परीक्षा...कुणाची?
'सी ई ओ'समोर पडला
कॉप्यांचा पाऊस !
डोके गरगरले,संताप
आला भाऊस ।।
'विकास मीना'- करारी,
मारली धडक भरारी ।।
बारावी चा गणिताचा पेपर,
खोके भरून कॉप्या,गाईड,
पाहून आले फेफरं ।।
परीक्षाकेंद्रातून अनेकांनी
मारली धूम,
कॉपी फॅक्टरी हँडलूम ।।
आता त्यांची सटकली,
जबाबदारी ना झटकली ।।
इमानदारीची लढाई आरपार,
पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर,
केला पोलीस ठाण्यात FIR ।।
आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री
संचालक पर्यवेक्षक नंबरी ।।
कुंपण च शेत खाते,
पर्यवेक्षक कॉपी देते ।।
कशासाठी हे सर्व?
शिक्षण न देता
पास व्हावेत सर्व ।।
विद्यार्थांना शिकायचे नाहीये.
शिक्षणसम्राटांना
शिकवायचे नाहीये ।।
आता हा झेडपी
'सी ई ओ' प्रामाणिक,
कशी बदली
करावी आणिक ।।
हाच चालला असेल खल,
एक होतील नायक खल ।।
लोकांची स्मृती असते अधू च,
तीन महिन्यांनी शाळेचा,
100% पास निकाल बघू च !!
https://www.esakal.com/marathwada/aurangabad/ceo-exposes-hsc-exam-mathem...
प्रतिक्रिया
23 Feb 2025 - 1:08 pm | कर्नलतपस्वी
कुंपणच शेत खाते पण किती असे इमानदार अधिकारी असतील ?
शिक्षण म्हणजे सापशिडीचा खेळ, नववी इयत्ते पर्यंत सर्व पास मात्र ९९ वर गेल्यावर सापाच्या तोंडातून खाली येणार.
23 Feb 2025 - 7:15 pm | मुक्त विहारि
आवडली....
27 Feb 2025 - 12:03 pm | विवेकपटाईत
सर्वांना पास करा, सर्वांना डिग्री द्या. हाच खरा समाजवाद असतो. प्रत्येक राज्यांत दहावीचा परिणाम 95 टक्क्यांचा वर असतो. दोन दिवस आधी चॅम्पियन वाचून किंवा नकल करून सहज बीए पास होता येते. हिंदीत एमए झालेला मुलगा एक पान हिन्दीचे न चुकता वाचू शकत नाही. बाकी विषयांबाबत न बोलणे उचित. आजची शिक्षण व्यवस्था वयाच्या 22 वर्षापर्यंत कागदी ज्ञान असणार्या तरुणांना तैयार करत आहे. मग त्यांना मूर्ख बनविण्यासाठी आरक्षण इत्यादि खेळ सुरू होतात. हे माहीत असून ही 100 पैकी फक्त 3 तरुणांना सरकारी नौकरी मिळणार. बाकी वयाच्या 30-35 वर्षांपर्यंत सरकारी नौकरीची तैयारी करत बेरोजगार फिरणार.
50 टक्के पेक्षा जास्त मार्क्स असणार्या विद्यार्थ्यांना 8 पुढे शिक्षणाची अनुमति दिली पाहिजे. 60 टक्केहून जास्त मार्क्स असेल तरच कॉलेज शिक्षण.