मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
प्रतिक्रिया
7 Aug 2021 - 3:01 pm | गामा पैलवान
इंद्रसेन आजोब लई जोमात आहेत. जलदगती गोलंदाज कधी ६०० गाठेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आजोबा तर ६२०+ मारून जम्बोदादाच्याही पुढे गेले. ६५० मारणार का ते बघायचं.
-गा.पै.
7 Aug 2021 - 3:03 pm | श्रीगुरुजी
तो बहुतेक ऍशेसची मालिका खेळून निवृत्त होईल.
8 Aug 2021 - 3:17 am | गामा पैलवान
भारताला जिंकायला १५७ धावा हव्यात व ९ गडी पडायचे बाकी आहेत. उद्या पहिल्या सत्रात ६० धावा व दुसऱ्या सत्रात १०० धावा काढून खेळ आटोपण्यावर भर राहील. पण पावसाचं भाकीत भारी निराशाजनक आहे. एकंदरीत शर्यत पावसाशीही आहे.
-गा.पै.
8 Aug 2021 - 2:53 pm | गामा पैलवान
गेल्या दोन तासांपासून ते चालू घटकेपर्यंत पावसाची स्थिती इथे पाहता येईल : https://www.netweather.tv/live-weather/radar
कसोटी सामना चालू आहे त्या नॉटिंगम चा पोस्टकोड NG11AA टाकावा.
-गा.पै.
9 Aug 2021 - 10:32 am | श्रीगुरुजी
कालचा संपूर्ण पाचवा दिवस पावसाने वाया गेल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताला विजयासाठी फक्त १५७ धावा शिल्लक असल्याने व फक्त एकच फलंदाज बाद झालेला असल्याने विजयाची बरीच संधी होती. अर्थात इंग्लंडच्या गोलंदाजांनाही थोडी संधी होती. भारताचे दुर्दैव.
15 Aug 2021 - 1:34 pm | श्रीगुरुजी
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना -
भारत पहिला डाव ३६४/१०
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पहिला डाव ३९१/१०
जो रूट फारच त्रास देतोय. पहिल्या कसोटीत ६४ व १०९ आणि दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद १८०.
15 Aug 2021 - 1:36 pm | श्रीगुरुजी
विंडीज-पाकडे पहिला कसोटी सामना -
पाकडे पहिला डाव २१७/१०
विंडीज पहिला डाव २५३/१०
तिसऱ्या दिवसाखेर पाकडे दुसरा डाव १६०/५
16 Aug 2021 - 5:39 pm | रात्रीचे चांदणे
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशन नंतर भारताची एकूण आघाडी 259. शमी 52 तर बुमराह 30 धवांवर खेळत आहेत.
16 Aug 2021 - 8:36 pm | सुजित जाधव
सामना मस्त चालू आहे ..चाहापणा पर्यंत इंग्रज ६७-४..भारताला विजयासाठी ६ बळींची आवश्यकता. जो रूट ची विकेट निर्णायक भूमिका बजावेल अस वाटतंय. खराब लाईट पण घोटाळा करू शकते.
16 Aug 2021 - 9:15 pm | श्रीगुरुजी
रूट गेलाय, पण अनिर्णित राहण्याचीच शक्यता आहे.
16 Aug 2021 - 11:12 pm | सुजित जाधव
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक विजय..इंग्लंड ला १५१ धावांनी चारली धूळ.. #हॅट्स ऑफ
16 Aug 2021 - 11:19 pm | गॉडजिला
पण t२० जर Olympics मधे समाविष्ट झाले तर भारताचे एक मेडल दरवेळेसाठी पक्के होऊन जाईल नाही ?
16 Aug 2021 - 11:12 pm | सुजित जाधव
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक विजय..इंग्लंड ला १५१ धावांनी चारली धूळ.. #हॅट्स ऑफ
16 Aug 2021 - 11:29 pm | श्रीगुरुजी
भारताचा अविश्वसनीय विजय झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडला १२० धावात गुंडाळून भारताने १५१ धावांनी सामना जिंकला.
16 Aug 2021 - 11:33 pm | श्रीगुरुजी
काल विंडीजने सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात पाकड्यांना १ फलंदाज राखून हरविले.
विंडीज-पाकडे पहिला कसोटी सामना -
पाकडे पहिला डाव २१७/१०
विंडीज पहिला डाव २५३/१०
पाकडे दुसरा डाव २०३/१०
विंडीज दुसरा डाव १६८/९
दुसऱ्या डावात विंडीज सुरूवातीला १६/३, नंतर ११४/७ व शेवटी १५१/९ अशा वाईट अवस्थेत होते. पण नेटाने किल्ला लढवून सामना जिंकला.
16 Aug 2021 - 11:48 pm | गुल्लू दादा
आज वेळात वेळ काढून आपले मिपाकर हॅरी पॉटर अन मी निवांत सामना बघितला. खूप मजा आली.
