ताज्या घडामोडी- मे २०२५

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
30 Apr 2025 - 7:30 pm
गाभा: 

आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.

लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywoo...

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2025 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली

युद्ध व्हायची शक्यता वर्तवली जात असतानाही शेअर मार्किट स्थिर कसे? हा प्रश्न मला पडललाय!

मुक्त विहारि's picture

30 Apr 2025 - 8:58 pm | मुक्त विहारि

भारतात इतके फितूर असताना कोण युद्धाच्या भानगडीत पडणार?

चार दोन जोरदार जीवघेणे ठोसे नक्कीच मारतील आणि ते पण मुके.... ह्या देशात फितूर भरपूर, त्यामुळे मुका मार देणेच योग्य.(IP Man तंत्र ज्ञान)

पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत जनतेला, युद्धाची सवय नाही.... त्यामुळे सगळ्या देशांच्या नेत्यांचा कल, गोरिला युद्धाकडेच आहे.

तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करा...

पलवाशा खान, ह्या पाकिस्तानी नेत्या म्हणतात की...२५ कोटी पाकिस्तानी जनता, आमच्या पाठीशी... थोडक्यात, पाकिस्तानी जनतेने हे मान्य केले आहे की पहलगाम हल्ला पाकिस्तानी सैन्याने केला... ह्याला एकजूट म्हणतात...

आणि आपलीच जनता इथे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देते....

युद्धाच्या झळा सोसायला तिथली जनता मानसिक रित्या तरी तयार आहे... आपली जनता, रात्रीचे दोन तास दिवे बंद केले तरी बोंबलत बसेल....

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 8:46 am | मुक्त विहारि

अलीगढ़ में मुस्लिम स्कूली छात्र से पाकिस्तान झंडे पर ठुकवाई कील, सरेआम सड़क पर करवाई पेशाब

https://www.abplive.com/states/up-uk/aligarh-hindu-organization-forced-m...

----

जाता जाता..

पाकिस्तानी लोकसंख्या २५ कोटी आणि एकाने देखील "भारत जिंदाबाद' अशी घोषणा केली नाही.

आणि ह्या देशांत मात्र, "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा ऐकायला मिळतात..
---
असो,

आनंद आहे...

युद्ध के डर से औंधे मुंह गिरा पाकिस्तान का शेयर बाजार; निवेशकों में मची अफरातफरी

https://www.jagran.com/world/pakistan-pahalgam-attack-pakistan-stock-mar...
-----
ये नया भारत हैं....

एक पाऊल पण नाही उचलले.... पाकिस्तानी घाबरले...

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2025 - 9:07 pm | अमरेंद्र बाहुबली

*BREAKING केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार:* मूळ जनगणनेसह केले जाईल, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय... https://link.divyamarathi.com/cHllkX1dZSb

पहलगाम हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्याचा मोदी सरकारचा डाव?

मुक्त विहारि's picture

30 Apr 2025 - 9:13 pm | मुक्त विहारि

याचे उत्तम उदाहरण...

आरक्षण नसते दिले तर म्हणाले असते की आरक्षण का नाही दिले? काँग्रेस तर कधीपासून जाती आधारित जन गणना करण्याची मागणी करत आहे...

आता

मागणी मान्य केली तर म्हणतात की आत्ताच का?
-----

असो,

तुमची पंचतंत्र वाचायची वेळ अद्याप गेलेली नाही....

अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट धोतराला हात घातलात ? आता ते कुठे पळतील ?

मोदींना शिव्या घालण्यासाठी, काही लोकांना पगार मिळतो.

आणि काही लोकांना परमपूज्य राहुल गांधी यांची तळी उचलण्यासाठी पगार मिळतो.

(एक विनोद....

तर्क शास्त्र, बहू बाजूंनी चालते....

ह्यांनी जे तर्क लावले ते तर्क लावून उद्या कुणी असेही म्हणू शकतो की "नॅशनल हेरॉल्ड स्कँडल" लपविण्यासाठी कुणीतरी पहलगामचा हल्ला केला असेल.कारण , ह्या दोन्ही प्रकरणा नंतर, परमपूज्य राहुल गांधी एकदम शांत झाले आहेत आणि वरून सुप्रीम कोर्टाचा सावरकर प्रकरणी आदेश...काँग्रेस आणि त्यांचे नेते, इतक्या खालच्या थराला जाणार नाहीत, इतपत तारतम्यता मला आहे...

सांगायचा मतलब असा की, स्वतःची बुद्धी वापरायची असते. बोळ्याने दूध किती दिवस पिणार?)

पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा- इंडिया में किसी ने मोदी का साथ नहीं दिया...

https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/lucknow-pakistan-parliament-...
---
.... काय बोलावं ते सुचेना ...

श्रीगुरुजी's picture

1 May 2025 - 9:07 am | श्रीगुरुजी

मुळात जात्याधारीत जनगणना, राखीव जागा प्रमाण वृद्धी या मुद्द्यांना बहुसंख्य जनतेचा पाठिंबा असल्याचे आजपर्यंत दिसले नाही. पप्पूने कंठशोष करून मागणी करूनही कॉंग्रेसला तसेच ही मागणी करणाऱ्या अन्य पक्षांना निवडणुकीत किरकोळ लाभ सुद्धा झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही.

तरीही अचानक हा निर्णय घेण्याचा गंभीर अश्वप्रमाद करण्याचे कारण काय? इतके दिवस हा निर्णय घेण्यास भाजप, संघ यांचा विरोध होता. आता हा निर्णय घेतल्यानंतर मागे फिरणे शक्य नाही. यातून प्रचंड सामाजिक तणाव निर्माण होईल. जातीजातीत यादवी माजू शकते.

एकदा जात्याधारीत जनगणना सुरू झाली की त्यात अजून नवीन मागण्या पुढे येतील व जनगणना समाप्तीनंतर आकडेवारी प्रसिद्ध करणे सरकारसाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकेल. महाराष्ट्रात मराठा जातीची टक्केवारी ३२-२४% नसून १६-१८% आहे किंवा देशभर इतर मागासवर्गीय ५२-५४% नसून ३५-३६% इतकेच आहेत असे निष्कर्ष आले तर सरकार ते प्रसिद्ध करण्याची टाळाटाळ करेल व केल्यास हे समाजगट ही आकडेवारी मान्यच करणार नाही आणि इतर समाजगट या आकडेवारीचा आधार घेऊन आपल्या मागण्या पुढे रेटतील.

राखीव जागा प्रमाण वृद्धी ही मागणी अत्यंत जोराने पुढे येईल व त्यासाठी सरकारला संसदेत घटनाबदल करून हे प्रमाण ७५-८०% पर्यंत न्यावे लागेल. यामुळे अराखीव गट संतापेलच, पण सर्वोच्च न्यायालय यावर स्थगिती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील सामाजिक वातावरण पूर्णपणे विषारी होईल.

केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल.

पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही.

पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही.

----
ह्या वाक्याला सहमत आहे...

आरक्षण ही दुधारी तलवार आहे आणि दुर्दैवाने ती भारतासाठी नेहमीच घातक ठरत आली आहे. उदा. नष्ट झालेले नंद साम्राज्य ते नष्ट झालेले मराठा साम्राज्य....
----

आपण इतिहासातून काहीच शिकत नाही...

खरे म्हणजे empirical data ही अत्यंत सुंदर.अशी गोष्ट आहे. जर आपला समाज आदर्श व नेते प्रामाणिक असते तर या data ने न्याय आणि विकास याचे उत्कृष्ठ संतुलन empirical data चा सुयोग्य वापर करून साधता आले असते. परंतु जसे तुम्ही खाली मराठा आरक्षण संदर्भात वास्तव सांगितले ते बघता आणि भारताची sady स्थिती बघता आहे होणे शक्य नाही. त्यामुळे यातून काही चांगले होईल ही आशा भाबडी म्हणावीबकेळ उलट black mirror होण्याची शक्य युरोपिया पेक्षा जास्तच आहे.
हा empirical data मात्र सतत नाकारणे म्हणजे आपण सर्व मागास समाज विरोधी आहोत हे दिसणे भाजपला परवडण्यासारखे नव्हते.कारण आरक्षणाविरोधी ही त्यांचीं प्रतिमा बऱ्यापैकी establish करण्यामध्ये virodhi यशस्वी झालेत आणि प्रत्यक्षात भाजपा आहे सुद्धा.
आता राहुल गांधी यांना हा मोठा मुद्दा भाजपची हिंदू मते फोडण्यासाठी महत्वाचा आहे असे वाटले असावे. कारण त्यांचे अदानी किंवा इतर मुद्दे तितक्या मोठ्या वर्गाला अपील होऊ शकत नवते. त्यामुळे त्यांनी जाती गणना व आरक्षनाची 50 टक्के सीलिंग तोडू हा मुद्दा लावून धरला. ( त्यांचे थोडे ग्रेस च्या या ओळी सारखे झाले घन जमतील तेव्हा जमतील मोकळे तू केस सोड परसात तुझ्या तरी काय ? निष्पर्ण सुरूचे खोड ) गमतीचा भाग सोडला तर ही मागणी राहुलची एकट्याची नव्हती लालू आणि इतर अनेक मंडळी याची मागणींकरात आहेत.
बघू या काय होते ते
Let us hope for the best

आग्या१९९०'s picture

1 May 2025 - 9:34 am | आग्या१९९०

केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल.
हा प्रकार कधी झाला?

