जनरल डायर ह्या सैतानाला @#$%^* ( अनेक म्हशीर्वाद'! )
जालियनवाला बाग
ही कुसुमाग्रजांची कविता नुकतीच वाचली.
त्यात येशूला कवी म्हणतो, की तू नेहमी प्रेमाचा, शांतिचा अन् दयेचा संदेश दिलास. पण आज तुझेच अनुयायी म्हणवणार्यांनी बायका-मुलांत गोळीबार केला. ही तुझ्या काळजात एक नवी जखम आहे.
कविता हृदयद्रावक आहे. वाचून झाल्यावर लक्षात आले, की मागच्या महिन्याच्या तेरा तारखेला या अमानवी घटनेला नव्वद वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशीसुद्धा आम्ही डाराडूर झोपून राहिलो होतो आणि अजूनही बर्याच बाबतींत निद्रावस्थेत आहोत. असे असताना, व माझ्या स्वराज्याचे सुराज्य करण्यात आत्तापर्यंत मी नालायक ठरलो असतानाही,
इंग्रज सरकारी आकड्यानुसार 'मारलेल्या' तीनशे-चारशे जणांना आणि प्रत्यक्षात 'शहीद पावलेल्या' हजारो देशभक्तांना माझा प्रणाम! त्यांच्या देहत्यागाचे खर्या स्वातंत्र्याने चीज व्हावे, भारतातील प्रत्येक प्राण्याला निदान दोन वेळचं खायला व डोईवर छप्पर मिळावे अशी आशा करतो.
जय हिंद !!
प्रतिक्रिया
16 May 2009 - 11:05 am | इनोबा म्हणे
कविता दिली असतीत तर बरे झाले असते. आंतरजालावर कुठे उपलब्ध असेल तर दूवा द्या.
या घटनेत शहिद झालेल्या सर्वांनाच श्रद्धांजली.
जनरल डायर हे नाव ऐकले तरी आमच्या तोंडून शिव्या बाहेर पडतात. या माणसाने किती लोकांचे शिव्या-शाप घेतले असतील देव जाणे!
16 May 2009 - 1:00 pm | बाकरवडी
जालियनवाला बाग - कुसुमाग्रज
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
16 May 2009 - 1:01 pm | बाकरवडी
http://ek-kavita.blogspot.com/
हा दुवा पहा.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
17 May 2009 - 12:02 am | विसोबा खेचर
जालियनवालाबाग हत्याकांडात मारल्या गेलेल्या निरपराधांना आदरांजली..!
तात्या.
17 May 2009 - 7:13 am | अवलिया
जालियनवालाबाग हत्याकांडात मारल्या गेलेल्या निरपराधांना आदरांजली..!
--अवलिया