दुसऱ्या महायुद्धात सांकेतिक कुट दळणवळणासाठी, जर्मन सैन्याने "एनिग्मा " नामक यंत्र बनवलेले असते,
ज्याच्या कुट /सांकेतिक भाषेची उकल करणे अशक्य आहे असा समज असतो (आजच्या भाषेत त्याला "हॅक" करणे अशक्य आहे, असा समज असतो)
यावर आधारित एक सत्यकथा सुंदर सिनेमा " द इमिटेशन गेम" म्हणून आला होता...अॅलन ट्युरिंग नामक ब्रिटिश गणित तज्ज्ञ , याची उकल यशस्वीरीत्या करतो ..
परंतु ब्रिटिशांना जरी जर्मनांच्या प्रत्येक सांकेतिक दळणवळणाची उकल करून, प्रतिडावपेच टाकणे शक्य असते... तरी
जर्मन लोकांना त्यांची "एनिग्मा " हॅक झाली आहे , हे कळू नये म्हणून, ब्रिटिश फक्त काही महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच याचा फायद्यासाठी वापर करतात. मग भले काही ठिकाणी आपले आप्त स्वकीय जरी बळी पडले तर पडू देतात. जर्मन लोकांना गाफील ठेवण्यात धूर्त इंग्रज यशस्वी होतात.
हॅकिंग जरी यशस्वी झालं तरी , सरसकट सर्व ठिकाणी हुकमी एक्का ब्रिटिश वापरत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष सुचना
कुणी या लेखाचा, बादरायण संबंध , कधीही "हॅक" होऊ शकणार नाही, अश्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच "इ. व्ही. एम." शी लावू नये.
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.
आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.
कळावे , लोभ असावा.
प्रतिक्रिया
12 Dec 2024 - 11:19 am | मुक्त विहारि
माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक...
12 Dec 2024 - 11:36 am | वामन देशमुख
द् इमिटेशन् गेम् या सिनेमाबद्धल माहीत नव्हतं (नाहीतरी अस्मादिकाला सिनेमाबद्धल फारसं काही कुठं माहीत असतं म्हणा!); सवडीने पाहीन. सिनेमाची ओळख आवडली पण खूपच संक्षिप्त लिहिल्यासारखं वाटलं.
---
ट्यूरिन्ग् टेस्ट् चे अॅलन् ट्यूरिन्ग् ते हेच का?
12 Dec 2024 - 11:43 am | आंद्रे वडापाव
होय
12 Dec 2024 - 12:28 pm | मुक्त विहारि
थोडक्यात ओळख करून दिली तरी चालते.
शिवाय, आजकाल गुगलबाबा लगेच मदतीला येतात.
काही वर्षांपूर्वी, एका मित्रा बरोबर, Charlie Chaplin ह्या विषयावर चर्चा करत असताना, तो सहजपणे म्हणाला की, Harold Lloyd आणि Buster Keaton हे पण उत्तम कलाकार होते.
अस्मादिकांना, "Harold Lloyd आणि Buster Keaton" बद्दल इतपत माहिती पुरेशी होती. बाकीचे उत्खनन आपले आपण केले.
घटा घटाचे रूप आगळे, त्यामूळे, तुमच्या मताचा आदर आहेच...
12 Dec 2024 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.
अगदी अगदी!आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.
जगात दोनच संस्था प्रामाणिक आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट!12 Dec 2024 - 1:27 pm | मुक्त विहारि
प्रगती आहे...
अजून, सीबीआय, न्यायालये हे राहिले... पण, कदाचित लवकरच तुमची ह्यांना पण मान्यता असेल.
सकारात्मक भूमिका स्वीकारता आली की, जीवनातले बरेचसे प्रश्न सुटतात. त्या मानाने, हे तुमच्या फार लवकर लक्षात आले, हे उत्तम...
12 Dec 2024 - 1:30 pm | अमरेंद्र बाहुबली
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे येऊन तुम्ही पो टाकला नाहीत.
12 Dec 2024 - 1:33 pm | जावा फुल स्टॅक
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे येऊन तुम्ही पो टाकला नाहीत.
12 Dec 2024 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली
खऱ्या आयडीने यायला घाबरता?
