ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Apr 2025 - 10:46 am
गाभा: 

सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.

भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.

महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!

ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.

राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.

---

नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.

- द्येस्मुक् राव्

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 4:46 pm | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 5:48 pm | अमरेंद्र बाहुबली

.

वामन देशमुख's picture

1 Apr 2025 - 10:07 pm | वामन देशमुख

बाकी, व्यंगचित्र अगदी "मार्मिक" आहे हं!

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2025 - 6:59 pm | चौथा कोनाडा

गोरगरिबांसाठी !

वामन देशमुख's picture

1 Apr 2025 - 9:58 pm | वामन देशमुख

सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा!

काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी

D

कोरोना काळात रस्तेबंदी असताना मी सुद्धा स्वत: गाडी चालवित वांद्र्यातून पंढरपुरास गेलो होतो. वांद्रे-पंढरपूर हा रस्ता दुर्गम, धोक्याचा व खड्ड्यांनी भरलेला आहे. माझे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे होते. हे सर्व करण्यामागे माझी देशभक्तीच होती.

जय हिंद जय महाराष्ट्र.

वामन देशमुख's picture

2 Apr 2025 - 10:00 am | वामन देशमुख

या लोकांची मज्जाये, कुणी फटफटी चालवतंय तर कुणी मोटार चालवतंय, देश-राज्य मात्र नरेंद्र-देवेंद्र चालवताहेत!

---

अवांतर: व्वा! खूप दिवसांनी फटफटी हा शब्द वापरला; एकदम भारी वाटलं! माझ्या बालपणी बाबांकडे रॉयल एनफिल्ड बुलेट होती. तेंव्हा मी ती चालवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी (बुलेट, जावा, येझदी, राजदूत इ. च्या काळात) मोटारसायकलीला फटफटी म्हणायचे. बाइक हा शब्द कदाचित कुणाला माहीतही नसावा! कालांतराने मी माझी रॉली घेतली. तेंव्हा, "वामन्या, घेतलास काय तुझी तुझी फटफटी लाष्टला?" असे मित्र म्हणाले होते.

आता हे सर्व आठवले. त्यानिमित्ताने रागांचे आभार मानू की उठांचे आभार मानू?

- (रॉलीप्रेमी) द्येस्मुक् राव्

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2025 - 11:14 am | चौथा कोनाडा

+१

गेले ते फटफटीचे दिवस !
किती सुटसुटीत ध्वनीदर्शक शब्द होता !

मोटारसायकल लै लांब अन बाईक लै बायकी शब्द !

रामचंद्र's picture

4 Apr 2025 - 12:26 am | रामचंद्र

'सायकल चालवून कंटाळा आला, फटफट झाली जुनी...' हे चित्रपटगीत आठवतं का?

सुबोध खरे's picture

2 Apr 2025 - 10:24 am | सुबोध खरे

बरं झालं

ते लखनौहुन उत्तरप्रदेशात ला गेले नाहीत

किंवा

बंगळुरूतून कर्नाटकला गेले नाहीत .

नाही तर माझ्या सारखे त्यांना पण मुंबईतून महाराष्ट्रात जायला लागले असते

रात्रीचे चांदणे's picture

2 Apr 2025 - 7:16 pm | रात्रीचे चांदणे

सौगात-ए-मोदी ची उधळपट्टी कदाचित वक्फ विधेयकासाठीच दिली असेल. सामान्य मुस्लिम लोकांचा विरोध थोडातरी कमी झाला असेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 9:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर

सेन्सेक्स ३०० अंकानी खाली.
US tariffs hit Indian markets as Sensex falls over 300 points, Nifty below 23,250
ट्रम्प ह्यांच्या आयात शुल्काच्या निर्णयावर जगातील सर्व देशप्रमुखांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Meloni called a 20% tariff rate imposed on the European Union "wrong", while Albanese said a 10% import tax on Australia's goods was "unjustified."
Ireland, Taoiseach Micheál Martin said Trump's decision was "deeply regrettable" and benefitted "no-one".
Japan said its 24% levy was "extremely regrettable" and could violate World Trade Organization and US-Japan agreements, while Thailand said it would negotiate its 36% tariff.

https://www.bbc.com/news/articles/cvgql020y5lo

https://indianexpress.com/article/business/market/us-donald-trump-tariff...

भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 11:08 am | श्रीगुरुजी

भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.

