सध्या काय पाहता?(२०२५)

Bhakti's picture
Bhakti in काथ्याकूट
10 Sep 2025 - 9:25 pm
गाभा: 

जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
1
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.

प्रतिक्रिया

हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे. या चित्रपटातील गोल्डन गाण्याचे तिच्याकडून बरेच कौतुक ऐकले आहे. मध्यंतरी तेहरान नावाचा जॉन अब्राहमचा चित्रपट पाहिला, तो मात्र विषेश रूचला नाही.

गोल्डन .. अप्रतिम आहे.

वेडनेस्डेचा दुसरा सिझन पाहिला. ओके आहे, जेवढी हवा पहिल्या सिझन अन त्यातील लेडी गागाने गायलेल्या गीताने केली होती त्यामानाने दुसरा अगदीच ठिकठाक आहे.

श्वेता व्यास's picture

11 Sep 2025 - 12:11 pm | श्वेता व्यास

इतक्यात काही मराठी चित्रपट शोधून ते पहिले.
अनवट, ७ रोशन वीला, गैर, विकी वेलिंगकर (हा निव्वळ टीपी, पण तरी आवडला)

'दशावतार' मराठी सिनेमाची वाट पाहतेय.

श्वेता व्यास's picture

12 Sep 2025 - 1:47 pm | श्वेता व्यास

+१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा प्लॅन आहे, त्याआधी कोणी पाहिला तर कसा वाटला ते नक्की सांगा.

मी आज जाणार आहे, सांगते कसा आहे ते .

श्वेता व्यास's picture

12 Sep 2025 - 4:33 pm | श्वेता व्यास

ओक्के :)

Bhakti's picture

13 Sep 2025 - 10:44 am | Bhakti

वय वर्षे ८१ तरीही जेव्हा निळसर पाण्यात मत्स्य अवताराची निरसळ रंगभुषा घेऊन दिलीप प्रभावळकर ट्रेलरमध्ये पाहिले. तेव्हा हा कलाकार काळाची लीला सहज पार करू शकतो हे जाणवले.
दशावतार कोकणची लोककला मान ,कोकणी कलाकारांची ओळख आहे.हे सूत्र धरूनच एक सच्चा दशावतारी कलाकाराच्या विविधांगी रूपातून कोकणची सध्याची दुखरी नसही दाखवली आहे...खाणकाम!
निसर्गाचे वरदान देवराई ची छाया,राखणदाराची माया हळूहळू आधुनिकरणाच्या कचाट्यामुळे लोप जाईल का?हा सुन्न करणारा प्रश्न भेडसावत राहतोच आहे.
सिनेमा अस्सल कोकणी आहे.तिथली साधी माणसं लक्षात राहतात.सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या बापलेकाचे नाते खुप सुंदर भावूक करणारे दाखवले आहे.
पण पुढे अनेक थरारक घटनांमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या असंख्य विविधांगी फ्रेम नजर खिळवून ठेवतात.
भरपूर प्रीडेक्टेबल कथानक असले तरी त्याला दशावतारची जोड आणि कोकणच्या निसर्गाचा प्रश्न‌ यात हाताळण्याचा छान प्रयोग झाला आहे.अजय गोगावले यांच्या आवाजातील भैरवी गीत रंगपूजा गीत विशेष श्रवणीय आहे.
चांगला मराठी सिनेमा आपणच पुढे न्यायला हवा,पाहायला हवा.

बाकी ललित प्रभाकरचाही 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला आहे.त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
अजूनही कुर्ला टू वेंगुर्ले हाही कोकण पर्याटनाची कथा असणारा छान सिनेमा आलाय.

Bhakti's picture

13 Sep 2025 - 10:53 am | Bhakti

*(चि.व.चि.सौ.कां)

श्वेता व्यास's picture

15 Sep 2025 - 10:29 am | श्वेता व्यास

धन्यवाद @भक्ती :)
दिलीप प्रभावळकर यांच्यासाठीच पाहायचा आहे हा सिनेमा. शालेय वयात त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता, तेव्हापासून या वरून साध्या पण अस्सल कलाकार माणसाची मी फ्यान आहे.
त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
सेम सेम :) जाऊदेत वय नाही पण मन तर आहे ना ;)

नुकताच ब्लेड रनर पाहिला.
आवडला.

