पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा...
संपले का रंग तुमचे
का कुंचले मोडले
किंतान सोडून तुम्हीं
अभासी चित्र का काढले?
शब्द गुंत्यात भंजाळले ,
टकांळता कंटाळले का?
रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून
रंगीत चित्र कसे साधले?
अभिजात कलागुण तुमचा
का खुंटीवर टांगला?
देवप्रज्ञा सोडून आपण
कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला?
___________________________________
कल्पनेत मन दंगले
कृबू ने ते साकारले
लेवूनी शुन्य,एक साज
अभासी चित्र ते रंगले
शुष्क शब्दांच्या उड्या
कल्पना सागरातल्या बुड्या
रंग सारे दाटले तरीही
नाही उमटल्या भावनांच्या खुणा.
जाणतो सारे तरीही
नवोन्मेषी गीत मी गातो
रात्रीच्या स्वप्नात माझ्या
उद्याचा उष:काल पाहतो
.
प्रतिक्रिया
18 Jun 2024 - 12:25 pm | प्रचेतस
एकदम मस्त कर्नलसाहेब
18 Jun 2024 - 12:26 pm | कंजूस
कुह्राडीचा दांडा होतास काळ.
18 Jun 2024 - 5:54 pm | चित्रगुप्त
प्रयोगशीलता आणि स्वयंशिस्त यातून कलेची आणखी उच्च्चतर पातळी गाठली जाऊ शकते.
18 Jun 2024 - 5:52 pm | चित्रगुप्त
कविता खूपच आवडली.
अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला?
देवप्रज्ञा सोडून आपण कृप्रज्ञा सवे खेळ का मांडला?
--- देवप्रज्ञा आणि कृबु या दोन्हीच्या संयोगातून आणखीही उत्कृष्ट कलानिर्मिती होऊ शकते, सध्या तोच प्रयत्न आहे.
19 Jun 2024 - 10:36 am | कर्नलतपस्वी
मनापासून धन्यवाद.
19 Jun 2024 - 1:54 pm | अथांग आकाश
प्रसंगोचीत कविता आवडल्याच :)
कृ बु चे आगमन झाल्यावर सहित्य आणि कला विश्वातील जाणकारांनी वर्तवलेली भीती खरी ठरताना दिसत आहे!!