कोणी दिली अशी प्रतिक्रिया?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 11:25 am | माईसाहेब कुरसूंदीकर

इंग्रजी वर्तमानपत्रांत उद्योजकांनी दिली आहे. काल शेयरमार्केटमधील दलालही असेच म्हणत होते.
सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच!

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 12:36 pm | श्रीगुरुजी

कोणकोणत्या उद्योजकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे? कोणकोणते दलाल असे म्हणत होते?

सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच.

म्हणजे देश चालविणाऱ्या अधिकृत सरकारकडून कोणत्याही अधिकृत नेत्याने अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

पण माईडी कोणतेतरी अनामिक उद्योगपती, अनामिक दलाल यांच्या निराधार प्रतिक्रिया वाचून नाचायला लगली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 12:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रम्पने मोदीना बोलावुन व्हाईट हाउसमध्येच भारताचा अपमान केला. बेड्या घालुन्,साखळ्या घालुन भारतियांना परत पाठवले.. त्यावर एक अक्षर न बोलणारे आता काही बोलतील ह्याची अपेक्षाच नाही. आयात्शुल्कावर आता महत्वाचे देशप्रमुख प्रतिक्रिया नोंदवत आहेत. "वसुधैव कुटुंबकम/विश्वगुरु' करणारे मात्र गप्प आहेत.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 1:13 pm | श्रीगुरुजी

खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर मार्गाने घुसलेल्या पुरूषांना ट्रंपने धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण, मोगऱ्याची वेणी देऊन ओटी भरून विमानाच्या प्रथम वर्गातून पाठवणी करायला हवी होती. पाठवणी करताना निरोप द्यायला ट्रंप दांपत्य विमानतळावर यायला हवे होते आणि प्रत्येकाला "पुन्हा यायचं हं आणि आल्यासरशी चांगलं महिनाभर रहायचं हं" असं सांगून गळाभेट घ्यायला हवी होती.

माईडे तू नानांची, समोरच्या दुकानातल्या मारवाड्याची, कोपऱ्यावरच्या पानवाल्याची, पोस्टमनची प्रतिक्रिया घे पाहू आणि आम्हालाही सांग.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 2:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण"
हे नाहीतर हातापायात बेड्या.. ह्यामधे काहीच नाही का ? बायनरी थिंकिंग म्हणतात ते हे. तुम्ही आमच्याबरोबर आहात नाहीतर तुम्ही आमचे शत्रु. मुलगी हवी तर ती ऐश्वर्या रायसारखीच नाहीतर मी अविवाहितच राहणार ही मानसिकता.
आयात शुल्क लावले म्हणुन ईतर देश ह्यावर कसा मार्ग शोधायचा ह्यावर विचार करत आहेत. आणि ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत. उद्या बेकायदेशीर भारतियांना ट्रम्पने गोळ्या घालुन मारले तरीही मौनी पंतप्रधान गप्प बसतील आणि त्यांचे समर्थक "तो अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणुन समर्थन करतील.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 3:02 pm | श्रीगुरुजी

ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत.

हो ना. आमच्याकडे सकाळी वृत्तपत्र टाकणारा, महापालिकेतील मूषकसंहार कार्यालयातील एक लिपिक, आरामखुर्चीतून झुलत झुलत वामकुक्षी करणारे एक निवृत्त पणजोबा, झालंच तर नाक्यावरचा पानवाला असे अनेक भारतीय आयातशुल्क वृद्धीसाठी ट्रंपचे कौतुक करताहेत. मौजे गुडमुडशिंगी (खुर्द) मध्ये तर कोपऱ्याकोपऱ्यावर फलक लावून त्यावर ट्रंपचे चित्र व त्याखाली वस्तादाने डाव टाकला असं लिहून फटाक्यांची आतषबाजी करताहेत.

स्वधर्म's picture

3 Apr 2025 - 2:56 pm | स्वधर्म

माईंचा मूळ मुद्दा जो की इतके सर्व देश प्रतिक्रीया देत असताना आपले नेते एक अवाक्षरही प्रतिक्रीया देत नाहीत हा आहे. वी आर जष्ट टेकर्स, विदाऊट करेज टू डिसअ‍ॅग्री अशी देशाची प्रतिमा जागतीक पटलावर होत आहे.
शेपूट घातले तरी त्याचे समर्थन आपण कसे करू शकता हे जाणून घ्यायला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 3:13 pm | श्रीगुरुजी

आंतरराष्ट्रीय राजकारणात घायकुतीला येऊन काहीही करत नाहीत. प्रत्येक वेळी पूर्ण अभ्यास करून, लाभ-नुकसानीचा सखोल विचार करून त्यानुसार प्रतिक्रिया देऊन भूमिका घेतली जाते.

