ऱोबर्ट वड्रांच्या नवीनतम मुलाखती

माहितगार's picture
माहितगार in राजकारण
12 Apr 2024 - 11:56 am

कुटूंबांनीच सत्ता गाजवायच्या तर सरंजामशाही आणि राजेशाही काय वाईट आणि लोकशाहीचे नाटक खेळणे गरजेचे आहे का? मी मागच्या दाराने कुटूंबशाही राबवणे लोक्शाही तत्वांचा अपमान आहे. कोणत्याही राजकीय पक्षातल्या कुटूंबशाहीचे तसूभरही समर्थन करत नाही. पण फार प्रचंडमोठा समाज कुटूंबशाहीचे समर्थक आहे याची कल्पना आहे. असो.

गेल्या आठवड्याभरापासून समस्त काँग्रेसीयांचे जावई (किंवा जे काही नाते असेल ते) मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखती माध्यमातून पेरल्या जात आहेत असे दिसते.

दुवे:

१) इंडीया टिव्ही
२) एबिपी न्यूज
३) न्युज २४ हि अधिक प्रदीर्घ आहे पण वेळ असल्यास हि मुलाखत राजकीय विश्लेषकांनी पहाणे अधिक सयुक्तिक असेल असे वाटते.

तुमच्या ऐकण्यात अजून मुलाखती आल्यास प्रतिसादातून आवर्जून नमूद कराव्यात.

शेअर मार्केट मध्ये इंटर्नल ट्रेडींग विषयी कायदे असतात तसे जमिन व्यवहाराबाबत आज पावेतो फारसे नसावेत याचा लाभ सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना होत असावा असा माझा व्यक्तिगत कयास आहे. आताच त्याची का आठवण यावी हे जाणकारास सांगणे न लगे. जेव्हा गोष्टी काय'द्याचे नुसार असतात तेव्हा सोज्वळपणे वावरणे यास वावगे म्हणावे की नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत मुल्यांचा प्रश्न असावा. असो.

मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखतींतून मला जाणवलेले मुद्दे १) आलेय आंगावर तर घ्या शिंगावर रंगवून अशा स्वरूपाचे परिवार वादाचे समर्थन उघडपणे रेटणे (सध्या नेपाळमध्येही राजेशाही परत आणण्यासाठी आंदोलन चालू आहे तेव्हा हे कदाचित भारतीय उपमहाद्वीपाच्या हस्तरेषांवर कोरलेले असेल?) २) राहुल गांधींच्या पंत्प्रधानपदाच्या उमेदवारीचे उघड सुतोवाच करणे ३) अधिक राजकीय भूमिकांसाठी नजिकच्या भविष्यात प्रियांका गांधी आणि स्वतः रॉबर्ट वड्राही गुडघ्यास बाशींग बांधून तयार असल्याचे सुतोवाच करणे ४) स्व कुटूंब कतृत्व आणि विरोधी पक्षांकडून होणार्‍या अनाठायी अन्यायाचे बखान करणे. ५) त्यांच्याही आजूबाजूला चापलूसांचा बर्‍यापैकी वावर असावा

मला जाणवलेली शैली मुलाखती केवळ पेरलेल्याच नाही तर तत्पुर्वी काही थोडे फार सराव झाले असावेत अर्थात राहुल गांधींचे ट्यूटरींग जाणवते तेवढे वड्रांचे चटकन लक्षात येत नाही. घरच्या वावरात इंग्रजीचा वावर अधिक असल्यामुळे का काय कोण जाणे मनातल्या मनात हिंदीत अनुवाद करत बोलल्यामुळे माध्ये मध्ये अडखळत असावेत कि विचार करत बोलल्यामुळे हे इतर श्रोत्यांनी ठरवावे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यसाठी अनेक आभार
* उत्तरदायित्वास नकार लागू

प्रतिक्रिया

म्हण अशी पाहीजे का?

'झुलं आली अंगावर तर घे शिंगही रंगवून'

अहिरावण's picture

12 Apr 2024 - 1:59 pm | अहिरावण

कुठे ह्या वराहमुखीच्या मुलाखती पहाता?

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 8:27 pm | अमरेंद्र बाहुबली

गेल्या आठवड्याभरापासून समस्त काँग्रेसीयांचे जावई (किंवा जे काही नाते असेल ते) मा. रॉबर्ट वड्रा साहेब >>>> ह्या हिशेबाने कौल बाई समस्त भाजपवासियांची काय म्हटली पाहिजे?? लिहिताना थोडा संयम बाळगावा, आपण भक्त असलो तरी आपल्या आपली भक्ती दाबून धरावी.
टीप- मी काँग्रेस समर्थक नसलो तरी घाणेरडे संघ संस्कार जिथे येणार तिथे लिहिणार.

कोणत्याही राजकीय पक्षातल्या कुटूंबशाहीचे तसूभरही समर्थन करत नाही.