12 Dec 2024 - 2:05 pm | मुक्त विहारि
त्यांचे मनोरंजक प्रतिसाद वाचून छान करमणुक होते. इतके मनोरंजन तर, त्यांचे लाडके नेते, परमपुज्य राहूल गांधी पण करत नाहीत....
12 Dec 2024 - 2:02 pm | मुक्त विहारि
आपण, खरोखरच लोकशाही मानता का?
कारण, लोकशाहीच्या व्याख्ये नुसार, प्रत्येकाला मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे.
आता हेच बघा ना, तुमचे प्रतिसाद कितीही मनोरंजक असले तरी, मी कधीच तुम्हाला , प्रतिसाद टाकू नका, असे म्हटले नाही.
12 Dec 2024 - 4:17 pm | आंद्रे वडापाव
12 Dec 2024 - 5:38 pm | मुक्त विहारि
आणि
१४०-१४५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशांत, EVM शिवाय पर्याय नाही.
16 Dec 2024 - 7:35 pm | सुबोध खरे
१४० कोटी लोकांच्या देशात साधारण ९० कोटी लोक मतदार असतील. यासाठी निदान १०० कोटी मतपत्रिका छापायला लागतील.
एवढ्या लोकसंख्येच्या देशाला हि मते मोजण्यासाठी किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा खर्च आणि मुख्य म्हणजे वेळ याचा हिशेब कुणी केलाय का?
एके काळी (संगणक येण्याच्या अगोदर) बँकेचे व्यवहार असेच कागदोपत्री होत असत.
त्यामुळे किती कालापव्ययआणि मनस्ताप होत असे याचा अनुभव घेतलेले माझ्यासारखे अनेक लोक आहेत.
आज सुद्धा संगणकव्यवस्था १०० टक्के सुरक्षित आहे का? सायबर फ्रॉड रोजच ऐकायला येतात
असे असताना यापैकी एकही माणूस परत संगणक सोडून आपले खाते परत त्याच जुन्या व्यवस्थेत न्यावे असे का म्हणत नाही?
रेल्वेची आरक्षण प्रणाली परत कागदोपत्री जात नाही. तात्काळ किंवा आरक्षण प्रणालीत दलालांची लुडबुड चालू असल्याचे आपल्याला ऐकिवात येते.
किंवा
कोणताही राजकीय पक्ष परत रेल्वे किंवा बँकेचे व्यवहार कागदोपत्री न्यावे असे म्हणत नाहीत.
असे का?
माझ्या कडे एक गारफिल्ड चे कार्टून होते त्यात लिहिलेले होते कि जगात कोणतीही चूक अशी नाही कि जिचे खापर दुसऱ्यावर फोडता येणार नाही.
सध्याच्या विरोधी पक्षांची स्थिती अशीच आहे
16 Dec 2024 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली
किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा खर्च आणि मुख्य म्हणजे वेळ याचा हिशेब कुणी केलाय का
अदानीवरील लाखो कोटी टनांच्या कर्जमाफीरुपी दौलतजाद्या पुढे लोकशाही वाचवण्यासाठीचा खर्च किरकोळ असावा नाही?17 Dec 2024 - 7:59 am | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
च्यामारी, विषय EVM बद्दल आणि आता ह्यात अदानी कशाला?
17 Dec 2024 - 10:28 am | सुबोध खरे
भुजबळांच्या डोक्यात अदानी, मोदी इ व्ही एम, घटनेची पायमल्ली, हुकूमशाही, कोमट पाणी, मिंधे, गद्दार, संघ, मनुवादी इ शब्दांची गर्दी झाल्याने त्यांची एकंदर विचारशक्ती नीट काम करत नाही.
पण त्याच वेळेस त्यांचे हात कायम शिवशिवत असतात
त्यामुळे कोणते तरी एक दोन शब्द बाहेर पडतात आणि मग ते काहीही टंकत राहतात.
कुठे त्यांच्या नादाला लागताय
17 Dec 2024 - 9:58 am | आंद्रे वडापाव
"इ व्ही एम" कधीच हॅक होऊ शकत नाही ... हे एक एक्स्ट्रीम टोक झालं ..
आणि
"कागदावर निवडणुका घ्या" हे दुसरे एक्स्ट्रीम टोक झालं ..
