गाभा:
Youtube जेव्हा ही "सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा , यांची संगत नको रे बाप्पा " हे गाणे बघतो तेव्हा वाटते की फार नाही ३० वर्षांपूर्वी सामान्य जनता किती प्रगल्भ होती !
आजच्या फुसक्या भावनोन्मादाच्या जमान्यात जिथे जातीचे नाव घेणे ही पाप मानवे लागेल....( पण सगळ्या सरकारी कामांसाठी मात्र जात लिहीणे बंधनकारक !) असे गाणे कुणी बनवूच शकणार नाही. कुणी बनवलेच तर त्याचा मराठी सलमान रश्दीच होईल.
खरंच समाज इतका असहिष्णू का झाला असावा? ह्या गाण्यात जी म्हणवापरलीये ती कशी उत्पन्न झाली असेल? म्हणी सार्वकालीन सत्य असतात का? काही अनुभव आहे का कुणाला ह्या म्हणीचा?
प्रतिक्रिया
19 Apr 2024 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली
मिपावरील कुळकर्ण्यांनी हजेरी लावावी.
20 Apr 2024 - 9:59 am | चौकस२१२
इथे तुम्हाला कुलकर्णी हाच उल्लेख का करावास वाटला ? सोनार या बद्दल का नाही लिहावेसे वाटले
हे जातीयवादी आहे यातच सगळे आले मिपा संपादक हे असे जातीयवादी चालते का ?
19 Apr 2024 - 10:26 pm | कर्नलतपस्वी
सरासर बत्तमिजी आहे. चाळीस वर्षापुर्वीच्या गाण्याचा संदर्भ देऊन किती कोती मानसिकता आहे हे दाखवून दिले आहे. मिपावर सौहार्द पुर्ण वातावरण ढवळून काढण्याचा कट दिसतो आहे.
संबधित उक्ती स्वातंत्र्य पुर्व किबहुना त्या आगोदर पासून प्रचलित होती. बलुतेदारी संपुष्टात आल्यानंतर हि उक्ती काळाच्या पडद्याआड गेली. लेखक आणी प्रथम प्रतिसादकाने बलूतेदारी ही समाजव्यवस्था बघीतली सुद्धा नाही याची मला खात्री आहे.
अबा या आय डी ला मिपावर प्रतिबंध होता तरीही मी विनंती केली त्याला मान देवून संपादकांनी या आय डी ला पुन्नरूजिवीत केले. मला माझी चुक लक्षात आली.
संपादक, मिपा मालकांना विनंती, चुक पदरात घ्या व या आय डी नां त्यांची योग्य जागा दाखवून द्या.
मिपा एक असे संस्थळ आहे जेथे मनमोकळे पणाने व्यक्त होता येते. चांगले मराठी साहित्य, पककृती, कला, कविता,विवीध चर्चा वाचायला मिळतात, आरोग्य ,अर्थ विज्ञान सारख्या गहन विषयावरील माहीती कळते. भटकंती मधून अनेक न बघीतलेल्या, बघू शकत नसलेल्या चांगल्या ठिकाणी मानस भेट देता येते.
राजकीय विषयावर मतमतांतर असल्याने खडाजंगी होणे स्वाभाविक आहे पण सभ्यतेच्या मर्यादा पाळून चांगली चर्चा होऊ शकते.
अशा धाग्यावर न व्यक्त होणे पळपुटे पणा वाटल्याने मी माझे परखड मत टंकले आहे. अतिशय निकृष्ट आणी खोडसाळ धागा उडवून टाकवा ही विनंती.
19 Apr 2024 - 10:38 pm | अमरेंद्र बाहुबली
कर्नल साहेब धागा कुणी लिहिला ते तर पाहा. अ बा कुठून आला मध्येच?? :(
कमाल आहे.
20 Apr 2024 - 10:00 am | चौकस२१२
सहमत
20 Apr 2024 - 10:01 am | चौकस२१२
सहमत कर्नाल तपस्वी यांच्याशी
19 Apr 2024 - 10:40 pm | अमरेंद्र बाहुबली
माझा प्रतिसादच ह्या अश्या जातीवाचक लिहिणाऱ्या लेखकाला लोकांनी चार बोल लावण्यासाठी हजर रहावे ह्यासाठि आहे.
20 Apr 2024 - 6:55 am | कर्नलतपस्वी
अ.बा. सविस्तर प्रतिसाद दिला असता तर कदाचित मत वेगळे झाले असते.
