स्वतःची अणू अस्त्रं भारताने स्वतःच निर्माण केली.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 May 2024 - 10:32 am

“आपला भारत देश आता प्रगतीच्या
मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती
करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.”
हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान
सांगत होतो.
आणि मी पूढे म्हणालो,
“भारतात खूप संशोधन संस्था निर्माण केल्या पाहिजेत.TIFR आणि BARC सारख्या संस्था श्री.टाटा आणि डॉ.भाभा ह्यांच्या सहाय्याने सत्तर बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झाल्या. स्वतःच्या हिम्मतीवर अणू अस्त्रांवर अभ्यास करून स्वतःची अणू अस्त्रं भारताने निर्माण केली.

भारताने, पाकिस्ताना सारखी इतर देशांकडून माहिती चोरून ही अस्त्रं मिळवली नाहीत.आपल्या शास्त्रज्ञांना त्याबद्दल शाबासकी देऊ तेव्हढी थोडी होईल.
आपल्या देशात विज्ञान शास्त्र शिकलेली खूप तरूण/तरूणीं आजमितीस उपलब्ध आहेत.
विज्ञानाचं महत्त्व त्यांना उमजलं
आहे असं दिसतं
विज्ञान हे ज्ञानाचं प्रवेश द्वार आहे.
असं मला वाटतं. भाऊसाहेब तुमचं
विज्ञानावषयी काय मत आहे?”
असा सरळ प्रश्न मी त्यांना केला.

ते मला म्हणाले,
“आणखी विस्तृत दृष्टीने सांगायचं
झाल्यास - स्वतःला,आपल्या देशाला, आपल्या नात्यांना, आपल्या विचारांना, भावनांना समजून घेण्याचं प्रवेश द्वार, हे विज्ञान आहे असं मला वाटतं.
माझा विश्वास आहे की शिकणं हे एक शास्त्र आहे आणि विज्ञान शास्त्र शिकणं हे आपल्याला आणि आपल्या क्षमतांना एकत्रित करण्यास
मदत करतं.

अज्ञाताची जाणीव, आपल्याला विज्ञानापासून ते कलेपर्यंतच्या सर्व सर्जनशील क्रियाकलापांमध्ये प्रेरित करत असते.

वैज्ञानिक पद्धतीद्वारे ज्ञानाचा शोध, एका मोठ्या उद्देशासाठी, जीवनातील विविध पैलूंना एकमेकांच्या विरूद्ध तोलण्यास मदत करतो.

व्यक्तींना एकत्र आणून, ​​एक नेटवर्क तयार करता येतं.त्यामुळे,वैयक्तिक बुद्धीमत्ता एकत्रित करून एकूण कार्य अधिक सामर्थ्यशाली बनवता येतं.

असं असताना मनुष्याचं नैतिक वर्तन, हे पालनपोषण आणि सामाजिक बंधन यावर आधारित असायला पाहिजे.
कारण माणूस म्हणून, आपण सर्वांनी एकमेकांवर अवलंबून राहून
सहकार्य करून,अद्वितीय वातावरण तयार करण्यासाठी झटलं पाहिजे.
ज्ञानासाठी विज्ञान शास्त्र शिकल्या शिवाय पऱ्याय नाही.असं मला वाटतं.”

क्षणभर प्रो. देसाई भारताच्या तरूण/
तरूणींच्या मनातलंच सांगत आहेत असं मला वाटलं.

तंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

नठ्यारा's picture

18 May 2024 - 1:30 pm | नठ्यारा

सामंतकाका,

हे असले शब्दांचे बुडबुडे सोडायचे असतील तर अवश्य सोडा. पण सोबत चुंबकद्रायूशास्त्रातील तुमच्या संशोधनावर जरा प्रकाश टाका. काये की शाब्दिक बुडबुड्यांना जरा वजन प्राप्त होईल.

-नाठाळ नठ्या

लेखातील विचारांचे अभिसरण, उद्धरण आणि उद्वाहन यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध झालेल्या विचारधारेसहित मानववंशशास्त्र आणि मानवी संसाधने या क्षेत्रांतील अनेक समकालीन विचारशालांचे परिशीलन होऊन भूमितीय श्रेणीने वाढलेल्या बौद्धिक क्रियाकलापांनी अनुप्रस्थ महासंयोजी पिंड विस्थापित झाले आहे.

हे सर्व लेखात चपखल पकडले आहे.

भागो's picture

18 May 2024 - 3:20 pm | भागो

गवि
ह्या वाक्यावर जर आपला म्हणजे तुमचा कॉपीराईट नसेल तर हे वाक्य मी इतरत्र वापरावे म्हणतो.

कसला डोंबलाचा कॉपीराईट? खुशाल वापरा.

पण त्यातून सार्वजनिक अभिसरण, अनुसंधान आणि अन्वेषण या त्रिसूत्रीचे संतुलन साधते आहे ना यावर लक्ष ठेवा म्हणजे झाले.

अनन्त्_यात्री's picture

18 May 2024 - 6:04 pm | अनन्त्_यात्री

पण त्रिसूत्रीचे संतुलन साधण्याच्या व्यामिश्र प्रक्रियेवर काॅपीराईट घेतला असण्याची संभाव्यता नक्कीच वाटते. कसे?

नठ्यारा's picture

18 May 2024 - 5:55 pm | नठ्यारा

याचं इंग्रजीत भाषांतर करयचं आव्हान मी अलेक्सास देतो.
-ना.न.

भागो's picture

18 May 2024 - 9:17 pm | भागो

म्हणजे गंगा पुन्हा हिमालयालाडे जाणार!

म्हणजे गंगा पुन्हा हिमालयाकडे जाणार!

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2024 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले

भारताच्या तरूण/तरूणींच्या मनातलंच सांगत आहेत

भारतातले तरुण तरुणी इन्स्टाग्राम वर रील्स बनवत आहेत हो =))))
पोरं गाड्या , ट्रिप्स , छानछौकीपणाचे फोटो टाकत आहेत तर पोरी त्यांच्या "अ‍ॅसेट्स" दाखवुन व्युव्ह आणि लाईक चे फार्मिंग करत आहेत. =))))

कांदा लिंबू's picture

18 May 2024 - 7:49 pm | कांदा लिंबू

सदर स्फूट लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ वैज्ञानिक परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो अणू ते ब्रह्माण्ड अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या बल्लवाचार्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या वेच्याशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही.

ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, अणूविज्ञानविषयाचे वैज्ञानिक तरीही आकलनसुलभ असे विवेचन आणि कृष्णार्जुनासम मित्र-संवादातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल.

- साहित्यसमीक्षक कांदा लिंबू

कर्नलतपस्वी's picture

18 May 2024 - 8:01 pm | कर्नलतपस्वी

माझ्यासारख्या हिंराठी(हिन्दी+मराठी) भाषी साठी आपले प्रतिसाद डोक्यावरून जात आहेत. टक्कल पडल्याने जास्तच वेगाने घरंगळतात.

मराठी शब्दकोशाची लिंक द्याल काय?

अमर विश्वास's picture

18 May 2024 - 9:28 pm | अमर विश्वास

जात होतो वाटेनं मी तोऱ्यात जी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात ..

त्याने माझ्या दारात बाँम्ब कि हो टाकला
हात नका लाऊ माझ्या देशाला जी देशाला