आपल्याला मध्यम मार्गाचा विचार करायला हवा..
प्रत्येक मतदाराने , "इ व्ही एम" बटन दाबल्यावर , आपले अपेक्षित चिन्ह व्ही व्ही पॅट मध्ये आलंय याची खातर जमा करणे त्या नागरिकाचे कर्तव्य आहे.
त्याच प्रमाणे, उमेदवाराने मागणी केल्यास, व्ही व्ही पॅट चिठ्ठयांचे प्रत्यक्ष फिजिकल मतमोजणी करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.
फक्त उमेदवार एका पक्षाचा असेल तर त्याला दुसरी वागणूक आणि दुसऱ्या पक्षाला दुसरी वागणूक असे नको..
17 Dec 2024 - 10:24 am | सुबोध खरे
प्रत्येक मतदाराने , "इ व्ही एम" बटन दाबल्यावर , आपले अपेक्षित चिन्ह व्ही व्ही पॅट मध्ये आलंय याची खातर जमा करणे त्या नागरिकाचे कर्तव्य आहे.
आपल्या उमेदवाराचे बटन दाबल्यावर त्याला जाणारे मत vvpat च्या खिडकीत १० सेकंद पर्यंत दिसत राहतं आणि तो कागद आत मध्ये पडल्यावरच आपण बूथ सोडायचा असतं.
नंतर रडारड करण्यात काय हशील आहे?
मी प्रत्येक वेळेस याची खात्री करूनच मग बूथ च्या बाहेर येतो.
महाराष्ट्रात 1,440 VVPATs verified आणि सर्वच्या सर्व निकाल तंतोतंत जुळले
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/1440-vvpat...
17 Dec 2024 - 10:26 am | अमरेंद्र बाहुबली
निवडणूक आयोग हा मतदारांसाठी नाही तर भाजपसाठी काम करतो हे मतदारांनी लक्षात घेतले तर सोपे होईल.
17 Dec 2024 - 10:30 am | सुबोध खरे
ते आम्ही केंव्हाच लक्षात घेतलें आहे
त्यामुळे २०२९च नव्हे तर २०३४ आणि २०३९ मध्ये पण भाजपच निवडून येणार आहे.
तेंव्हा आता पुढची १५ वर्षे तुमच्या नशिबात रडगाणेच आलेले आहे.
तुम्हाला रडायला पाट कुठे मांडायचा?
आणि उदबत्ती मोगऱ्याची हवी कि गुलाब?
17 Dec 2024 - 1:31 pm | अमरेंद्र बाहुबली
इतका कॉन्फिडन्स इव्हीएम सेटिंग वर?
17 Dec 2024 - 1:52 pm | श्रीगुरुजी
पप्पू, पिंकी, उठा, आठा, संरा आणि त्यांचे तुमच्यासारखे समर्थक यांच्या अगाध बुद्धीवर त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे.
ज्या खुळखुळ्यातून आवाज सुद्धा येत नाही असे राफेल, अदानी, जात्याधारीत जनगणना, राखीव जागा, मागासवर्गीयांवर अन्याय, घटना बदलणार, मतयंत्रात लबाडी, निवडणूक आयोग असे खुळखुळे कितीही वाजविले तरी शष्प लाभ नाही.
वाजवा अजून. वाजवा रे वाजवा.
17 Dec 2024 - 2:08 pm | मुक्त विहारि
त्यामूळे असेच चालणार.
बरं ह्यांच्या मतांची चिरफाड केली की आपले पण प्रतिसाद गायब होतात...
17 Dec 2024 - 2:03 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद... ना शेंडा ना बुडखा....
ना तुम्हाला संविधानाचा इतिहास माहीत नाही आणि ते किती वेळा आणि कुणी बदलले ते पण तुम्हाला माहीत नाही.
आणि सध्याच्या काळात, मनुस्मृती ही कधीच कालबाह्य झाली आहे.
असो,
तुम्ही असेच मनोरंजक प्रतिसाद लिहीत जा...
