आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
21 Apr 2025 - 3:45 pm
गाभा: 

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महराष्ट्रात पहिलीपासून ३ भाषा सक्तीने अभ्यासक्रमात टाकलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यात हिंदीचा पूर्णपणे अनावश्यक समावेश केला आहे.

आपली राष्ट्रीय राजकाराणात जाण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मदतीसाठी, हिंदीभाषिक राज्यात व मतदारात स्वीकारार्हता वाढविण्यासाठी, पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत राहण्यासाठी स्वभाषेचा, मुली-मुलांचा, महाराष्ट्राच्या हिताचा बळी दिला जात आते. हिंदी कोवळ्या वयात मुली-मुलांवर लादण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व तितकाच संतापजनक आहे. वयाच्या सहाव्या वर्षी एकदम ३ भाषा शिकाव्या लागणे हा त्या कोवळ्या जिवांवर क्रूर अत्याचार आहे.

मुळात महाराष्ट्रात हिंदी शिकण्यासाठी कोणतेही वेगळे परीश्रम करण्याची कोणतीही गरज नाही. मराठी व हिंदीची लिपी व व्याकरण समान असून बहुतांशी शब्द समान आहेत. हिंदी वर्गात बसून अजिबात न शिकताही मराठी माणसांना हिंदी व्यवस्थित समजू शकते, बोलता येते व लिहिताही येते. मग अभ्यासक्रमात हिंदी हा वेगळा विषय म्हणून अगदी पहैलीपासून सक्तीचा करून मुली-मुलांच्या डोक्यावरील भार वाढविणे व त्यांचा वेळ अक्षरशः वाया घालविणे यापेक्षा काहीही वेगळे साध्य होणार नाही.

नोकरी मिळविणे, परदेशात जाणे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण इ. साठी हिंदी संपूर्ण निरूपयोगी आहे. फडणवीसांनी आअली कायद्याची पदवी इंग्लिशमध्ये मिळविली की हिंदीमध्ये स्वत:च्या मुलीला हिंदी माध्यमाच्या विद्यालयात शिकविले की हिंदी माध्यमाच्या? नोकरी, उच्च शिक्षण, परदेशी जाणे यासाठी इंग्लिशला पर्याय नाही व त्यासाठी हिंदीचा शून्य उपयोग आहे.

तामिळनाडूने तिसरी भाषा अभ्यासक्रमात लादण्यासाठी स्वच्छ शब्द्दत नकार दिला आहे. तामिळ व इंग्लिश या दोनच भाषा आम्ही अभ्यासक्रमात ठेवणार, हिंदी अर्यायी भाषा म्हणून सुद्धा अभ्यासक्रमात ठेवणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे, हिंदीभाषिक राज्यात हिंदी व इंग्लिश या दोनच भाषा अभ्यासक्रमात आहेत. मग महाराष्ट्रात हिंदीचा एवढा कंड का आहे? आधी नेहरू, नंतर इंदिरा गांधींनी त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रावर लादले, आजवर कोणत्याही पक्षाच्या एकाही सरकारने क्षीण विरोध सुद्धा केला नाही. केंद्र सरकारचे सर्व निर्णय निमूटपणे सर्वांनी स्वीकारले. फडणवीसांनी पुढची पायरी गाठली.

हिंदी म्हणे राष्ट्रभाषा आहे व ती सर्वांना यायलाच हवी असे मराठी नेते राज्य स्थापनेपासून बरळत आहेत. राज्यभाषा प्रचार समिती हे खूळ फक्त महाराष्ट्रातच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. प्रत्येक राज्याची भाषा ही राज्यभाषा आहे. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे हे वारंवार असत्य का सांगितले जाते

व्यावहारिक लाभासाठी पहिलीपासून सर्वांना इंग्लिश व्यवस्थित यावे असे धोरण हवे. त्याबरोबरीने इंग्लिश लिपीशी साधर्म्य असणार्‍या दॉईच, फ्रेंच, स्पॅनिश, डच अश्या भाषांचा पर्याय हवा किंवा संगणक, कला, दाद्य,, गायन, नृत्य असे पर्यायी विषय हवे ज्यामुळे रोजगार मिळण्याची जास्त शक्यता आहे. अगदीच खाज असेल तर हिंदी हा ऐच्छिक विषय म्हणून असावा.