मां भारतीय, पिता पाकिस्तानी… अब कहां जाएंगे बच्चे? पुलिस कंफ्यूज; MP में फंसा पेंच

https://www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/jabalpur-mother-is-indian-...
----

त्यात विचार काय करायचा? ह्याचे उत्तर फार आधीच, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिले आहे.

"शत्रू राष्ट्राच्या मुलांना थारा देऊ नये. विषवल्लीच्या बिया, विषारीच वेली तयार करतात."

भोपाळ मध्ये "नराधम फरहान गँग" बद्दल लेख लिहीत असताना खालील बातमी मिळाली....

"भोपाल में नया कांड, 17 साल की दलित लड़की बोली- जोया भाभी भाई शाहरुख से करवाती.."
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/bhopal-dalit-girl-alleges-r...
-------

धर्मराजमुटके's picture

1 May 2025 - 11:35 am | धर्मराजमुटके

कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही.
भारतातून जात जाणार नाही, राजकारणी जातीपातीचा वापर करुन घेणारच मात्र त्याला आपण किती बळी पडायचे हे वास्तव स्वीकारुन जात आधारीत जणगणणेचा स्वीकार केला गेला पाहिजे. आर्थिक सुबत्ता वाढली की जननदर कमी होतो असा एक सर्वसाधारण सिद्धांत आहे तो खरा आहे की खोटा ते ही या निमित्त पडताळून पाहता येईल. शिवाय जनगणनेच्या सुधारीत आकड्यामुळे सरकारी विभागांना जुन्या कार्यक्रमांमधे नव्याने बदल करावे लागू शकतात (ते चांगले की वाईट हा कळीचा मुद्दा)

बाकी आरक्षणाच्या मुद्यावर न बोललेले बरेच (विशेषतः सवर्णांनी).
ब्राह्मणाच मुलगा ब्राह्मण राहणार आणि शुद्राचा मुलगा शुद्रच राहणार ही व्यवस्था बदलायची म्हणून आणि सामाजिकदृष्ट्या मागास जनांना पुढे आणायचे म्हणून आरक्षणव्यवस्था चालू केली मात्र कोणत्याही चांगल्या गोष्टीचे वाट्टोळे करण्यात आपण भारतीय हुशार आहोत. (निदान ह्या दृष्टीने तरी आपणा सर्वांचा डीएनए एकच आहे ही म्हण लागू होते). आज ७० वर्षे झाली तरी बहुधा सगळ्या जातींचे लोक त्यांच्या जुनाट बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर प्डू शकले नाहीत. जे बाहेर पडले त्यांनी आपले कल्याण साधले. ज्यांनी आरक्षणाचा लाभ दोन तीन पिढ्या घेतला तेही मानसिक गुलामगिरीतून / मागासपणातून बाहेर पडलेले नाही किंवा आपले आरक्षण आपल्याच जातीतल्या गरजुला देण्याइतपत दाते होऊ शकले नाहीत.

जातीय जनगणनेने काही तणाव निर्माण होतील म्हणून ती करायचीच नाही म्हणजे शहामृगासारखे वाळूत तोंड खूपसून बसण्यासारखे आहे. कोण जाणे, कदाचित एखादी चांगली गोष्ट देखील पुढे येऊ शकेल. उम्मीद पर दुनिया कायम है !

अवांतर-१ : जातीय जनगणनेत जात बाह्य / धर्मबाह्य विवाह करणार्‍यांची पण शिरगणती व्हावी म्हणजे सामाजिक अभिसरण रोटी बेटी व्यवहारात किती पुढे सरकले आहे तेही तपासून पाहता येईल.

अवांतर-२ : जनगणनेच्या वेळी जात न सांगण्याचा पर्याय असावा व जातीला महत्व नसेल तर जात न सांगणारे किती जण निघतात ते देखील पाहणे रोचक ठरेल.

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 12:12 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला...

धर्मराजमुटके's picture

1 May 2025 - 11:38 am | धर्मराजमुटके

तमाम मराठी जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
खरे तर मिपा ने आज बॅनर लावावयास हवे होते. असो !

श्रीगुरुजी's picture

1 May 2025 - 11:49 am | श्रीगुरुजी

पाकिस्तानशी चर्चा करा या विरोधकांच्या मागणीचा अनावश्यक ताण घेऊन वाजपेयी-अडवाणींनी मुशर्रफला भारतात बोलावून भारताचे तोंड काळे करून घेतले.

तसेच जात्याधारीत जनगणनेच्या अनावश्यक मागणीचा दबाव घेऊन मोदींनी जात्याधारीत जनगणनेचा निर्णय घेतलेला दिसतो.

वाजपेयींनी मुशर्रफला दिलेले आमंत्रण काढून घेतले असते तरी खूप काही वेगळे झाले नसते. परंतु जात्याधारीत जनगणनेच्या निर्णयावर माघार घेणे शक्य नाही.

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 12:20 pm | मुक्त विहारि

सहमत आहे..

सत्तेपुढे आणि एकगठ्ठा मतदारांपुढे, कुणाचेच काही चालत नाही... कधी तरी आपण एकत्र भेटू आणि शांत पणे बियर पिऊ...

बाय द वे,

आरक्षण ह्या जगात अनादी अनंत काळापासून सगळीकडे आहे आणि कमी अधिक प्रमाणात ते राहणारच आहे...

पृथ्वीराज कपूर यांची चौथी पिढी, स्वतः च्या तोंडाला रंग फासून पैसे कमवत आहे. हे एक उदाहरण...

जात्याधारित आरक्षण या गोष्टीने हिंदू समाजाचे जे अपिरिमित नुकसान झाले आहे त्यास तोड नाही.

हिंदुत्ववादी असल्याचा दावा करून हिंदूंची मते मिळवून सत्तेत आलेल्या संघप्रणीत मोदींनी मागच्या दहा बारा वर्षांत -

- हिंदुहिताचा एकही नवीन निर्णय घेतला नाही
- हिंदुअहिताचा एकही जुना निर्णय रद्द केला नाही

---

काँग्रेस ही हिंदूंची थेट शत्रू आहे तर भाजप हा हिंदूंचा छुपा शत्रू आहे.

कोणीही मित्र नसलेला व सर्वच शत्रू असलेला हिंदू समाज म्हणजे पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप!

आग्या१९९०'s picture

1 May 2025 - 12:30 pm | आग्या१९९०

कळप सोडा.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2025 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली

चला भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष नाही इथपर्यंततरी काही लोकांची प्रगती झाली!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2025 - 2:19 pm | अमरेंद्र बाहुबली

राहुल गांधींपुढे मोदी झुकले, शेवटी सत्य जिंकले!
सत्यमेव जयते! माझा भारत महान!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2025 - 5:48 pm | अमरेंद्र बाहुबली

नरेंद्र मोदींनी एका रात्रीत २८ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली, आणि पाकिस्तानात जणू भूकंपच आला! रस्त्यापासून संसदेपर्यंत, लष्करापासून गल्लीपर्यंत, सगळीकडे हलकल्लोळ माजलाय.
- इस्लामाबादेत पाकिस्तानच्या संसदेवर दगडफेक!
- पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
-युट्युब चॅनल बंदीमुळे पालिस्तानी लष्कराची सप्लाय चेन कोसळली.
-पाकिस्तानात मटण महागले, बोकडचोरीच्या घटना वाढल्या.
- कराचीत लोक उंच बिल्डिंगवर चढून उड्या टाकताहेत कारण खायला काही नाही.
- सिंधू नदीत उड्या टाकून अनेकांची आत्महत्या, कारण मोदींचा मास्टरस्ट्रोक!
-पाकिस्तानचे नेते मिळेल ती फ्लाईट पकडून देश सोडताहेत.
-अतिरेकी गुफेतून बाहेर येऊन स्वतावर गोळ्या झाडताहेत.
- अनेक मुल्ला मौलवींचे पाकिस्तान सोडून पलायन!
- “28 चॅनल बंदीचा मास्टरस्ट्रोक मागे घ्या” पाकी पंतप्रधानांची मोदींकडे भीक!
- युट्यूब चॅनल बंदीने पाकी पंजाबातील गहू उत्पादनावर परिणाम. पाकी शेतकरी हवालदिल!
- पाकी परिवहन यंत्रणा कोलमडली!
- गहू पाकी सीमांवर अडलेला, युट्युब चॅनल चालू झाल्याशिवाय गहू देशाबाहेर निघणे कठीण!
- पाकव्याप्त काश्मीरात बर्फ वितळण्यास सुरुवात, ह्यामागे मोदींची २८ युट्युब चॅनलवरील बंदी कारणीभूत, जागतिक हवाईसुंदरी असोसिएशन च्या प्रमुखांचे मत!
- हे सगळे पाहून मोदी, डोभाल नी शहा ह्यांनी पार्टी केल्याची बातमी.

महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या.

https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/5054074/inflation-at-peak...
----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही...

धर्मराजमुटके's picture

1 May 2025 - 8:23 pm | धर्मराजमुटके

Meritocracy vs. Social Justice एक जरुर पहावी अशी चित्रफीत

यातील सुटी सुटी मते माहीत होती. परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे. तरी ते थोडे. एकांगी आहेत. या द्वैत वरील ही खालील निष्कर्ष मला फारच मार्मिक व अचूक व अचूक काटेकोर संतुलन साधलेली वाटली बघा तुम्हाला काय वाटते.

The debate over the 50% ceiling on reservations reflects a dynamic tension between the principles of equality and social justice.

While maintaining the ceiling ensures a balanced approach to merit and representation, the socio-economic realities necessitate a flexible, context-sensitive application.

Moving forward, a comprehensive policy review, informed by empirical data and societal needs, is essential to create a reservation system that is both equitable and effective in addressing the aspirations of all communities.

हा गोळा केला जात होता /आहे सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही. पण तुम्ही बघा सरसकट हे द्या सरसकट सगे सोयरे टाका इत्यादी जन दबावापुढे झुकून जेव्हा काम होते तेंव्हा कसला empirical data आणि कसला policy review
असे कठोर वास्तव आहे अशी आपली राजकीय व्यवस्था आहे.

श्रीगुरुजी's picture

1 May 2025 - 10:40 pm | श्रीगुरुजी

सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही.

खटला अत्यंत संथ वेगाने सुरू होऊन अर्धवट अवस्थेत असताना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या राज्यात केल्याने आतापर्यंतची सुनावणी पूर्णपणे रद्द झाली आहे. खटल्याची नव्याने सुनावणी होण्यासाठी तिसऱ्या न्यायाधीशाची जागा भरणे आवश्यक आहे व अनेक महिन्यांनतरही ती जागा भरली जात नाही.

हा तथाकथित इंपिरिकल डेटा हा पूर्णपणे फार्स होता हे माहिती असल्याने आणि नीट सुनावणी झाल्यास राखीव जागा तिसऱ्यांदा रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असल्याने खटलाच अनेक वर्षे लोंबकळत ठेवणे हा उपाय शोधलेला आहे. यात राज्य सरकार व न्यायव्यवस्थेचे साटंलोटं असणार.

मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी शिंदेंनी सर्वेक्षणाचे पूर्वीप्रमाणेच नाटक करून सर्व खोटा डेटा दाखवून प्रगत मराठा जातीला अत्यंत मागास ठरवून राखीव जागा दिल्या. परंतु मुख्यमंत्रीपद टिकले नाही. मधल्या मध्ये अराखीव गटाचे नुकसान करून टाकले.

स्वधर्म's picture

2 May 2025 - 4:06 pm | स्वधर्म

आपल्या मुद्द्यांशी सहमत आहे. केवळ जरांगे यांच्यासारख्यांच्या दबावामुळे हे सगळे करण्यात आले व आता सगळेच अधांतरी होऊन बसले आहे. परंतु या मोमेंटमचा फायदा घेत प्रशासन व राजकारणातल्या अनेकांनी प्रचंड घाई करुन फार मोठ्या प्रमाणात 'कुणबी' प्रमाणपत्रे वाटली व या ना त्या मार्गाने राखीव जागांत शिरकाव करून घेतला. त्याने खर्‍या मागास गटांचे नुकसान झाले ते झालेच.

पण जे वास्तव कुणबी होते असे सोडून अजून कोणाला म्हणजे जे कुणबी नव्हते अशा अपात्र व्यक्तींना मिळाली तरच चुकले ना ?

असे झालेले आहे का ? असल्यास त्याचे प्रमाण किती खऱ्या कुणबी certificate च्या तुलनेत?

असे मोठया प्रमाणात झाले आहे का ?
अपात्र असून कुणबी प्रमाणपत्र दिले असे झाले असेल तर मात्र मोठे नुकसान झाले

वामन देशमुख's picture

1 May 2025 - 10:30 pm | वामन देशमुख

... परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे.

जर typo नसेल तर फारच + मार्मिक == फार्मिक हा शब्द आवडला.

माझ्या फार घाणेरड्या चुका होत आहेत हल्ली मोबाईल वर टाईप करताना. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिसळपाव चे मास्तर फार कडक आहेत चूक झाली म्हणजे झाली चुकीला क्षमा नाहीच.
Edit चा पर्याय नाही. Bhiga आपल्या कर्मा
ची फळं बघत रहा आता तुम्ही काय वेडवाकड टाईप केलेलं आहे ते
इलाज नाही मिस्टर नेने इलाज नाही सारखं
पण छान शब्द अपघाताने निर्माण झाला हे खरं

वामन देशमुख's picture

2 May 2025 - 1:41 pm | वामन देशमुख

वक्फ चा विरोध म्हणून गावाची वीज कापली!

https://www.amarujala.com/video/uttar-pradesh/kanpur/video-protest-again...

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2025 - 9:06 pm | अमरेंद्र बाहुबली

https://www.tv9marathi.com/videos/india-digital-strike-on-pakistan-pm-sh...

बापरे काय ती कारवाई! पाकिस्तानचा थरकाप उडाला असेल! हर हर मोदी, नमो नमो!

श्रीगुरुजी's picture

2 May 2025 - 10:04 pm | श्रीगुरुजी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील व भारतातील पाकिस्तानचा निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी विदूषक एकदम जागे होऊन पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2025 - 10:07 pm | अमरेंद्र बाहुबली

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील अंधभक्त व पाकीसमर्थक भारतातील निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी अंधभक्त विदूषक एकदम जागे होऊन पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत.

श्रीगुरुजी's picture

3 May 2025 - 5:11 pm | श्रीगुरुजी

खालील पाकिस्तानी वृत्तपत्रांची संकेतस्थळे आज उघडत नाहीत.

- डॉन, द नेशन, एक्सप्रेस ट्रिब्यून, पाकिस्तान टुडे, न्यूज इंटरननॅशनल, डेली टाईम्स

कालपर्यंत डॉन ऑनलाईन वाचता येत होते. आता या क्षणी वरीलपैकी कोणत्याच वृत्तपत्राचे संकेतस्थळ उघडत नाही.

भारतात ही वृत्तपत्रे वाचता येऊ नये यासाठी भारतानेच ही संकेतस्थळे प्रतिबंधित केली की पाकिस्ताननेच प्रतिबंधित केली की माझ्याच आंतरजाल जोडणीत समस्या येत आहे हे समजय नाही.

श्रीगुरुजी's picture

3 May 2025 - 11:33 pm | श्रीगुरुजी

D

पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदू असल्यामुळे मारले नाही हा प्रचार पाकिस्तानप्रेमी सातत्याने करताहेत. मागील आठवड्यात पवारांनी हाच प्रचार केला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 May 2025 - 11:54 pm | अमरेंद्र बाहुबली

ते काहिका प्रचार करेना! आपण ३५-४० हजार वार्षिक खर्च करूनही अतिरेकी इतक्या आत पोहोचले कसे नी परत गेले कसे हा प्रश्न सरकारला विचारत राहिला पाहिजे, एवढे हजारो कोटो नक्की काश्मीर वर खर्च होताहेत की भाजप नेत्यांच्या स्विस बँक खात्यात जाताहेत? हे देखील!

