गालावरी हसू, मुखावरी दाढी ।
राजकारणे गुढी, बांधू पाहे ।।
दाढीचे वजन, दाढीचेच भजन ।
करू आम्ही नमन, दाढीचेच ।।
दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती ।
सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।।
पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त ।
करू मशागत, दाढीचीच ।।
कपिला गाय, करोनिया माय ।
गळ्यातच पाय, आमच्याच ।।
ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू ।
विरोधकांचे दमन, करू पाहे ।।
जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले ।
समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।।
चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ ।
हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।।
प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा ।
दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।।
मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड ।
निर्भयांचे तोंड, फोडू पाहे ।।
जनता अडानी, मतदार अडानी ।
अडानीच अडानी, चहूकडे ।।
हुकूमशाहीचा वास, येताच डास ।
राष्ट्रप्रेमाची गुणगूण, करू पाहे ।।
प्रतिक्रिया
27 Feb 2024 - 11:53 am | अहिरावण
एक नंबर रम्या भाऊ !!!
फक्कड जमलंय !!!
27 Feb 2024 - 12:06 pm | महिरावण
माननीय मोदींवर हुकूमशाहा झाल्याची टिका ह्या कवितेत आहे. वरून धनुष्य, घड्याळ चोरल्याचे आरोपही आहेत. इडी विरूध्द गरळ ओकून झाल्यावर रम्या हा आयडी आता अदानीवरही घसरलाय. संपादक मंडळ मात्र काहीही करायला तयार नाही. किती खालची पातळी गाठल्यावर संपादक मंडळ एक्टीव होणार??
-महेंद्र रावणबळी
27 Feb 2024 - 1:08 pm | वामन देशमुख
महिरावण यांच्याशी सहमत
27 Feb 2024 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे व्वा. लैच भारी. स्वागत. अजून येऊद्या. भक्त पिसाळतील पण अजून असे डासबोध टाकून त्यांच्या जखमेवर मिठ चोळा.
:)
27 Feb 2024 - 12:55 pm | महिरावण
बाझीगर यांच्या अशाच पण विरुद्ध आशयाच्या कवितेवर तुम्ही टीका करत असताना येथे मात्र तुमचा दांभिकपणा दिसून येतो. तिकडे गुलाम पिसाळले असेही म्हणता येईल
27 Feb 2024 - 1:07 pm | वामन देशमुख
पुरोगाम्यांना वाटतंय जनता अडानी राहावी. पण भारताचे प्रचंड लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मात्र "सबका साथ सबका विकास" असा ध्यास घेतलाय.
फरक आहे!
27 Feb 2024 - 1:39 pm | कर्नलतपस्वी
बंडाचा झेंडा तिकिटाचा घोळ
कार्यकर्त्यांला म्हणती सतरंजीवर लोळ
मानकरी तिकीटाचे अदुगरच ठरले
कार्यकर्त्यांच्या ओठावर मधाचे बोट फिरले
मतदार राजा म्हणजे शिराळशेठ
पाच वर्षांत एकदा विनम्र भेट
एक दिवसाच राज्य एक दिवसाचा राजा
नंतर मात्र टका सेर भाजी टका सेर खाजा
तेव्हां मतदार, कार्यकर्त्यांनी आपली जागा ओळखावी आणी आपसातली तू तू मैं मैं थांबवावी.
27 Feb 2024 - 1:47 pm | अमरेंद्र बाहुबली
पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त ।
करू मशागत, दाढीचीच ।। हे विशेष आवडले. तसेच मिपावरील काही लोक आठवले. त्यांच्यावर हे वर्णन हुबेहुब बसते. काही अल्ट्रा प्रो अंधभक्त तर आकाने दाढी खाजवली तरी तिला मास्टरस्ट्रोक म्हणतात.:)
27 Feb 2024 - 6:36 pm | मुक्त विहारि
करी ३७० रद्द, तोच आमचा नेता.