हिंदीमुळे यापुढे महाराष्ट्रात मराठी कोणासाही येण्याची आवश्यकता उरलेली नाही. अश्या परिस्थितीत मराठी जगविण्यासाठी व मराठीचे व्यावहारिक महत्त्व कायम राहून वाढविण्यासाठी आपण खालील कृती करू शकतो.

१) cm@maharashtra.gov.in या पत्त्यावर मी खालील ईमेल लिहिले आहे.

भारतात घटनेनुसार कोणतीही भाषा राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही फालतू भाषा कधीही राष्ट्रभाषा नव्हती, नाही व नसेल. आपले अनेक मंत्री हिंदी राष्ट्रभाषा आहे असे धडधडीत असत्य सांगत आहेत.

पहिलीपासून महराष्ट्रात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या. तिसरी भाषा म्हणून इतर सर्व भाषांचे पर्याय द्या व ही तिसरी भाषा पाचवीनंतर अभ्यासक्रमात आणा.

कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला हिंदुराष्ट्र हवे आहे, हिंदीराष्ट्र अजिबात नको.

मी व माझे कुटुंब भाजपचे कट्टर समर्थक असलो तरी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

२) महाराष्ट्रात समोरासमोर किंवा दूरभाष माध्यमाद्वारे मी कधीही हिंदीत बोलणार नाही, मराठीतच बोलण्यावर आग्रही राहीन. अगदीच पर्याय नसेल तर इंग्लिश. हिंदी येत नाही हे ठामपणे सांगत राहीन.असे सांगितल्यावर बहुतेक वेळा समोरील व्यक्ती मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते असा माझा अनुभव आहे.

३) माझ्या फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअ‍ॅप, टाटा स्काय, गुगल इ. ची भाषा मराठी ठेवली आहे. गुगलवर शोधलेली पाने मला मराठीत भाषांतरीत होऊन दिसतात. यातून मराठी भाषेचे महत्त्व वाढते.

४) एटीएम वापरताना मी मराठीचा पर्या निवडतो. आपण जेव्हा जेव्हा मराठी हा पर्याय एटीएमवर, आंतरजालावर, संभाषणात वापरला जातो तेव्हा तेव्हा त्याची नोंद होते व मराठी अनेक जण वापरताहेत असे दिसले तर मराठीचा पर्याय जिवंत राहतो. यातून मदतकेंद्रात मराठी माणसांना काम मिळण्याची शक्यता वाढते. माझ्या ओळखीचा एक जण काही वर्षांपासून गुगलला मराठीत भाषांतर केलेली वाक्ये, शब्द इ. पुरवितो. मराठी अजिबात वापरात नसती तर गुगलला मराठी पर्याय द्यायची गरज वाटली नसती.

५) मराठी माणसांशी बोलताना सुद्धा शक्य तेथे मराठीच पापरा. नाईन एट टु टु फोर असा क्रमांक सांगण्याऐवजी नऊ आठ दोन दोन चार असा सांगता येतो. ग्रॉक, चॅटजीपीटी वगैरे कॄबु साधने वापरतानाही मराठीत प्रश्न विचारल्यास मराठीत उत्तर येते.

सर्व पक्षांचे सर्व राज्यकर्ते अत्यंत नालायक आहेत. ते सत्तेसाठी आईबाप्प सुद्धा विकतील तेथे मातृभाषेला किंमत काय. मराठी वाचविण्यासाठी फक्त मराठी माणसेच प्रयत्न करू शकतात.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2025 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

आम्हाला हिंदुराष्ट्र हवे आहे, हिंदीराष्ट्र अजिबात नको.