कुटूंबांनीच सत्ता गाजवायच्या तर सरंजामशाही आणि राजेशाही काय वाईट आणि लोकशाहीचे नाटक खेळणे गरजेचे आहे का? मी मागच्या दाराने कुटूंबशाही राबवणे लोक्शाही तत्वांचा अपमान आहे.

कुटूंबशाहीचे समर्थन मूळात लोकशाहीचा अपमान म्हणून घाणेरडे आहे (घाणेरडे शब्द चांगला वाटतो का हा उपयोगच खटकतो आणि स्विकार्य टिकेला विनाकारण लक्ष्य करतो?) . (कुणीही व्यक्तिगतपणे घेऊ नका) तुम्ही म्हणता त्या कौल बाई कोण माहित नाही पण भारतातील सरंजामशाही प्रिव्ही पर्सेस बंद करण्यात स्वतः इंदिरा गांधी पुढे होत्या लाल बहादूर शास्त्रींनी कसेल त्यांची जमीन राबवली ते संघ विचाराचे होते का? कुटूंब शाहीचा विरोध करणे संघ विचाराचेच कशावरून असते आणि संघ विचाराच्या लोकांना टिका करण्याचा अधिकार नसतो किंवा कसे.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही टीका करा अथवा नका करू पण वर जी घाणेरडी गरळ ओकुन संघ संस्कार दाखवलेत ना ते बंद करा.

माहितगार's picture

12 Apr 2024 - 9:01 pm | माहितगार

माझ्या मनात आणि शब्दात काही घाणेरडे नाही. (तुमच्या आणि इतर कुणाच्या मनात काही घाणेरडे येत असेल तर टनभर डीटर्जंट घेऊन धुऊन ते दूर करावे हि नम्र विनंती) घराणेशाहीचा जावल्य तिरस्कार आहे आणि संघ काय कोणत्याही खर्‍याखुर्‍या लोकशाहीवाद्याला तिटकारा वाटेल एवढे घराणेशाहीचे प्रस्थ मग कोणत्याही पक्षातील असो ते खर्‍याखुर्‍या लोकशाहीवाद्यांना तुमच्या शब्दात भयंकर ओकार्‍या येणारे का वाटू नये?

विवेकपटाईत's picture

12 Apr 2024 - 10:18 pm | विवेकपटाईत

रेहान राजीव गांधी ह२०२४ नंतर भारताचा भावी प्रधानमंत्री होणार.

माहितगार's picture

12 Apr 2024 - 10:28 pm | माहितगार

भरपूर शक्यता आहे. मोदी समर्थकांना अंधभक्त म्हणणारी खुपशी मंडळी घराणेशाहीच्या अंधभक्तीचा स्वतः कळस करतात ते त्यांना दिसेल अशी शक्यता नाही कारण अंधभक्त अंधभक्त असतात कोणत्या का बाजूचे असेनात.

सर टोबी's picture

12 Apr 2024 - 10:25 pm | सर टोबी

हि संकल्पना कुणाला का तिरस्करणीय वाटावी याचा काही अंदाज येत नाहीय. अनुमान काढणे हि जी मानवी चेतना आहे त्याच्या मुळाशी काहीतरी पारंपरिक ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणजे बघा परिवारवादातून जे नेते निपजतात ते देशाचे वाटोळे करतात असं जर अनुमान काढायचं असेल तर त्यासाठी काही वाईट नेत्यांची निपज होणं आवश्यक आहे.

देशात एका परिवाराचे जे तीन पंतप्रधान झाले आहेत त्यांचं कितीही नकारात्मक मानसिकतेतून विश्लेषण केले तरीही पायाभूत सुविधा, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि आधुनिक जगात भारतीयांची ओळख निर्माण करण्याच्या त्यांच्या योगदानाचे महत्व कुणीही नाकारू शकत नाही. याउलट प्रस्थापितांना धक्का देऊन जे सध्या सत्तेत विराजमान आहेत त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि त्यामुळे राजकारण्यांना काहीतरी शेक्षणिक पात्रतेची अट असावी का हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय.

माहितगार's picture

12 Apr 2024 - 10:40 pm | माहितगार

सगळे राजे वाईट थोडीच असतात? छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चांगले राजे असतातच ना नाही कोण म्हणतय. पण एकाच घराण्य्च्या पुत्रांना राजा करत राहण्याच्या मर्यादा असतात हे पेशव्यांच्या घराण्याचा लय असो वा थायलंडचा सध्याचा राजा कसे वागतो ते असो. सरंजामशाहीचे वाईट परिणाम नको म्हणून सरंजामशाही बुडवायची आणि त्याच घराण्याने स्वतःची सरंजामशाही राबवायची? स्वातंत्र्यपुर्व काँग्रेसने जन समर्थनच जनतेच्या राज्याच्या लोक्शाहीच्या आणि संरंजामशाही मिटवण्याच्या आश्वासनावर मिळवले याचे विस्मरण करावयाचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय त्यांच्याच घराण्याने त्याग केला माझेही घराणे काँग्रेसमधलेच आमच्या पुर्वजांनी त्याग नाही केला? महात्मा गांधी लाल बहादुर शास्त्रींच्या पुढच्या पिढ्या ते माझ्या पर्यंत सत्ता वाटून देताय? बसतो आम्ही सुद्धा संसदेत रॉबर्ट वड्रांच्या मांडीला मांडी लावून. १४० कोटी जनतेत सर्वसामान्य जिवन जगलेली दुसरी काबील नेते मंडळी मिळत नाहीत?