कायप्पावर टंकले आहे, कदाचित पटेल.
क लो आ
19 Apr 2024 - 10:46 pm | अमरेंद्र बाहुबली
आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही घेणं देण नसताना मला बोल लावले जाताहेत. अंधभक्तांचं समजू शकतो, मानसिक अस्थिर असतात. पण कर्नल साहेबांनीही माझ्या बद्दल अस लिहावं??? कर्नल साहेबानी? हे मला लागलंय. मी एक आठवड्यासाठी मिपासन्यास घेतोय. मधल्या काळात मी मीपावर लॉगिन नसेन नी कुठली प्रतिक्रियाही देनार नाही. :(
काळजी घ्या मिपाकरानो. भेटूयात. पुढच्या शनिवारी २७ तारखेला. चतुर्थीच्या दिवशी. :(
19 Apr 2024 - 10:52 pm | कांदा लिंबू
कायमचाच संन्यास घ्या, पुन्हा नाही आलात तर चांगलंच.
20 Apr 2024 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली
20 Apr 2024 - 10:27 am | अहिरावण
क्या बात है !!
आता एवढ्या काळात जो आयडी अचानक सक्रिय होऊन भाजप, संघ, हिंदू, ब्राह्मण, गाय, राम, कॄष्ण, परंपरा, थोडक्यात जे काही भारतीय आहे त्याला दुषणे देऊ लागला की समजा तो अबांचा अजून एक आयडी... किंवा अजून काही आयड्या !!
तुम्ही असे करा आता ४ जूनलाच या !!
20 Apr 2024 - 12:03 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप संघाचं ठिकाय. ते आहेच दूषणे देण्या लायक. पण हिंदू, ब्राह्मण, गाय, राम, कॄष्ण, परंपरा, थोडक्यात जे काही भारतीय आहे त्याला मी कधी दूषणे दिली?? डू आय डी आहे म्हणून काहीही काळ्याए टाकणार का अहिरावण?? खऱ्या आयडीने समोर यायची हिमत नाही नी चल्लेक चर्चेत भाग घ्यायला.
20 Apr 2024 - 12:01 pm | अमरेंद्र बाहुबली
कर्नल साहेबांशी व्यनित बोलणे झालेय. नी कर्नल साहेब माझ्या आदर्श स्थानी असल्याने मी त्यांच्या शब्दा बाहेर नाही. त्यामुळे मी माझा आठवड्याचा मिपासन्यास मागे घेतोय.
20 Apr 2024 - 1:05 pm | कर्नलतपस्वी
मी एक तद्दन सर्व सामान्य माणूस आहे. मला तुमच्या मन मखरात बसवू नका,यापुढे जाऊन मी म्हणेन कुणालाच बसवू नका. कारण जै आदर्शवादी चित्र तुमच्या मन:पटलावर तयार होते त्याला जर तडा गेला तर भ्रमनिरास होईल.
प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो (सुमारे 427 बीसीई ते सुमारे 347 बीसीई) हे तत्त्वज्ञानातील आदर्शवादाचे जनक, सर्वात मूलभूतपणे, आदर्शवाद हा भौतिक, नैसर्गिक जगाचा भाग नसलेल्या, परंतु मनात घर केलेल्या कल्पनांचा उगम आहे.जेव्हा तुम्ही एखाद्याला आदर्श समजत असता तेव्हा तुम्ही त्याच्यामधे परिपूर्णतेचे स्वप्न पाहता. साध्या व थोडक्या शब्दात आदर्शवाद म्हणजे,
1.belief in or pursuance of ideals.
2. the tendency to represent things in their ideal forms, rather than as they are.
अशा परिस्थितीत जेव्हां तुमच्या मनात असलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी प्रतिमा तुम्हांला दिसेल तेव्हां अपेक्षाभंग होईल कारण मुळ प्रतिमा ही वेगळीच असते.
मग आदर्शवाद/आदर्श मानावे किवां नाही हा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या मते कुणालाच आदर्श मानून नये. अगदी आईवडील सुद्धा याला अपवाद नाही . "
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधूर ते ते", असे सर्व उचलावे,आत्मसात करावे. मला जे आदर्श वाटते ते दुसर्याला वाटेलच असे काही नाही. आदर्श/आदर्शवादाच्या भिन्न विचारधाराच वाद निर्माण करतात. त्यामुळे सर्वांच्या सुविचारांचा आदर हाच सरतेशेवटी आदर्शवाद.