अहो गुरुजी, तुम्ही ज्या लोकांच्या बाजूला उभे राहता आहात ते लोक -
आम्हाला हिंदी राष्ट्र नको अन् हिंदू राष्ट्र तर मुळीच नको असे म्हणणारे आहेत.

तस्मात् खरा प्रश्न हा आहे -

तुम्हाला हिंदुराष्ट्र मिळत असेल अन् समजा त्यातील प्रधान भाषा मराठी व्यतिरिक्त अन्य कोणतीही असेल तर तुम्ही ते हिंदू राष्ट्र नाकारणार आहात का ?

अमराठी हिंदुराष्ट्र आणि मराठी "गंगा जमना तहजीब वालं सेक्युलर राष्ट्र" ह्यात चॉईस करा असे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय निवडाल ???

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 6:48 pm | श्रीगुरुजी

मराठी भाषा नसलेले हिंदुराष्ट्र मला नको आणि मराठी भाषा असलेले अहिंदुराष्ट्र सुद्धा मला नको.

हिंदुराष्ट्रासाठी मराठीचा बळी देणे मी मान्य करणार नाही.

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2025 - 7:04 pm | प्रसाद गोडबोले

अनपेक्षित उत्तर.
आता अवांतर :
म्हणजे समजा महाराणा प्रताप ह्यांनी राजस्थानी हिंदू स्वराज स्थापन केले असते तर तुम्ही ते नाकारले असते ?
आणि हरिहर बुक्कारयाचे कन्नड हिंदुराष्ट्र ?
आणि चोळांचे हिंदुराष्ट्र तुम्ही नाकारणार का ?

समजा उद्या योगी जी पंतप्रधान झाले अन् त्यांच्या निमित्ताने आम्हाला आमचे पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिर परत मिळणार असेल तर केवळ योगी हिंदी बोलतात, मराठी बोलत नाहीत म्हणून आम्ही ही मंदिरे नाकारायचे का ???

असो. ज्याच्यात्याच्या निष्ठा जाचेत्याचें प्राधान्यक्रम !

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 7:10 pm | श्रीगुरुजी

यासाठी मराठीचा बळी देणे अजिबात मान्य नाही. हिंदुराष्ट्र करा, हिंदू स्वराज्य करा किंवा अजून काही करा, मराठी जिवंत राहणार असेल तरच मान्य आहे. मुळात हे करण्यासाठी मराठीचा बळी देण्याची कोणतीही आवश्यकता अजिबात नाही. मराठी माणूस हिंदी न समजता सुद्धा आयुष्याभर हिंदू राहू शकतो.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 7:16 pm | अथांग आकाश

मुळात हे करण्यासाठी मराठीचा बळी देण्याची कोणतीही आवश्यकता अजिबात नाही.

तिसरी भाषा हिंदी ठेवल्याने मराठीचा बळी कसा जातो? काहीही येडछाप बोलु नका ते कंत्राट दुसर्‍याला मिळाले आहे!

वामन देशमुख's picture

21 Apr 2025 - 7:15 pm | वामन देशमुख

प्रगो, हा विषय सध्या टाळावा, अवांतर करू नये अशी विनंती.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 7:22 pm | श्रीगुरुजी

कोणतीही आवश्यकता नसताना हिंदी सक्तीच्या वादग्रस्त निर्णयावरील लेखात व इतरत्र हिंदुराष्ट्र, ब्राह्मणद्वेष इ. मुद्दे घुसडले.

मुळात हिंदुराष्ट्र हा येथे मुद्दाच नाही. विनाकारण हिंदीची पहिलीपासून सक्ती करणे, त्यातून भविष्यात महाराष्ट्र हे हिंदीराष्ट्र करणे हे वादग्रस्त निर्णय हा मुद्दा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2025 - 7:24 pm | प्रसाद गोडबोले

D'accord.

I accept that your suggestion and stop here.

मेरे जो विचार है वो मैने लेख दिये , और वो आप तक पोहच भी गये.

इत्यलम्

कळळं रांडेच्या. बसतू गप. पर म्या अदुगरच सांगून ठेवलेलं लक्षात ठिव.

