साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म. माटे हे ते लेखक असावेत . त्यांची काही पुस्तकेही मी मागवलीत पण त्यात तो लेख नाही.
तरी मित्रांनो हि उकल करून माझ्या डोक्यात वळवळणाऱ्या किड्यास शांत करावे कारण गेल्या महिन्यापासून मी त्या मागे आहे.
प्रतिक्रिया
19 Aug 2024 - 10:58 am | गवि
श्री म माटेच.
सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे.
दुवा:
https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt
19 Aug 2024 - 11:35 am | भम्पक
बाबोव .....
एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी....
काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली....
कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..
19 Aug 2024 - 11:55 am | गवि
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन.
आता मी एक प्रश्न टाकतो.
याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य.
हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही.
* बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.
19 Aug 2024 - 12:00 pm | गवि
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय.
बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.
19 Aug 2024 - 12:01 pm | भम्पक
19 Aug 2024 - 12:06 pm | गवि
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.