पाच राज्यातील निवडणूक निकाल

महिरावण's picture
महिरावण in राजकारण
3 Dec 2023 - 11:02 am

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू होताना दिसतेय. अनुक्रमे १३७ आणि ११६ जागा मिळताना दिसत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये ममुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच1 होण्याची शक्यता दिसते, विशेषतः राजस्थानात स्वतंत्र वृत्तीच्या वसुंधराराजे असल्याने तिथे डोकेदुखी वाढणारच.

छत्तीसगडमध्ये मात्र भाजप काँग्रेस ७/८ जागांच्या फरकाने तुल्यबळ लढत होताना दिसतेय. ,काँगेस जिंकली तर बघेल मुख्यमंत्री होतील, भाजप जिंकले तर रमणसिंह पुन्हा होतील का?

तेलंगणमध्ये मात्र काँग्रेस केसीआरवर भारी पडतेय. केसीआर यांचा प्रभाव आणि बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसतेय, भाजपला ह्याचा फायदा लोकसभेत होऊ शकेल.

मिझोरामची मतमोजणी मात्र उद्या आहे.

एकंदरीत पाहता हिंदी पट्ट्यातले भाजपचे वर्चस्व दिसून येतंय. कठीण वाटणारी लोकसभा निवडणूक मोदींसाठी आता थोडी सोपी झाली असा आजचा निकाल पाहता म्हणता यावे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Dec 2023 - 12:10 pm | कंजूस

श्री चंद्रशेखर राव यांच्याबद्दल इंडिया टुडे साप्ताहिकात वाचले. ते Congress मधून बाहेर पडून तेलंगणा रा समिती मधून दोन मुदती जिंकले.
आता फ्री गोष्टी वापरण्यावरून मतदार फिरत आहेत. बाकी त्या पक्षात राव कुणाचच ऐकत नाहीत तर कॉन्ग्रेसमध्ये नेते समन्वय नाही असं म्हटलं आहे. इथली सत्ता मिळणे कॉन्ग्रेसमध्ये चैतन्य आणेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Dec 2023 - 5:13 pm | अमरेंद्र बाहुबली

गायपट्टा गायपट्टाच राहनार.

कंजूस's picture

3 Dec 2023 - 6:16 pm | कंजूस

म्हणजे २०२४ पण नाहीच?

आंद्रे वडापाव's picture

4 Dec 2023 - 4:45 pm | आंद्रे वडापाव

बहुतेक नाहीच.

२०२४ मध्ये मोदींची प्रोबॅबिलिटी इतरांच्या तुलनेत खूप जास्त आहे ...

पण

किती बहुमत ? (तोकडे बहुमत कि राक्षसी बहुमत ) हेच पाहावे लागेल ..

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Dec 2023 - 5:50 pm | अमरेंद्र बाहुबली

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल ह्यांनी संघटीत प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही.

अहिरावण's picture

5 Dec 2023 - 3:03 pm | अहिरावण

मायबाप जनता जनार्दनाला विसरलात आपण महाशय !
तिला कमी लेखू नका. तिनेच पप्पू नको मोदी हवे असा नारा दिलाय.
तुम्हासारख्या डाव्यांबद्दल सहानुभुती आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Dec 2023 - 9:36 pm | अमरेंद्र बाहुबली

पप्पू कोण??? जनता जनार्दन स्थानीक नेते पाहून निवडूण देतं . स्थानीक नेत्यांना आमच्या पक्षात या नाहीतर सीबीआय , इडी ची चौकशी लावू अशी धमकी दिली जाते. पक्षात आल्याआल्या चौकशा बंदं कशा होतात हो???

अहिरावण's picture

6 Dec 2023 - 7:43 am | अहिरावण

आमचे जवळचे मित्र कै श्रावण मोडक यांच्या शब्दात सांगतो - "मोठे व्हा !"

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Dec 2023 - 8:20 am | अमरेंद्र बाहुबली

आरसा पहा.

अहिरावण's picture

6 Dec 2023 - 10:23 am | अहिरावण

उगी उगी

विवेकपटाईत's picture

7 Dec 2023 - 1:58 pm | विवेकपटाईत

या यंत्रणांचा दुरुपयोग २०१४ पूर्वी निश्चित होत होता. पण आता होत नाही. २००४ ते १४ पेक्षा दोनशे पट जास्त वसूली इडी ने केली आहे. यातच सर्व आले.

बाकी व्होट देणारी सामान्य जनता या एजन्सीला भीत नाही. मतदारांवर त्यांचा शून्य प्रभाव असतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली

सर हे दिल्लीतील लोकांना का समजावत नाही. ते विकासपुरूष केजरीवाल ह्यांनाच निवडूण देतात. नी लोकही दिल्ली वाईट असूनही तीत राहतात.

विवेकपटाईत's picture

8 Dec 2023 - 8:41 pm | विवेकपटाईत

दिल्लीत० टक्के संगठित मत आहेत. दिल्लीत जर ६० टक्के पेक्षा जास्त मते पडली तर केजरी जिंकणार नाही. लोकसभेत संभावना शून्य आहे. बाकी एका वर एक बाटली फ्री तिहाड कडे जाते.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 9:01 pm | अमरेंद्र बाहुबली

पण विकायपुरूष जिंकले ना??

विवेकपटाईत's picture

8 Jan 2024 - 5:44 pm | विवेकपटाईत

ईडी इत्यादीचा दुरुपयोग यूपीए काळात होत होता. उदा. २४०० वर धाड टाकून फक्त ६०० कोटी मिळाले. तर ५००० च्या जवळपास धाडी टाकून सव्वा लाख कोटी. यातच सर्व आले.
बाकी मते जनता देते. ती मत देताना ईमानदार भ्रष्ट जेल वारी करून आलेला इत्यादी पहात नाही.