वामन देशमुख's picture

21 Apr 2025 - 7:35 pm | वामन देशमुख

धन्स्

सोत्रि's picture

21 Apr 2025 - 7:50 pm | सोत्रि

आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?

मराठी भाषा जिवंत राहणार नाही हे कसं ठरलं/ठरवलं?

- (मराठी) सोकाजी

एखाद्या भाषेत बोलणाऱ्यांची संख्या कमी होत जाते तशी ती हळूहळू मृत होण्याकडे वाटचाल करते.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 8:30 pm | श्रीगुरुजी

अगदी बरोबर. महाराष्ट्रात हिंदीला मराठीच्या बरोबरीने स्थान देणे म्हणजे महाराष्ट्रात मराठीची आवश्यकता नष्ट करणे व पर्यायाने मराठी मारून टाकणे.

हे बादरायण संबंध जोडण्यासारखं आणि अतिशयोक्त आहे.

- (मराठी ) सोकाजी

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 9:04 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात हिंदीला मराठीच्या बरोबरीने स्थान देणे म्हणजे महाराष्ट्रात मराठीची आवश्यकता नष्ट करणे व पर्यायाने मराठी मारून टाकणे.
+१

सोत्रि's picture

21 Apr 2025 - 9:01 pm | सोत्रि

ह्या न्यायाने संस्कृत भाषा मृतभाषा म्हणायला हवी. पण तसं नाहीयेय. The Australian National University, the University of Oxford, and the University of Iowa ह्या विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते, आजही.

- (मराठी) सोकाजी

कोण म्हणतं संस्कृत बोलली जात नाही? सकाळच्या सूर्यनमस्कारापासून, भगवद्गीता ,गायत्री मंत्रापर्यंत (अजून तर खूप संस्कृत रचना रोज वापरल्या जातात )अनेक वेळा ती जपली जाते.संस्कृत तर मराठी,हिंदी,गुजराती इ. इंडो आर्यन भाषांची एक महत्त्वाची शाखा आहे आहे.ती जागतिकच असणार ना.
संतांची कृपा म्हणून प्राकृत मराठी ते आजच्या मराठी पर्यंत ही बोलली जाते.

धर्मराजमुटके's picture

21 Apr 2025 - 9:51 pm | धर्मराजमुटके

अगदी. अगदी.
फार काय तर हिंदी चित्रपटात लग्नाचे फेरे घेताना, खलनायकाचा वध (की खून) करताना देखील मागे संस्कृत श्लोक बोलले जातात.

अवांतर : खालील दुव्यांवर टिचकी मारुन माझ्या आवडत्या संस्कृत गाण्यांचा आस्वाद घ्या.
मम देशो भारतं। मम भाषा संस्कृतम् ।
धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना (संस्कृत)
वादा कर ले साजना (संस्कृत)
तेरी मिट्टी मे मिल जावा (संस्कृत)

Bhakti's picture

21 Apr 2025 - 9:59 pm | Bhakti

+१ जाहिरात
लेकी बरोबर माझीही एक बालकविता पाठ झाली.(शुनक शुनक)
https://youtube.com/shorts/GN9a2UX7GEg?si=Z4ighF38nrYA2H5Y
ऑनलाईन माध्यमामुळे तिला भाषा शिकणं जरा जड गेलं.बाकीचे विद्यार्थी पहिल्यापासून संस्कृत शिकत असल्यामुळे खुप पारंगत होते.
ऐकते सर्व गाणी!

छान वाटले ऐकुन. अनेक शुभेच्छा

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 6:50 pm | अथांग आकाश

नोकरी मिळविणे, परदेशात जाणे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण इ. साठी हिंदी संपूर्ण निरूपयोगी आहे.

तुमचे संकुचीत विचार नीट समजले! रेमीटन्सवर जगणारे मागास हिंदुराष्ट्र तुम्हाला हवे आहे तर! छान!! पदवी व पदव्युत्तर शिक्षण मराठीत शिकुनही मिळते हे तुम्हाला माहिती नाही का? ज्यांना तेवढे पुरते ते घेतात.