ज्या घराणेशाहीमुळे तुम्हाला एवढा मस्तकशूळ होतोय ते नेते व्यवस्थित निवडणूक लढवून सत्तेत आले होते. आणि यात कोणताही मानभावीपणा नाहीय. इंदिरा गांधी जेव्हा पायउतार झाल्या तेव्हा जगात सर्वत्र रक्तविहीन क्रांती करू शकणारी लोकशाही असा भारतीय लोकशाहीचा गौरव केला गेला. याउलट मोदी समर्थक जेव्हा मोदी लोकशाही पध्दतीने निवडून आले आहेत असं म्हणतात तेव्हा त्यांच्या कितीतरी दुष्कृत्यांकडे त्या समर्थकांनी डोळे झाक केलेली असते. निवडणुकीवरील वारेमाप खर्च, सरकारी यंत्रणा राबवणे, शहीद सैनिकांच्या बलिदानाचे भांडवल करणे, जी निवडणूक प्रक्रिया अगदी दहा वर्षांपूर्वी एखाद दोन आठवड्यात, कागदी मतांच्या वापराने पूर्ण करता यायची ती आता दीड पावणे दोन महिने चालते. शेवटचा टप्पा पूर्ण केल्यानंतरही काही दिवसांनी मतमोजणी सुरु होते. यात कुणालाच काळंबेरं दिसत नाही?

शेवटी सत्ता राबवण्याचे पर्याय आपसूक चांगले किंवा वाईट नसतात. सत्ता राबवणाऱ्यांची नियत महत्वाची असते.

घराणेशाही तिच्या तथाकथित चांगल्या वाईट फायद्यांसहीत घराणेशाही नसलेल्यांच्या समस्त त्रुटी स्विकारूनही समा दाम दंड भेदाने समूळ मोडून काढली पाहीजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 10:53 pm | अमरेंद्र बाहुबली

देशात एका परिवाराचे जे तीन पंतप्रधान झाले आहेत त्यांचं कितीही नकारात्मक मानसिकतेतून विश्लेषण केले तरीही पायाभूत सुविधा, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि आधुनिक जगात भारतीयांची ओळख निर्माण करण्याच्या त्यांच्या योगदानाचे महत्व कुणीही नाकारू शकत नाही.
सहमत. ह्या परिवाराचे पंतप्रधान सोडले नी एक लाल बहादुर सोडले तर इतरांनी काय दिवे लावले ते दिसलेच. एकाने अणुबॉम्ब बद्दल पाकिस्तानला फोन करुन सांगितल तर एकाने मुस्लिम नाराज होऊ नयेत म्हणून बॉर्डर सैनिकाना क्रॉस करू दिली नाही. सध्याचे प्रताप आपण पाहताच आहोत त्याच्या बद्दल बोलून फायदा नाही. घराणेशाही विरुद्ध बोंबलणारे जय शहा विरुद्ध काहीही बोंबलणार नाहीत. शोभा फडणवीसांचे पुतने नी आमदार गंगाधार फडणवीस ह्यांचे पुत्र मुख्यमंत्री होतात, पण ती घराणेशाही नसते कारण हे दोघे भाजपचे आहेत. अश्या अंधभक्ताना फक्त काँग्रेसच्या विरुद्धच गळा काढायचा असतो.

राजकारण्यांना काहीतरी शेक्षणिक पात्रतेची अट असावी का हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय. काही उपयोग नाही. खोट्या डिग्र्या घेऊन राजकारणात घुसलेले नी नंतर कोर्टात डिग्री दाखवायची नाही म्हणून गळे काढणारे उदाहरण आपल्या समोरच आहे.

घराणेशाही विरुद्ध बोंबलणारे जय शहा विरुद्ध काहीही बोंबलणार नाहीत. शोभा फडणवीसांचे पुतने नी आमदार गंगाधार फडणवीस ह्यांचे पुत्र मुख्यमंत्री होतात, पण ती घराणेशाही नसते कारण हे दोघे भाजपचे आहेत.