17 Dec 2024 - 2:34 pm | श्रीगुरुजी
पप्पू इतरवेळी पत्रकारात इतर मागासवर्गीय किती, राजपत्रित अधिकाऱ्यात इतर मागासवर्गीय किती अशी डोकी मोजतो. पण वायनाडमध्ये इतर मागासवर्गीयाला उमेदवारी न देता स्वतःच्या बहिणीला उमेदवारी दिली. उद्या वड्रासुद्धा खासदार होईल. त्यापूर्वी नेहरू, फिरोज घँडी, राजीव गांधी, संजय गांधी खासदार होते. म्हणजे एकाच कुटुंबात ७ जण.
पवारांच्या घराण्यातही आतापर्यंत ७ जणांना उमेदवारी पवारांनी दिली. त्यात सध्या ३ खासदार व २ आमदार आहेत. उर्वरीत २ पडले.
त्यांची तळी उचलणाऱ्या मूर्खांना हे अजूनही समजत नाही की हे फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी आहेत आणि हे मूर्ख फक्त घोषणा देण्यासाठी आणि प्रचारासाठी वापरून फेकून दिले जातात.
17 Dec 2024 - 3:16 pm | अमरेंद्र बाहुबली
फडणवीसांच्या घरातही ३ आमदार होतेच की तरी लोक त्यांची तळी उचलतात!
17 Dec 2024 - 3:49 pm | श्रीगुरुजी
ते सुद्धा मूर्ख आहेत आणि ते मूर्ख आहेत म्हणून उठा समर्थक, पवार समर्थक शहाणे ठरत नाहीत. ते मूर्खच राहतात.
अंतर एवढंच आहे की देफ समर्थक एप्रिलच्या उन्हात दिवसभर देफच्या घराबाहेर जमून उपाशीपोटी घोषणा देत उभे रहात नाहीत. पण उठा समर्थक . . .
17 Dec 2024 - 5:05 pm | मुक्त विहारि
राष्ट्रवादी काँग्रेस, पवार यांची ....
काँग्रेस , गांधी यांची ....
उबाठा गट, ठाकरे यांची...
राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर, भाजप मात्र कुठल्याच घराण्याला बांधील नाही... ना मुंडे, ना महाजन, ना राणे, ना गडकरी, ना मोदी, ना अडवाणी, ना बाजपेयी, ना देसाई...
असो,
उद्या फडणवीस भाजप सोडून गेले तरी भाजपला आणि आम्हाला काही फरक पडत नाही. दुसरा कुणीतरी नेता ती जागा भरून काढेल आणि जोपर्यंत भाजप हिंदू हितवादी भूमिका घेत आहे तोपर्यंत आम्ही काही भाजप सोडणार नाही.
विचारसरणी आणि घराणेशाही, ह्यात हाच मूलभूत फरक आहे.
.
17 Dec 2024 - 9:28 pm | कर्नलतपस्वी
हे जेव्हां कळेल तेव्हां लोकशाही वयस्क झाली असे म्हणावे लागेल.
17 Dec 2024 - 2:06 pm | जावा फुल स्टॅक
धन्यवाद भावा.
आपल्या भावना हे लोक समजून घेणार नाहीतच.
बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिले म्हणून आपण वेशीबाहेरुन गावात आलो. आता लढाई आहे ती संपूर्ण गाव जिंकण्याची. शिका संघटित व्हा संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र घेऊन आपण आपल्या संविधानाच्या मार्गाने यांना प्रत्युत्तर देत राहू या.
तू एकटा नाहीस भावा, आपले सर्व दीन दलित पतित बांधव सोबत आहेत.
जय संविधान!
17 Dec 2024 - 2:26 pm | श्रीगुरुजी
आंबेडकर शिका म्हणजे शिक्षित व्हा असे म्हणाले होते. शिक्षण घेतलं पण त्याचा उपयोग स्वयंप्रगतीपेक्षा कोणत्यातरी मूर्ख नेत्यामागे बैलासारखे जाणे आणि कालबाह्य मुद्दे घेऊन समाजमाध्यमांवर एका विशिष्ट जातीवर गरळ ओकणे एवढ्यासाठीच केला जातोय. असा दुरूपयोग आंबेडकरांना अपेक्षित नसावा.
17 Dec 2024 - 5:14 pm | मुक्त विहारि
बाबा साहेब आंबेडकर यांची, समान नागरी कायदा हीच भूमिका होती.... त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?