सर्व पक्षांचे सर्व राज्यकर्ते अत्यंत नालायक आहेत. ते सत्तेसाठी आईबाप्प सुद्धा विकतील तेथे मातृभाषेला किंमत काय.

ऑ! नका देउ मत पण मग हे कशाला?

मी व माझे कुटुंब भाजपचे कट्टर समर्थक असलो तरी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

मिपा आता नाना नानी पार्क झाले आहे हेच खरे!!!

वामन देशमुख's picture

21 Apr 2025 - 7:14 pm | वामन देशमुख

मी मी शक्य तेवढी मोबाईल ॲप्स मराठी मध्ये वापरतो. मराठीतील शक्य तेवढे लिखाण आवाजाद्वारे टाईप करून लिहितो. इतरही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना शक्य तेवढा मराठीचा उपयोग करतो.‌ महाराष्ट्रात असताना ठरवून मराठीतच बोलतो. महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या राज्यांमध्ये हिंदीचा बापर शक्यतो करत नाही.

मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी उर्दू या भाषा मला पुरेशा चांगल्या रीतीने येतात. अगदी बेसिक कन्नड देखील येते.‌ तरीही गैर लागू भाषेचा वापर शक्यतो करत नाही.‌

महाराष्ट्रामध्ये मराठी व इंग्लिश या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे हे अजिबात मान्य होणारे नाही.‌ महाराष्ट्र शासनाने मराठी व इंग्लिश याव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो तात्काळ रद्द करायला हवा.

- (तेलुगु व कन्नड मावश्या असलेला मराठी भाचा) द्येस्मुक् राव्

वामन देशमुख's picture

21 Apr 2025 - 7:17 pm | वामन देशमुख

इथे मेल पाठवला आहे.

रात्रीचे चांदणे's picture

21 Apr 2025 - 7:45 pm | रात्रीचे चांदणे

पहिली पासून हिंदीचा अतिशय चुकीचा नर्णय. केवळ आणि केवळ आपल्या वरिष्ठतांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. विरोधी पक्षांनी ह्याचा विरोध केला पाहिजे.

खुप चुकीचा निर्णय आहे.हिंदीने आधीच महाराष्ट्रात पाय पसरवले आहेत.आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 8:41 pm | अथांग आकाश

आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.

कशी काय विश्वास घातकी आहे? हे कृपया स्पष्ट करावे!

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

कोणते पर्याय चालतील? कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, उडिया, गुरुमुखी, असामी, मणिपूरी, बंगाली, उर्दू का अजून कुठली?

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 8:43 pm | अथांग आकाश

आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.

कशी काय विश्वास घातकी आहे? हे कृपया स्पष्ट करावे!

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

कोणते पर्याय चालतील? कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, उडिया, गुरुमुखी, असामी, मणिपूरी, बंगाली, उर्दू का अजून कुठली?

मला संस्कृत पर्याय चालेल.पुण्यातल्या काही शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृतही शिकवतात.आमच्याकडे तो पर्याय नाही.त्यामुळे बाहेरून मुलीसाठी एका संस्कृत विद्यापीठाचा कोर्स लावला होता.सर्व भाषांची महत्त्वाची शाखा जाणून घेतली तर भाषेचे फायदे वेगळे शिकवावे लागणार नाही.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 11:16 pm | अथांग आकाश

मला संस्कृत पर्याय चालेल.पुण्यातल्या काही शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृतही शिकवतात.आमच्याकडे तो पर्याय नाही

ऑ! संस्कृत ही रोजगाराभिमुख भाषा आहे? असेलही काही शे लोकांसाठी! १४० कोटींच्यावर लोकसंख्या असलेल्या देशासाठी हा पर्याय योग्य आहे का? तुम्ही आधीच्या प्रश्नाचीही उत्तरे दिली नाहीत!! ती कृपया द्यावीत म्हणजे काही गैरसमज दुर होतील!!!