घराणेशाही भाजपाईंनी केली तरी सुद्धा लोकशाहीचा अवमान आणि निंद्यच असते. (अब्जावधी वेळा पुन्हा पुन्हा वाचणे)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 11:08 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्यातील भाजपच्या २० पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची !
काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाके मुरडणाऱ्या भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली आहे. आता कुठे गेला घराणेशाहीचा विरोध, असा सवाल विरोधी नेत्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील २० पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे. तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या समर्खकांनी भाजप उमेदवारांच्या यादीतील घराणेशाहीकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील २० उमेदवार भाजपने जाहीर केले. पण त्यापैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे. काँग्रेसच्या घधराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच टीका करीत असतात.
https://www.loksatta.com/politics/seven-of-the-20-bjp-candidates-in-the-...

माहितगार's picture

12 Apr 2024 - 11:15 pm | माहितगार

तुम्हाला सांगतोना मी घराणेशाहीतून वर्णी लावून घेणार्‍या सर्वांना कडूनिंबाच्या मळ्यात पाच पाच वर्षे कडूनिंबाचा रस पाजून मग किमान घराणेशाही पुरुष उमेदवारांना उलटे टांगून मिरच्यांची धुरीच दिली पाहिजे. तरच सर्वसामान्य जनतेतून येणार्‍या कार्यकर्त्यांच्या संधी मारल्या जाणे बंद हॉईल. पक्ष कोणतेही असू द्यात. पक्ष कोणतेहीअसूद्यात हे अब्जवेळा पुरत नसेल तर अनंत अब्जवेळा पुन्हा पुन्हा वाचावे

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 11:18 pm | अमरेंद्र बाहुबली

वर सगळी गरळ रॉबर्ट वड्रा विरूद्ध ओकलीय.

माहितगार's picture

12 Apr 2024 - 11:20 pm | माहितगार

अहो दुसर्‍या धाग्यात भाजपाच्या जाहीरातींवर केलेली टिका दिसत नाही का? सोईनेच टिका टोचते का?

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 11:24 pm | अमरेंद्र बाहुबली

पण घराणेशाही वेळी रॉबर्ट वद्राच तेवढे आठवले इतर भाजपेई सोयीने झाकून ठेवले. तुम्हीक हुशार असाल हो पण लोक मूर्ख नाहीत.

अतींक्रमणाचा चुकणारा उंच कळ्स आधी दिसतो याचा अर्थ इतर अतींक्रमणाचा इमारतींकडे दुर्लक्ष केले जाते असे नसते. घराणेशाहीचे सर्वच अतींक्रमण बुल्डोझर लावून काढले पाहीजे

अनामिक सदस्य's picture

13 Apr 2024 - 10:56 am | अनामिक सदस्य

महिला उमेदवाराना का नको?

माहितगार's picture

13 Apr 2024 - 11:07 am | माहितगार

स्त्री दाक्षिण्य

अनामिक सदस्य's picture

13 Apr 2024 - 10:57 am | अनामिक सदस्य

महिला उमेदवाराना का नको?

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 11:12 pm | अमरेंद्र बाहुबली

घराणेशाहीतून उमेदवार उभे करायचे, घराणेशाहीतच मतदान करायचे नी वर घराणेशाहीविरुद्धच बोंबलत फिरायचे. वारे भाजपेयीनो.

अमरेंद्रराव माझे लेखन तुमच्या वाचण्यातून दुर्लक्षीत का होते? ़़अगद प्रमाणपत्रप्राप्त काँग्रेसी कुटूंबात वाढलेला नेहरुवीयनच आहे मी

माहितगार's picture

12 Apr 2024 - 11:23 pm | माहितगार

आहेर घरचाच आहे

हुप्प्या's picture

13 Apr 2024 - 3:17 am | हुप्प्या

गांधी घराण्याचे लोक रीतसर निवडणुका लढवून जिंकत आले आहेत म्हणून ते शिरसावंद्य. पण निवडणूकीचे तिकिट मिळवणे हे सामान्य कार्यकर्त्यासाठी दुरापास्त असते. कित्येक लोक आयुष्य वेचतात पण फारतर शेवटी कधीतरी तिकिट मिळाले तर मिळते, कित्येकांना कधीच मिळत नाही. बिनाकष्ट लोकसभा किंवा विधानसभेचे तिकिट मिळणे हा एक मोठ्ठा फायदा घराणेशाहीतून होतो. सामान्य लोकांच्या आवाक्यात नसणारा.
ह्याची तुलना आय आय टी वा चांगल्या मेडिकल कॉलेजमधे केवळ अमक्या घरात जन्म झाला म्हणून प्रवेश मिळाला. आता डिग्री मिळवण्यासाठी लागेल तो अभ्यास करण्याची जबाबदारी तुमची. असे केले तर ते न्याय्य म्हणता येईल का? इतर सामान्य विद्यार्थी जे अशा संस्थात प्रवेश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. (चर्चेपुरती खुल्या वर्गातील जागा विचारात घेऊ नाहीतर नको ते फाटे फुटतील!)

