देणाऱ्याचे हात घ्यावे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Dec 2024 - 12:21 pm

लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेफाम गर्दीचा बेहाल
थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट...

...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं
गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी
चट्दिशी उठून
वाहत्या गर्दीच्या
काठावर गेली
एक नेहमीसारखा खाली बसला
अन् दुसरा ऐटीत उभा राहून
स्वतःच्या भिकेतले नाणे
बसलेल्याच्या ओंजळीत टाकून
निर्व्याज हसू लागला
मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल..

...विंदांच्या "घेता" कवितेच्या
शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी
गर्दीच्या महापुरातही
अनवधानाने जिवंत ठेवणारी
ती लेकरं
पुन्हा दिसलीच नाहीत कधी

मुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

5 Dec 2024 - 12:34 pm | चांदणे संदीप

काय सुरेख लिहिले आहे. मस्त.

सं - दी - प

कर्नलतपस्वी's picture

5 Dec 2024 - 12:53 pm | कर्नलतपस्वी

स्वप्ने सर्वांचीच असतात
कुणाची काळाच्या ओघात .....
तर कुणाची सत्यात उतरतात.

सुंदर.

चौथा कोनाडा's picture

6 Dec 2024 - 7:47 pm | चौथा कोनाडा

व्वा ... सुंदरच !