सिनेमे

कॉमी's picture
कॉमी in काथ्याकूट
25 Mar 2022 - 10:05 pm
गाभा: 

(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)

गुड टाईम (२०१७)

कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.

त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.

या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.

खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

26 Sep 2024 - 3:07 pm | चौकस२१२

बहू चर्चित असलेलला " द गोट लाईफ " बघितला
आखाती देशात गेलेल्या भारतीय कामगारांची "काफिला" पद्धती मध्ये अतिशय भयानक पिळवणूक , म्हणजे चक्क गुलामगिरी केली जाते यावर चित्रपट आहे,
काळ मोबाईल फोन येण्याच्या आधीचा आहे
चित्रपटातील कामे, चित्रीकरण वगैर उत्तम आहे ( मुख्य अन्यायकारी अरबांचे काम एका खरंच ओमानी अरब कलाकाराने केलं आहे तालिब अलं बलुशी , (अर्थात त्याला त्यामुळे सौदी कडून दम मिळाला हे वेगळे सांगणे ना लागे )

केरळ मधील एक ना शिकलेले कामगार तिकडे जातो आणि गेल्या रात्रीच त्याला कळत कि आपल्याला शहरातील ऑफिस हेल्पर असे काम जे सांगितले तसे नसून एखाद्या गुलामासारखे वाळवंटात मेंढपाळांचे आणि ते सुद्धा अन्ययाकारक अश्या परिस्थिती आहे , सुरवातीची त्याची तगमग दाखवताना दिग्दर्शकाने केरळ मधील हिरव्या वनराईत त्याचं कुटुंबातील आठवणी आणि त्या विरुध ओसाड वाळवंट / रखरखीत पण याचा चांगला उपयोग केला आहे

पण लांबी फार वाटली , रेंगाळलंय तसेच मध्ये मध्ये जाला "कन्टीनुएटी " म्हणजे रंगभूषा वेषभुसहा यातील ती गंडते .. एक वेळी पायात अतिशय जीर्ण बूट असतात तर दुसरया दृश्यात ते तेवढे मळलेलं नास्तात वैगरे , तसेच शेवटी त्याला मदत मिळू लागते तेवहा मदत करणारी लोक त्याला सरळ भारतीय दूतावासाकडे का घेऊन जात नाहीत? हे काही कळले नाही
एकूण जेवढा गवगवा झाला त्या मानाणे कंटाळवाणा वाटलला

कॉमी's picture

19 Oct 2024 - 12:24 pm | कॉमी

सिरीयल - नेटफ्लिक्स - मिडनाईट मास

खुप आवडली. एकदम दोन दिवसात पूर्ण संपवली आणि अजूनही डोक्यात विचार चालू आहेत.

एका छोट्याश्या बेटावर तुरळक वस्तीचे गाव असते. अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारी वर टिकून असते. गावकरी धार्मिक असतात. तिथल्या चर्चचा वयोवृद्ध प्रिस्ट इजरायलमधल्या धार्मिक जागा पाहण्यासाठी जातो, आणि त्याला काहीतरी इजा होते आणि त्याच्याऐवजी तात्पुरती सोय म्हणून एक तरुण प्रिस्ट गावात येतो. त्यानंतर काही चमत्कारीक गोष्टी घडू लागतात.
अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे. आणि काही प्रसंग भीतीदायक तर काही खुप सुंदर आहेत. आवर्जून पहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2025 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला भाग... आणि इतर राखून ठेवले आहेत. निवांत बघुनच घेईन.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2025 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही प्रसंग भीतीदायक तर काही खुप सुंदर आहेत.

+१ मजा आली. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव's picture

8 Jan 2025 - 3:10 pm | आंद्रे वडापाव

अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे. आणि काही प्रसंग भीतीदायक तर काही खुप सुंदर आहेत.

प्राईम वर ... "फ्रॉम" म्हणून सिरीज बघायला घेतलीये...

वामन देशमुख's picture

1 Jan 2025 - 11:23 pm | वामन देशमुख

Last Holiday हा सिनेमा एका मित्राच्या सुचविण्यामुळे पाहिला.‌ कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, केवळ दोन-तीन महिन्यांचेच आयुष्य शिल्लक राहिलेल्या एका निम्न-मध्यमवर्गीय नोकरदार मुलीची मजेशीर कथा आहे. (कथेचा शेवट मित्राने आधीच सांगितलेला असल्याने, सिनेमा पाहताना माझा दृष्टिकोन कदाचित बदललेला होता).

