिलीत.
पिंजर एक नितांत सुंदर सिनेमा आहे. आता शोधून बघणे आले....
- (पिंजरच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला) सोकाजी
5 Oct 2025 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिग्दर्शकाचं पत्र आवडलं. सिनेमा पाहतो, जरा मोकळा वेळ मिळाल्यावर.
-दिलीप बिरुटे
5 Oct 2025 - 9:27 pm | अमरेंद्र बाहुबली
दिग्दर्शिका आहे ती!
6 Oct 2025 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली
काल कार्तिक कॉलिंग कार्तिक हा २०१० चा सिनेमा पहिला, युट्यूबला आहे, थोडा धीमा वाटला, ढकलून पाहिला तरीही कळतो, सस्पेन्स चांगला आहे.
त्या आधी डरना मना है पाहिला, इतका भीतीदायक नव्हता.
7 Oct 2025 - 7:44 pm | Bhakti
Cleopatra's Final Secret' ही एक डॉक्युमेंटरी आहे.
कॅथलीन मार्टिनेझ यांनी क्लियोपेट्राच्या अंतिम स्थान(कबर) शोध घेतल्यानंतर, क्लियोपेट्राचे अंतिम रहस्य भूमध्य समुद्रावरील वाळवंट आणि पाण्याखालील मोहिमा दाखवते.
क्लियोपेट्रा ही इजिप्तची एक शेवटची फेरोह होतीच पण ताकदवान स्त्री होती.अशी ताकदवान स्त्री तत्कालीन रोमन साम्राज्याला नक्कीच नको होती.तिने हे ठरवलंच होतं की कोणत्याही पुरुषाच्या हातून तिच्या अंतिम स्थानाचा शोध लागू नये.जवळपास ३००० वर्षांनी कॅथलीन या संशोधिकेने तिचे शेवटचे स्थान शोधण्याचा दावा केला आहे.
ही अप्रतिम डॉक्युमेंटरी जियो हॉटस्टारवर आहे.
9 Oct 2025 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
फॉल हा २०२२ चा सर्वाईवल सिनेमा पाहिला! उत्कृष्ट होता, पूर्ण सिनेमाभर एक टेन्शन भरलेलं वातावरण तयार करण्यात यश आलय. नक्की पाहवा! अंगठीचे मालक (लॉर्ड्स ऑफ द रिंग) पाहणेही सुरू केले आहे, पहिला भाग पाहून संपला.