चंद्रसूर्यकुमार's picture

4 May 2025 - 9:37 pm | चंद्रसूर्यकुमार

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्राएलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर अनेक अमेरिकन विद्यापीठांमध्ये इस्राएलविरोधी निदर्शने झाली होती. हार्वर्डमध्ये झालेल्या अशाच एका निदर्शनात इब्राहिम भरमाल या विद्यार्थ्याने एका ज्यू धर्मीय विद्यार्थ्याला मारहाण केली होती. अमेरिकेत अशाप्रकारचे गुन्हे किरकोळ समजले जात नाहीत आणि अशा गुन्ह्यांना तुरूंगवासाची शिक्षा असते. मात्र इब्राहिम भरमलला बॉस्टनमधील न्यायाधीशाने काय शिक्षा दिली? तर रागावर नियंत्रण कसे ठेवावे हा कोर्स करायला सांगितला. https://www.nbcboston.com/news/local/harvard-grad-students-ordered-to-at... मागच्या वर्षी दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून दोघांचे जीव घेणार्‍या पुण्यातल्या त्या पोरट्याला दारू पिण्याचे दुष्परीणाम हा निबंध लिहायला एका न्यायाधीशाने सांगितला होता तसे करणारे गुडघ्यातले न्यायाधीश फक्त भारतातच असतात असे नाही.

त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्या इब्राहिम भरमालला हार्वर्ड लॉ स्कूलने ६५ हजार डॉलरची फेलोशिप दिली. म्हणजे ज्यू विद्यार्थ्याला मारहाण करणे हा गुन्हा किरकोळ होता असे हार्वर्डचे मत आहे का? समजा उबर-ओला वगैरे टॅक्सी वाहनचालकाचा धर्म बघून कोणी रद्द केली अशी बातमी आली तर मग झेनोफोबिया, अमका फोबिया, तमका फोबिया वगैरे आकांडतांडव करणारे डापु गँगमधील लोकांना एखाद्याचा धर्म बघून मारहाण करणे/ जीव घेणे वगैरे समर्थनीय वाटत असावे कदाचित.

बरं डापु गँगवाले लोक काय करतील ते करतील. ते तसलेच आहेत. पण त्या इब्राहिम भरमालला ती फेलोशिप दिल्यानंतर ट्रम्पतात्यांनी हार्वर्डचे करमुक्त स्टेटस रद्द केले आहे. हार्वर्डला देणगी मिळते किंवा इतर स्त्रोतांमधून जे उत्पन्न आहे (केस स्टडी विकणे, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूची वर्गणी वगैरे) त्यावर कर भरणे इतकी वर्षे अपेक्षित नव्हते. हार्वर्डला मिळालेल्या उत्पन्नाचे काय करायचे हे ते विद्यापीठ ठरवेल. पण ज्ञानाची आराधना करणे सोडून असल्या प्रकारांना ते समर्थन/प्रोत्साहन द्यायला लागले तर त्यांचे करमुक्त स्टेटस रद्द करून तात्यांनी काही चुकीचे केले असे वाटत नाही.

अशीच अद्दल भारतातील जे.एन.युला कधी घडविणार याची वाट बघत आहे. हार्वर्ड हे बर्‍याच अंशी अमेरिकेतील जे.एन.युच आहे.

श्रीगुरुजी's picture

4 May 2025 - 10:01 pm | श्रीगुरुजी

चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाणी भारताने अडविले.

झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे पाणी सुद्धा अडविले जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी कितपत खरी आहे व खरी असल्यास याचे कोणते, किती प्रमाणात व केव्हा परिणाम होतील याची कल्पना नाही.

आग्या१९९०'s picture

4 May 2025 - 10:44 pm | आग्या१९९०

अंगातले पाणी दाखवा. पहलगामच्या अतिरेक्यांना पकडा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2025 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज ५ मे, आजच्या ५ मे १८१८ रोजी जर्मनीत ट्रीयर येथे कार्ल मार्क्सचा जन्म झाला. बर्लीन विद्यापीठात तत्वज्ञान या विषयात पीएच.डी संपादन केली. २४ फेब्रुवारी १८४८ साली जगातील जवळपास सर्व भाषेत प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे 'कम्युनिष्ट पक्षाचा जाहीरनामा' . पृथ्वीच्या निर्मीतीपासून तर माणूस समाज कसा कसा बदलत गेला त्याची जशी चर्चा त्यांनी त्यात केली तशी चर्चा आजही होतांना दिसते. भांडवलदार कामगारांच्या श्रमाची कशी चोरी करतात त्यावर लिहून-बोलून भांडवलशाहीच्या उरात धडकी भरवली. प्रभावी राजकीय विचारवंत म्हणूण कार्ल मार्क्स विचार केला जातो. कार्ल मार्क्सचे समर्थक आणि विरोधक दोघेही त्यांना विसरु शकत नाही हे त्याचे वैशिष्ट्ये.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

5 May 2025 - 11:24 am | चंद्रसूर्यकुमार

काहीकाही माणसं जन्माला आली नसती तर जगावर अनंत उपकार झाले असते अशा माणसांच्या यादीमध्ये कार्ल मार्क्सचा क्रमांक फार वरचा आहे. हा एक माणूस जन्माला आला नसता तर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2025 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काहीकाही माणसं जन्माला आली नसती तर जगावर अनंत उपकार झाले असते

अशी यादी फार मोठी होईल.... ;)

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

5 May 2025 - 11:40 am | वामन देशमुख

हा एक माणूस जन्माला आला नसता तर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले असते.

मार्क्स आणि शांतिदूत यांच्यात स्पर्धा आहे!

श्रीगुरुजी's picture

5 May 2025 - 1:28 pm | श्रीगुरुजी

१९ व्या व २० व्या शतकात जन्मलेली आणि आता हयात नसलेली काही तथाकथित भारतीय माणसे जन्माला आली नसती तर भारतावर अनंत उपकार झाले असते व भारताची इतकी वाट लागली नसती.

युयुत्सु's picture

5 May 2025 - 11:30 am | युयुत्सु

<भांडवलदार कामगारांच्या श्रमाची कशी चोरी करतात त्यावर लिहून-बोलून भांडवलशाहीच्या उरात धडकी भरवली. >

किंचित अवांतर - अनेकवेळा कामगार पण मालकाचे शोषण करतात. विशेषतः सरकार जेव्हा मालक असते तेव्हा हे जास्त प्रकर्षाने जाणवते.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 May 2025 - 11:36 am | अमरेंद्र बाहुबली

+१
बरेच सरकारी कर्मचारी काम न करून सरकारचे नी लाच घेऊन जनतेचे शोषण करतात, भारतात तर हा प्रकार खूप आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2025 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशासनात सुधारणा होण्यासाठी आता 'टेक-वारी' उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवे तंत्रज्ञान नवे बदल झाले पाहिजेत. पण, आज काय परिस्थिती आहे. ( राम राज्य आलेलं आहे, या भोळ्या भाबड्या अडाणी लोकांचे मते तो भाग वेगळा ) पण, सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अगदी भ्रष्टाचार अधिकृत झाला आहे. चिरीमिरी शिवाय आता कोणतेच काम होत नाही हे आपल्या मनात ठसले आहे. कोणतेही क्षेत्र असो अगदी न्यायपालिकडे सुद्धा संशयाने बघितल्या जात आहे, यात सुधारणा करण्यासाठी किती पावले उचलल्या गेली ? ते दिसत नाही. उलट मंत्री, अधिकारी वसुली नाक्यावर उभे असल्यासारखे सर्वच क्षेत्रात शोषण करतात. अधिका-यांकडे वाढणारी संपती पाहता त्यांचं शोषणाचं काम प्रचंड वाढलेले दिसत आहे. कडक कायदे आणि उपाययोजना करण्याऐवजी नेते, मंत्री, सरकारही लोकांना वाढत्या धार्मिकतेकडे घेवून जातात, बुवाबाजी-सत्संग यात गुंतवून ठेवतात. समाजाला- देशाला कुठे घेऊन जायचं हे धोरण ठरत नाही तोपर्यंत हे असे व्हायचेच. नवे तंत्रज्ञान जनतेच्या फायद्याचे ठरो अशी भाबडी अपेक्षा ठेवतो.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

5 May 2025 - 12:58 pm | श्रीगुरुजी

D

मार्क्ससोबत जन्मोत्सव आणि महाभंडारा हे वाचून आधी मौज वाटली पण नंतर लक्षात आले कि त्यात वावगे काही नाही.

उजव्यांचे विश्वगुरु अमुक आणि डाव्यांचे विश्वगुरु तमुक; यांच्या जन्मोत्सवानिमित्त हे महाभंडारा करतात, त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त ते महाभंडारा करतात. म्हटले तर दोन्हीही शेणपट्ट्यात वळवळणारे गोबरवादी, म्हटले तर दोन्हीही समर्थक अनुयायी!

फरक असेल तर एवढाच की मार्क्सच्या मानवताविरोधी विचारसरणीने कोट्यवधी लोक मरण पावले; उजव्या विचारसरणीने मात्र अब्जावधी लोकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा, दिशा आणि साधने मिळाली.

