जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
17 Mar 2025 - 3:35 pm

जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५)

शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले.

ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याचे लक्षात आल्यानंतर बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असे वारंवार सांगूनही ते बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी गवताची गंजी पेटवून देण्याचा इशारा दिल्यानंतर हेरॉल्ड बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. परंतु बूथ बाहेर येण्यास तयार नव्हता. नंतर बूथ गोळी लागून मेल्याचे दिसले. त्याने स्वतःला गोळी मारून घेतली की पोलिसांच्या गोळीने तो मेला हे समजले नाही. प्परंतु गोळीने मेलेला बूथ नसून कोणीतरी दुसराच होता अशी काही काळ अफवा पसरली होती . . .

नंतर कटात सहभागी असलेल्या ८ आरोपींवर लष्करी न्यायालयात खटला चालविला गेला. एकूण ३६६ साक्षीदारांची साक्ष झाली. ३० जून १८६५ या दिवशी खटल्याचा निकाल लागून सर्वांना दोषी जाहीर करण्यात आले. हेरॉल्ड, पॉवेल, आट्झेरॉट आणि मेरी सरॅट (ही महिला वॉशिंग्टन डी सी मध्ये एक खाणावळ चालवित होती ज्यात कायम अनेक भूमिगत सरकारविरोधी जेवायला जात होते) यांना दोषी जाहीर करून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी ७ जुलै १८६५ या दिवशी करण्यात आली. याव्यतिरिक्त डॉ. मड, मायकेल ओ'लॉकलन आणि सॅम्युअल अर्नॉऑल्ड यांना जन्मठेपेची व एडमन स्पँगलरला ६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. कटातील अजून एक आरोपी, जॉन सरॅट देश सोडून पळाला होता. त्याला नंतर पकडून खटला चालविला गेला, पण तो निर्दोष सुटला.

================================================================================
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
================================================================================

वॉरन आयोगाने १० महिने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदरांशी बोलले, केनेडींच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपासला, गोळी झाडतानाचे चित्रीकरण अनेक वेळा बघितले, सर्व उपलब्ध पुरावे तपासले आणि अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून शेवटी निष्कर्ष काढला की ओस्वाल्ड हा एकटाच या खुनात सामील होता व त्याने एकट्यानेच केनेडींच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती.

केनेडींच्या हत्येसंदर्भात काही अंदाज -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबाबत अनेक सिद्धांत समोर आले. मात्र, त्यांची हत्या का करण्यात आली याबाबत अद्याप काहीच माहिती समोल आली नाहीय. त्यामुळं त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पहिला अंदाज - अमेरिकन एजन्सी एफबीआयनं केनेडी यांच्या मारेकऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना एक महिला छायाचित्रकार दिसली. हत्येच्या वेळी ती महिला छायाचित्रे काढत होती. या महिलेचं नाव द बाबुष्का लेडी असे होते. केनेडींची हत्या याच महिलेने आपल्या कॅमेर्‍यात पिस्तुल लपवून आणून केल्याची चर्चा होती. परंतु या महिलेची कधीच ओळख पटली नाही. तसंच तिच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. यानंतर केनेडी यांची हत्या कोणी केली, ती महिला त्यांच्यासोबत होती का अशी चर्चा सुरू झाली.

दुसरा अंदाज - या हत्येच्या वेळी अमेरिका तसंच रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अवघ्या वर्षभरापूर्वी रशियाने अमेरिकेच्या शेजारचा देश क्युबामध्ये अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे तैनात केली होती. जगात तिसरं महायुद्ध पेटणार असे वाटायला लागले होते. परंतु केनेडींनी रशियाशी करार करून हे संभाव्य युद्ध टाळले. त्यामुळं केवळ अमेरिकेतच नव्हे तर रशियातही केनेडींची प्रशंसा झाली. त्यामुळं चिडून रशियाचं नेते ख्रुश्चेव्ह यांनी केजीबी या गुप्तचर संस्थेच्या सहकार्यानं केनेडी यांची हत्या घडवून आणल्याचे सांगण्यात आले. मात्र या आरोपाबाबतही ठोस पुरावे मिळू शकले नाहीत.

