स्निग्ध पिठलं चिकन

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in पाककृती
30 Jan 2025 - 5:15 pm

नमस्कार मित्रहो. बऱ्याच दिवसांनी एक ओपन एंडेड पाककृती करायला वेळ मिळाला. त्यात अजून काही मॉडिफिकेशन करून तुम्ही ती पुढे इंप्रोवाइज करावी ही नम्र विनंती.

नाव जे पटकन सुचले ते दिले आहे. ही पाककृती तशी अतिशय सोपी आणि जगभर या ना त्या प्रकारे केली जाते. तिखट नसल्याने मुलांना आवडेल. कमकुवत हृदयाच्या लोकांनी पुढचे वाचू नये.

साहित्य:

१. चिकन (बोनलेस असेल तर चिकन स्टॉक साठी चिकन स्टॉकची पावडर लागेल. कोंबडीच असेल तर चिकन स्टॉक वेगळा करता येईल. परंतु वेगळादेखील करायचा नसेल तरी काही हरकत नाही. एकत्र केले तरी बिघडत नाही)

२. मशरूम (नसतील तरी चालतील मात्र असतील तर लाजवाब लागतं. याला पर्याय म्हणून गोडसर शिमला मिरचीचे काप घेता येतील. )

३. हिरवे कोवळे वाटाणे (सगळीकडे आजकाल फ्रोजन वाटाणे मिळतात. ताजे मिळाल्यास उत्तमच. याला पर्याय म्हणजे थंडीच्या दिवसात करत असाल तर सोनुलं घेऊ शकता, अजून इम्प्रोवाइज करायचे असल्यास कोवळी तूर सुद्धा चालेल. इनफॅक्ट कोवळी तूर चांगली लागेल. थोडक्यात गोडसर कोवळे दाणे/बिया घ्या)

४. एक कांदा

५. गाजर. लहान लहान क्यूब करून.

६. साय. अमूल साय मिळाली तर बघा. नसेल मिळत तर घरची किंचित आंबवलेली ताजी साय हवी. शक्यतो पॅकेज्ड सायच घ्यावी. चिकनच्या पाव ते निम्मे

७. लोणी (हे लोणी म्हणजे बटर होय. कृष्णलोणी (कृष्णाने चोरलेली ताक काढलेली लोणी, काळी नव्हे) नको). अमूलचे छोटे क्यूब मिळतात.

८. जायफळ पूड/ किंवा किसता येईल असे जायफळ

९. थोडी काळी मिरी वाटून/ पूड

१०. पीठ. (शक्यतो थोडा मैदा घेतला जातो. मैदा थोडासाच घ्यावा. याला ज्वारीचे पीठ हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. कुळीथाचे पीठ सुद्धा वापरुन बघायला काही हरकत नाही. पिठलं पातळ ठेवायचे असल्याने जास्त पीठ नको. अंदाजाने घ्यावे. बेसन नको. त्याने चिकनची चव जाऊ शकते. नुकतेच सोललेले चिकन त्यावरचे उरलेले बारीक पिसे वगैरे काढताना ज्वारीचे पीठ भिजवून आख्खे असे त्वचेसहित भाजतात. तेव्हा ज्वारीचे माइल्ड पीठ चांगले आणि हलके असे मला तरी वाटते. मी सध्या थोडा मैदाच वापरला.

११. पाणी (स्टॉक नसेल तर स्टॉक करायला पाणी)

=====

१. चिकन स्टॉक उकळायला ठेवा.. त्यात साय घालून एक उकळी काढा. मग गाजर घाला. मग चिकन घाला. ( चिकन स्टॉक नसेल तर नुसतेच पाणी + साय उकली काढून घ्यावे. गाजर आणि त्यात सगळे चिकन उकळायला टाकावे, . एक उकळी आल्यावर कांदा सोलून उभा मधोमध चिरा आणि त्या दोन मोठ्या फोडी जशाच्या तशा घाला. कांदा सुटा होऊ देऊ नका शिजताना त्यामुळे जास्त ढवळू नका. कांदा सोलला नाही तरी चालेल.

२. मसाले भुरभुरून घ्या. जायफळ आणि काळी मिरी.

३. हे मिश्रण बऱ्यापैकी शिजत आले आल्यावर कांदा काढून टाका. आच कमी करा. हळू हळू शिजू द्या. क्रीम आटू द्या.

४. बाजूलाच दुसऱ्या भांड्यात (मोठ्या भांड्यात) कमी आचेवर भरपूर बटर वितळवून घ्या. त्यात पीठ एकजीव करून घ्या. सतत ढवळून एकजीव करा. आच मंद ते कमी ठेवा. याला roux (रु) असेही म्हणतात.

५. वरचे मिश्रण रू मधे ओता. किंवा रु मिश्रणात टाका. आता सगळे एकत्र नीट ढवळून घ्या. रू च्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत.

६. आता लवकर शिजणाऱ्या भाज्या किंवा थोड्या कच्च्या राहिल्या तरी चालतील अशा भाज्या टाका. म्हणजे मशरूम, वाटाणे.

७. सगळा प्रकार शिजू द्या. मिश्रण रू शिजेल तसे घट्ट होईल. म्हणजेच रूचे पिठले होईल. पिठल्याचा झुणका करू नका. प्रकरण पळीवाढ ठेवा.

===

गरम वाफाळत्या भातावर खा.

lok

चिकन

प्रतिक्रिया

कॉमी's picture

30 Jan 2025 - 5:35 pm | कॉमी

छान.

वामन देशमुख's picture

30 Jan 2025 - 6:37 pm | वामन देशमुख

फोटो अत्यंत जीवघेणा देखणा आला आहे त्यासाठी *****

किंचित विस्कळीत वाटली तरीही पाकृ आवडली.

---

बाकी, सध्या शाकाहारी असल्यामुळे "ही पाकृ अंडं घालून करता येईल का" असा मिपा-अभिजात प्रश्न विचारण्याचीही सोय नाहीय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2025 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन येऊ द्या..

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2025 - 9:20 am | चौथा कोनाडा

व्वा.. भारी आहे.

शानबा५१२'s picture

2 Feb 2025 - 9:23 am | शानबा५१२

जापनीस चिकन ब्रॉथ पन बनवुन बघा.....तसेच एकदा मच्छी मसाला (खातु मसाले) वापरुन त्यात लालसर रस्स्याचे चिकन बन्वा, थोडे घट्ट, पुअधच्या वेळी ही रेसीपी दाखवा प्लीज. वरील रेसीपी खरोखर छान आहे पण तिखट कमी असावी.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 Feb 2025 - 2:44 am | हणमंतअण्णा शंकर...

डुकराचा मस्त ब्रॉथ आणि तोन्कोत्सु रामेन हे स्वर्गीय लागते.

ज्याने कुणी रामेन शोधले आहे त्याला सलाम!!!