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 12:24 am | श्रीगुरुजी

कार्ल मार्क्सच्या जयंतीनिमित्त महाभंडारा

कार्ल मार्क्सची काही वचने मला खूप आवडतात.

The rich will do anything for the poor but get off their backs.

The production of too many useful things results in too many useless people.

Reason has always existed, but not always in a reasonable form.

माझे सर्वाधिक आवडते वाक्य -

History repeats itself, first as tragedy, then as farce.

मूळ वाक्य हेगेलने History repeats itself एवढेच लिहिले होते. कार्ल मार्क्सने त्यात थोडी भर टाकली.

कार्ल मार्क्सने बूझ्वा (bourgeois) या शब्दाला एक वेगळाच अर्थ दिला. त्याच्या म्हणण्यानुसार बूझ्वा (बुर्झ्वा हा चुकीचा उच्चार आहे व या शब्दाचा प्रतिगामी, कर्मठ, पुराणमतवादी असा चुकीचा अर्थ घेतला जातो) म्हणजे ढोंगी मध्यमवर्गीय जे कायम नीतिमत्तेची प्रवचने देत असतात, परंतु धनसंपत्ती मिळविण्यासाठी नैतिक अनैतिक अश्या सर्व मार्गांचा अवलंब करतात.

श्रीगुरुजी's picture

5 May 2025 - 2:09 pm | श्रीगुरुजी

बागलीहार धरणापाठोपाठ चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजेही भारताने बंद केले.

झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही दरवाजे भारत बंद करण्याची शक्यता आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 May 2025 - 3:39 pm | अमरेंद्र बाहुबली

ही नाटके काही दिवस चालतील, आपल्या कळण्याधीच पाणी औरू केले जाईल (कारण मग पडलेल्या पावसाचे पाणी जमा करून ठेवणार कुठे?) मग पुढील हल्ल्यापर्यंत पाणी सुरूच राहील! ५६ इंची छाती दाखवून हल्ला करा म्हणावे, नुसती नाटके नको!

चंद्रसूर्यकुमार's picture

5 May 2025 - 3:41 pm | चंद्रसूर्यकुमार

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याची घोषणा केली. याच शंकराचार्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तेव्हा विरोधकांना अगदी उकळ्या फुटल्या होत्या अगदी मिपावरही तेव्हा वाचल्याचे आठवते की- बघा शंकराचार्य पण विरोध करत आहेत. स्वतः राहुल गांधी म्हणाले होते- शंकराचार्य या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठ्या अधिकारी व्यक्तीने असे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हिंदू धर्मात सगळ्यात मोठा अधिकारी वगैरे असा कोणी नसतो हेच मुळात राहुल गांधींना माहित नसावे. असो. पण आता झाले असे आहे की शंकराचार्यांनी राहुल गांधींना असे हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत- "याच प्रवृत्तीच्या लोकांनी महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या आणि आता ते राहुल गांधी यांना टार्गेट करत आहेत" https://marathi.indiatimes.com/maharashtra/parbhani/harshwardhan-sapkal-...

आहे की नाही मज्जा? या मंडळींच्या मनासारखे शंकराचार्य बोलल्यावर- बघा शंकराचार्य पण तेच म्हणत आहेत असे म्हणायचे. आणि त्याविरूध्द बोलल्यावर लगेच नथुराम प्रवृत्ती म्हणायचे. अमक्याला पाकिस्तानात पाठवा, तमक्याला पाकिस्तानात पाठवा (कोणतेकोणते धर्मनिरपेक्षतावाले डापु लोक) अशी मागणी मधूनमधून होते असते. अशा मागण्यांमध्ये काहीही दम नसला तरी अशा मागण्या हे लोक जे काही बरळत असतात त्यामुळे उद्वेगातून होत असतात. मिपावर मागे एक विद्वान होते. ते अशी मागणी करणार्‍यांना 'पाकिस्तान पर्यटन विभागाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर' म्हणायचे. त्याच धर्तीवर काँग्रेस आणि इन जनरल सगळी डापु जमात नथुराम, मनू वगैरेंचे पर्सनल सेक्रेटरी असावेत. कोण नथुरामवादी, कोण मनूवादी वगैरे त्यांना अचूक कळते :)

बाकी हे शंकराचार्य (आणि सुब्रमण्यम स्वामी, यशवंत सिन्हा सुध्दा) वगैरे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रांप्रमाणे असतात. आपल्याला येनकेनप्रकारेण प्रसिध्दी मिळायला हवी असे वाटत असले पण पाहिजे ती प्रसिध्दी मिळत नाही असे दिसले की काहीही बोलून कधी कोणावर जाऊन आदळतील याचा काहीही भरवसा नसतो. आज आपल्या विरोधकावर जाऊन आदळले म्हणून टाळ्या पिटणार्‍यांना तेच भरकटलेले क्षेपणास्त्र भविष्यात आपल्यावरही कधीतरी येऊन आदळेल याची कल्पनाही नसते. अशा लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे जरी लक्षात आले तरी ते चांगलेच होईल :)

अमरेंद्र बाहुबली's picture

5 May 2025 - 3:45 pm | अमरेंद्र बाहुबली

राहुल गांधी तसेही मनुवादी नाहीत त्याना हिंदू धर्मात घेतल्याचा आनंद नाही नी धर्मातून काढल्याचे दुःख नाही, पण जे मनुवादी वृत्तीचे लोक मनुवाद मानतात, ते आपसूक शंकराचार्याना मानतात, त्यांनी राममंदिर उदघाटनाला शंकराचार्यांचा विरोध पाहून स्वतःही विरोध करायला हवा होता ना?

त्यांना भरकटलेले क्षेपणास्त्र असे आपण म्हणत आहात, याची नोंद घेतो.

<शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याची घोषणा केली.>

रागाबद्दल मला अजिबात प्रेम / उमाळा नाही. पण शंकराचार्यांना "हिंदू धर्मातून बहिष्कृत" करण्याचे अधिकार आहेत का? हे शंकराचार्य फेस्बुक्वर "विचारा तुम्ही सांगतो आम्ही" स्टाईलचे एक सदर चालवतात, त्या सदरात एकाने प्रश्न विचारला - जाट क्षत्रिय की शूद्र? त्यावर यांचा निवाडा ऐकून मला अंमळ मौज वाटली. ते म्हणाले - तुम्हाला कशाचा अभिमान वाटतो? तुम्हाला क्षत्रिय असण्याचा अभिमान वाटत असेल तर तुम्ही क्षत्रिय आणी जर तुम्हाला तुमच्या शूद्रत्वाचा अभिमान असेल तर तुम्ही शूद्र.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2025 - 9:27 am | चंद्रसूर्यकुमार

पण शंकराचार्यांना "हिंदू धर्मातून बहिष्कृत" करण्याचे अधिकार आहेत का?

नसावेत. कारण हिंदूंमध्ये एक कोणीतरी अधिकारी आणि तो फतवे काढणार त्याचे पालन सगळ्यांनी निमूटपणे करावे ही मुळात पध्दतच नाही.

युयुत्सु's picture

6 May 2025 - 9:04 am | युयुत्सु

<बाकी हे शंकराचार्य (आणि सुब्रमण्यम स्वामी, यशवंत सिन्हा सुध्दा) वगैरे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रांप्रमाणे असतात.>

शंकराचार्य आणि सुब्रमण्यम स्वामी यांना एका पंक्तीला बसवल्याने दोघांना पण ठसके लागल्याचा भास झाला.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2025 - 9:47 am | चंद्रसूर्यकुमार

शंकराचार्य आणि सुब्रमण्यम स्वामी यांना एका पंक्तीला बसवल्याने दोघांना पण ठसके लागल्याचा भास झाला.