तिसरा अंदाज - अमेरिकन माफियांनी क्युबामध्ये खूप पैसा गुंतवला होता असे सांगण्यात येत होते. अमेरिकेच्या क्युबासोबतच्या संबंधात आलेल्या कटुतेमुळं त्यांची मोठी हानी झाली व त्यामुळं अमेरिका तसेच क्युबाच्या माफियांनी मिळून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हत्या केली असा अजून एक अंदाज व्यक्ते करण्यात आला. मात्र या प्रकरणातही अमेरिकन एजन्सीकडून तपासात फारशी मदत मिळाली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जॉन केनेडी व अब्राहम लिंकन हे दोघेही पूर्ण वेगळ्या आव्हानात्मक काळात राष्ट्राध्यक्ष झाले होते. केनेडींच्या तुलनेत लिंकनचा काळ खूपच कठीण होता. केनेडींच्या काळात रशियाचा धोका होता पण तो बाहेरून होता, पण लिंकनच्या काळात देश तुटायला आला होता व आपल्याच नागरिकांशी युद्ध करून लिंकननी देश एकसंध ठेवला. दुर्दैवाने काही प्रभावशाली व्यक्तींचे हितसंबंध दुखविले गेल्याने पूर्वनियोजित कटानुसार त्यांची हत्या करण्यात आली. परंतु या दोन्ही हत्याकांडातून अमेरिका सावरली व पुढे जात राहिली.

एकंदरीत अब्राहम लिंकन व जॉन केनेडी या दोघांचीही हत्या पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आली. अनेक बडी धेंडे यामागे होती असा शेवटपर्यंत संशय होता, परंतु ते सिद्ध करणारे सबळ पुरावे मिळविण्यात तपास संस्थांना अपयश आले. प्राथमिक तपासानंतर जे मारेकरी व साथीदार सापडले तेवढेच पकडले गेले व त्यांना शिक्षा झाली. परंतु या कटामागील मुख्य सूत्रधार शेवटपर्यंत नानानिराळे राहिले असे सर्वसामान्य जनतेला वाटत राहिले. या हत्या या केवळ तात्कालिक संताप यातून एकट्या दुकट्या माथेफिरूने केलेले कृत्य नसून त्यामागे अनेक प्रभावी व्यक्ती व दीर्घकालीन योजना होती यावर बहुसंख्य जनतेचा विश्वास होता. ज्याप्रमाणे धाकटे मर्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येसाठी पकडलेला एक बळीचा बकरा होता व प्रत्यक्षात त्यामागे वेगळीच प्रभावी माणसे होती व ती माणसे कधीही पकडली गेली नाहीत यावर बहुसंख्य अमेरिकनांचा विश्वास होता, त्याप्रमाणे लिंकन केनेडी यांच्या हत्येसाठी केवळ बळीचे बकरे पकडले व मुख्य सूत्रधार सुरक्षित राहिले असे बहुसंख्य अमेरिकनांना अनेक वर्षे वाटत होते.

अमेरिकेच्या इतिहासातील जवळ्पास १०० वर्षांच्या अंतराने घडलेली व अत्यंत गाजलेली ही दोन प्रकरणे लेखमालिका स्वरूपात मांडण्याचा रयत्न केला. यामागे माझे कोणतेही संशोधन नाही. आंतरजाल , काही लेख व काही पुस्तके वाचून मी केवळ सर्व माहिती एकत्रित स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

(इति लेखनसीमा)
__________________________________________________________________________________________________________________

राजकारण

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2025 - 5:17 pm | चंद्रसूर्यकुमार

केनेडींच्या खुनामागे आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी ही की त्यांचा सी.आय.ए नेच खून केला. क्युबन मिसाईल प्रकरणात रशियाने क्युबातून आपली क्षेपणास्त्रे काढून घ्यायच्या बदल्यात अमेरिकेने आपली टर्की आणि इटलीमधील क्षेपणास्त्रे काढून घ्यायला मान्यता दिली. म्हणजे रशियाने अमेरिकेपासून १०० मैलावर असलेल्या क्युबातील क्षेपणास्त्रे काढायच्या बदल्यात रशियापासून कित्येक पटींनी दूर असलेल्या इटली आणि टर्कीमधून अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे काढली. क्युबन मिसाईल प्रकरणी रशियाने आपली क्षेपणास्त्रे क्युबातून काढली म्हणून अमेरिकेचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तो अमेरिकेचा पराभव होता असे बड्यांचे मत पडले. तेव्हापासूनच केनेडींवर त्यांचा राग होता.