भाजपमधे फुटकळ पदे घराणेशाहीतून मिळत असली तरी सर्वोच्च पदांसाठी लोक घराणे पाहून निवडत नाहीत. एखाद्या पंकजा मुंडे नाहीतर पूनम महाजनला लोकसभेचे नाहीतर विधानसभेचे तिकिट मिळेल (वर म्हटल्याप्रमाणे तोही बाकीच्यांवर मोठा अन्यायच आहे). पण ही मंडळी राज्यातील वा केंद्रातील सर्वोच्च पदांसाठी विचारात घेतली जात नाहीत. उलट उद्धव सेना, शरद पवार राष्ट्रवादी गट, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षातील सर्वोच्च पदे केवळ विशिष्ट घराण्यातल्या लोकांनाच मिळतात.

म्हणून भाजप मधे तुलनेने घराणेशाही कमी आहे.

अहिरावण's picture

13 Apr 2024 - 10:38 am | अहिरावण

असं लिहून वफादाराच्या मनसुब्यांवर पाणी ओतू नका.. त्यांना काढू द्या ओका-या

जितके त्यांचे खरे स्वरुप समोर येईल समस्त हिंदू अधिक शहाणे होत मोदी शहांच्या मागे उभे रहातील

जय श्रीराम ! जय जय श्रीराम !!

जय बजरंग बली ! तोड दे कॉग्रेस की नल्ली! !

सर टोबी's picture

13 Apr 2024 - 11:39 am | सर टोबी

अवहेलनेच्या दृष्टीकोनातून शिकवला गेला असेल तर अशी मतं तयार होतात. पाच पैकी दोनवेळा गांधी कुटुंबाव्यतिरिक्तचा पंतप्रधान, तीनवेळा कोणतीही परिवारवादी परंपरा नसलेले पक्षाध्यक्ष हा झाला सर्वोच्च पदांचा इतिहास. याखेरीज सामान्यांमधून घडविलेले नेतृत्व आणि बुध्धीवंतांची कदर याची तर लांबच लांब जंत्री होईल. सहकार महर्षी विखे पाटील, तनपुरे, कोल्हे, राजाराम बापू पाटील, रत्नाप्पा कुंभार,अशी हि यादी. या खेरीज सुशीलकुमार शिंदे, बाबू जगजीवनराम, मीरा कुमार असे मोठ मोठ्या पदांवर विराजमान झालेले नेते. शिवाय वर्गिस कुरियन, एस स्वामिनाथन, विक्रम साराभाई, डॉ. कस्तुरीरंगन, एनसीआर राव, सॅम पित्रोडा, वसंत गोवारीकर यांच्या सारखे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ. हि सगळी माणसे आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर कीर्तिमान झाली.

आता बघूया वर्तमान परिस्थितीकडे. मोदींच्या पहिल्या टर्ममध्येच अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस स्मृती ईराणी या विदुषी मनुष्य संसाधन विकास या खात्याच्या मंत्री होत्या. सध्यातर रेल्वे गाड्यांपासून तर चांद्रयानापर्यंत सर्व गोष्टी मोदींमुळेच होतात.

माहितगार's picture

13 Apr 2024 - 12:52 pm | माहितगार

काँग्रेसचा इतिहास अवहेलनेच्या दृष्टीकोनातून शिकवला गेला असेल तर

आँ!! चालू द्या चालू द्या

सर टोबी's picture

13 Apr 2024 - 1:46 pm | सर टोबी

तुमच्या या धाग्यावर फक्त आणि फक्त झिलकाऱ्यांची गर्दी असेल अशी तुमची अटकळ होती. आमच्या प्रतिसादांमुळे तुमचा वीरस होणं साहजिक आहे. त्यात तुमचा इनसाइडर ट्रेडिंगचा धागा आल्यावर तर तुमच्या सुपारी वाजवण्याच्या कामात आमचा व्यत्यय नको या दृष्टीकोनातून आम्ही माघार घेत आहोत. फक्त फारच नाकाने कांदे सोलता आहात असे वाटले तर येऊच वीरस करायला.

अहिरावण's picture

13 Apr 2024 - 1:34 pm | अहिरावण

>>>>काँग्रेसचा इतिहास अवहेलनेच्या दृष्टीकोनातून शिकवला गेला असेल तर अशी मतं तयार होतात.

हा हा हा !!

आम्ही शाळेत होतो तेव्हा कॉग्रेसने लिहिलेला, कॉग्रेसची भलामण करणाराच इतिहास आम्हाला होता.

आग्या१९९०'s picture

13 Apr 2024 - 1:43 pm | आग्या१९९०

शाळेतला इतिहास हा गुण मिळवण्यासाठी शिकत असतो. कुजबुज गँगचा इतिहास हा सतत आदळत असल्याने तो खरा वाटू लागतो, त्यांचे पुरावे देखील बालिश असतात. शाळेत m गांधींना वंदन करायचे आणि बाहेर आल्यावर ' मजबुरीका का नाम गांधी ' म्हणत टवाळक्या करायला फार बुध्दी लागत नाही.

