धनवर्षाव (शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
11 Mar 2025 - 11:20 am

सर्वपित्रीची रात्र

गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.

शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.

ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.

याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?

आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.

मांत्रिकानं दिलेली पंचधातूची सुरी महाआहुतीत भोसकून तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..

आता फक्त एक महिना..पुढच्या अमावास्येला धनवर्षाव.....

पण अरे..हे सर्च लाईट?
ह्या शिट्ट्या?
हा मांत्रिक कुठं पळतोय?
~~~~~~~~~~~~~
ब्रेकिंग न्यूज ..
फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल:
फाशी ठोठावली...
गुप्तधनासाठी
.
.
कन्याबळी देणाऱ्या बापाला

कथा

प्रतिक्रिया

फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क.
दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत.
याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?
आणि
फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Mar 2025 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ इजुभो!

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2025 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले

श्या

मजा नहीं आ रहा है.

Maja

अनन्त्_यात्री's picture

11 Mar 2025 - 3:17 pm | अनन्त्_यात्री

मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.