वाहुनी तू रहावे

रोहन जगताप's picture
रोहन जगताप in जे न देखे रवी...
8 Dec 2024 - 11:10 am

नसे सोय बोलून सत्यात काही
जगाला हवे ते असत्यात राही
उगा मौन राखून विश्वा पहावे
वहात्या जगा वाहुनी तू रहावे

घळे आसवांतून पाषाण लेणी
मुकी साचताना उरी दैव देणी
अबोलाच बोलून गाईल गाणी
स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी

झरे ज्ञान मर्मातले होत ओळी
जरी सांडले वेचले घेत झोळी
शिदोरीच वाटेत ही चालवावी
उपाशी जिवा तेवढी चाखवावी

निसर्गास वाटेल जेही मनाशी
अनाहूत साकार होई जगाशी
जुळल्यास योग कृतीही करावी
नसे अन्यथा शांतता बाळगावी

अव्यक्तवृत्तबद्धकविता

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

9 Dec 2024 - 3:58 pm | विवेकपटाईत

कविता आवडली

रोहन जगताप's picture

9 Dec 2024 - 6:31 pm | रोहन जगताप

आभारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2024 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

रोहन जगताप's picture

9 Dec 2024 - 6:33 pm | रोहन जगताप

नक्कीच लिहित राहीन, आभारी आहे!

अथांग आकाश's picture

9 Dec 2024 - 4:25 pm | अथांग आकाश

मनाचे श्लोक वाचल्यासारखे वाटले!
कविता आवडली!!

रोहन जगताप's picture

9 Dec 2024 - 6:39 pm | रोहन जगताप

आपल्या बहुमोल प्रतिक्रियेसाठी अगदी मनःपूर्वक आभार!

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2024 - 9:30 pm | चौथा कोनाडा

छान रचना.... आवडली !

निसर्गास वाटेल जेही मनाशी
अनाहूत साकार होई जगाशी
जुळल्यास योग कृतीही करावी
नसे अन्यथा शांतता बाळगावी

शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते...
नायतं .. शांत रहायचं

रोहन जगताप's picture

10 Dec 2024 - 11:22 am | रोहन जगताप

अगदी बरोबर, मनःपूर्वक आभारी आहे!