१९९८ मधील अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध घातल्यानंतर त्या संबंधात भारत-अमेरिका चर्चा सुरू झाली व चर्चेच्या अनेक फेऱ्यांनतर जो अणुकरार झाला तो २००८ मध्ये.

आताही पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय योग्य वेळी होईल व त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अपत्य जन्माला येत नाही. त्यासाठी ९ महिने लागतात. तसेच असे आंतरराष्ट्रीय विषय एका दिवसात हातावेगळे होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.

स्वधर्म's picture

3 Apr 2025 - 5:11 pm | स्वधर्म

बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. आपण आत्ता विश्लेषण करत आहोत. अगदी थायलंडसारखा देशही प्रतिक्रिया देता झाला. ते घायकुतीला आलेत असे अजिबात वाटत नाही. जिथल्या तिथे पहिली प्रतिक्रिया देणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आब राखण्यासाठी आवश्यक होते. भारतीयांना परत पाठवले ते ठीक पण बेड्या घालून पाठवणे हे देशासाठी अत्यंत अपमानकारक आहे. त्यावरही चिडीचूप!
तरीही तुमच्या मनातील सरकारच्या प्रतिमेल धक्का लागत नाही, हे थोडे जास्तच बाजू घेणे नाही का?

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 5:17 pm | श्रीगुरुजी

तात्काळ व घाईघाईने प्रतिक्रिया द्यावी असा हा निर्णय नाही. सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 5:18 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली.
बहुतेक त्या त्या देशात खोट्या पदवीवाले पीएम असतील त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत असतील, आपल्या देशात खर्या पदवीवाले पीएम असल्याने डोके चालवून विश्लेशन करुनउत्तर द्यायला थोडा वेळ
लागत आसावा!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 5:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते."
प्रश्नपत्रिकेत एक/दोन वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न होते. ते सोडुन "आम्ही संदर्भासहित स्पष्टीकरणच लिहिणार" म्हणून ह्यांनी उत्तर पत्रिकाच कोरी ठेवली. काय बोलणार?
एखाद्या हुशार बनियाने डाळींच्या भावाचा फलक ज्या सहजतेने दुकानाबाहेर लावावा तसे ट्रम्प ह्यांनी काल आयात शुल्कांचा फलक दाखवला.ईतर देशप्रमुखांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अशा प्रतिक्रिया द्यायला प्रचंड व्यासंग्,सखोल ज्ञान वगैरेची काहीही गरज नसते/नव्हती.
trump

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 6:03 pm | श्रीगुरुजी

आंतरराष्ट्रीय राजकारणात एका वाक्यात उत्तर द्या असे प्रश्न कधीही नसतात. काही प्रश्नांना तर उत्तर देण्यासाठी अनेक प्रबंध लिहावे लागतात. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, चोवीस तासात काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असला मूर्खपणा फक्त मुर्खांसाठी असतो.

अगदी ११ सप्टेंबरनंतर सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरला अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला नव्हता. १९९० मध्ये सद्दामने कुवेत बळकावल्यानंतरही अमेरिकेने जवळपास साडेपाच महिन्यांनंतर युद्ध सुरू केले होते. अमेरिका-युक्रेन युद्ध म्हणजे हत्ती व मुंगीचे युद्ध आहे, परंतु तीन वर्षांनंतरही रशियाला विजय मिळालेला नाही वा युद्ध थांबले नाही. कायमचूर्ण वटी झोपताना घ्या, सकाळी पोट साफ असे आंतरराष्ट्रीय राजकारण नसते. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 11:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मग चीन्,जपान्,युरोपियन युनियन मधील देश ह्यांनी गेल्या काही महिन्यात अमेरिकेच्या धोरणांवर ज्या तात्काळ प्रतिक्रिया दिल्या, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही पण भारताला मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण चांगले कळते असे समजायचे?

आग्या१९९०'s picture

3 Apr 2025 - 11:30 pm | आग्या१९९०

तसं नाही हो. आपण विश्वगुरु आहोत अशा ' फालतू ' गोष्टींकडे बघायला वेळ ( धमक ) कुठे आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 11:40 pm | श्रीगुरुजी

भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण व्यवस्थित समजू लागले आहे. ते कसे ते काही काळातच समजेल.