आता आणील UCC, हाच आमचा नेता.
CAA आणि NRC ला विरोध जरी अपार.
आम्हीच निवडून आणू चारशे पार.
27 Feb 2024 - 7:39 pm | अमरेंद्र बाहुबली
करी भ्रष्टांना पावन, तोच आमचा नेता,
सोडेल पाळीव ईडी, तोच आमचा नेता.
बोलले खोटं नी वाढवेल पेट्रोलचे दर अपार
असं करून आणेल ४०० पार.
27 Feb 2024 - 10:33 pm | मुक्त विहारि
नाही पर्याय लोकसंख्या नियंत्रणाला
आणि शत्रूच्या मुसक्या आवळायला
पाकिस्तान थकला, चीनही आला जेरीस
आर्थिक उन्नती सुरू जाहली
वेगवान रेल्वे सुरू जाहली
बघुनी ही प्रगती जनता वेडावली
काही लोकांची भांडी फुटकी
दोष द्यायला आहेच मग ईडी.
कर नाही तर डर कशाला?
ही भूमिका नाहीशी झाली
तोंड वेंगाडूनी पळपुटे निघाली.
27 Feb 2024 - 11:23 pm | बाजीगर
https://www.lokmat.com/national/caa-news-caa-will-be-implemented-across-...
27 Feb 2024 - 11:34 pm | मुक्त विहारि
आता
CAA आणि NRC
27 Feb 2024 - 7:02 pm | कर्नलतपस्वी
+
27 Feb 2024 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली
28 Feb 2024 - 7:59 am | वामन देशमुख
गालावर खळी डोळ्यात धुंदी
चेहऱ्यावर खुंटे आहेत दाढीची
कधी सुरु कधी बंद भारतयात्रा
वाट पाहतो मी सत्ता प्राप्तीची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझी पायपीट तू घे तुझी सत्ता मला दे
28 Feb 2024 - 3:43 pm | मुक्त विहारि
आधीच चाल ती मंद त्यात घराणेशाहीची झूल
तशांत गुलामांची टोळी साथीला
नुसतीच दाढी वाढवून नाही येत अक्कल
आता ज्ञानामृत देती, पीठ लीटरमध्ये मोजायची शक्कल.
असे शास्त्रज्ञ आणि त्यांच्या शिष्यांचा विजय असो....
28 Feb 2024 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आशय छान आहे. भिडली रचना.
अभंग रचना आकृतीबंध कमी-जास्त झालाय.
पण, चालायचंच.
-दिलीप बिरुटे
28 Feb 2024 - 4:09 pm | वामन देशमुख
धन्स्!
माझ्यासारख्या गद्य-गर्दभाने चार ओळींचं विडंबनकाव्यसदृश्य काहीतरी गिरवलं म्हणजे माळरानातल्या कातळावर अंकुर उगवला म्हणा की!
28 Feb 2024 - 4:16 pm | वामन देशमुख
बाकी, कविता करण्याचा खूपदा प्रयत्न केला पण तो काही आपला प्रांत नाही हे लक्षात येऊन अनेक दशके झाली.
आम्ही आपले गद्य-गर्दभच बरे; पद्य-मृगः काही आम्ही या जन्मी तरी होणे नाही!
28 Feb 2024 - 5:28 pm | स्वधर्म
मूळ कवितेला असावा, असे दिसते. डॉ. बिरूटे स्पष्ट करतीलच.
28 Feb 2024 - 5:33 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/national/story-supreme-court-said-that-ed-...
कर नाही तर डर कशाला?
19 Mar 2024 - 1:09 pm | पाषाणभेद
सत्यवचन आहे.
19 Mar 2024 - 11:08 pm | नठ्यारा
डासबोधास सम्यक या अर्थीचा सम् वा सं असा उपसर्ग लावावासा वाटतो.
-नाठाळ नठ्या