मला सिनेमा आवडला; मिपाखरांना पाहण्याची शिफारस करतो.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Jan 2025 - 3:18 am | हणमंतअण्णा शंकर...

ह्या गोष्टीला नावच नाही: अशक्य सुंदर चित्रपट आहे. आमची कोल्हापूरची पोरं काय कमाल अभिनय करतात. खूप दिवसांनी आवंढा गिळला एखादा चित्रपट पाहताना. जीवाजवळचा वाटला. प्राइमवर भाड्याने उपलब्ध आहे. अतिशय सुंदर, शांत, गंभीर. संदीप सावंत हा उत्तरोत्तर असेच चित्रपट करत राहो अशी इच्छा.

अमलताश: कोथरूडातल्या wannabe कोरेगावपार्क करांसाठी पेठेतल्या लोकांनी केलेली अतिशय पातळ (तरल) हगवण

moonstruck : एक मस्त रॉम कॉम. नाताळ सुखाचा झाला.

Speed : धमाल पॉपकॉर्न थ्रिलर. Keanu Reeves, sandra Bullock, आणि मस्त गरम गरम दुलई आले + बडीशोप किंवा नुसत्या बडीशोपचा चहा जग भरून.

The Proposal, While You Were Sleeping: पुन्हा एक टिपीकल sandra Bullock रॉम कॉम. ख्रिसमस साठी अत्यावश्यक. थंडीने गारठून आणि अंधाराने बोअर झाल्यावर गरम वाइन चे घुटके घेत पाहायला खूप मजा येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2025 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या गोष्टीला नावच नाही, सुंदर सिनेमा सुचवल्याबद्दल आभार.

गाव-तांड्या वस्त्यावरील शिकायला येणा-या मुलांशी संबंध येत असल्यामुळे लहान-सहान गोष्टी बघायला मिळतात. एक छान गोष्ट बघायला मिलाली. कथा वेगवान नसली तरी, संथपणाही हवाहवासा वाटतो. संगीत, वातावरण, मुलं कँपस, हे सर्व आपल्यासमोर घडतं तेव्हा त्यातला एक भाग आपण होऊन जातो. गावगाड्यातील कुटूंब, नदी, नदीतला प्रवास, माणसं, एकमेकांशी असलेली नाती, तरलपणे चित्रपटात आले आहे. आवडला सिनेमा. धन्स.

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

8 Jan 2025 - 12:16 am | वामन देशमुख

The Wild Robot हा ऍनिमेशनपट नुकताच पाहिला. सिनेमात एकही मानवी पात्र नाही. एक-दोन रोबो आणि अनेक लहानमोठे प्राणी हीच पात्रे आहेत.

मालवाहू जहाज फुटून त्यातील रोबोचे पॅकेज एका निर्मनुष्य बेटावर येऊन पडते. त्यातून एक रोबो किंचित अपघातानेच बाहेर पडतो आणि मग तिथे एकच धमाल उडते. मध्यंतरानंतर भावनिक होत जाणारा हा सिनेमा शेवटी शेवटी अनपेक्षित वळणे घेत जातो.

हा सिनेमा पाहायची शिफारस मिपाखरांना करतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2025 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली

मागील काही दिवसात पाहिलेले सिनेमे.
गार्गी (तमिळ) २०२२:- नक्की पहावा असा सिनेमा, बलात्काराच्या आरोपात फसलेल्या बापाला सोडवण्यासाठी होणारी मुलीची तगमग. शेवट हलवून सोडतो.

पोलादी आकाश (आयरन स्काय) :- हिटलरचा एक नाझी कॅम्प चंद्रावर असतो नी ते सूड घ्यायला पृथ्वीवर हल्ला करतात. मस्त आहे.

पोलादी आकाश २ (आयरन स्काय -२) ठीकठाक आहे, कुठल्यातरी पुस्तकाच्या आधारावर आहे.

Welcome Home :- अतिशय जास्त हिंसाचार आहे. अंगावर येतो. पाहू नये.