साय -फाय नक्की पाहणार.

स्वधर्म's picture

11 Sep 2025 - 4:56 pm | स्वधर्म

लाय टू मी ही अमेरिकन वेब सिरीज अ‍ॅमेझॉनवर पहात आहे. खोटे बोलणे ओळखण्याचे कौशल्य वापरून संशयितांमधून नेमका अपराधी शोधणे अशा वेगवेगळ्या कथांची थ्रिलर मालिका. सुरूवात तरी चांगली वाटत आहे.

Bhakti's picture

11 Sep 2025 - 8:20 pm | Bhakti

+१

जुइ's picture

11 Sep 2025 - 6:44 pm | जुइ

The Thursday murder club हा जेष्ठ कलाकारांना घेऊन तयार केलेला सिनेमा रंजक आहे, आवडला!

एक कोरियन चानेल होता त्यात खूप वेगवेगळे कार्यक्रम असत. कोरियन हेल्थ, व्यायाम, बालकथा, सायन्स, पॉप किंवा इतर संगीत आणि मालिकासुद्धा असायच्या. आता ते सर्व काढून फक्त मालिका ठेवल्या आहेत.

"गोल्डा" या युद्धातील गोल्डा मीर यांच्या नेतृत्वावर केंद्रित आहे. चित्रपटात दाखवले आहे की कशा प्रकारे गोल्डा मीर यांनी सुरुवातीच्या धक्क्यांनंतर इस्रायलला एकत्र आणले आणि अमेरिकेच्या मदतीने विजय मिळवला. हेलन मिरेन यांनी साकारलेली गोल्डा मीर यांची भूमिका युद्धातील नेतृत्व आणि दबावपूर्ण निर्णयांना ठळकपणे दाखवते.गोल्डा कर्करोगाशीही या काळात झुंज देत असते,खरोखर आयर्न लेडी होती.पण खुप संथ सिनेमा आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2025 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली

ब्रेकींग बैड च पाचवा सीझन चालू केलाय!

मारवा's picture

11 Sep 2025 - 8:48 pm | मारवा

Better call Saul चा पहिला season संपवून दुसरा सुरू आहे.
अत्यंत उत्कृष्ठ सिरीज आतापर्यंत तरी
ब्रेकिंग bad मध्ये जेव्हा saul चे पात्र बघितलेले होते तेव्हाच तो मनात रुतलेला होता. आता संपूर्ण series नेमक्या आपल्या आवडत्या पत्रावर बेतलेली म्हटल्यावर मोठा आनंद झाला.
मानवी भावनांचा खोलवर वेध, उत्कृष्ठ निर्मिती मूल्ये, सर्व कलाकारांचा लाजवाब अभिनय. किती तरी बाबी
सर्वात महत्त्वाचे script आणि फिलॉसॉफिकल स्टाईल फारच आवडली.
आणि किती ती वैविध्यपूर्ण महाभारत style पात्रे.
खूप आवडण्यात आलेली आहे.
ब्रेकिंग बॅड चे आणि vince gilligan चे फॅन असाल तर बेटर कॉल सॉल निव्वळ मेजवानी आहे

श्वेता२४'s picture

11 Sep 2025 - 10:36 pm | श्वेता२४

घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे. ज्यांना कौटुंबिक चित्रपट आवडतात त्यांनी जरूर हा चित्रपट पहावा . मला आवडला .
जारण - या चित्रपटाबद्दल बरेच बोलले लिहिले गेले आहे. अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट आवडला. पण कथा थोडी कमकुवत वाटली. प्रेडिक्टेबल वाटला.
कुबेरा- हा साउथ इंडियन मूवी आवडला. बऱ्याच दिवसांनी टिपिकल एंटरटेनिंग चित्रपट पाहायला मिळाला.