वॉशिंग्टन डी.सी मधील अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून केनेडींनी १० जून १९६३ रोजी भाषण केले होते. त्यात ते म्हणाले-

What kind of peace do I mean? What kind of peace do we seek? Not a Pax Americana enforced on the world by American weapons of war. Not the peace of the grave or the security of the slave. I am talking about genuine peace, the kind of peace that makes life on earth worth living, the kind that enables men and nations to grow and to hope and to build a better life for their children--not merely peace for Americans but peace for all men and women--not merely peace in our time but peace for all time.

इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे ते म्हणाले-
Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home.

हे भाषण https://www.jfklibrary.org/archives/other-resources/john-f-kennedy-speec... वर वाचता आणि https://www.youtube.com/watch?v=0fkKnfk4k40 वर बघता येईल.

म्हणजेच काय की रशियाची चूक असली तरी आपण आपली चूक काय आहे हे पण तपासून बघू. क्युबन मिसाईल क्रायसिससारख्या मोठ्या घटनेनंतर काही महिन्यातच आपण आपली चूक आहे का हे तपासून बघू असे अध्यक्षांनी म्हणणे कितपत पचनी पडणार होते? समजा कारगीलनंतर काही महिन्यात वाजपेयी म्हणाले असते की भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत त्यात आपली चूक काय हे आपण तपासून बघायला पाहिजे तर ते पचनी पडले असते का?

असे म्हणतात की अमेरिकन युनिव्हर्सिटीतील ते भाषण म्हणजे शेवटची काडी ठरली. केनेडी बोटचेपे आहेत आणि रशियाविरोधात पाहिजे तितके आक्रमक नाहीत- असा अध्यक्ष असल्यास आपले नुकसान होईल ही धारणा सी.आय.ए मधील बड्यांची झालीच होती आणि त्यातूनच सी.आय.ए नेच केनेडींचा काटा काढला.

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2025 - 5:25 pm | श्रीगुरुजी

असे बरेच अंदाज व्यक्त झाले. परंतु कोणताही सबळ पुरावा कधीच मिळाला नाही. अर्थात अश्या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत असते व पुरावे सापडणे अशक्य असते.

जगभरात आजही अनेक देशांचे प्रमुख नेते मारले जातात व नुसता संशय व्यक्त केला जातो कारण सबळ पुरावेच नसतात. याबाबतीत मोसाद व केजीबी आदर्श आहेत.

श्वेता२४'s picture

18 Mar 2025 - 12:14 pm | श्वेता२४

लवकर सम्पली असे वाट्ले.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2025 - 12:54 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! लिंकनच्या हत्येची फारशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. केनेडींच्या हत्येची तुलनेने जास्त माहिती उपलब्ध आहे. दोन्ही प्रकरणातील मारेकरी तसे चटकन सापडले व त्यामागे खूप नियोजन, कटकारस्थान वगैरे नव्हते. त्यामुळे फार काही लिहिण्यासारखे नव्हते.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Mar 2025 - 12:35 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लेखमाला! केनेडी आणी अब्राहम ह्यांच्या हत्यानबद्दाल
बरेच साम्य नी कॉन्सपरसी थिअरीज होत्या असेऐकून आहे त्या लेखात किंवा चान्सुकू ह्यांच्या प्रतिसादात येतील असे वाटले होते, पण आल्या नाहीत!

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2025 - 12:52 pm | श्रीगुरुजी

दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व दोघाचाही गोळ्या मारून खून झाला हे वगळता कोणतेच साम्य नाही. साम्य या नावाखाली whatsapp वर जे जे येते त्या सर्व थापा आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Mar 2025 - 12:56 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद!

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Mar 2025 - 1:04 pm | चंद्रसूर्यकुमार

सगळ्याच थापा आहेत असे नाही. काहीकाही साम्ये आहेत.

