लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले.
पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता. एक गव्हर्नर जनरल पंतप्रधान झाला. त्यानंतर अमेरिकेतील राजदूत पंतप्रधान झाले. त्यानंतर ते पंतप्रधान पुन्हा अमेरिकेत राजदूत झाले. पाच वर्षांत पाच पंतप्रधान कुठून आले आणि कुठे गेले, याबाबत जनतेलाही स्पष्टता नव्हती. मी हे तपासले आहे. लियाकत अली खान यांच्यानंतरच्या पंतप्रधानांची नावे सुशिक्षित पाकिस्तानी लोकांनाही सांगता येत नाहीत.
चौधरी मूहम्मद अली
1956 मध्ये चौधरी मुहम्मद अली यांच्या काळात पाकिस्तान हे प्रजासत्ताक बनले. तात्पुरती राज्यघटना तयार करण्यात आली आणि इस्कंदर मिर्झा हे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांनी इंग्रजी ही अधिकृत भाषा, उर्दू आणि बंगाली ह्या राजभाषा म्हणून घोषित केल्या. यासोबतच २१ वर्षांवरील नागरिकांसाठी मतदानाच्या हक्काची व्यवस्था करण्यात आली होती. पंजाब, सिंध, बलुच आणि खैबर-पख्तुन यांचे एकत्रीकरण करून पश्चिम पाकिस्तानचा प्रांत निर्माण करणे ही आणखी एक गोष्ट त्यांनी केली. लाहोर ही त्याची प्रांतीय राजधानी बनली.
खान बंधू नेहरूंसोबत
खान अब्दुल जब्बार खान हे या नव्या पश्चिम पाकिस्तानचे पहिले मुख्यमंत्री झाले. खान साहेबांनी मुंबईतून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते आणि त्यांचे धाकटे बंधू खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत खुदाई खिदमतगार चळवळीचे आयोजन केले होते. ते हजारीबाग कारागृहातही राहिले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या समर्थन पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना पठाणांना भारताचा भाग बनवायचा होतं. त्यांनी स्वतःचा रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगचा पराभव केला तर पूर्व पाकिस्तानात एच.एस. सुहरावर्दी यांनी त्यांची अवामी लीग स्थापन केली होती. सुहरावर्दी हे गांधींचे सहकारी होते. मात्र, कलकत्ता येथे झालेल्या भीषण दंगलीच्या वेळी ते बंगालचे मुख्यमंत्री होते. संपूर्ण बंगालचा स्वतंत्र देश व्हावा आणि पाकिस्तान किंवा भारताचा भाग होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली नाही, पण मुस्लिम लीगचा पराभव करून ते पूर्व पाकिस्तानचे पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे ते संपूर्ण पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
सूहरावर्दी
अशा प्रकारे संपूर्ण पाकिस्तानात मुस्लिम लीगचा पराभव झाला. लोकशाहीचे हेच सौंदर्य आहे की ज्या पक्षाने देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली त्या पक्षालाही जनता खाली आणू शकते.
अमेरिकेने या सौंदर्यावर हल्ला करायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम सीआयएने 1953 मध्ये इराणमधील लोकशाहीमार्गाने जिंकलेल्या पंतप्रधानांचा तख्तापालट केला. त्यानंतर बगदादमध्ये लष्करी करार झाला, ज्यामध्ये इराण, इराक, तुर्की आणि पाकिस्तान यांनी मिळून अमेरिकेशी हातमिळवणी केली. त्याचे नाव CENTO होते. आता अमेरिकेने इस्रायलसह संपूर्ण मध्य आशियात आपले जाळे पसरवले होते. या संपूर्ण लष्करी व्यवहारात जनरल अयुब खान यांचा मोठा वाटा होता. सुहरावर्दी आणि पठाण खान अब्दुल जब्बार खान यांच्यासारखे पंतप्रधान होते.
9 मे 1958 रोजी खान साहेब लाहोरमध्ये त्यांच्या मुलाच्या घरी वर्तमानपत्र वाचत होते. त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. आता सुहरावर्दींची पाळी होती. (क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
प्रतिक्रिया
23 Feb 2024 - 10:20 pm | तुषार काळभोर
पाकिस्तान विषयी भरपूर माहिती आहे, या गैरसमजाच्या चिंध्या करणारे पुस्तक (आणि ही लेखमाला).
मनःपूर्वक आभार!
23 Feb 2024 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
24 Feb 2024 - 10:22 am | विवेकपटाईत
ज्या प्रमाणे इराणचा मध्ये भ्रष्ट नेता मीडिया आणि शेतकरी इत्यादी वापरून इराण मध्ये कठपुतली सरकार स्थापित करून इराणच्या तेलावर कब्जा केला. युक्रेन मध्ये ही असेच केले. रशिया विरुद्ध युक्रेनचा वापर करत आहे. भारताच्या विरुद्ध ही ८००० कोटी सरकार पाडण्यासाठी अमेरिका, चीन इत्यादी खर्च करत आहे.
अमेरिकेच्या जाळ्यात अटकून आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
24 Feb 2024 - 10:38 am | अमरेंद्र बाहुबली
८००० कोटी?? कुठे मिळाला हा आकडा?
24 Feb 2024 - 10:45 am | अहिरावण
२० कोटी एक खासदार
२० * ४०० = ८०००
मागे अंबाणी म्हटले होते एक कोटीत एक खासदार
आता रेट वाढला
24 Feb 2024 - 12:12 pm | अमरेंद्र बाहुबली
इतके स्वस्त खासदार विकले जातात का?? साधा आमदार विकत घ्यायचा म्हटला तरी पाळीव ईडीला डबल शिफ्टमध्ये काम करावे लागते, पन्नास वेळा छापे तसेच घरातील वाॅचनन पासून पाळीव कुत्र्यापर्यंत सर्वांना त्रास द्यावा लागतो, खोके ५० च्या खाली ऐकत नाहीत आमदार. आणी खासदार वीस कोटीत?? खासदार आहे की भाजीपाला
24 Feb 2024 - 12:15 pm | अहिरावण
तुम्ही खूप हुशार आहात.
27 Feb 2024 - 12:38 am | diggi12
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
27 Feb 2024 - 10:04 am | श्वेता व्यास
अनुवाद चांगला करताय.
27 Feb 2024 - 1:11 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.