ती :
नेहमीच राहतोस एकाकी ,भग्न,
चेहर्यावर शोधत प्रश्नचिन्ह,
साचवत असतोस सदा एकांत !
तो :
कुणी नसे मज, मला एकटेपण
कुणासाठी मी नसे साजण
विश्वच सारे मजसाठी दुष्मन
ती :
का आणिलेस स्वतःस एकाकीपण
मी आहे तुझीच साजण
विश्वात कोण तुज दुष्मन ?
तो :
कुणासही नसे माझे भान
घरी-दारी नसे मज मान
कुणीच ना म्हणे मज छान !
ती (नियती) :
तू कुणाचे ठेवलेस भान
घरी दारी दिला कुणास मान ?
कुणास तू म्हटलास छान ?
प्रत्येकास आपलं मान,
प्रेमाचं कर तु दान,
क्षमेसाठी धर कान !
तो :
उघडले आता माझे कान !
उमगली मज हे गुढ सान
अहंभाव हा पेटवितो रान
प्रतिक्रिया
12 May 2009 - 3:40 pm | अनंता
अहंकाराचे झापड प्रत्येकाचेच कळत-नकळत नुकसान करत असते.
ज्याला समजले, त्याने जग जिंकले!!
12 May 2009 - 8:01 pm | क्रान्ति
अहंकार आत्मीयतेला नेहमीच मारकठरतो. वास्तवदर्शी कविता.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
http://www.agnisakha.blogspot.com
12 May 2009 - 3:50 pm | पर्नल नेने मराठे
लाइफ इ़ज नोट सो ऱोझी :(
चुचु
12 May 2009 - 8:14 pm | प्राजु
आवडली कविता.
अहं भाव.. गळून पडलाच पाहिजे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 May 2009 - 8:26 pm | सँडी
तू कुणाचे ठेवलेस भान
घरी दारी दिला कुणास मान ?
कुणास तू म्हटलास छान ?
एक नंबर! मस्त!
-संदीप.
काय'द्याच बोला.
13 May 2009 - 11:08 am | जागु
अनंता, क्रांती, मराठे, प्राजू, सँडी धन्यवाद.
13 May 2009 - 12:28 pm | पाषाणभेद
"अहंभाव हा पेटवितो रान"
नो इगो.
म
स्त.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)