17 Dec 2024 - 11:12 am | कर्नलतपस्वी
हरदासची कथा मूळपदावर .
कुठल्याही विषयावर लिहा,धाग्याचे काश्मीर करणारचं,हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे..
17 Dec 2024 - 11:28 am | कंजूस
राजीव गांधींनी म्हटले होते की एकवीसव्या शतकात कंपूटर सर्व करणार आणि कागदाचा वापर शून्य होणार. तसंच झालं असतं पण डिजिटल गोष्टी पुसल्या जातात. म्हणून कागद वापरायचा. तर काय दोन्ही वापरले जातात.
17 Dec 2024 - 12:06 pm | आंद्रे वडापाव
आपल्याला सगळ्या १५० कोटी लोकांना विश्वासात घेऊन पुढं जायचे आहे.
तसं बघायला गेलो तर मी , सध्याच्या इ व्ही एम तंत्रज्ञाना ऐवजी,
"ब्लॉकचेन" बेस्ड , "इ व्ही एम" वापरा असंही म्हणून सध्याच्या "इ व्ही एम" ला बोल लावू शकलो असतो. परंतु
मुळ मुद्दा "तंत्रज्ञान" नाही, तर "देशात परस्पर अविश्वास चे वातावरण आहे" , "केंद्रीय संस्थांच्या तटस्थेबद्दल अविश्वास चे वातावरण आहे" ... हा मूळ मुद्द्दा आहे..
त्याला ऍड्रेस केले गेले पाहिजे ...
17 Dec 2024 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याबद्दल आम्ही चकार शब्द बोलणार नाही!
17 Dec 2024 - 2:29 pm | टर्मीनेटर
'आपण किती मागासलेल्या विचारांचे आहोत' ह्याचे प्रदर्शन करणे हे त्यावर ज्यांची उपजीविका चालते त्यांची गरज असू शकते आणि त्यावर आक्षेपही नाही, कारण त्यासाठी कोणी देहविक्रयही करतात...
पण 'आपण तांत्रिकदृष्ट्या किती मागासलेले आहोत' ह्याचे प्रदर्शन करणे बहुसंख्यकांना मान्य नसते कारण ते 'तंत्रज्ञान आणि व्यवहारज्ञान' ह्या दोन्ही अंगानी पुढारलेले असतात (कारण ते खरोखरचे पुरोगामी असतात, शाहू-फुलेंच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणाऱ्या आणि लोकांना मूर्ख बनवणाऱ्या राजकारण्यांच्या नादी लागलेले बावळट प्रतिगामी नसतात) त्यामुळे ते असल्या निरर्थक विषयांवर 'च'(चू)कार शब्द बोलत नाहीत...😂
"घोडा घास से दोस्ती करेगा, तो खायेगा क्या?" हे सत्यवचन असल्याने तुमचे चालू द्या...
बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे तुमच्या सारख्यांच्या) खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी झाडणारे आंद्रे हुशार आहेत हे पुनःश्च मान्य 😀
17 Dec 2024 - 2:38 pm | आंद्रे वडापाव
17 Dec 2024 - 2:56 pm | टर्मीनेटर
Lol...
Yup! You did it successfully once again my friend 😀
17 Dec 2024 - 2:50 pm | टर्मीनेटर
इथे नुसत्या 'आंद्रे' ऐवजी 'आंद्रे गुरुजी' असे वाचावे....
त्यांच्या ९९% राजकीय विचारांशी सहमती नसली तरी उर्वरित १% आणि आर्थिक विषयांवर बऱ्यापैकी (जवळपास ५०%) सहमती असल्याने त्यांच्याविषयी कायमच आदरभाव वाटत आला आहे!
17 Dec 2024 - 8:48 pm | धर्मराजमुटके
टॉयलेट पेपर आणि बॅलेट पेपर असेपर्यंत मा. राजीव गांधीजींचे स्वप्न पुरे होणार नाही.
तरी त्यातल्या त्यात आजकालची लहान मुलं पेपरवर सकाळ्ची आन्हिके उरकत नाहीत. त्यांनी त्यांच्यापुरती डिजीटल क्रांती केली आहे असं म्हणायला हरकत नाही.