माझ्या ओळखीतल्या किमान पाच तरी मुली संस्कृत भाषा (phd न करता )निमित्ताने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.एक तर परदेशात शिकवते.
विश्वास घातकी म्हणजे हेच की हिंदी मावशीला समोरच्या रोजगार करणाऱ्याला मदत म्हणून समजून घेतलं तर मावशी घरचं बळकावतेय घरात रोजगार करायचा तर हिंदी यायलाच हवं हे गरज नसताना होत आहे.

अथांग आकाश's picture

22 Apr 2025 - 10:57 am | अथांग आकाश

माझ्या ओळखीतल्या किमान पाच तरी मुली संस्कृत भाषा (phd न करता )निमित्ताने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.एक तर परदेशात शिकवते.

हे आजचे झाले! विस वर्षांनंतर संस्कृत सारखी निरुपयोगी भाषा किती लोकांना रोजगार मिळवुन देईल?

विश्वास घातकी म्हणजे हेच की हिंदी मावशीला समोरच्या रोजगार करणाऱ्याला मदत म्हणून समजून घेतलं तर मावशी घरचं बळकावतेय घरात रोजगार करायचा तर हिंदी यायलाच हवं हे गरज नसताना होत आहे.

हे साप साप म्हणुन भुई धोपटण्यासारखे झाले!
२०४७ हे लक्ष्य ठेउन आखलेल्या दिर्घकालीन धोरणांतर्गत हा निर्णय घेतला असेल तर आज पहिलित असलेल्या मुलांना पंधरा वीस वर्षांनी त्याचा फायदा होणार नाही असे खात्रीलायकपणे आज कोणी सांगु शकेल का? दरवर्षी शिक्ष्णावर अब्जावधी रुपये खर्च करणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारला शैक्षणिक धोरण ठरवण्याचा अधिकार असु नये?
सरकारचा निर्णय आवडला नाही म्हणुन त्यावर टिका, साधक-बाधक चर्चा करणे ठिक आहे! पण येथे काही लोक फक्त आपल्या व्यक्तीगत आकस, द्वेषातुन काहिच्या काही अकलेचे तारे तोडत आहेत ते संतापजनक आहे!!

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 9:03 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात तिसरी भाषा सक्तीची नको. सक्ती फक्त मराठी व इंग्लिशसाठी हवी.

तिसरी भाषा याऐवजी संगणक, गायन, नृत्य, वादन, क्रीडा, परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे. ज्यांना हिंदी हवी ते शिकतील तिसरा विषय म्हणून. ज्यांना हिंदी नको ते इतर कोणतातरी आवडीचा विषय शिकतील.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 9:19 pm | अथांग आकाश

तिसरी भाषा याऐवजी संगणक, गायन, नृत्य, वादन, क्रीडा, परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे.

नक्की का? मग परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे. लॉक किया जाये?
गुरुजी जो कुठला फालतू माल फुकून असे प्रतिसाद देत असाल तो फुकणे पाहिले बंद करा! जेसी पिंकमन होत आहात तुम्ही :-)

सोत्रि's picture

21 Apr 2025 - 9:25 pm | सोत्रि

:=))

- (हसून हसून फुटलेला) सोकाजी

वामन देशमुख's picture

21 Apr 2025 - 9:08 pm | वामन देशमुख

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

तिसर्‍या पर्यायाची गरजच नाही.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात मराठी व इंग्लिश या दोन भाषा पुरेशा आहेत. तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 8:47 pm | अमरेंद्र बाहुबली

काही मुर्खाना वाटतेय की हिंदी म्हणजे हिंदुत्व! बाकी लेख छान आहे, मराठी माणसालाच मरतजी वाचववू लागणार आहे, अन्यथा मराठी १० वर्षातच संपेल. कोवळ्या जीवांवर हिंदी लादून काय साधणार आहेत?