१. दोघांच्याही हत्या करणार्‍यांचा प्रत्यक्ष खटला उभा राहायच्या आधी मृत्यू झाला.
२. दोन्ही अध्यक्षांच्या उपाध्यक्षांचे नाव (आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष झालेल्यांचे) जॉन्सन हे होते. लिंकनचे उपाध्यक्ष होते अ‍ॅन्ड्र्यू जॉन्सन आणि केनेडींचे उपाध्यक्ष होते लिंडन जॉन्सन.
३. दोघांनाही डोक्यात मागच्या बाजूला गोळी झाडण्यात आली.
४. दोघांनाही गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या पत्नी शेजारीच हजर होत्या.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2025 - 2:07 pm | श्रीगुरुजी

आंतरजालावर खालील साम्य आढळले.

- अब्राहम लिंकन यांची सन १८४६ मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये निवड झाली. जॉन एफ. केनेडी यांची सन १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये निवड झाली.

- लिंकन हे सन १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. जॉन एफ. केनेडी हे १९६० मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.

- लिंकन आणि केनेडी हे दोघेही विशेषतः नागरी हक्कांबाबत जागरुक होते.

- व्हाईट हाऊसमध्ये असताना दोघांच्याही पत्नींनी आपले एक बाळ गमावले.

- दोन्ही राष्ट्राध्यक्षांची शुक्रवारीच गोळी झाडून हत्या करण्यात आली.

- दोघांच्याही डोक्यातच गोळी झाडण्यात आली.

- लिंकन यांच्या सेक्रेटरीचे नाव केनेडी होते तर केनेडी यांच्या सेक्रेटरीचे नाव लिंकन होते.

- दोन्ही राष्ट्राध्यक्षांची हत्या दक्षिणेकडील मारेकर्‍यांकडून झाली.

- दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्यक्तींचे नाव जॉन्सन होते.

- लिंकन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म सन १८०८ मध्ये झाला; तर केनेडी यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लिंडन जॉन्सन यांचा जन्म सन १९०८ मध्ये झाला.

- लिंकन यांचा मारेकरी जॉन विल्कीस बूथ याचा जन्म सन १८३९ मध्ये झाला तर केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म सन १९३९ मध्ये झाला.

- दोघाही मारेकर्‍यांची ओळख त्यांच्या अशा तीन नावांनी होती.

- दोघांच्या नावांमधील इंग्रजी अक्षरे पंधरा आहेत.

- लिंकन यांची हत्या 'फोर्ड' नावाच्या थिएटरमध्ये झाली तर केनेडी यांची हत्या 'फोर्ड' कंपनीने बनवलेल्या 'लिंकन' नावाच्या गाडीत झाली.

- बूथ आणि ओसवाल्ड यांना त्यांच्यावर खटला सुरू होण्यापूर्वीच मारण्यात आले.

- लिंकन यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते मेरीलँडच्या मन्रो येथे होते तर केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते हॉलीवूडची सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्यासमवेत होते.

- लिंकन यांच्यावर थिएटरमध्ये गोळी झाडल्यावर मारेकरी वेअरहाऊसकडे पळाला तर केनेडी यांच्यावर वेअरहाऊसमधून गोळी झाडल्यानंतर मारेकरी थिएटरकडे पळाला.
परंतु यातील बहुसंख्य मुद्दे खालील पानात खोडून काढले आहेत.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2025 - 1:55 pm | श्रीगुरुजी

ट्रंप प्रशासनाने केनेडी हत्या तपासातील आतापर्यंत अप्रकाशित असलेली ११२३ कागदपत्रे प्रसिद्ध केली.

माहितीपूर्ण लेखमालेबद्दल धन्यवाद
श्रीगुरुजी

सौंदाळा's picture

20 Mar 2025 - 10:11 am | सौंदाळा

माहितीपूर्ण लेखमाला आणि प्रतिसाद आवडले.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2025 - 2:25 pm | श्रीगुरुजी

सर्व वाचकांना व प्रतिसादकांना धन्यवाद!

विशेषतः चंद्रसूर्यकुमार यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादातून चांगली माहिती मिळाली.