अहिरावण's picture

13 Apr 2024 - 1:56 pm | अहिरावण

अगदी बरोबर. पण काही जणांना बुद्धी असते ते सर्व मिळेल ते वाचत सुटतात आणि कळते कॉग्रेस नालायक होती आहे आणि असेल. तिथे ना कुजबुज ची गरज असते ना शाळेतील इतिहासाची.

डीस्कवरी ऑफ ईंडीयाच्या परदेशात प्रसिद्ध झालेल्या आवृत्यांमधे मराठा राज्यकर्त्यांचा त्रोटक आणि चुकीचा इतिहास तसेच मुघलांचा खोटा आणि भलामण केलेला इतिहास वाचला की त्या लेखकाची कीव तर येतेच पण त्याच्या बद्दल नंतर कळलेली माहीती खरी आहे हे समजले की किती नालायक आहे ते कळते.

बाकी आपल्याशी चर्चा करुन आनंद वाटला

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Apr 2024 - 12:13 pm | अमरेंद्र बाहुबली

हुप्प्या ह्यांचा प्रतिसाद थोडक्यात- भाजप मध्ये घराणेशाही असेल तर ती चांगली, इतर पक्षात असेल तर ती वाईट. छोटी असेल तर ती चांगली. मोठी असेल तर ती वाईट.

हुप्प्या's picture

14 Apr 2024 - 1:09 am | हुप्प्या

आपला निष्कर्ष आततायी आणि भाजप द्वेषामुळे कलुषित विचारातून आला आहे. हरकत नाही.
हे माझे स्पष्टीकरण:
घराणेशाही हा भारतीय लोकशाहीला असलेला कलंक आहे. पण तो एका झटक्यात नष्ट होणार नाही. असे कुठले जादूचे बटण नाही की जे दाबल्याने घराणेशाही स्विच ऑफ होईल. टप्प्याटप्प्याने कदाचित नष्ट होऊ शकेल. कुठले आहेत हे टप्पे? तर भाजप जे करते आहे ते एक योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. पंकजा मुंडे यांना कदाचित आमदार खासदार केले जाईल पण गोपीनाथ मुंडे यांचे जे महाराष्ट्र भाजपमधे १ किंवा २ क्रमांकाचे स्थान होते ते वंशपरंपरेने पंकजा मुंडे यांना दिले जात नाही. हे ते योग्य पाऊल.
उलट बाकी पक्षात बापाचे, आईचे जे सर्वोच्च स्थान असेल तेच मुलाला किंवा मुलीला देण्याकडे कल असतो.
जर तटस्थपणे पाहिले तर हा फरक सहज लक्षात येईल. पण हा एक मोठा "जर" आहे!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 11:52 am | अमरेंद्र बाहुबली

आपला निष्कर्ष आततायी आणि भाजप द्वेषामुळे कलुषित विचारातून आला आहे. आणी आपला प्रतिसाद नी निष्कर्ष आततायी अंधभक्तीतून आलाय.

तर भाजप जे करते आहे ते एक योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे बरोबर. अमित शहाचक पोरगा बीसीसीआय वर बसवलक ते योग्यय.
प्रमोद महाजन -पूनम महाजन
गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे
एकनाथ खडसे -रक्षा खडसे
धर्मेंद्र -हेमामालिनी -सनी देवल
सुषमा स्वराज - बासुरी स्वराज्य
गंगाधर फडणवीस -देवेंद्र फडणवीस -शोभा फडणवीस
विखे कुटुंब
राजनाथ सिंग नी त्याचा पोरगा
दानवे नी त्यांचा पोरगा
आणी या सारखे अनेक

हे घराणेशहीतून आलेले लोक म्हणजे योग्य दिशेन उचललेले पाऊल वाटते तुम्हाला?? ह्यालाच माझ्य मते आततायी अंधभक्ती म्हणतात.

माहितगार's picture

14 Apr 2024 - 5:33 pm | माहितगार

भाजपातील घराणेशाहीसुद्धा अयोग्यच. सर्वच राजकीय पक्षाचे लोक आक्षेप टोलवण्याची क्लृप्ती म्हणून Whataboutism करतात. कोणाकडच्याही एकाच्या घराणेशाहीने दुसरीकडच्या घराणेशाहीचे समर्थन होऊच शकत नाही.

आपापल्या विरोधीपक्षाची उणी दाखवण्याच्या निमीत्ताने का होईना घराणेशाही नाकारण्याचे महत्व अधोरेखित होत असेल तर अभिनंदन!