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 8:53 pm | अथांग आकाश

मराठी माणसालाच मरतजी वाचववू लागणार आहे,

चोक्कस! साची वात छे!!

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 8:59 pm | श्रीगुरुजी

मराठी भाषेचे सौंदर्य, नवरस, वृत्ते, योग्य शब्द इ. वर एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे. लवकरच सुरू करतो.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 9:05 pm | अथांग आकाश

लिह! पिसं काढायला आम्ही मऱ्हाठी द्वेषी बसलोच आहोत तुंम्हा फडणवीस द्वेषी सारखे :-)
फ्री नको पण बुर्जी कुठे चांगली मिळते ते बघावे लागेल!!

मुळात मराठी माणसाला हिंदी शिकण्याची गरज नाही. त्याला आजूबाजूच्या वातावरणातून जुजबी हिंदीचे धडे मिळत असतात. जसा इतर राज्यांत हिंदीचा पर्याय दिलेला आहे तसा हिंदी भाषिक पट्यात मराठी / गुजराती / कन्नडा / तमिळ /तेलुगू यापैकी कोणतीही एक भाषा तरी पहिलीपासूनच सक्तीचे करावी कारण तिकडची जनता याच
भाषा बोलणार्‍या राज्यांत कामासाठी जात असते. त्यांना रोजगार मिळायला मदत होईल. फारच वाटले तर याला राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवावा म्हणजे बघा उत्तरेतून येऊन कशी दक्षिणवासियांची मने जिंकली वगैरे. या सगळ्या भाषा शिकल्या तर उत्तरेच्या राजकीय पक्षांना देखील दक्षिण मधे प्रवेश करायला मदत होईल. मार्ग थोडा अवघड आहे पण पहिलीपासूनच ब्रेनवॉश केला तर जमून जाईल.

मराठी भाषिकाला फक्त ट्रेन मधे भांडताना मराठी भाषा आठवते पण भांडण जसजसे पुढे जाते तसतसे तो हिंदीवरच घसरतो.

मुळात राजकारण्यांपेक्षा मराठी भाषिक म्हणून आपण स्वतः नालायक आहोत हे मान्य केले तर आपल्या चुका सुधारता येतील.
मराठी भाषिकांची भांडकुदळ म्हणून प्रतिमा बनविली गेली आहे / बनली आहे (त्याला जबाबदार कोण हा नंतरचा प्रश्न ), ती सुधारण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.
कामानिमित्त बरेचदा चेन्नै, कोईम्बतूर येथे जाणे येणे व्हायचे तेथे हिंदी बोलता येते का विचारल्यावर "सॉरी सर, ओन्ली तमिळ ऑर इंग्लीश" असे विनयपुर्वक उत्तर कैकवेळा मिळाले आहे.
मराठी कामगार मिळणे, त्याने वेळेत काम करणे, आवश्यकता पडल्यास वेळेपेक्षा जास्त काम करणे हा आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठाच मुद्दा बनलेला आहे हे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. मी १५ वर्षे मराठी बाणा राबवून हट्टाने मराठी कामगार ठेवले मात्र त्यातून प्रचंड त्रास सहन करावा लागला. (काही अपवाद होते त्याचे कौतुक आहेच).त्यामुळे नाईलाजाने हिंदी भाषिक कामगारांना शरण जावे लागले आहे. शेवटी पोटासमोर मराठी बाणा किती टिकवायचा याचा पण विचार करावा लागला.
मात्र मराठी माणूस शक्यतो चोरीचपाटी करत नाही, बोलायला स्पष्टवक्ता असतो मात्र शक्यतो खोटी आश्वासने देत नाही असे देखील अनुभव आले आहेत हे देखील नमूद करावेसे वाट्ते.

हिंदी भाषिकांना मराठी समजते पण बोलता येत नाही असे मला बरेच हिंदी भाषिक म्हणतात. ते किती खरे, किती खोटे मला माहित नाही मात्र त्याने हिंदीत बोलावे, आपण मराठीत बोलावे, अडलेल्या शब्दावर हिंदी बोलावे असा सध्याचा दिनक्रम आहे.