17 Dec 2024 - 12:49 pm | सुबोध खरे
देशात परस्पर अविश्वास चे वातावरण आहे
निवडणूक हरली कि अविश्वास जास्त वाढतो आणि निवडणूक जिंकली कि विश्वास वाढतो.
सध्या ओमर अब्दुल्ला आणि तृणमूल काँग्रेसने इ व्ही एम वर संपूर्ण विश्वास दाखवलेला आहे.
EVMs can’t be a problem only when you lose elections’: Omar Abdullah takes dig at Congress
After Omar, TMC’s Abhishek Banerjee trashes INDIA bloc ally Congress’s charge of EVM hacking
असं आहे एकंदर.
बाकी १५० कोटी लोकांना विश्वासात घेऊन पुढे जायचं आहे.
इतकं भोंगळ आणि भंपक समाजवादी विधान दुसरं नसेल
पण त्यातील अर्ध्यांची तोंडं मागे आहेत त्या मुळे त्यांच्या दृष्टीने पुढे म्हणजे तुमच्या दृष्टीने मागे आहे.
मग जायचं कुठे आणि कसं?
UPA २ मध्ये हीच स्थिती होती.(पॉलिसी पॅरालीसीस) धोरण लकवा.
बाकी चालू द्या
17 Dec 2024 - 5:15 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
17 Dec 2024 - 6:28 pm | जावा फुल स्टॅक
या धाग्यावर यापुढे मी येणार नाही.
17 Dec 2024 - 8:45 pm | धर्मराजमुटके
असे लिहून वेशीवरुनच माघारी निघाला व्हय ?
सुधारणेचा गाडा पुढे नेता नाही आला तरी चालेल पण निदान मागे तरी नेऊ नका असं बाबांनी सांगितलेलं इसरला व्हय ?
17 Dec 2024 - 8:51 pm | धर्मराजमुटके
"एनिग्मा " चं काय घेऊन बसला लेखक, इकडे ईव्हीएम ने लोकांची डोकीसुद्धा हॅक केली आहेत.
17 Dec 2024 - 9:44 pm | धर्मराजमुटके
ईव्हीएम हॅक करणारांना बॅलेट पेपर हॅक करता येणार नाही अशा भोळ्या भाबडया समजुतीत वावरणार्या लोकांबद्दल ड्वाळे पानावले.
17 Dec 2024 - 11:31 pm | वामन देशमुख
तसं नाही हो. त्यांना इवीएम् हॅक करण्याएवढी अक्कल नाही, त्यांची अक्कल पेपर बॅलेट हॅक करण्यापुरतीच आहे. म्हणून ते पेपर बॅलेट ची मागणी करताहेत.
17 Dec 2024 - 11:37 pm | अमरेंद्र बाहुबली
इव्हीएम हॅक केलंय एस बोलून भाजप समर्थक मुद्दाम गोलपोस्ट बदलतात.
इव्हीएम हॅक नाही तर म्यानूपुलेट केले जाते पण ह्यावर बोलतील तर शप्पथ!
17 Dec 2024 - 11:47 pm | वामन देशमुख
मॅनिप्युलेट्
लिहा दहा वेळा.
18 Dec 2024 - 6:05 am | मुक्त विहारि
"इव्हीएम हॅक नाही तर म्यानूपुलेट केले जाते."
हे कसे शक्य आहे? हे जरा सांगता का?
बाय द वे?
वक्फ बोर्डाच्या बाबतीत आपले मत काय आहे? हे अद्याप तरी तुम्ही स्पष्ट केले नाही.....
17 Dec 2024 - 11:34 pm | वामन देशमुख
बाकी, हा धागा अनेकदा उघडण्याच्या नादात "हॅकिंग एनिग्मा" हे चुकून "हॅकिंग एनिमा" असे वाचल्या गेले.
;-)
---
आम्ही लहानपणापासूनच वाह्यात; काय करता, जाऊ द्या.
- (वाह्यात) द्येस्मुक् राव
18 Dec 2024 - 10:47 am | आंद्रे वडापाव
हा मग् कायं झालं ?? एनिमा तर् एनिमा ..
ह्यात काहीच वाह्यातपणा नाही ..
"बस्ती" एक कर्म आहे ज्याने आपला ऑरा सात्विक होतो ...