27 Aug 2021 - 4:39 pm | श्रीगुरुजी
तिसरा कसोटी सामना -
भारत ७८/१० व १४/०
इंग्लंड ४३२/१०
28 Aug 2021 - 12:05 am | सौंदाळा
तिसर्या दिवसाखेर भारत २१५/२, अजुन १३९ धावांची पिछाडी
पुजारा खूप दिवसांनी चांगला खेळतोय, कोहलीने पण चांगली साथ दिली.
पण सामना वाचवायचा असेल तर काहीतरी चमत्कारच व्हायला पाहिजे. (ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने केलेले असे चमत्कार)
राहाणे, पंत, जडेजा सगळे नेटाने उभे राहायला पहिजेत.
28 Aug 2021 - 2:52 pm | गामा पैलवान
सौंदाळा,
विराट कोहली या परिस्थितीतही विजयाचाच विचार करीत असणार याची खात्री आहे.
त्याकरिता आजचा ( चौथा ) दिवस पूर्ण व उद्या उपाहारापर्यंत फलंदाजी करावी लागेल. तोवर भारताकडे २५०+ धावांची आघाडी जमलेली असेल. इंग्लंडास २ सत्रांत २५० धावांचं माफक म्हणूनंच आकर्षक आव्हान मिळेल. त्याचा पाठलाग करू जाता भारतास चौथ्या डावात विरलेली खेळपट्टी व उत्तम गोलंदाजी यांच्या आधारे यजमानांना उखडणं जमून जावं.
आ.न.,
-गा.पै.
28 Aug 2021 - 3:04 pm | श्रीगुरुजी
म्हणजे भारताने दुसऱ्या डावात ६००+ धावा करायच्या!
अजिबात शक्य नाही.
28 Aug 2021 - 4:52 pm | गुल्लू दादा
गळती लागलेली आहे.
28 Aug 2021 - 5:08 pm | श्रीगुरुजी
पहिला डाव फक्त ७८ धावात संपल्यानंतर भारत सामना वाचवू शकेल असे कधीच वाटत नव्हते. आता २७६/८. पराभवाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
28 Aug 2021 - 5:42 pm | श्रीगुरुजी
सर्वबाद २७८. १ डाव ७६ धावांनी पराभव.
28 Aug 2021 - 5:45 pm | सौंदाळा
पहिल्या २ कसोटीतील दमदार कामगिरीनंतर खूपच लाजिरवाणा पराभव.
पहिल्या डावातील फलंदाजांची हाराकिरी नडली.
28 Aug 2021 - 5:53 pm | श्रीगुरुजी
आज केवळ पावणेदोन तासात १९.३ षटकात उर्वरीत ८ फलंदाज बाद झाले. इतकी केविलवाणी पडझड होईल अशी अपेक्षा नव्हती.
31 Aug 2021 - 10:17 pm | श्रीगुरुजी
दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेनने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ९३ कसोटीत ४३९ फलंदाज बाद केले आहेत. १२५ एकदिवसीय सामन्यात त्याने १९७ फलंदाज बाद केले आहेत.
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथम फलंदाजी करताना ३८.५ षटकात १ बाद २६९ अशा भक्कम स्थितीत होता. परंतु नंतर स्टेनच्या भेदक माऱ्यापुढे डाव कोसळला व शेवटी ४९ व्या षटकात २९६ धावांवर भारताचे सर्व फलंदाज बाद झाले. डेल स्टेनने ५ बळी घेऊन भारताचे कंबरडे मोडले होते. शेवटी तो सामना आफ्रिकेनेच जिंकला.
२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरूद्ध आफ्रिकेने ४३ षटकात २९७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. परंतु न्यूझीलंडने ते पार करून आफ्रिकेचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. तेव्हा सामना हरल्यानंतर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन यांचे निराश रडवेले चेहरे अजून आठवतात. डेल स्टेनच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात विजयी षटकार मारणारा न्यूझीलंडचा ग्रँट ईलियट हा आफ्रिकेत स्थानिक सामन्यात डेल स्टेन बरोबरच खेळायचा. सामना संपल्यावर त्याने जमिनीवर निराश रडवेल्या अवस्थेत बसलेल्या डेल स्टेनकडे जाऊन हात पुढे करून त्याला उठविले होते. क्रीडाभावनेचे ते उत्कृष्ट उदाहरण होते.
मागील काही वर्षे त्याला टाचेच्या दुखापतीने ग्रासले होते. त्यामुळे तो फार कमी सामन्यात दिसत होता.
अत्यंत आक्रमक गोलंदाजी करणारा व मैदानात कायम उत्साही असणारा डेल स्टेन कायम स्मरणात राहील. ही स्टेनगन आता परत धडधडताना दिसणार नाही हे आपले दुर्दैव.
31 Aug 2021 - 10:46 pm | गुल्लू दादा
नेहमी हसतमुख, प्रसंगी आक्रमक, खिलाडू, वेग आणि स्विंग अजून काय हवंय एका खेळाडूमधे. भावी जीवनासाठी शुभेच्छा डेल.