कोकराची शांतता (The silence of the lamb) :- हा जून मास्टरपीस पाहिला छान होता. पहावाच.

प्यासा (१९५७) :- छान होता. कालच्या पुढील सिनेमाच्या यादीत होता.

रॉकेटसिंह:- हा ही छान होता.

तमाशा :- आवडला नाही. (ह्याची थीम काही लोकांना आवडू शकते.)

नाळ :- अतिशय सुंदर सिनेमा. नागराज मंजुळे टच. नक्की पहावा.

महाराजा :- ओल्ड बॉय ची भारतीय नक्कल. पण कथेची मांडणी सुंदर आहे. नक्की पहावा.

नो स्मोकिंग :- जॉन अब्राहमचा काळाच्या पुढच्या सिनेमातील यादीतील हा सिनेमा त्या काळी अनेकांच्या डोक्यावरून गेला असावा. पण मस्त आहे. नक्की पहावा.

लंचबॉक्स:- अतिशय सुंदर सिनेमा. पहावाच असा.

चौथा कोनाडा's picture

20 Jan 2025 - 10:49 pm | चौथा कोनाडा

रॉकेटसिंह:- आवडला होता.

तमाशा :- पहिला अर्था खुपच आवडला... इन्टरव्हल नंतर सरधोपट मार्गाने जातो .. आणि शेवट विशेष छाप पाडत नाही.

लंचबॉक्स:- आवडला

आता नो स्मोकिंग आणि गार्गी बघीन म्हणतो.. यू ट्युब वर आहेत का हे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2025 - 11:20 pm | अमरेंद्र बाहुबली

तूनळी वर नसावेत.

सायलेंस ऑफ द लॅम्ब्स आवडला असेल तर हातोहात हॅनिबल (पुढचा भाग) आणि रेड ड्रॅगन (मागचा भाग) आणि हॅनिबल नामक टीव्ही सिरीयल (रेड ड्रॅगनच्याही मागचा भाग) बघून टाका.

तमाशा आवडलेला मला. नो स्मोकिंग तर मस्तच. स्टीफन किंगच्या लघुकथेवर आहे.

नाळ, लंचबॉक्स, महाराजा नक्की बघीन.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jan 2025 - 10:02 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. पाहतो.

इतक्यातच एक जॅपनीज वॉर मुव्ही सिरीज बघीतली. किंगडम!
https://en.wikipedia.org/wiki/Kingdom_(2019_film)
https://en.wikipedia.org/wiki/Kingdom_2:_Far_and_Away
https://en.wikipedia.org/wiki/Kingdom_3:_The_Flame_of_Destiny
https://en.wikipedia.org/wiki/Kingdom_4:_Return_of_the_Great_General

बंदुका, तोफा यांच्या आधीच्या काळात बेतलेला सिनेमा. पण टिपिकल मार्शल आर्ट मुव्ही नाही. त्यामुळे बघायला मजा येते. विशेषतः व्हीएफएक्स बेमालूमपणे मिसळलेले असल्यानं खास फील येतो.

एक पदच्युत राजा, त्याच्याऐवजी मरणारा त्याचा डिकॉय गुलाम आणि राजाला राज्य परत मिळवायला मदत करणारा, डिकॉयचा जिवलग मित्र. हा राजा आणि हा मित्र यांची स्वतःची वेगवेगळी स्वप्नं आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न. एवढ्या भांडवलावर सुरु झालेली कथा. हळूहळू अनेक पात्रं कथेत वाढत जातात.
अतिशय वेगवान हाताळणी आणि अप्रतीम वॉर सीन्स! मुख्य म्हणजे सर्व भाग चढत्या क्रमानं चांगले होत जातात.
सध्या पाचवा भाग बनवू घेतलेला आहे. २ वर्षात भारतात दिसेल बहुदा.

मला तरी जाम आवडलेली सिरीज आहे! नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.

कॉमी's picture

21 Jan 2025 - 10:14 am | कॉमी

पाहण्यासारखे वाटते आहे.

कुरोसावाचा रान तुम्ही पाहिला असेलच. तो सुद्धा मस्त सिनेमा आहे. किंग लिअरचे पडद्यावर रूपांतरण आहे.