वर म्हणल्या प्रमाणे मी सामान्य माणूस असल्याने तुमच्या मनातील प्रतिमेला तडा जाऊ शकतो.व एवढी मोठी जबाबदारी मला पेलवणार नाही.
माझ्याबद्दल चागंले शब्द लिहिल्याबद्दल धन्यवाद.
20 Apr 2024 - 4:20 pm | भागो
कर्नल साहेब
वरील प्रतिसाद वाचला, Notwithstanding तुम्ही माझे आदर्श आहात.
20 Apr 2024 - 4:37 am | रामचंद्र
यात काही फारसं मनाला लागल्यासारखं वाटत नाही. बलुतेदारीत उडदामाजी काळं गोरं असणारच. अस्सल गावच्या मानसिकतेनुसार थोडाबहुत अनुभव आला की सरसकट जातीवर शिक्कामोर्तब केलं जाणार. सोन्याचा भाव मोठा, त्यात जरा कुठं सोनारानं हात मारला तरी ते त्याचवेळी नेमकं पकडणं सर्वसामान्यांना अवघड. त्यात सोनार म्हणजे नाही म्हटलं तरी खाऊन पिऊन बऱ्यापैकी. त्यामुळं त्याला बोल लावण्याची मानसिकता स्वाभाविकच. आता कपड्याचा संबंध शिंप्याशी अन् कपडे म्हणजे प्रत्येकाच्याच रोजच्या व्यवहारातली बाब. आता आपण दिलेलं कापड आणि मापात नीट वा आखूड शिवलेला कपडा आणि त्याच कापडाचे शिंप्याच्या घरातल्यांच्या अंगावरचे कपडे असं गाव बघतच असणार. उदाहरण असेल एखादंदुसरंच पण मग मारा शिक्का समस्त शिंपी जातीवर. आता राहिले कुलकर्णी. आपलं घर, जमीन या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बाबी. त्यावरच्या भांडणांत कैक पिढ्या पिचून गेल्या हा तर इतिहास आहे. गाव कामगार म्हणा किंवा वतनदार म्हणा काही कुलकर्णीमंडळींनी चिरीमिरीच्या बदल्यात फेरफार केले होतेच हे नाकारण्यात अर्थ नाही. म्हणून मग सोनार, शिंपी यांच्या जोडीला कुलकर्णी अप्पा आले! अस्सल मराठमोळ्या भाषेत कुणालाच सोडलेलं नाही. घिसाडघाई, चांभारचौकशी, धेडगुजरी असे शब्द आपल्या कानावर नक्कीच पडलेले असणार. बरं हा आपल्या भाषेचाच रोखठोक आणि रांगडा बाणा आहे, त्याबद्दल आपल्याला कानकोंडलं व्हायचं काही कारण नाही.
20 Apr 2024 - 10:38 am | dadabhau
पटले एकदम ....हे असेच काहीसे logic असणार ह्या म्हणीमागे ....
20 Apr 2024 - 7:02 am | कर्नलतपस्वी
यात काही फारसं मनाला लागल्यासारखं वाटत नाही. बलुतेदारीत उडदामाजी काळं गोरं असणारच.
रामचंद्र भौ,तुम्ही सुता सारखे सरळ आहात. वाचन भरपूर व पराकाष्टेचा वाणी वर संयम म्हणून तुम्हांला असे वाटले.
काही जण सुता वरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतात ,तेच खटकते.
उडिद च राहीले नाही तर काळे गोरे कशाला चिवडायचे?
मी एव्हढा ज्ञानी नाही पण तेल आणी तेलाची धार नक्कीच ओळखू शकतो.
आपल्या शांत गंभीर व्यक्तीमत्वाला सलाम.
20 Apr 2024 - 10:01 am | सुबोध खरे
कर्नल साहेब
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
20 Apr 2024 - 12:09 pm | अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही.
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- डॉ. श्री. खरे.
20 Apr 2024 - 10:40 am | कंजूस
म्हणी सार्वकालीन सत्य असतात का?
सर्व निवडणूक जातींवरच चालते.
पंढरपूर यात्रेत काय असतं? सगळ्यांचे गाडे वेगळे.