2 Sep 2021 - 4:03 pm | गुल्लू दादा
सामना सुरू झालाय.
2 Sep 2021 - 4:16 pm | श्रीगुरुजी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांनी दोन बदल केलेत. इशांत शर्मा व शमी ऐवजी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव आत आलेत. जॉस बटलर आणि करन ऐवजी ऑली पोप आणि ख्रिस वोक्स संघात आलेत.
भारत सध्या २८/१ (९). रोहीत वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन ११ धावांवर बाद झाला.
2 Sep 2021 - 4:36 pm | गुल्लू दादा
शमीला बाहेर बसवणे मला नाही आवडलं.
2 Sep 2021 - 4:45 pm | श्रीगुरुजी
दुखापतीमुळे बाहेर आहे. आता ३२/२ (१४.३).
2 Sep 2021 - 5:12 pm | श्रीगुरुजी
३९/३. जडेजा ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय.
2 Sep 2021 - 5:17 pm | नावातकायआहे
28 Aug 2021 - 3:22 pm | गुल्लू दादा
गळती लागलेली आहे.
फारसा फरक नाही. कोहली पुन्हा चाचपडतोय!!
:-)
2 Sep 2021 - 5:40 pm | श्रीगुरुजी
भोजनसमयी ५४/३
2 Sep 2021 - 7:56 pm | श्रीगुरुजी
१०७/५. कोहली अर्धशतक करून बाद.
2 Sep 2021 - 8:12 pm | श्रीगुरुजी
१२२/६, रहाणे गेला.
2 Sep 2021 - 8:19 pm | गुल्लू दादा
188 तरी करा म्हणा...
2 Sep 2021 - 10:51 pm | श्रीगुरुजी
भारत १९०/१०. इंग्लंड ५/२ वरून ५२/२.
2 Sep 2021 - 11:01 pm | नावातकायआहे
मस्त... जो रुट गेलाय. बघायला मजा येतेय !!!!
3 Sep 2021 - 10:28 pm | श्रीगुरुजी
भारत सर्वबाद १९१
इंग्लंड सर्वबाद २९०
दुसरा डाव भारत २६/० (७)
3 Sep 2021 - 11:14 pm | श्रीगुरुजी
दुसऱ्या दिवसाखेर भारत ४३/० (१६). अजून ५६ धावांनी मागे.
4 Sep 2021 - 12:25 am | गुल्लू दादा
हे लेकाचे दिवस संपत यायला लागला की तारून नेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पासून फक्त मैदानावर हजेरी लावून येतात. उद्याचा संपूर्ण दिवस बॅटिंग केली तर आहे काहीतरी खरं.
4 Sep 2021 - 9:18 am | श्रीगुरुजी
भारताने दुसऱ्या डावात किमान ३५० धावा केल्या तरच सामना वाचविण्याची किंवा जिंकण्याची आशा आहे.
4 Sep 2021 - 5:38 pm | गुल्लू दादा
अजून तरी बरं चाललंय सगळं. लंच पर्यंत भारत एक बाद १०८.
4 Sep 2021 - 8:20 pm | गुल्लू दादा
रोहित भाऊंचे दणदणीत शतक. भारत एक बाद १९९.
4 Sep 2021 - 10:40 pm | श्रीगुरुजी
आजचा खेळ संपला. भारत २७०/३. १७१ धावांनी पुढे.
5 Sep 2021 - 1:53 am | गामा पैलवान
एकंदरीत बेत असा दिसतोय की, उद्या अर्ध्या दिवसात १८० टाकून दीड दिवसात ३५० धावा काढायचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवणार. मग चौथ्या डावात यजमानांना २०० च्या आत गुंडाळायचं.
-गा.पै.
5 Sep 2021 - 6:00 pm | श्रीगुरुजी
भोजनसमयी भारत ३१४/६, २१५ धावांनी पुढे. रहाणे पुन्हा अपयशी.
5 Sep 2021 - 7:21 pm | गामा पैलवान
ऋषभ पंत व शार्दूल ठाकूर ११५ ते १२५ षटकांच्या दरम्यान ५ च्या सरासरीने खेळले. याचा दराने खेळंत राहिले तर ४०० ची आघाडी सहज आवाक्यात आहे. मात्र त्याआधी भारताचा डाव लवकर घोषित केला तर इंग्लंडास फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. याउलट उशीर लावला तर इंग्लंड जिंकायचा प्रयत्न न करता सामना अनिर्णीत ठेवण्याचं धोरण अंगिकारू शकतात. त्यामुळे आता कोहलीच्या धूर्तपणाची परीक्षा आहे.
-गा.पै.
5 Sep 2021 - 9:58 pm | श्रीगुरुजी
भारत दुसरा डाव ४६६/१०.
विजयासाठी इंग्लंडला १२६ षटकांत ३६८ धावा हव्या. भारत आता हरणार नाही.