सुब्रमण्यम स्वामी या मनुष्याचा पूर्वेतिहास माहित आहे ना? दिनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूमागे अटलबिहारी वाजपेयींचा हात होता असा आरोप त्यांनी दिनदयाळ गेल्यानंतर ४-५ वर्षांनी केला होता. तेव्हापासून त्यांचे आणि वाजपेयींचे अजिबात जमायचे नाही. अगदी वाजपेयींचे निधन झाल्यावर लाजेकाजेस्तव पण त्यांनी श्रध्दांजली वाहिली नाही. वास्तविकपणे माजी पंतप्रधानांचे निधन झाल्यावर खासदारांनी निदान दोन शब्दात तरी श्रध्दांजली वाहिली पाहिजे अशी अपेक्षा करणे फार अप्रस्तुत नसावे. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना समाजवादी जनता दलाच्या पाच खासदारांना (भागेय गोवर्धन, विद्याचरण शुक्ला आणि इतर तीन) पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवायच्या प्रकरणात जर त्या खासदारांना अपात्र ठरविलेत तर मी तुम्हाला अटक करेन अशी धमकी स्वामींनी लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना दिली होती. लोकसभा अध्यक्ष हे उतरंडीमध्ये चौथ्या क्रमांकाचे पद असते- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर. लोकसभा अध्यक्ष हे प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान सोडून इतर कोणत्याही मंत्र्याला वरीष्ठ असतात. त्यांना अटक करू- आणि ते पण कोणता गुन्हा केला (खून, भ्रष्टाचार वगैरे) म्हणून नाही तर राजकीय कारणाने अशी धमकी मंत्र्याने देणे कितपत योग्य आहे? त्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांना लोकसभेत सरकारच्या वतीने लोकसभा अध्यक्षांची माफी मागावी लागली होती. जयललितांविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून खटला स्वामींनीच दाखल केला होता. पण त्यानंतर वर्ष-दीड वर्षात १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस जयललितांच्याच अण्णा द्रमुक आघाडीत त्यांचा पक्ष सामील झाला. त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार वाजपेयी असतील हे अलम दुनियेला ठाऊक होते. यांचे वाजपेयींशी जमायचे नाही- ठीक आहे. पण मग आधी त्यांच्या सरकारला पाठिंबा दिलाच का? आणि त्यानंतर तीन महिन्यात वाजपेयी सरकार धर्मांध असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि मग तो पाठिंबा काढून घेतला. ३० मार्च १९९९ रोजी ज्या चहा पार्टीत वाजपेयींचे सरकार खाली खेचायचा निर्णय सोनिया आणि जयललिता यांच्या भेटीत झाला ती पार्टी कोणी आयोजित केली होती? तर सुब्रमण्यम स्वामींनी. नंतरच्या काळात हे गृहस्थ सोनिया-राहुलच्या मागे लागले. त्या मायलेकरांविषयी काडीचेही ममत्व मला नाही. त्यांच्या मागे लागले हे वाईट केले असे म्हणत नाही मात्र या सगळ्या कारकिर्दीत किती कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या हे बघितले तर थक्क व्हायला होईल. सोनिया-राहुलच्या मागे लागले म्हणजे त्यांचा राजकीय दृष्ट्या उपयोग करून घेता येईल म्हणून त्यांना भाजपने पक्षात घेतले, राज्यसभेवर पण पाठवले. सुरवातीला मोदींचे कौतुक करणारे स्वामी आता मात्र मोदींना शिव्या घालत आहेत. असल्या बेभरवशाच्या माणसाचा पाहिजे तेवढा वापर करून घ्यावा आणि मग फेकून द्यावे असे मोदींना वाटले असेल तर त्यात फार काही चूक नसावे. हे भरकटलेले क्षेपणास्त्र नाही तर काय आहे? कधी कोणावर जाऊन आदळेल सांगता येणार नाही. अन्यथा मोदींविरोधात एक शब्दही कोणी बोलला तरी पूर्वेतिहास विसरून काँग्रेस आणि समस्त डापु गँग त्या व्यक्तीला आपलेसे करते पण स्वामींना मात्र काँग्रेसनेही चार हात दूरच ठेवले आहे.

बादवे, तुम्हाला स्वामी आणि रघुराम राजन या दोघांविषयीही त्यांच्या विद्वत्तेमुळे आदर आहे असे मिपावरच वाचल्याचे आठवते. पण स्वामी आणि राजन यांचेही जमत नाही त्याचे काय? कार्ती चिदंबरमच्या सिंगापूरमधील बँक खात्यांची माहिती रघुराम राजन यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना दडवून ठेवली म्हणून स्वामी रघुराम राजनवर खार खाऊन आहेत. रघुराम राजन मुळात अर्थशास्त्रज्ञ नाहीतच असा त्यांचा दावा आहे. मग एकाच वेळेस या दोघांविषयी आदर असलेले बघून इतरांनाही ठसका लागावा का? :) :)

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 10:14 am | श्रीगुरुजी

आपल्याला अर्थमंत्री करावे ही स्वामींची मागणी वाजपेयी व मोदी या दोघांनीही धुडकावल्याने ते दोघांच्याही विरोधात गेले.

युयुत्सु's picture

6 May 2025 - 10:27 am | युयुत्सु

<पण स्वामी आणि राजन यांचेही जमत नाही त्याचे काय?>

दोन विद्वानांचे पटले नाही तर त्यात नवल काय? पटले तरच नवल म्हणायचे...

सुबोध खरे's picture

6 May 2025 - 11:46 am | सुबोध खरे

हो ना

आपणच सर्वज्ञ
म्हटल्यावर दुसऱ्याच्या ज्ञानाबद्दल शंका येणारच.

आणि दोघे अशाच संस्थात काम करत होते

नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी।
गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः।

गुणहीन लोक गुणवान माणसांचे गुण जाणू शकत नाहीत.

गुणी माणसे इतर गुणी माणसांचा द्वेष करतात

स्वतः; गुणी असून इतर माणसांच्या गुणांचा आदर करणारे सज्जन फारच दुर्मिळ असतात

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी ह्याच सुब्रह्मण्यम स्वामीनी चीनने केलेला हल्ला नी काबीज केलेली भारताची जमीन पुराव्यानीशी दाखवून मोदी सरकारला उघडे पाडले होते ना? ससुब्रह्मण्यम स्वामींचे देशप्रेम वादातीत आहे!

काय तेच तेच खोटं बोलता नेहमी? जरा नवीन तरी खोटं बोला. इतके वेळा उघडे पडलात तरी तेच. कोणता पुरावा? तो कोणी, तुम्ही आणि राऊतांनी मान्य केला की झाले का?

निदान तुमच्या राजमाता आणि राजपुत्रांवरची केस कोर्टात तरी उभी आहे, हो ह्याच स्वामींनी टाकलेली, त्याबद्दल काय मत?

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 4:17 pm | श्रीगुरुजी

इतके वेळा उघडे पडलात तरी तेच.

जो मुळातच कायम वस्त्रहीन अवस्थेत असतो, त्यास उघडे पडण्याची भीति नसते. बघणाऱ्यांनाच किळस वाटून ते दूर पळतात. यातच त्याचा विजय असतो. सातत्याने खोटे आरोप करणे, मुर्खासारखे असंबद्ध बरळणे, आपले अज्ञान दाखवून गाढवपणा करणे, स्वत:चे वारंवार हसू करून घेणे यावर कोणतेही उपचार नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 4:57 pm | अमरेंद्र बाहुबली

फक्त सुभ्रमण्यम स्वामी china असे गुगलवर लिहिले तरीही बक्कळ लिंक आहेत. पण तुम्ही, गुर्जी आणी मोदी मान्य करत नाही म्हणजे चीनने भूमी बळकावली नाही असे होत नाही! सत्याचा साथ द्या आपल्या लाडक्या नेत्याचा आदर्श ठेऊ नका, त्याच्या डिग्रीपासून भिक मागण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत!

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 3:25 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांची (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इ.) निवडणूक घेण्याची आज्ञा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. अर्थात पूर्वीही अशीच आज्ञा उच्च न्यायालयाने देऊनही सरकारने ती आज्ञा धुडकावली होती.

महाराष्ट्रातील सर्व महापालिकांची मुदत संपून तीन वर्षांहून अधिक काळ लोटलाय. जिल्हा परिषद, पंचायत समिती इ. मुदत संपून त्याहून जास्त काळ लोटलाय. परंतु पराभवाच्या भीतीने मविआ व युती सरकारने आजतागायत वेगवेगळी कारणे पुढे करून निवडणूक आजवर टाळली आहे.

आतासुद्धा काहीतरी वेगळी कारणे पुढे आणून निवडणूक घेतली जाणार नाही.

किमान एका न्यायालयाने सर्व पुरावे साक्ष तपासून न्यायालयीन कार्यवाही रीतसर पूर्ण करून आसारामबापू ला दोषी मान्य करून बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे.

याच आसारामबापूचे वकीलपत्र स्वामी यांनी घेतलेले होते. अर्थातच हा त्यांचा अधिकार मान्य आहेच. पण ते घेऊनही स्वामी आसारामबापूला शिक्षा होण्यापासून पासून वाचवू शकले नाहीत हे देखील सत्य आहे.

माझ्या अल्प माहितीप्रमाणे ते आजही आसाराम बापूंना निर्दोष मानतात ते एक षडयंत्राचा बळी आहेत वगैरे सुद्धा ते बोलत असतात.