'ह्यां'ना दोन मिनिटात साबुदाण्याची लापशी करून देण्याइतके आंतरराष्ट्रीय राजकारण सोपे नसते.

वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले.
उबाठा सेनेने त्यांचे वक्फ बिलाविरुद्ध मत नोंदवले.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 12:37 pm | श्रीगुरुजी

जन्मापासून मुस्लिमधार्जिणा असलेल्या पक्षाकडून काही वेगळे अपेक्षित होते का?

आग्या१९९०'s picture

3 Apr 2025 - 10:16 pm | आग्या१९९०

हे माहीत असूनही तुमच्या लाडक्या पक्षाने त्यांच्यासोबत युती का केली होती? सध्या तुम्ही तुमच्या लाडक्या पक्षाच्या धोरणावर आणि पक्ष वाढीवर ( भ्रष्ट नेते आयात ) नाराज असल्याचे जाणवते. नैराश्यातून आलेला तुमचा प्रतिसाद बघता लवकरच तुम्ही संन्यास घेणार असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 10:35 pm | श्रीगुरुजी

पूर्वी प्रचारात अमित शाहंनी एक बोधकथा सांगितली होती. ती सांगण्याचा मोह आवरत नाही.

एका अरण्यात एक साधू तपश्चर्या करीत असतो. त्याच्या गुहेत एक मूषक वास्तव्यास येतो. साधू त्यालाही आपल्याबरोबर थोडे अन्न द्यायचा. एक दिवस मूषक साधुला सांगतो की मला त्या मार्जाराचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू त्या मूषकाचे मार्जारात रूपांतर करतो. काही दिवसांनी तो बोका साधुला सांगतो की मला त्या श्वानाचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू बोक्याचे रूपांतर श्वानात करतो.

काही दिवसांनी श्वान साधुला सांगतो की मला त्या शार्दुलाचे खूप भय वाटते. त्यामुळे तो साधू श्वानाचे रूपांतर शार्दुलात करतो. काही दिवसांनी शार्दूल साधुला सांगतो की मला मूषकाचे खूप भय वाटते. तो रात्री केव्हाही अंगावर चढून आयाळ कुरतडतो.

शेवटी वैतागून साधू शार्दुलाला पुन्हा एकदा मूळ मूषक स्वरूपात आणतो.

भाजपने शिवसेनेला मूषक स्वरूपातून शार्दूल स्वरूपात नेले, परंतु शार्दूल होण्याची पात्रता नसल्याने पुन्हा मूळ मूषक स्वरूपात आणून बिळात नेऊन ठेवले.

तात्पर्य - मूषकास मूषक स्वरूपातच ठेवावे, शार्दूल स्वरूपात नेले तरी तो मूषकच राहतो.

बाकी मी संन्यास वगैरे घेत नसतो. येथील थापाड्यांच्या थापा उघडकीस आणण्याचे माझे कार्य अखंडित राहील.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 10:39 pm | अमरेंद्र बाहुबली

एक अजगर आपल्या मालकाच्या बाजूला झोपून रोज माप घेतो, एके दिवशी त्याची साईज मालका पेक्षा मोठी झाल्यावर मालकालाच गिळतो, असे अजगर महाराष्ट्र गोमंतक पार्टी, अकाली दल, आसाम गण परिषद नी शिवसेना ह्यांनी पाळले होते म्हणतात!

परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते, तेव्हा तिकडून तुम्ही पळ काढला आणि परत तीच गरळ ओकायला निर्लज्जपणे इकडे आलात. तुम्हाला माहित आहे खोटे 2 ओळीत लिहिता येते पण ते खोडण्यासाठी खूप मेहनत घेऊन मुद्देसूद लिहावे लागते. दिवसभर गावभर हुंदडायला आणि निर्लज्जपणे फुकटचा पगार खाणाऱ्या माणसासाठी काड्या सारणे हा खेळ आहे, पण प्रत्येक वेळी तुमचे खोटे उघडे पाडायला इतरांकडे वेळ असेलच असे नाही. म्हणून उगाच स्वतःची पाठ थोपटू नका

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Apr 2025 - 12:48 am | अमरेंद्र बाहुबली