प्रचेतस's picture

21 Jan 2025 - 3:21 pm | प्रचेतस

हॉटस्टारवर जपानीज राज्यसंस्कृतीवर आधारीत शोगुन पण जबरदस्त आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jan 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली

राघव, कॉमी, आणी प्रचेतस तुम्ही सुचवलेले जपानीज सिनेमे/ वेब सिरीज हिंदीत आहेत का?

ही जॅपनीज मूव्ही सिरीज तर अजून हिंदीत काय ईंग्रजीत पण नाही. मला आता subtitles वर मूव्ही बघायची सवय झालीये, त्यामुळे मला तशी गरज भासली नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jan 2025 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली

कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ पूर्ण केलाय.
अमरेंद्र बाहुबली, हे बघितले नसतील तर नक्की बघा -
1. The departed- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजीत मूवी एक्सप्लेशन पाहिलं आवडलं. मला लिओनार्डो दी कार्पिओ आणी मॅट डेमन ह्याच्यातला फरकच कळत नव्हता त्यामुळे सिनेमा समजत नव्हता.
2. Gone girl- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजी एक्सप्लेशन शोधतोय युट्यूबवर. आज संपवेन.
3. Memento- हा आपला गजनी असल्याचे पहिल्या काही मिनिटातच समजल्याने बंद केला.
4. 12 angry men- हिंदीत मिळाला तर पाहीन नाहीतर इंग्रजी एक्सप्लेनेशन .
5. Doctor Strangelove (or how I learned to stop worrying and love the bomb)- हिंदीत मिळाला नाही यूट्यूब एक्सपेलनेशन पाहिलं हिंदीत. छान होता.
6. Prisoner- हया नावाचे बरेच सिनेमे होते. २०१३ चा पाहिला लहान मुलीच्या किडनापिंग चा. आवडला.
7. Nightcrawler- हिंदी एक्सप्लेसनेशन पाहिल आवडलं.
8. Django unchained- पाहतो लवकरच.
9. The Thing- मस्त सायफाय. आवडला.
10. Rosemary's baby- मस्त मस्त आणी मस्तच. भारी भयपट.
हया व्यतिरिक्त आवडला.
(हा प्रतिसाद मी ह्या आधी दिलाय का?)

हिंदी मिळालेत तर जरूर बघावेत. पण काही चित्रपट खरोखर मूळ भाषेतच छान वाटतात.

12 angry men चा हिंदी रिमेक बघता येईल - "एक रुका हुआ फैसला".

कॉमी's picture

24 Jan 2025 - 8:01 pm | कॉमी

नोसफराटू (२०२४)
पाहिला. रॉबर्ट एगर्स (द विच, लाईटहाऊस आणि नॉर्थमनचा दिग्दर्शक.)

ड्रॅक्युला कादंबरीचे रूपांतर. एक पुरातन रक्तपिपासू राक्षस आपल्या युरोपातल्या गढीतून बर्लीन मध्ये एका मुलीच्या आसक्तीने येतो. तिथे त्याचा सामना नायक-नायिका कसा करतात ह्याची गोष्ट.

आवडला, पण फारसा भीतीदायक नाहीये.

बरेच सिनेमे पाहिले,हिंदी डब्ड-
१.प्रॉक्झिमिटी- मला साय फाय सिनेमे आवडतात.प्राईमवरचे जवळपास सगळे पाहिले.हा युट्यूबवर पाहिला.जरा अतिच वाटला.पण याचा शेवट...अहाहा... हसून हसून पुरेवाट झाली.का ते समजायला नक्की पहा ;) असो.
२.क्लिक-ठीक आहे,दक्षिण भारतीय संत फाय- टाईम ट्रव्हलवर सिनेमा आहे.नेहमीप्रमाणे दक्षिण भारतीय पॅटर्न एका गोष्टीत अजून एक गोष्ट,मग त्या गोष्टीत अजून एक गोष्ट,जो पर्यंत दिग्दर्शकाचे,लेखकाचे मन भरत नाही तो पर्यंत हे सुरू असते वाटतं.शेवटी विचारावं वाटते,अरे कहना क्या चाहते हो..
३.प्रिझनर -इथे सांगितला होता.आणि तो हिरो मला आवडतो म्हणून पाहिला.पण इन्स्पेक्टरने मनाप्रमाणे त्याच मुलाच्या मागे राहून तपास केला असता तर घटना लवकर सुटली असते.फॉरेनमध्येपण नोकरीत इतकं पॉलिटिक्स?
४.द पेरिफेरल (सिरीज)- गेमिंग+एक आय+ टाईम ट्रव्हलवर जबरदस्त आहे.नक्की पहा.
५.नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २- चार जादूगारांच्या अफलातून प्रयोगाचा भन्नाट प्रयोग आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Feb 2025 - 2:18 pm | अमरेंद्र बाहुबली

नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २- चार जादूगारांच्या अफलातून प्रयोगाचा भन्नाट प्रयोग आहे.
नाउ यु चन सी मि आणी प्रेस्टीज वरून धूम ३ बनवलाय.
बादवे, मी आता मिळेल तेव्हा एक सिनेमा पाहतो, इंग्रजी नंतर हिंदी, मग मराठी नी साऊथ असा क्रम आहे. प्रॉक्सिमिटी पाहतो.

प्रॉक्सिमिटी पाहतो... अजिबात नको पाहू..वेस्ट ऑफ टाईम..तो हिरोच मला पहिल्यांदा एलियन वाटला ;);)

क्लोव्हरफिल्ड मध्ये एक गॉडझिला सदृश्य अजस्त्र प्राणी न्यू यॉर्क शहरात येतो. गॉडझिलाचे सिनेमे हे सैन्य, सरकार ह्यांच्या दृष्टीत असतात. हा सिनेमा न्यू यॉर्क मधल्या सामान्य रहिवाशांच्या नजरेतून आहे. एक कपल आपल्या लग्नाची मागणी घालण्याचा क्षण मित्र मैत्रिणींसोबत साजरा करत असते - एका हॅन्डहेल्ड कॅमेऱ्यात शूट करत. तर अचानक हा राक्षस दिसेल ते उध्वस्त करत अवतरतो. त्या राक्षसाची अनभिज्ञता आणि आपण ज्या गटाला फॉलो करत असतो त्यांची भीती आपल्याला प्रखरपणे जाणवते. पूर्ण सिनेमा त्या हॅन्डहेल्ड कॅमेऱ्यावर शूट केला आहे. एकूण आगळीवेगळी मॉन्स्टर मुव्ही आहे. बघण्यासारखाच सिनेमा.

१० क्लोव्हरफिल्ड लेन हा त्याहूनही अतिशय उत्तम सिनेमा आहे. ह्याचा पहिल्या सिनेमाशी थेट संबंध नाही. पहिला न बघता थेट हा पाहता येतो.

एक तरुण मुलगी कारमधून प्रवास करत असते पण तिचा अपघात होतो. जेव्हा ती उठते तेव्हा ती एका न्यूक्लिअर बॉम्ब सेफ बंकर मध्ये असते. एक साठीतला माणूस आणि एक तरुण मुलगा हेच फक्त तिच्यासोबत असतात. तिला सांगितले जाते की न्यू यॉर्क वर काहीतरी अत्यंत अघटित संकट आले आहे. कदाचित न्यूक्लिअर बॉम्ब किंवा असेच काही. (प्रेक्षकांना अर्थात माहित आहे नक्की काय झालंय.) बाहेर पडणे सेफ नाही.

म्हातारा माणूस थोडा पॅरानॉईड दाखवला आहे. तो अनेक वर्षांपासून असले काहीतरी होईल ह्याची तयारी करत असतो. अनेक वर्ष पुरेल इतके अन्न पाणी त्याने जमवून ठेवले असते. बंकर पण त्यानेच बांधला असतो. पण तरुण मुलगा सुद्धा म्हाताऱ्याच्या म्हणण्याची पुष्टी देतो की बाहेर काहीतरी अघटित घडले आहे.

त्या मुलीला नक्की काय खरे काय खोटे ठरवण्यास काही मार्ग नसतो. पुढे काही सांगणे इष्ट नाही, सिनेमाच बघा.