20 Apr 2024 - 11:22 am | रामचंद्र
ही म्हण इतर अनेक म्हणींप्रमाणे तत्कालीन गावगाड्यातील लोकव्यवहारावर आधारित दिसते. यातला संदर्भ तत्कालीन पेशांशी असणार, आज त्या आडनावांचा त्या पेशांशी तितका घनिष्ठ संबंध उरलेला नाही, उदा. कुलकर्णी हे वतन. मात्र परंपरागत उपजीविकेचे साधन म्हणून सोनार किंवा शिंपीकाम करणारे काही प्रमाणात तरी अजून नक्की आढळतात. पण गावगाड्यातले लोकजीवन आता पहिल्यासारखे राहिले नसल्याने तशी ही म्हण आजच्या वस्तुस्थितीशी सुसंगत राहिली नाही असं वाटतं.
20 Apr 2024 - 4:14 pm | भागो
ही म्हण आजच्या वस्तुस्थितीशी सुसंगत राहिली नाही असं वाटतं.>>
काप गेले नि भोकं राहिलि.
बलुतेदार पद्धत गेली पण जाती राहील्या.
कॉलेज प्रवेशाच्या वेली, नोकरीत, छोकरीत, निवडणुकांच्या मोसमात जाती तरारून वर येतात. तेव्हा कोंबडे झाकण्याने काय होणार?
एकदा एका मान्यवर नेत्याने मतदारांना सल्ला दिला होता. "पैसा, धोतर, साडी, रेडीओ जे मिळतय ते घ्या पण मत मात्र आपल्या पसंतीच्या उमेदवाराला द्या."
तर EC त्याच्यावर नाराज झाली. आणि खटला केला.
20 Apr 2024 - 11:29 am | रामचंद्र
क्वचित् काणो भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता ।
विरलदन्तो क्वचिन्मूर्खो खल्वाटो निर्धनः क्वचित् ॥
हा श्लोकही असाच. यातल्या किती गोष्टी आज प्रत्ययाला येताना दिसतात?
20 Apr 2024 - 2:12 pm | कर्नलतपस्वी
काण्या,बोळक्या,टकल्या व नाचगाणी करणाऱ्या स्त्रीची टिंगल,टवाळी करण्यासाठी हा श्लोक लिहीला असावा.
कृपया हल्के घ्या.
20 Apr 2024 - 12:41 pm | अहिरावण
कर्नल तपस्वींचा जाहिर निषेध !!! :)
20 Apr 2024 - 5:34 pm | विअर्ड विक्स
धागा वाचून करमणूक झाली. लिंक उघडून फार कमी लोकांनी हे गाणे पूर्ण ऐकले असेल. हे युगल गीत आहे. सोनार व चमकी ( प्रियकर नि प्रेयसि यातील लाडिक संवाद आहे ). मराठीत अशा अनेक म्हणी आहेत यांत जात आणण्यापेक्षा त्या त्या व्यवसायातल्या असणाऱया वृत्तीशी निगडित आहे .
उदा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे ( यांत क्षत्रिय समाजाचा दुरान्वये संबंध नाही ) / भटाला दिली ओसरी नि भट हातपाय पसरी ( ह्या नावाचे एक नाटक सुद्धा आले होते ) ( बोट मिळाल्यावर हात पकडणे असा अर्थ यात ब्राह्मणाचा संबंध नाही )
मराठीत अजून एक म्हण आहे "सुतावरून स्वर्ग गाठणे" तसे आता यापुढे गीतावरून जात काढणे " अशी वापरता येईल ( ह. घ्या. )
थोड्या वर्षांपूर्वी एक हिंदी गाणे आले होते " हवन करेंगे " फार प्रसिद्ध सुद्धा झाले होते तेव्हा कोणी त्यावर जातीवाचक टीका केल्याचे स्मरणात नाही . त्यामुळे माझे एकच म्हणणे - म्हणीच्या शब्दांपेक्षा गर्भितार्थ महत्वाचा !
माझा एक मित्र म्हणायचा " You see what you want to see ". कोणाला उत्सव म्हणजे उन्माद वाटतात तर काही लोकांना उन्माद म्हणजेच उत्सव वाटतो .
बाजी निवडणुकीचा माहौल आहे , काही अभ्यासपूर्ण विश्लेषण वाचायला मिळेल या संस्थळावर वाचायला मिळेल या अपेक्षेत. आज पहिला टप्पा झाला . मिपा मराठी सण साजरे करते तसा ह्या लोकशाहीचा सण विशेषांक काढावा हि सूचना