स्वामी हे निःसंदिग्ध विद्वान गृहस्थ आहेत. चीन ने बळकावलेल्या भारतीय जमिनी संदर्भातही त्यांनी माहिती कायद्या द्वारे माहिती .उलट नाही यासाठी केस दाखल केलेली आहे.

अजून मात्र माझ्या माहितीप्रमाणे ते हा दावा सिद्ध करू शकलेले नाहीत. यामध्ये सरकार माहितीच्या कायद्या अंतर्गत त्यांना माहिती देत नाही असा त्यांचा दावा प्रलंबित आहे. सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहे व माहिती रोखत आहे असे प्रथमदर्शनी
मत आहे. पुढे जसे जसे सत्य बाहेर येईल तेव्हा त्यांच्या दाव्यातील साऱ्या बाहेर येईलच.
एकंदरी स्वामी चे आजपर्यंतचे वर्तन बघितल्यास मला ते
अत्यंत विद्वान, प्रवाहा विरोधात जाणारे धाडसी, परखड व unapologetic असे व्यक्त्ती आहेत.च बरोबर अतिशय विक्षिप्त ,अस्थिर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहसा मुद्द्यांना त्यांच्या logical conclusion पर्यंत नेण्याअगोदर सोडून देणारे , बेभरवशाचे misguided missile वाटता. ज्यांनी आपले उपद्रव मूल्य नक्कीच सिद्ध केलेले आहे. पण समाजाला फायदा होण्यासारखे भरीव कार्य न होता त्यांचा ऊठवलेला मुद्दा हा फक्त या किंवा त्या राजकीय पक्षाला मात्र उपयुक्त किंवा उपद्रवी वेळोवेळी ठरत असतो.
त्याव्यतिरिक्त substantial असे काही ते करत नाही. कारण तो पर्यंत त्यांचा लाडका त्यांचा शत्रू झालेला असतो ,mood swing झालेला हा गाडी मग नवा मुद्दा नवा भिडू नवा राज खेळून स्वतःची पोळी भाजायला पुढे सरकतो.
त्यामुळे ते एक sensational trolling पेक्षा जात काही साध्य करत नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहे नालायक देशद्रोही लोक चीनने बळकावलेल्या जमिनीची माहिती देत नाहीयेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे!

सरकार चीन संदर्भातील जमिनीची माहिती देण्यास विलंब / टाळाटाळ करीत आहे. असे स्वामी यांच्या याचिकेवरून दिसत आहे.
आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे असे प्रथमदर्शनी तरी.माझे.मत आहे. संशयाला जागा आहे आहे योग्य वाक्य आहे.
मात्र अजून जोपर्यंत याचा अंतिम निर्णय येत नाही किंवा court या संदर्भात आदेश देत नाही तो पर्यंत यापुढील निष्कर्षावर अगोदरच jump घ्यावी यात काही तथ्य नाही.

कारण माझ्या अल्प माहिती प्रमाणे डिफेन्स संदर्भातील आणि राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातील माहिती मागण्याचा अधिकारी हा कायद्याने दिला नाही..मात्र.मला याची सखोल.माहिती नाही
म्हणून.मी ठोस निकाल येई पर्यंत वाट बघणे पसंत करेल

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 8:50 pm | श्रीगुरुजी

सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today I met Tapir Gao BJP LS MP of Arunachal. He told me AP people wanted that I also focus on Arunachal. He told me that China PLA has already crossed McMahon Line in three parallel columns halfway down south of the State. Early next year I will go to AP.”

टापिर गाओ - “I met @Swamy39 in Central Hall, Parliament on 2 Dec at 10:35 AM, when he asked about Chinese intrusion I told him that during 1962 war China occupied 2-3 locations during Congress regime but no fresh incursion has taken place during Modi regime; unfortunately he has misquoted me,”

No sooner was Swamy reprimanded by the Arunachal MP for misquoting him, the former gave an extremely lame reply to justify his actions. He Tweeted that “did not state any date except to say that China had already occupied territory.” He further wrote: “Even if China had occupied it in 1962 and had built pucca villages thereafter why were we sleeping since 2014 and 18 one to one meetings? Was it ever raised with Xi?”

Swamy offered no explanation as to why he had misquoted the Arunachal Pradesh MP.

While defending himself, he said that Gao had not mentioned a “date” which seems like an untenable explanation given that Gao said specifically that he mentioned “Congress regime”. Even if we consider this as miscommunication, it does not explain why Swamy lied and claimed that Gao had told him that the people of Arunachal Pradesh want him to personally get involved.

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 8:50 pm | श्रीगुरुजी

सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today I met Tapir Gao BJP LS MP of Arunachal. He told me AP people wanted that I also focus on Arunachal. He told me that China PLA has already crossed McMahon Line in three parallel columns halfway down south of the State. Early next year I will go to AP.”

टापिर गाओ - “I met @Swamy39 in Central Hall, Parliament on 2 Dec at 10:35 AM, when he asked about Chinese intrusion I told him that during 1962 war China occupied 2-3 locations during Congress regime but no fresh incursion has taken place during Modi regime; unfortunately he has misquoted me,”

No sooner was Swamy reprimanded by the Arunachal MP for misquoting him, the former gave an extremely lame reply to justify his actions. He Tweeted that “did not state any date except to say that China had already occupied territory.” He further wrote: “Even if China had occupied it in 1962 and had built pucca villages thereafter why were we sleeping since 2014 and 18 one to one meetings? Was it ever raised with Xi?”

Swamy offered no explanation as to why he had misquoted the Arunachal Pradesh MP.

While defending himself, he said that Gao had not mentioned a “date” which seems like an untenable explanation given that Gao said specifically that he mentioned “Congress regime”. Even if we consider this as miscommunication, it does not explain why Swamy lied and claimed that Gao had told him that the people of Arunachal Pradesh want him to personally get involved.

तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे.

यानंतर स्वामिनिन्हे चायनीज land. acquisition चे प्रकरण (तरी) नेटाने लावून धरलेले दिसते आहे . यानंतरच स्वामी यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सरकार कडून चीन ने आपली नेमकी किती जमीन विशेषतः 2014 नंतर बळकावली याची माहिती मागण्याचा जोरदार प्रयत्न केलेले दिसत आहे.

अनेक सरकारी खात्यांनी त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे. त्यावर स्वामी यांनी पुन्हा माहिती आयोग कडे अपील सुद्धा केले.
त्यानंतर मला या संदर्भात जी सर्वात ताजी अलीकडील माहिती मिळाली ती इथे आहे.
त्यानुसार ऑगस्ट 2024 मध्ये ही माहिती स्वामी यांना पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते.

The contentious issue of the amount of Indian land ceded to China, which is guarded like a top secret but strongly taken up by veteran politician Dr Subramanian Swamy, led to the central information commissioner (CIC), last week, ordering the public information officer (CPIO) of the ministry of external affairs (MEA) to furnish complete information by the third week of August.

यासाठी स्वामी यांनी दोन अपील केले होते
Dr Swamy also got vague replies when he filed his first appeal with the first appellate authority (FAA).

त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी दुसऱ्यांदा अपील केले या संदर्भात अजून एक खुलासा मला झाला तो असा की ही माहिती देण्यात कायद्याप्रमाणे अडसर नाही. म्हणजे ही देण्यायोग्य असलेली माहिती आहे. शिवाय अमुक.माहिती जर दिली नाही तर तसे का याचे स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागते. हे स्वतः आयोगाने CIC
नेच आदेशात म्हटलेले आहे ते असे

Aggrieved and dissatisfied, Dr Swamy filed a second appeal. CIC Samariya observed in his order that the contention of Dr Swamy was that “The information sought is not barred from disclosure under section 8(1) of the RTI Act and even if the information sought falls within any of the exceptions, the PIO was obliged to furnish a clear rationale for rejection as per section 7(8)(i) of the Act. He averred that information had been denied to him in violation of the provisions of the RTI Act.”

आता CIC ने हा सुस्पष्ट आदेश की ही हवी असलेली माहिती स्वामी यांना द्या असा मंत्रालयाला दिलेला होता आणि हा आदेश ऑगस्ट 2024 मध्ये दिलेला होता.

ही सर्व लिंक वाचून मोठ्या प्रमाणात सरकारने माहिती देण्यास टाळाटाळ केली असे स्पष्ट दिसून येत आहे . ही लिंक पूर्ण वाचा
यात उत्तम.माहिती आहे.
https://www.moneylife.in/article/cic-orders-ministry-of-external-affairs...
आता ऑगस्ट 24 ते आज मे 25 या पुढील.9 महिन्यात या आदेशाचे काय झाले ?माहिती मिळाली का नाही ?
या बद्दल मला काहीही माहिती नाही

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 9:29 pm | श्रीगुरुजी

तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे.

