क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2025 - 10:26 pm | अमरेंद्र बाहुबली

BCCI आणि इतर राष्ट्रीय क्रीडा संघटनांमधील फरक:
1. स्वायत्तता आणि सरकारचा हस्तक्षेप:
• BCCI (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेटसाठी स्वतंत्र संस्था आहे. ती सरकारी संस्था नाही आणि सरकारकडून आर्थिक सहाय्य घेत नाही.
• इतर क्रीडा संघटना, जसे की AIFF (All India Football Federation), Hockey India, इत्यादी, या भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि Sports Authority of India (SAI) कडून निधी घेतात.
2. आर्थिक क्षमता आणि उत्पन्न:
• BCCI जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, आणि त्याची कमाई प्रामुख्याने IPL, मीडिया हक्क, ब्रँड स्पॉन्सरशिप आणि आंतरराष्ट्रीय सामने यांमधून होते.
• इतर राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सना मुख्यतः सरकारी अनुदान, ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून मिळणारे उत्पन्न आणि खासगी स्पॉन्सरशिपवर अवलंबून राहावे लागते.
3. खेळाडूंचे वेतन आणि फायदे:
• BCCI क्रिकेटपटूंना कोटींच्या करारावर ठेवते आणि IPL मुळे त्यांना मोठे कमाईचे पर्याय मिळतात.
• इतर खेळांमध्ये (फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक्स) खेळाडूंचे वेतन आणि करार तुलनेने खूपच कमी असतात.
4. लोकप्रियता आणि चाहता वर्ग:
• क्रिकेट भारतात सर्वात लोकप्रिय खेळ आहे, आणि BCCI मुळे क्रिकेटर्सना मोठी प्रसिद्धी मिळते.
• इतर खेळ, जसे की फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, इत्यादींना तुलनेने कमी प्रसिद्धी आणि आर्थिक पाठबळ मिळते.
5. आंतरराष्ट्रीय नियंत्रण:
• BCCI ICC (International Cricket Council) सोबत काम करते पण सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नाही.
• इतर खेळांच्या संस्था, जसे की FIFA (फुटबॉल), FIH (हॉकी), या थेट आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली असतात आणि नियमांचे काटेकोर पालन करावे लागते.

निष्कर्ष:

BCCI ही एक खासगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे, तर इतर राष्ट्रीय क्रीडा संघटना प्रामुख्याने सरकारी नियंत्रणाखाली असतात आणि आर्थिक मर्यादांमुळे मर्यादित विकास होतो. क्रिकेट भारतात सर्वोच्च आहे, पण इतर खेळांना अजूनही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची गरज आहे.

धनावडे's picture

21 Feb 2025 - 12:20 pm | धनावडे

उद्या BCCI ची आर्थिक परिस्थिती खराब झाली की सरकार त्यांना सुद्धा अनुदान देईल. जसं कांदा आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देत याचा अर्थ अस नाही होत की कृषी मंत्रालय कांदा लागवड करते.

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2025 - 12:27 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही द्विराष्ट्रीय मालिकेत किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा संघ भारतीय संघ या नावाने उल्लेखतात. सामन्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत सादर केले जाते. हेल्मेटवर भारताचा ध्वज असतो. क्रिकेट नियामक मंडळाच्या दैनंदिन कार्यक्रमात सरकार हस्तक्षेप करीत नाही, परंतु न्यायालयाने मंडळाला नियमावली घालून दिली आहे. त्यामुळेच पवार, श्रीनिवासन, निरंजन शहा वगैरे वयस्करांना सक्तीने पायउतार व्हावे लागले होते. जेव्हा जेव्हा नियामक मंडळ मनमानी करू लागते तेव्हा तेव्हा न्यायालयाने मंडळाला चाप लावला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2025 - 8:48 pm | अमरेंद्र बाहुबली

नीट माहिती घ्यावी. भारत सरकाचे अधिकृत संघ व फालतू बीसीसिया ह्यात बराच फरक आहे.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2025 - 4:33 am | मुक्त विहारि

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2025 - 1:00 pm | श्रीगुरुजी

चँपियन्स करंडक स्पर्धेतील पहिला सामना आज दुपारी २:३० पासून पाकडे वि. न्यूझीलंड.

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2025 - 6:47 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलंड ३२०/५ (५०)

नुकतेच पाकड्यांनी ३५३ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता ३२१ करायच्यात.

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2025 - 10:25 pm | श्रीगुरुजी

पाकडे २६०/१०

किवीज ६० धावांनी जिंकले.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2025 - 10:57 pm | अमरेंद्र बाहुबली

आणी ह्याच सोबत श्रीगुर्जींच्या धाग्याने ४०० प्रतिसाद संख्या गाठली! हुर्रे! अभिनंदन गुरुजी. :)

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2025 - 5:32 pm | श्रीगुरुजी

भारत वि. बांगडे

३५/५ वरून १५४ धावांच्या भागीदारीनंतर बांगडे १९०/६ (४३.२)

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2025 - 9:54 pm | श्रीगुरुजी

भारत बांगड्यांविरूद्ध जिंकला.

बांगडे २२८/१० (४९.४)
भारत २३१/४ (४६.३)

मुक्त विहारि's picture

21 Feb 2025 - 5:52 am | मुक्त विहारि

पाकिस्तान विरुद्ध जिंकलो तर, बाकी मॅचेस हरलो तरी चालेल.....

Vichar Manus's picture

21 Feb 2025 - 7:22 pm | Vichar Manus

असे अजिबात वाटत नाही, पाकिस्तान विरुद्ध जिंकायला हवे पण पाकिस्तान विरुद्ध जिंकले आणि सेमीफायनल किंवा फायनल la हरले तर दुःख च होईल आणि पाकिस्तान विरुद्ध हरलो पण फायनल जिंकलो तर आनंदच होईल

मुक्त विहारि's picture

23 Feb 2025 - 5:48 am | मुक्त विहारि

पाकिस्तान न्यूझीलंड बरोबर हरले आहे.

त्यामुळे आपण जर आजची पाकिस्तान बरोबरची मॅच जिंकलो तर, पाकिस्तान out...

मुक्त विहारि's picture

21 Feb 2025 - 5:50 am | मुक्त विहारि

बाकी समालोचन कुठल्याही भाषेत असो...

कोहलीची जाहिरात मात्र उत्तम सुरू असते.

जणू काही कोहली शिवाय हा संघ जिंकूच शकत नाही...

असो...

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2025 - 3:38 pm | श्रीगुरुजी

पाकडे ५९/२ (१३)

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2025 - 5:25 pm | श्रीगुरुजी

पाकडे १६७/५ (३७)

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2025 - 6:32 pm | श्रीगुरुजी

पाकडे २४१/१० (४९.४)

मुक्त विहारि's picture

23 Feb 2025 - 6:51 pm | मुक्त विहारि

मराठी समालोचन उत्तम करत आहेत..

माहितीचा स्रोत म्हणून, मराठी हा माझा प्राथमिक पर्याय असतो.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2025 - 9:52 pm | श्रीगुरुजी

- भारत जिंकला २४४/४ (४२.३)

- कोहलीचे शतक

- भारत उपांत्य फेरीत दाखल

- पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

मुक्त विहारि's picture

23 Feb 2025 - 9:56 pm | मुक्त विहारि

पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर...

Yes...

आजच्या दिवसातली उत्तम बातमी...