हुप्प्या's picture

14 Apr 2024 - 8:26 pm | हुप्प्या

माझा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा नाही असे दिसते. हरकत नाही. अजून एक प्रयत्न करतो.
अस्सल घराणेशाहीची उदाहरणे
बाळ ठाकरे यांचा वारस उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांचा वारस आदित्य ठाकरे. : संघटनेचे सर्वोच्च पद वंशपरंपरेने दिले गेले. राज ठाकरे हा जास्त योग्य असून केवळ पुत्रप्रेमासाठी त्याला डावलले गेले. बाकी भुजबळ, राणे वगैरे तर फारच पूर्वी कट झाले.

शरद पवार यांचा राजकीय वारस सुप्रिया सुळे. संघटनेचे सर्वोच्च पद वंशपरंपरेने दिले जाणार आहे. अजित पवार पुतण्या आहे म्हणून डावलला गेला.

मुलायम सिंग यांचा राजकीय वारस अखिलेश. संघटनेचे सर्वोच्च पद वंशपरंपरेने दिले गेले आहे

लालू यादव यांचा वारस तेजस्वी यादव. संघटनेचे सर्वोच्च पद वंशपरंपरेने दिले गेले आहे

गांधी घराण्याचे काय बोलावे? नेहरु, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल्/प्रियांका: काँग्रेस पक्षातील सर्वेसर्वा हे पद मिळवायला गांधी हे आडनाव आवश्यक आहे. नेहरु गांधी घराणे असणे आवश्यक आहे. केसरी, नरसिंह राव वगैरे लोकांना काही काळानंतर कचर्याच्या डब्यात फेकले गेले. मनमोहन सिंग हे सोनियाच्या हातातले कळसूत्री बाहुले बनले होते. घराणेशाही ह्या विषयात सर्वोच्च स्थान ह्या पक्षाकडे आहे. इतकी वाईट परिस्थिती कुठल्याच पक्षाची नसेल.

आता भाजपचे उदाहरण पाहू.

गोपीनाथ मुंडे भाजपचे १ किंवा २ क्रमांकाचे राज्याचे नेते. विरोधी पक्ष प्रमुख: पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना अनुक्रमे आमदार आणि खासदार बनवले. पण राज्यत थेट सर्वोच्च स्थान दिले नाही. या निवडणूकीत प्रीतम मुंडे यांना तिकिट नाही. म्हणजे घराणेशाही कमी होताना दिसते आहे. राजकीय परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतले जात आहेत.

प्रमोद महाजनः भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे मुख्य पाच नेत्यातले एक. राज्यात १ किंवा २ क्रमांकाचे नेते. पूनम महाजन. एक सामान्य खासदार. राज्यात किंवा केंद्रात पहिल्या पाच नेत्यात ह्यांचे नाव येत नाही.

धर्मेंद्र -हेमामालिनी -सनी देवल: इथे केवळ त्यांचे ग्लॅमर पाहून जिंकतील म्हणून तिकिट दिले. यापैकी कुणी कधी भाजपचे नेते नव्हते. आणि यावेळेस सनी देवलला तिकिट नाही.

गंगाधर फडणवीस -देवेंद्र फडणवीस -शोभा फडणवीस: हे अत्यंत हास्यास्पद उदाहरण. गंगाधर फडणवीस हे स्थानिक नेते. राज्य पातळीवर त्यांचे नाव कधी कुठे चर्चेत नव्हते. केंद्र पातळीवर तर आजिबातच नाही. देवेंद्र फडणवीस हे आपल्या कर्तृत्वाने आपल्या पदावर आहेत. गंगाधर फडणवीसांचे पद वंशपरंपरेने दिले असते तर आज ते एक भाजपचे नगण्य नेते असते.

एकनाथ खडसे -रक्षा खडसे: अजून एक हास्यास्पद उदाहरण. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. आपल्या कामाने त्यांनी माती खाऊन राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. असे असून पूर्ण घराण्याला वाळित न टाकता रक्षा खडसे ह्यांची निवडून येण्याची क्षमता आहे असे वाटले म्हणून तिकिट दिले. पुन्हा एकदा, एकनाथ खडसे हे एक ज्येष्ट पदावरील मंत्री होते. राज्याचे एकेकाळचे मोठे नेते होते. पण रक्षा खडसेला असे कोणतेही उच्च पद देऊ केलेले नाही. वंशपरंपरेचा मर्यादित फायदा दिला आहे.

बाकीही उदाहरणे अशीच आहेत.
जर बिगर शून्य घराणेशाही आणि शून्य घराणेशाही इतके ढोबळ वर्गीकरण आपल्याला कळत असेल आणि ह्या अवगुणाच्या हलक्या होत जाणार्या छटा बघण्याची कुवत नसेल तर नाईलाज आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 8:56 pm | अमरेंद्र बाहुबली

अतिशयक अंधभक्तीयुक्त प्रतिसाद इतकेच लिहू शकतो.