लडाख आरोपही असेच खोटे आहेत हे सिद्ध होईल. ज्याने एकदा खोटे आरोप केले होते, त्याच माणसाच्या नवीन आरोपांना खूप महत्त्व देण्याची गरज नाही.

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 10:06 pm | श्रीगुरुजी

मिपावर २-३ जण अत्यंत मुर्खासारखे रोज २५-३० प्रतिसाद देत असतात. जवळपास सर्व मिपाकर त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. स्वामींचं तसंच आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2025 - 11:00 pm | चंद्रसूर्यकुमार

त्या तिघांचेही (त्यातील एक उडाला) सदस्यनाम 'अ' च्या बाराखडीतील अक्षरांपासून सुरू होते हा योगायोग का?

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 11:19 pm | श्रीगुरुजी

हहपुवा.

योगायोग नाही. नियतीची योजना तशीच आहे.

तिघेही 'अ'डाणी व 'अ'कलेचा भाग नाही आणि तिघांनीही 'अ'दानी, 'अं'बानी आणि 'अ'मितवर डूख धरलाय. त्यामुळे तिघांनाही मिपाकर 'अ'नुल्लेखाने मारतात. 'अ'ज्ञान, 'अ'शुद्ध व 'अ'र्वाच्य लेखन, 'अ'सत्य आरोप, 'आ' अक्षराने नाव सुरू होणारा नेता मूर्ख असला तरी त्याचे 'अं'धानुकरण हे यांचे व्यवच्छेदक लक्षण.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2025 - 11:21 pm | चंद्रसूर्यकुमार

:) :)

CIC च्या आदेशाची प्रत या लिंक.मध्ये दिलेली आहे. 4 आठवड्यात स्वामी यांना pointwise माहिती देण्याचे आदेश माहिती आयोगाने मंत्रालयाला दिलेले आहेत
शिवाय compliance केला याचा अहवाल सुद्धा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
यानंतर काय आले ते माहिती मजकडे नाही
पण इथपर्यंतचा स्वामी यांचा माहिती घेण्याचा प्रवास बघितला ते सरकारने जमीन गमावली तर नाही ना याची शंका अधिकच बळावली
आणि म्हणूनच तर सरकार नामुष्की टाळण्यासाठी ही माहिती देण्यास विलंब करत आहे ?
असा प्रश्न पडल्यास काही चूक. नाही.
https://judicialquest.com/chinese-incursion-cic-directs-centre-to-furnis...

श्रीगुरुजी's picture

6 May 2025 - 10:03 pm | श्रीगुरुजी

आपल्याला अर्थमंत्री न केल्याने स्वामी मोदींना त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. एकदा त्यांचा खोटेपणा उघडा पडला होता. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

१९९१-९६ या काळात स्वामी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिताच्या मागे हात धुवून लागले होते. एकदा ते मद्रासमध्ये असताना आज जयललिता आपल्याला अटक करणार ही बातमी समजल्याने ते घाईघाईने विमानतळावर जाऊन दिल्लीच्या विमानात जाऊन बसले. पोलिस विमानतळावर आले तेव्हा विमानोड्डाण झाले होते. त्यांच्या पाठोपाठ तामिळनाडू पोलिस दुसऱ्या विमानाने दिल्लीत गेले. स्वामी आधी पोहोचले व घाईघाईने सभापतींना भेटून आपल्या अटकेपासून संरक्षण मिळविले व जयललिता संतापाने हात चोळत बसली.

याच जयललिताला बरोबर घेऊन सोनिया गांधी व मायावतीच्या मदतीने स्वामींनी वाजपेयी सरकार पाडले कारण वाजपेयींनी त्यांना अर्थमंत्री केले नसल्याचा राग मनात होता. सोनिया गांधींनी पवारांप्रमाणे स्वामींनाही योग्य अंतरावर ठेवल्याने ते गांधी घराण्याच्या मागे हात धुवून लागले. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही त्यांना अर्थमंत्री न केल्याने आता ते मोदींच्या मागे लागले आहेत.

अश्यांना मोदी दुर्लक्ष करून मारतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 10:11 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणून चीनने भारतीय जमीन बळकावली की नहाई ही माहिती देण्यास टाळाटाळ करणारे सरकार बरोबर ठरते का? जमीन बळकावली असल तर तसे ह्या खोटारड्या सरकारने स्पष्ट करावे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2025 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहलगाम घटनेमुळे भारत पाकिस्तान संबंध ताणल्या गेले आहेत. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी नागरिकांची सजगता आणि शहानपण वाढविण्यासाठी उद्या मॉकड्रीलचं नियोजन केलं आहे. देशभरात एकूण २४४ जिल्ह्यात हा युद्धसराव केला जाणार आहे. हवाई हल्ला झाल्यास इशारा देणारा भोंग्यांची चाचणी, नागरिकांनी बचाव कसा करावा, मोठ्या शहरात प्रदेशात एकाच वेळी अंधार ब्लॅक आउट करणे, अस्थापना स्थलांतर करणे, वगैरे करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यानंतर, आता मिपावर जी पिढी आहे ( अपवाद असतीलही ) त्या आपल्या सर्वांसाठी हा एक नवीन अनुभव आहे. युद्ध होईल ना होईल कसे होईल ते आज माहिती नाही, पण युद्धाची नांदी सुरु झाली असे वातावरण झालेले दिसत आहे. आंतरराष्ट्री परिस्थिती आणि देशाच्या निर्णयाची कसोटी लागणार आहे. मॉकड्रीलच्या निमित्ताने आठवण होते ती करोना काळात भारतीय लोकांनी जो अफाट कल्पना लढवल्या होत्या तसे काही होणार नाही अशी अपेक्षा.

उद्या सायंकाळपर्यंत अनेक अनुभव आपल्याला समलेले असतील. पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टींचं आदानप्रदान करुया असे वाटले.

-दिलीप बिरुटे

"युद्धाची तयारी चालू आहे"
१.अशी कुठेही गांभिर्याने चर्चा करत नाहीत.
२. शेअर मार्केटवर काही परिणाम?
३. चानेलवर बातम्या आहेत की मंत्री मंडळाच्या बैठका सुरू आहेत.
४. सावधान राहण्याचे आदेश आलेत आणि उद्या तालीम होणार असं टीव्हीवरून कळतंय.
५. मुख्य म्हणजे कोणत्या भारत सरकारच्या साईटवर याबद्दल लिहिलं आहे? गृह मंत्रालयच्या साइटवर ? कुणाला सापडले का? Ministry of Home affairs किंवा pib.gov.in?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 9:19 pm | अमरेंद्र बाहुबली

युद्धाच्या फक्त वल्गना आहेत काहीही होणार नाहीये, युद्ध झाले तर अदाणीचे शेअर्स पडतील त्यामुळे अदाणी काही युद्धासाठी हिरवा कंदील दाखवणार नाहीये.

कानडाऊ योगेशु's picture

6 May 2025 - 11:09 pm | कानडाऊ योगेशु

+१.
आय.पी.एल जोरात सुरु आहे. ते सामने पाहताना देशात अशी काही युध्दजन्य परिस्थिती असेल अशी पुसटशीही शंका येत नाही.
केवळ वातावरण निर्मिती करण्याचा हेतु दिसतो आहे सरकारचा.
मागे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना त्यांनी एक विधान केले होते कि बर्याच दिवसात युध्द न झाल्याने सैन्याची क्रयशक्ती कमी झाली आहे.
कुणा एका सामाजिक विचारवंतानेही युध्दे ही एकुण प्रगतीसाठी आवश्यक आहेत असे विधान ही केल्याचे वाचल्याचे आठवते. माझ्या मते युध्द हे काही होणार नाही पण त्यानिमित्ताने खुंटा हलवुन बळक्ट केला जाईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2025 - 11:15 pm | चंद्रसूर्यकुमार

युध्द होईलच असे खात्रीने कोणीच बोलू शकणार नाही. मात्र आय.पी.एल जोरात चालू आहे म्हणजे युध्दजन्य परिस्थिती नाही आणि त्यामुळे युध्द होणार नाही असे म्हणता येणार नाही. दुसरे महायुध्द सुरू झाले १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्यापासून. त्याच्या चारच दिवस आधी- म्हणजे २७ ऑगस्टला वॉर्सामध्ये पोलंड विरूध्द हंगेरी असा फुटबॉलचा सामना झाला होता आणि त्यात पोलंडने ४-२ असा विजय मिळविल्यानंतर पोलिश लोकांनी आनंदही व्यक्त केला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2025 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली

इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तान बेचिराख असता, मिस यू इंदिराजी! _/\_