खोटा कोण आहे ते अख्खा महाराष्ट्र जाणतो, ज्यांच्या डिग्र्याच खोट्या आहेत ते नी जे बांडगुळ बनून शिवसेनेच्या जीवावर वाढले ते स्वतःला मोठे म्हणणारच! अहो कसे पाया पडायला यायचे मातोश्रीवर विसरले का? सेनेने फेकलेल्या १२७ की १२० जागा घेऊन पळत सुटायचे! १७१ की १८० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला ११७ जागा पदरात मिळालेला पक्ष वाढवतो ह्यावर एखादा मूर्खच विश्वास ठेवेल किंवा एखादा अंधभक्तच! मूर्ख अंधभक्त असेल तर तो ह्यालाही खोटेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल!

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2025 - 8:21 am | श्रीगुरुजी

गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते,

युती होण्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत शून्य जागा जिंकणाऱ्या पक्षाला भाजपने खांद्यावर घेऊन मोठे केले. पण हे इतके नालायक की आपल्या कर्तृत्वानेच आपण मोठे झालो या भ्रमात भाजपच्या कानातच . . .

शेवटी भाजपने खांद्यावरून उतरवून दाणकन जमिनीवर आदळून पेकाट मोडले. १ वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान होणार अशी दर्पोक्ती करणारे आज राज्यात विरोधी पक्षनेता होण्याच्या पात्रतेचे सुद्धा राहिले नाहीत व पात्रता नसली तरी आमच्यावर दया करून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी भाजपचे पाय धरून विनवणी करीत आहेत. पण मांजर जसे उंदराला खेळवते तसे भाजप खोडकरपणे यांना खेळवतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदेंशी बोला असे सांगून सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी भाजपने उबाठाची केविलवाणी अवस्था केलीये. शेवटी नाक मुठीत धरून एकनाथ शिंदेंंना शरण जावे लागणार आणि भाजप उपकार केल्यासारखा आपल्याला हवा तोच माणूस विरोधी पक्षनेता करणार व भास्कर जाधव, आठा वगैरे चरफडत हात चोळत बसणार.

सुबोध खरे's picture

4 Apr 2025 - 11:03 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

आग्या१९९०'s picture

3 Apr 2025 - 11:14 pm | आग्या१९९०

मी म्हटलेच होते ,तुम्ही संन्यास घेणार. आता असंबद्ध बोधकथा सांगून लवकरच भोंदूबाबा होणार ह्याची तयारी चालू केलीसुद्धा .

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 11:28 pm | श्रीगुरुजी

बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते. मी तुमच्यासारख्यांच्या झोंबणाऱ्या जखमांवर नियमित तिखटमीठ टाकण्यासाठी येत राहणार.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 2:09 pm | श्रीगुरुजी

शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व संदिग्धावस्थेतून बाहेर पडून मुस्लिम अनुययाची व हिंदू विरोधाची आपल्या पिताश्रींपासून चालत आलेली भूमिका सुस्पष्टपणे घेतली यासाठी हार्दिक अभिनंदन!

वरकरणी तोंडदेखले हिंदूप्रेम, आमचं हिंदुत्व गाईचे नाही तर बाईचे अशी हास्यास्पद भूमिका, मुस्लिमप्रेम उघड उघड दाखविण्यास संकोच या मानसिक कुचंबणेतून उठा बाहेर आले. मुस्लिमप्रेम सांगता येत नाही व हिंदूउन्नती सहन होत नाही ही अवस्था शेवटी उठाने संपुष्टात आणली. उठाच्या संदिग्ध भूमिकेमुळे ओवेसी, अबू आझमी, कॉंग्रेस इ. साशंक असायचे.

पण शेवटी धाडस करून उठाने अत्यंत निसंदिग्धपणे मुस्लिम अनुनयाची भूमिका घेऊन सर्व संदिग्धता, साशंकता कायमस्वरूपी संपुष्टात आणली. मुस्लिमांना आता अधिकृत एक नवीन मसीहा मिळाला. मृतावस्थेत पडून शेवटचे आचके देणाऱ्या उबाठा गटाला मुस्लिम मतांचा प्राणवायू मिळून हा गट अति दक्षता विभागातून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये येण्याची शक्यता निर्माण झालीये.

