https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-ra...
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
ज्या शाळेत शिकल्या
म्हणे नवनीत राणा ।
ती अस्तीत्वात च नाही,
म्हणे, हे कारण जाणा ।।
पंजाबी चमार चे,
केले मराठी मोची ।
विरोधकांनी केली,
थोडा काळ गोची ।।
जात प्रमाणपत्र,
पाहता अवैध ।
मुलं घाबरली,आई
होणार का कैद ??
हायकोर्टाने ठरवले अवैध ।
सुप्रीम कोर्ट ने करवले वैध ।।
युक्तीवाद म्हणजे,
शब्दांना किसणे ।
शेवटी कामी आले,
छान छान दिसणे !!
प्रतिक्रिया
7 Apr 2024 - 3:00 pm | कर्नलतपस्वी
एक चांगले विडंबन काव्य लिहीता म्हणून जो आदर होता त्यालाच धक्का लागला.
शेवटचे कडवे अप्रासंगीक व सभ्यतेला सोडून आहे. शेवटचे कडवे असे असते तरी प्रासंगिक ठरले असते.
असे माझे मत आहे.
युक्तीवाद म्हणजे,
शब्दांना किसणे ।
असलेले नसणे
नसलेले दिसणे.....
हाय काय नाय काय
बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना मर्यादांचे उल्लंघन तर होत नाही ना याचे व्यक्त होणार्या व्यक्तीने भान ठेवावे.
7 Apr 2024 - 7:19 pm | अहिरावण
नेमके
8 Apr 2024 - 11:25 am | बाजीगर
कर्नलजी अगदी सहज आपण योग्य सुधारणा (improvisation) सुचवलीत.
सर आँखोपर है आपल्या नव्या ओळी.
संपादकमहाराज आता बदलणे (edit) शक्य असल्यास अवश्य करावे.
7 Apr 2024 - 7:18 pm | अहिरावण
जमले नाही यावेळेस
8 Apr 2024 - 11:27 am | बाजीगर
कर्नलजींनी चांगला बदल सुचवलाय.