बरेच अवांतर झाले पण मुळात हिंदी भाषिक नको हा या धाग्याचा मुद्दा नाही तेव्हा केवळ शिक्षणात हिंदीची सक्ती नको एवढीच मागणी पुढे रेटून थांबतो. मुख्यमंत्री कार्यालयाला ईपत्र पाठवतो आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 9:46 pm | श्रीगुरुजी

चांगलं लिहिलंय. बरेच मुद्दे पटले.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 9:58 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या ओळखीचे अनेक उत्तर भारतीय आहेत, छान मराठी बोलतात, त्याना विचारले तेव्हा कळले की मराठी लोकच हिंदीत सुरुवात करतात आणी त्याना नाईलाजाने हिंदीतच बोलावे लागते, दक्षिणेतले लोक त्यांच्या भाषेत हिंदी भाषिक बोलला तर आनंदतात व दक्षिण भारतीय भाषेत बोलू लागतात, ह्याउलट मराठी लोक समोरचा मराठी बोलत असेल तरीही हिंदीतच बोलत सुटतात, हिंदीत बोलणे हा मानसिक रोग झालाय मराठी माणसाचा.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 10:49 pm | अथांग आकाश

हिंदीत बोलणे हा मानसिक रोग झालाय मराठी माणसाचा.

तुमचा रोग असेल! सरसकट सगळ्या मराठी माणसांना दोष देउ नका! छोटे पिंक्मॅन!

अप्पा जोगळेकर's picture

21 Apr 2025 - 10:02 pm | अप्पा जोगळेकर

आपली बाजू कितीही बरोबर असली तरी आपण आडमुठेपणा केला की समोरुन धडाकेबाज विरोध होणार, वाद होणार, हम्रीतुमरी होणार आणि शेवटी मराठी भाषेचे नुकसान होणार. खुप चांगली नाही बोलता आली तरी चालेल पण व्यवहारापुरती आली पाहिजे असे वाटणारे अन्य भाषिक लोक अनेक आहेत. मी राहतो त्या सोसायटीच्या वाचनालयात अशा लोकांचे जुजबी मराठीचे वर्ग घेण्याचा विचार केला आहे. क्रिकेट खेळायला जातो तिथेसुद्धा बरेच जण आहेत. बघू जमते का.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Apr 2025 - 9:17 am | माईसाहेब कुरसूंदीकर

हिंदी शिकवण्यापेक्षा लहान मुलांना महिन्यातून दोन हिंदी चित्रपट बघायला लावणे अनिवार्य करावे. करोनानंतर तुमचे ते मल्टिप्लेक्सवाले कोलमडले आहेत असे वाचले आहे. एवढा मोठा धंदा मिळाल्यावर ते खूष. पॉप्कॉर्न्/सामोसेवाले पण खूष, घरापासुन थियेटर्/मल्टिप्लेक्स पर्यंत पोचवणारे रि़क्षावाले पण खूष..बॉलिवूडवाले पण खूष.
अर्थव्यवस्था चाललीच मग वरच्या दिशेने.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Apr 2025 - 9:30 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्याचा खर्च मात्र राज्यसरकारने केंद्राकडुन वसुल करावा हे लिहायचे राहिले.

अथांग आकाश's picture

22 Apr 2025 - 10:09 am | अथांग आकाश

ह्याचा खर्च मात्र राज्यसरकारने केंद्राकडुन वसुल करावा

बरोब्बर! हिंदी शिकवण्यासाठी लाखभर अमराठी शिक्षकांचा पगार तुमच्या ह्यांनी आपल्या खिशातुन का म्हणुन करावा बरे? तो राज्यसरकारने केंद्राकडुन वसुल करावा :-)

युयुत्सु's picture

22 Apr 2025 - 11:18 am | युयुत्सु

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडु हिला बैसवू वैभवाच्या शिरी
जगन्मान्यता हिस अर्पू प्रतापे अभिजातता थापू कशी ही तरी