सर्व उबाठाप्रेमींना यासाठी दिलोजानसे बधाई.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 6:38 pm | श्रीगुरुजी

D

हा अजून पाषाणयुगात वावरतोय. अडीच वर्षे कुंभकर्णी निद्रा केल्यानंतर असंच होणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली

एखाद्याने किती खरं बोलावं? काही मर्यादा?? काढा रे इडी, सीबीआय, निवडणूक आयोग, गद्दार…..

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली

*''छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी सर्वधर्मभाव जोपासला.”*

- ⁠*भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*

https://saamtv.esakal.com/maharashtra/gadkari-slams-nitesh-ranes-controv...

*इतिहासाचे विद्रूपीकरण करणाऱ्या भाजपच्या उथळ नेत्यांना व भक्तांना नितीन गडकरींनी स्पष्टच शब्दात चपराक दिली आहे.*

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2025 - 7:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पांचजन्य्,ऑर्गनायझरच्या पलिकडे जाउन जे वाचन करतात त्यातल्या मोजक्या भाजपा नेत्यांत गडकरी ह्यांचा समावेश होतो.
गडकरी बरोबर बोलतात पण वेळ निघुन गेल्यावर.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

हुकुमशाहीत वेळ निघुन गेल्यावरच बोलावे लागते!

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 7:41 pm | श्रीगुरुजी

आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे काल २ एप्रिल होती आणि उद्या ४ एप्रिल असेल, परवा ५ एप्रिल असेल आणि साहजिकच आहे मग ६ एप्रिल असणार, त्यानंतर ७ एप्रिल येणार. येणार म्हणजे काय येणारच. न येऊन चालणारच नाही. मी मानगुटीला धरून ७ एप्रिलला घेऊन येणार. नाही आला तर पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून महाराष्ट्राच्या मातीत गाडीन.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Apr 2025 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

मागचा आठवडा आंद्रे वपाडाव ह्यांनी गाजवल्या नंतर हा आठवडा aagya गाजवताहेत! श्रीगुरुजी एकटेच लढताहेत, भक्तांकडून योग्य ती रसद श्रीगुरूजीना पोहोचत नाहीये. पुढचा आठवडा बहुतेक “माई दी ग्रेट” गाजवणार! त्यापुढचा बिरुटेसर! :) मस्त रे मस्त!
कुणी फिरवा दंडपटा
कुणी काढा तलवारी,
पण सोडू नका शत्रूला मोकळे
ह्या मुलुख मैदानी! :)
- २० मिपाकराना प्रत्यक्ष भेटलेला अमरेंद्र बाहुबली!

खोटाड्यांना खोटे पणाच्या फुसकुल्या सोडून वातावरण दूषित करणे फार सोपे असते. स्वतःच स्वतःचा वास घ्या आणि खुश व्हा.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2025 - 11:03 pm | श्रीगुरुजी

अश्यांची कार्यपद्धती म्हणजे अहो रूपम् अहो ध्वनी:.

सुक्या's picture

4 Apr 2025 - 3:59 am | सुक्या

आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2025 - 8:09 am | श्रीगुरुजी

मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.

वामन देशमुख's picture

4 Apr 2025 - 10:07 am | वामन देशमुख

मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.

आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.

दुर्दैवाने सहमत आहे. यांच्या अश्या वागण्यामुळे अनेक जुनी जाणती मिपाखरे एकतर वाचनमात्र झालीत नाहीतर मिपा सोडून गेलीत.

सुबोध खरे's picture

4 Apr 2025 - 11:06 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2025 - 9:09 am | श्रीगुरुजी

वफ्फ सुधारणा विधेयक १२८ वि. ९५ अंतराने राज्यसभेनेही संमत केले. मुस्लिमधार्जिण्या पक्षांचा विरोध निष्फळ ठरला.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2025 - 9:33 am | श्रीगुरुजी

मुस्लिमांना इंतजेमा का काहीतरी असतं त्यासाठी उबाठा गटाने बीकेसीतील मैदान वापरायची अनुमती दिली होती. ती जागा बुलेट ट्रेनसाठी दिल्याने new muslim icon उठाचा संताप अनावर झालाय.