लेकीबरोबर रविवारी एक सिनेमा एक वेब सिरीज पाहिली
१.Mrs.हा हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' यांचा हिंदी रिमेक आहे.अर्थात नेहमीप्रमाणे मूळ चित्रपट अधिक प्रभावी आहे.बायको म्हणजे स्वयंपाक घरातली स्वैपाकी, घरातली नोकर आणि बेडरूममधली बाहुली अशी वागणूक बऱ्याच जुनाट विचारांच्या लोकांच्या घरात असायची...आताही ती आहे?ठीक आहे,पण या सिनेमातली नवीन लग्न झालेली नायिका नृत्यांगनाही आहे.तीला त्यात पुढे जायचयं पण यातून तिची सुटकाच होईना..शेवटी धीर करून ती सुटका करते.दोन्ही सिनेमातला शेवट सारखाच जबरदस्त आहे,ते..लीकेज वॉटर ...सरबत.. ;)
लेक भरतनाट्यम शिकतेय.हे पाहून ती म्हणाली,मी काही लग्न करणार नाही...नाचू पण देत नाही,नुसता स्वैपाक ;) :)

२.द सिक्रेट ऑफ शिलेदार,नाव जरी इंग्लिश असले तरी हिंदी सिरीज आहे आणि प्रकाश कोयडे यांच्या मराठी कादंबरीवर 'प्रतिपश्चंद्र' या काल्पनिक गोष्टी वरआधारित सस्पेन्स (६/१०) सिरीज आहे.खुप प्रेडिक्टेबल पण मराठी कलाकार,छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासातील गूढ गोष्ट ३२ मन सोन्याचे सिंहासन,मराठ्यांना मिळालेला विजयनगरच्या खजिना असे धागे असल्याने इंडियाना जोन्स टाईप आहे.

कॉमी's picture

31 Mar 2025 - 12:21 am | कॉमी

Prince of Egypt हा जुना ऍनिमटेड सिनेमा पाहिला. खुप आवडला.

इजीप्तच्या फॅरोने हिब्रू मुलांची कत्तल करण्याचा सपाटा लावला असतो. त्यामुळे एक बाई आपल्या बाळाला एक टोकरीत ठेऊन नदीत सोडते. तसेच, आईस विश्वास असतो की हाच मुलगा ज्युंचा तारणहार होईल. (ह्यांतून कर्णाची आठवण खास येते. हया प्रकारच्या कथेची पाळेमुळे गिलगमेश च्या कथेत सापडतात.)
तो मुलगा फॅरोच्या पत्नीस सापडतो आणि तो मुलगा, मोझेस, फॅरोचा मुलगा म्हणून वाढतो. प्रिन्स रामसेस आणि मोझेस ह्यांच्यात खुप घट्ट मैत्रीचे संबंध असतात.

पण तारुण्यात मोझेसला आपल्या जन्माबाबत सत्य समजते आणि हिब्रू लोकांच्या गुलामगिरीबाबत त्याला संताप येतो. त्यात त्याच्या हातून एक इजीपशीयन सैनिक मारला जातो आणि मोझेस राजधानीतून पळतो आणि मेंढपाळ म्हणून आयुष्य जगतो. पुढे हिब्रू देव त्याला हिब्रूनची गुलामगिरी संपवण्यास पुन्हा रामसे समोर धाडतो. मग पुढे काय होते त्याची कथा.

ही कथा जुन्या करारातील exodus हया प्रकरणावर आधारित आहे. त्यामुळे, ज्यू, ख्रिषचन आणि मुस्लिम तिन्ही लोकांना हया कथेवर कमी अधिक प्रमाणावर विश्वास आहे. हा सिनेमा बऱ्यापैकी ऍकयुरेटली बनवला आहे - त्यामुळे जुन्या करारातील अ-दयाळू, संतापी, कत्तलखोर देवाचे रूप सिनेमातून डोकावते.

ऍनिमेशन अत्यंत सुंदर आहे. खासकरून रेड सी पार्टींगचा सीन पारणे फेडणारा आहे. अवश्य पहा.

आंद्रे वडापाव's picture

31 Mar 2025 - 9:01 am | आंद्रे वडापाव

-इजीप्तच्या फॅरोने हिब्रू मुलांची कत्तल करण्याचा सपाटा लावला असतो. त्यामुळे एक बाई आपल्या बाळाला एक टोकरीत ठेऊन नदीत सोडते. तसेच, आईस विश्वास असतो की हाच मुलगा ज्युंचा तारणहार होईल. (ह्यांतून कर्णाची आठवण खास येते. हया प्रकारच्या कथेची पाळेमुळे गिलगमेश च्या कथेत सापडतात.)