रामचंद्र's picture

14 Apr 2024 - 11:02 pm | रामचंद्र

बऱ्यापैकी तथ्य वाटते. मुळात काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भाजपमध्ये किमान मोदीशहापूर्व कालात घराणेशाही नव्हती असे म्हणता येईल. आता दहा वर्षांत भाजपमध्येही घराणेशाहीचा शिरकाव झालेला दिसतो. मात्र हा निवडणुकीतील यशासाठीच्या डावपेचांचाच एक भाग वाटतो. म्हणजे मग याचा संबंध साधनशुचितेपेक्षा उपयुक्ततावादाशी आहे. मुळात या पक्षाच्या मातृसंस्थेचा साधनशुचितेवर विश्वास नाहीच. आणि एकदा बहुजनसमाजात, विशिष्ट मतदारसमूहात एखाद्या कार्यकर्त्याने आपले स्थान निर्माण केले असेल तर तो मतदारसमूह आपल्या पकडीत आल्यावर त्याच्या वारसांना तितके उच्च स्थान भाजपमध्ये मिळताना स्वाभाविकपणेच दिसत नाही. त्यामुळे मोदी-शहा वगळले तर अन्य कोण्या नेत्याची वारसपरंपरा भाजपमध्ये प्रस्थापित होऊ दिली जाईल असे वाटत नाही. आणि आपल्या अंतस्थ हेतूंच्या पूर्तीसाठी पक्ष व मातृसंस्था अथकपणे विविध पातळ्यांवर नवे नेतृत्व उभे करत आली आहे. भाजपचे विरोधक यात खूपच कमी पडतात.

रामचंद्र's picture

14 Apr 2024 - 11:07 pm | रामचंद्र

अर्थात मोदींबद्दल वारसाचा मुद्दाच नाही आणि शहांच्यि बाबतीत क्रिकेटसंदर्भातील अर्थकारण हा विषय सोडल्यास राजकारणात जय शहा येण्याची वा त्यांना पक्ष आणण्याचीही शक्यता वाटत नाही.

सुबोध खरे's picture

15 Apr 2024 - 10:22 am | सुबोध खरे

@हुप्प्या

कुठे त्या भुजबळांच्या नादी लागताय?

काही लोक खांद्याखाली( च) बळकट असतात.

त्यांच्याशी वाद घालणे हा शुद्ध कालापव्यय असतो.

पादलात तर का पादलात ?

आणि

नाही पादलात तर का नाही पादलात?

अशा तर्हेचा वाद घालणाऱ्यांशी संवाद होऊ शकत नाही.

आग्या१९९०'s picture

13 Apr 2024 - 12:38 pm | आग्या१९९०

पतंजलीने बाजारात कोरोनील आणण्यासाठी वार्ताहर परिषद आयोजित केली होती, त्यात त्यांनी कोरोनिल हे कोरोनावर रामबाण उपाय आहे असा दावा केला होता आणि त्याला who ने मान्यता दिली आहे असे ठोकून दिले होते. हे सर्व आरोग्य मंत्री हर्षवर्धन ह्यांच्या उपस्थितीत घडले होते. आता सुप्रीम कोर्टाने असे अशास्त्रीय दावे केल्याप्रकरणी रामदेवबाबाला चांगलेच खडसावले आहे. असे नग मंत्री असताना भक्तांना खटकत नाही परंतु त्यांना नेहरूंचा वैज्ञानिक दृष्टिकोन सतत सलत असतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Apr 2024 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली

अंधभक्तच ते. त्यांच्या नेत्या पासून ते नेत्याच्या डिग्रिपर्यंत सगळच खोटं. खोट्याचा डोलारा नुसता.

तरीही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून तुमच्या सणसणीत कानाखाली जाळ काढतात !! अरेरे ! किती हतभागी तुम्ही !!

नठ्यारा's picture

13 Apr 2024 - 5:47 pm | नठ्यारा

आजच्या घडीस काँग्रेस म्हणजे नेमकं काय, हे कुणी नीटपणे सांगेल काय? माझा रोख मुद्दा क्रमांक २ कडे आहे : https://www.misalpav.com/comment/1034694#m0002

-नाठाळ नठ्या

ज्याच्यापाशी काही तत्व नसतात, विचार नसतो, काही करण्याची धडाडी, धमक नसते, फक्त पैसे टाकून कामं करण्याची मानसिकता असते, दुस-याच्या जीवावर जगण्याची वृत्ती असते, पुर्वजांची थोरवी गात आम्हाला मान द्या असला आचरट स्वभाव असतो ते ते सर्व कॉग्रेस. विषय संपला.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 7:32 pm | अमरेंद्र बाहुबली

.

अंधभक्त हया धाग्यावर यायचं का टाळताहेत हे हया फोटोवरून कळतंय. :)

अहिरावण's picture

14 Apr 2024 - 7:38 pm | अहिरावण

पूर्ण भारताचा आकडा द्या... अर्धवट नको.