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2025 - 10:59 am | चौथा कोनाडा

घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे.

घरत गणपती :} मी पण सुरुवातीस घरात असंच वाचत होतो...

एकंदरीत सिनेमा छान आहे, गाणी छान आहेत.
पहिला अर्धा तास मराठी टीव्ही मालिकेसारखा वाटल्याने बंद करणार होतो .. पण कथानकाने योग्य वळण घेऊन मला रोखले.

कुमार१'s picture

12 Sep 2025 - 11:17 am | कुमार१

लघुपट
गजरा
खऱ्या सुगंधाचा अर्थ . . .
मोलकरणीच्या भूमिकेत मयुरी मोहिते यांचा सुंदर अभिनय !
https://www.youtube.com/watch?v=EdRa-3sqVqI&t=1s
. . .
अपरिचित (हिंदी)
आपल्याला फक्त फेसबुकी मैत्री हवी आहे की प्रत्यक्ष माणसांना भेटण्यात रस आहे ?
शिशिर शर्मा चांगल्या भूमिकेत
https://www.youtube.com/watch?v=sbMkZSHA5UY
. .
मुलाखत
गुलजार
खुसखुशीत, हास्यविनोदाने भरलेली, अर्थपूर्ण आणि राष्ट्रीयत्वाचे भान देणारी मोजक्या अर्ध्या तासाची सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=PKU9pQC5fSE
. . .
अनेक भारतीय भाषांमध्ये पारंगत असलेले भाषांतरकार आणि भाषाशिक्षक वासुदेव डोंगरे
सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=g9Gw1U_aMaI

सिरुसेरि's picture

12 Sep 2025 - 7:00 pm | सिरुसेरि

रिचर , शेरलॉक , क्राउन , रॉयल्स , कराटे किडस - लिजंडस , कोब्रा काय -- गेल्या काही महिन्यांमधे इत्यादी बघितले .

जुइ's picture

12 Sep 2025 - 11:00 pm | जुइ

किर्तनकार आफळे बूवांचे किर्तन ऐकण्याचा योग येथे गेल्या आठवड्यात आला. औलोकिक अनुभव होता त्याचबरोबर अविराज तायडे हे पंडित भिमसेन जोशींचे शिष्य यांचेही गायन ऐकायची संधी मिळाली. दोन्ही कार्यक्रमासांठी तुलनेत वेळ कमी होता त्यामुळे मनाला चुटुपूट लागून राहिली. अर्थात तूनळी सगळे पाहायला ऐकायला मिळतेच, प्रत्यक्ष अनुभूती निराळीच.

श्वेता व्यास's picture

15 Sep 2025 - 10:30 am | श्वेता व्यास

वाह ! +१

बोन एपेटिट, युअर मेजेस्टी" Bon Appetit, Your Majesty
कोरियन ड्रामा,५०० वर्षे भूतकाळात पोहचलेल्या शेफ मुलीची आणि तेव्हाच्या राजाची हलकी फुलकी रोमॅंटिक, कॉमेडी सिरीज आहे.ही कथा पाककृतींच्या विविध आविष्काराने सजली आहे.अधिक तर मांसाहारी पाककृती आहेत.तरीही ती शेफ ज्या पद्धतीने अनेक पदार्थांचा शोध लावते ते दरवेळी पाहायला खुपच मस्त वाटते.एकंदरीत खुप्पच गोड सिरीज आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Sep 2025 - 2:37 pm | चंद्रसूर्यकुमार

विकांताला मुंबई पोलिसांमधील प्रसिध्द इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्यावरील 'इन्स्पेक्टर झेंडे' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2025 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालीधर लापता पाहिला. अभिषेक बच्चनचा सहज सुंदर अभिनय आवडला.
कथा साधीच आहे. लहान मुलाचा अभिनय, छायाचित्रणही भन्नाट. मस्तच.

-दिलीप बिरुटे