आणि कृष्णाची सुद्धा ...

बाय द वे .. कृष्णाच्या कथेची ओव्हरऑल थीम पण मिळती जुळती आहे ...

similarities and common themes:

Divine Conception: Both Moses and Krishna are said to have been conceived through divine intervention.
Moses was born to a Hebrew family, but his mother, Jochebed, was instructed by God to place him in a basket and set him adrift on the Nile River. Krishna, on the other hand, was born to Devaki and Vasudeva, but his birth was orchestrated by the god Vishnu, to evacuate him out of Kansa's domain of influence.

Exile and Adoption: Both characters were exiled or abandoned as infants.
Moses was found by an Egyptian princess, while Krishna was discovered by a cowherd named Nanda.

Prophetic Dreams: Both Moses and Krishna had prophetic dreams or visions that foretold their future roles.
Moses had a dream in which he saw a burning bush, while Krishna had a dream in which he saw himself as the savior of the world.

Leadership and Deliverance: Both characters led their people out of slavery and oppression.
Moses led the Israelites out of Egypt, while Krishna led the milk sellers shepherd out of Kansa's atrocities,
And Pandavas to victory in the Mahabharata war.

Divine Discourse /Ten Commandments: Moses received the Ten Commandments from God, while Krishna is said to have discoursed the Bhagavad Gita to Arjuna and Pandvas, which contains teachings on duty, morality, and spirituality.

Miracles and Wonders: Both characters performed miracles and wonders to demonstrate their divine authority. Moses parted the Red Sea, while Krishna lifted the Govardhan Hill to save his devotees from a deluge.

Conflict with Authorities: Both Moses and Krishna faced opposition from authorities who did not recognize their divine authority. Moses faced Pharaoh, while Krishna faced Kansa, and the Kauravas and their king, Duryodhana.

Moral Guidance: Both characters provided moral guidance to their followers. Moses gave the Israelites the Law, while Krishna taught the Pandavas about duty, compassion, and self-realization.

Spiritual Guidance: Both characters served as spiritual guides, helping their followers to connect with the divine. Moses led the Israelites to the Promised Land, while Krishna guided the peple via Pandavas on their spiritual journey.

Symbolic Death and Resurrection: Both characters experienced a symbolic death and resurrection. Moses died on Mount Nebo, while Krishna's body was taken up to heaven, symbolizing his transcendence of the material world.

Legacy and Impact: Both characters have had a profound impact on their respective traditions and cultures. Moses is considered one of the most important figures in Judaism, Christianity, and Islam, while Krishna is revered as one of the supreme deity in Hinduism.

These similarities are not coincidental, as both stories have been shaped by the cultural and spiritual traditions of their respective societies. Despite the differences in their narratives, Moses and Krishna share a common thread – they are both symbols of divine guidance, leadership, and spiritual transformation.

आंद्रे वडापाव's picture

31 Mar 2025 - 9:06 am | आंद्रे वडापाव

ग्रोक च्या सौजन्याने वरील प्रतिसाद दिला आहे.

कॉमी's picture

1 Apr 2025 - 9:57 pm | कॉमी

अरेच्चा होय की!
रोचक.

वामन देशमुख's picture

1 Apr 2025 - 10:02 pm | वामन देशमुख

WALL·E (२००८) कुणी पाहिलाय का? पाहण्यासारखा आहे का?

असा मी असामी's picture

2 Apr 2025 - 12:11 am | असा मी असामी

मस्त आहे ..नक्कि पहा

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Apr 2025 - 2:19 am | अमरेंद्र बाहुबली

चेकमेट हा जुना मराठी सिनेमा पाहिला! बरा होता! युट्युबवर उपलब्ध आहे.
शेखर होम्स ही शेरलॉक हॉम्सच्या धरतीवर बनवलेली वेब सिरीज पाहिली, कमी बजेटची आहे पण मस्त आहे. छान छान सस्पेन्स!
मंगळवारम हा साऊथचा अनैतीकसंबंधपट पाहिला, नाही आवडला!
खारी बिस्किट हा मराठी सिनेमाही सुरुवातीला ठिकाय पण नंतर क्रिकेट मध्ये घालून पांचट केलाय!
ड्रीम गर्ल हा हिंदी सिनेमा पाहिला, जास्त आवडला नाही.