वामन देशमुख's picture

4 Apr 2025 - 11:01 am | वामन देशमुख

हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली फुरोगामित्व सोडून सनातनी होऊ घातले आहेत का? चार-सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी मोदींचे समर्थन वाटेल काहीतरी बोललेले आठवते.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Apr 2025 - 6:50 pm | चंद्रसूर्यकुमार

वक्फ बोर्ड संशोधन कायद्याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार कारण हा कायदा घटनाबाह्य आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. एक गोष्ट कळत नाही. सध्या म्हटले जात आहे की संशोधन कायद्यानंतर १९९५ ची परिस्थिती परत आली आहे म्हणजे २०१३ मध्ये युपीए सरकारने जे बदल केले आहेत ते या नव्या संशोधन कायद्याद्वारे उलटवले आहेत असे मला तरी वाटत आहे. ते बरोबर आहे का? तसे असेल तर मग तो कायदा घटनाबाह्य आहे असे म्हणायला नक्की आधार काय आहे हे समजत नाही. कारण त्याचा अर्थ असा होईल की १९९५ चा कायदा हा पण घटनाबाह्य होता- तस्मात २०१३ मधील बदलही घटनाबाह्य होते.

सुबोध खरे's picture

4 Apr 2025 - 7:37 pm | सुबोध खरे

हे सर्व देखावा आहे.

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे न्यायालयातील अर्ज दाखल केलेले आहेत हे स्पष्ट आहे.

कारण जोवर राष्ट्रपती त्यावर सही करत नाहीत तोवर तो कायदा होत नाही

आणि

संसदेत काय मंजूर होऊ शकते यावर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण नाही तेंव्हा सध्या तरी सर्वोच्च न्यायालय काही कार्यवाही करेल हि शक्यता सुतराम नाही.

राष्ट्रपतींनी त्यावर सही केली आणि ते भारत सरकार राजपत्रात त्याची नोंदणी झाली कि मगच त्याला आव्हान देता येईल.

याचे गुऱ्हाळ नंतर दोन तीन वर्षे तरी चालेल आणि त्यात निष्पन्न काहीही होणार नाही

कारण एखादे प्रकरण न्यायालयात नेता येणार नाही असा कायदा केला असेल तर त्याला कोणते न्यायालय संमती देईल.

इतके मूलभूत विचार करण्याची अपेक्षा बहुतांशी मुसलमान मतदारांची नाहीच.

आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2025 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे.

गोबरयुगात आपली सत्ता राहिली पाहिजे म्हणून 'गाजर ए कोबी' आणि 'वक्फ' ची दाळबट्टी आणली आहे, असे नाही वाटत का ?

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Apr 2025 - 7:04 pm | चंद्रसूर्यकुमार

वक्फ संशोधन बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास झाल्यानंतर जनता दल (युनायटेड) च्या पाच नेत्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे पाच नेते आहेत- नदीम अख्तर, राजू नय्यर, तबरेझ सिद्दीकी अलीग, महंमद शाहनवाझ मलिक आणि मोहंमद कासीम अन्सारी. हे पाच जण नक्की किती वरीष्ठ पदांवर आहेत याची कल्पना नाही. निदान मी तरी या पाचांपैकी एकाचेही नाव ऐकले नव्हते. बाकी कोणी राजीनामे दिले तरी फारसा फरक पडणार नाही खासदारांनी राजीनामे दिले तरच काही फरक पडू शकेल.

१९९८ मध्ये तेलुगू देसमने वाजपेयी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचे नेते बशीरूद्दिन बाबू खान यांनी पण असाच राजीनामा दिला होता. ते चंद्रबाबू नायडू आणि एन.टी.रामाराव यांच्या मंत्रीमंडळात मंत्री तरी होते. मात्र हे पाच जण कितपत वरीष्ठ आहेत याची कल्पना नाही. त्या बशीरूद्दिन बाबू खान यांचे १९९८ नंतर नाव एकदाच ऐकले ते त्यांचे १०-१२ वर्षांपूर्वी निधन झाले तेव्हा. त्यामुळे असे नेते बाहेर पडून कितपत नुकसान होत असावे याची कल्पना नाही.

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे राजीनामे दिलेले आहेत.

दुष्काळात भाकड गाय ब्राम्हणाला दान देण्याची हि वृत्ती आहे. एकतर गाय दूध देत नाही, त्यातून चाऱ्याचा खर्च वाचतो आणि गोदानाचे पुण्यही मिळते.

सुबोध खरे's picture

4 Apr 2025 - 7:46 pm | सुबोध खरे

यातला एकही ज द चा आमदार किंवा खासदार नाही. तेंव्हा पुढच्या निवडणुकीत रा ज द मध्ये जाऊन तिकीट मिळवायचे असावे.