थोडी गंमत.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
7 Jan 2024 - 5:13 pm

ओळखा पाहू.
खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा
तुम्हाला ओळखता येत आहे का.
१.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही
नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो.
२.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी
सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू.
३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू
हळू वाढतेे (इतरांच्या तुलनेत) . तसेच पहिल्या मजल्यावरची सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल.
४. अणु एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो. (म्हणजे तुम्ही ऑफिसात काम करा. आणि त्याच
वेळी प्रिये बरोबर थियेटर मध्ये सिनेमा बघू शकता. असे आहे का? ओह माफ करा, सध्या हे आपल्या
सारख्या मर्त्य मानवांना शक्य नाही. पण अणु हे करू शकतात. आणि आपण सरते शेवटी अणुनेच बनलो आहोत. तेव्हा भविष्यात हे शक्य होईल. मग उगाच एक सिक लिव वाया जाणार नाही.)
५.संपूर्ण मानव जात एका शुगर क्यूब मध्ये सामावू शकेल.
६.बिग बँग तुमच्या दारी! टेलीविजन मध्ये कधी कधी पावसाच्या धारा किंवा अनेक ठिपके ठिपके दिसतात. त्याला static म्हणतात. त्यातला काही भाग हा बिग बँगचा अवशेष असतो. (cosmic microwave background CMB)
७. विज्ञानाचे नियम टाईम ट्रॅवेलची शक्यता नाकारत नाहीत.
८.गरम कॉफीने भरलेला कप हा थंड कॉफीने भरलेल्या कपाच्या तुलनेत जास्त वजनदार असतो.
९.तुम्ही जेवढ्या वेगाने प्रवास कराल तेव्हढी तुमची अंगकाठी शिडशिडीत राहील.

विज्ञान

प्रतिक्रिया

भागो's picture

7 Jan 2024 - 7:49 pm | भागो

सुलताना सुलताना
तू न घबराना
तेरे मेरे प्यार को
क्या रोकेगा ज़माना
तोड़ के सब दीवारे
तुझको ले जाएगा दीवाना
सुलेमान सुलेमान
तू न घबराना
तेरे मेरे प्यार को
क्या रोकेगा ज़माना
--------------- है शाबास! इसको हम बोलते है "टनेलिंग इफेक्ट."

तुषार काळभोर's picture

8 Jan 2024 - 7:03 am | तुषार काळभोर

हा प्रेमासारख्या intangible गोष्टीपासून ते ५०-१०० किलो वजनाच्या सुलताना-सुलेमान यांना एकसारखा लागू होईल का?
सुलताना आणि दिवार, प्यार आणि जमाना या जोडीमध्ये Tunneling Effect वेगवेगळा असेल, असा आपला माझा अंदाज..

तुषार काळभोर's picture

8 Jan 2024 - 7:17 am | तुषार काळभोर

१,४,५,६ ओके
३ मध्ये वयातील फरक पिको, फेमटो किंवा ॲट्टो सेकांदांचा असेल.

फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचा.

भागो's picture

8 Jan 2024 - 10:08 am | भागो

आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगलायला सोपी पडेल.
One of the following is true:
• Every breath you take contains an atom breathed out by
Marilyn Monroe.
• There is a liquid that can run uphill.
• You age faster at the top of a building than at the bottom.
• An atom can be in many different places at once, the equiva-
lent of you being in New York and London at the same time.
• The entire human race would fit in the volume of a sugar cube.
• One percent of the static on a television tuned between sta-
tions is the relic of the Big Bang.
• Time travel is not forbidden by the laws of physics.
• A cup of coffee weighs more when it is hot than when it is
cold.
• The faster you travel, the slimmer you get.
No, I’m joking. They are all true!
As a science writer I am constantly amazed by how much stranger
science is than science fiction, how much more incredible the Uni-
verse is than anything we could possibly have invented.
कुणाला काही चांगले मटीरिअल मिळाले तर इथे सगळ्यांसाठी पोस्ट करा.

माझ्या नाकाच्या शेंड्यावरची पेशी, करोडो वर्षापूर्वी डायनासोरच्या शेपटीच्या टोकावर होती.
आणि ही एक विज्ञान कथा.
"आमचे यान त्या निळ्या ग्रहावरती चकरा मारत होते.
त्यांना वाटत होते कि आम्ही त्यांचे शत्रू आहोत. आम्ही त्यांना खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकायला तयारच नाहीत.
उलट त्यांनी त्यांच्याकडची सगळी अण्वस्त्र आमच्यावर डागली.
आमच्या यानाचा कप्तान वैतागला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.
ते अस्त्र साधेच होते.
त्या ग्रहावरच्या अणूंमधली सर्व पोकळी त्याने शोषून घेतली.
कप्तान साहेबाच्या टेबलावर एक सेंटीमीटर क्यूब होता.
संपूर्ण मानववंश त्यात सामावून गेला होता.

नठ्यारा's picture

22 Jan 2024 - 2:04 am | नठ्यारा

दूरस्थ कलाप म्हणजे दूरवर घड(व)लेला परिणाम ही भानामती आहे : - इति अल्बर्ट आईनस्टाईन

संदर्भ : https://www.google.co.uk/search?q=spooky+action+at+a+distance+quote

-नाठाळ नठ्या

आईनस्टाईन ह्यांनी आयुष्यात दोन तीन चुका केल्या त्यापैकी ही एक!

मी माझ्याच बाकड्यावर शेजारी बसलेल्या माणसापासून एक प्रुथ्वीप्रदक्षिणा होईल इतक्या अंतरावर बसलेला असतो.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2024 - 4:02 pm | मुक्त विहारि

हे आवडले...