टुलकीट किती समान आहे की एकच विचारधारा आहे सर्व डाव्यांची?

https://www.loksatta.com/desh-videsh/dmk-mp-d-n-v-senthilkumar-said-bjp-...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2023 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं आपली विकासाची 'रेवडी' उडवत अतिशय 'प्रभावी' कामगिरीच्या बळावर तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवत लोकसभेच्या दिशेने दमदार पावलं टाकली आहेत. काँग्रेसच्या ताब्यात असलेली दोन राज्ये मिळवून मध्य प्रदेशमधील आपली सत्ताही कायम राखली आहे. भाजपाचं अभिनंदन. काँग्रेसनेही तेलंगणाच्या बळावर आपण निवडणुका असल्या की निवडणूकीत उतरण्यापूरतं यश मिळवू शकतो हे दाखवून दिलं, त्यांचं ही अभिनंदन.

-दिलीप बिरुट

चौकस२१२'s picture

8 Dec 2023 - 5:15 am | चौकस२१२

भाजप उडवते ते "रेवडी" आणि काँग्रेस आणि दावे ( शिलक असतील तर) वाटते ते काय शुक्रवारचे फुटाणे? कि खोट्या सर्वधर्मसमभावाच्या लाह्या
अहो थोडे तरी दुसरया बाजूने लिहीत जा हो
लोकशाही मार्गाने जिकंले तरी तूच पोटशूळ काही जात नाही धन्य आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2023 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर राजकारण सुरु झालं का ? खाते उडवण्यासाठीचे ट्रॅप आहेत ?
खुलासा नै काय नै.... ?

-दिलीप बिरुटे
(सावध)

अहिरावण's picture

5 Dec 2023 - 3:04 pm | अहिरावण

काही झालं तरी तुमचं उडणार नाही... खातं हो.. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Dec 2023 - 9:37 pm | अमरेंद्र बाहुबली

असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू वगैरे लिहीनही सुरू झालंय. भक्तगण मूळरूप दाखवू लागलेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2023 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

8 Dec 2023 - 5:12 am | चौकस२१२

वारे वा बाकीचे ते अंधभक्त मग आपण कोण अंध गुलाम ! ६० वर्षां पासून

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Dec 2023 - 3:01 pm | अमरेंद्र बाहुबली

नवाब मलिक सत्तेत. काही नतद्रष्टांनी त्यांचे दाऊदशी संबंध आहेत
असे आरोप केले होते. आता दाऊद मित्र दुश्मन राऊत. :)

धर्मराजमुटके's picture

7 Dec 2023 - 9:32 pm | धर्मराजमुटके

गायपट्ट्या ऐवजी गोमुत्र राज्ये असा नवीनच शब्दप्रयोग ह्यावेळी दक्षीणेच्या राजकारण्यांच्या तोंडी ऐकायला मिळाला.

चौकस२१२'s picture

8 Dec 2023 - 5:20 am | चौकस२१२

दक्षीणेच्या लोकांचे काही कळत नाही एकीकडे हिंदुत्वाला विरोध आणि दुसरीकडे पाहावे तर हिंदूंची सर्वात महत्वाच्या देवळांपैकी अनेक देवळे दक्षिणेत !
हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदी भाषिक अशी त्यांची समजूत झालीय का?
तिकडे राहिलेले कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय?
एक भारताबाहेर देशात पहिले कि उत्तर भारतीयांनी चालवळली शिव विष्णू मंदिरापेक्षा दक्षिण्यांनी चालवलेलय विनायक मंदिरात जास्त कट्टर पण जाणवते !

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 8:12 am | अमरेंद्र बाहुबली

पेरियार ह्यांची सशक्त विचारधारा आहे तिथे. शेणपट्ट्यात दुर्दैवाने कुठलीही विचारधारा नाहीये.

वामन देशमुख's picture

8 Dec 2023 - 9:32 am | वामन देशमुख

पेरियार ह्यांची सशक्त विचारधारा आहे तिथे.

https://www.opindia.com/2020/01/periyar-history-hindu-hate-lord-rama-sita/

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 10:34 am | अमरेंद्र बाहुबली

हिंदू आणी सनातनी ह्यात फरक असतो सर. सनातनींनी हिंदू नावाचा बुरखा घातला म्हणजे त्यांचं इतर जातींना कमा लेखून सिवतस ऊच्च समजनं लपत नाही. तयं नसतं तर पेरियारना बहुसंख्य हिॅदूंचा पाठिंबा मिळाला नसता.

वामन देशमुख's picture

8 Dec 2023 - 11:18 am | वामन देशमुख

हिंदू आणी सनातनी ह्यात फरक असतो सर

थांबवा हे प्रकार

@संपादक मंडळ / व्यवस्थापक / मालक, अमरेंद्र बाहुबली हा आइडी सातत्याने धर्मविरोधी राष्ट्रविरोधी विधाने करत आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी ही नम्र विनंती.

(अश्या प्रकारच्या आइडींना वेळीच आवर न घातल्याने यापूर्वी अनेक चांगले अभ्यासू लेखक मिपा सोडून गेले आहेत याची नोंद घेण्यात यावी.)

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 6:34 pm | अमरेंद्र बाहुबली

सरळ सांगा की खरं बोलतोय बॅन मारा.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 6:50 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदू धर्मातील सुधारणांना तुम्ही लोक दोनशे वर्षा आधी ही विरोध करत होतात आजही करताय. काय झालं? धर्म सुधारायचा थांबला का?? सनातनी जातीवाद्यांवर टीका ही धर्म आणी राष्ट्रावर टिका कधी झाली?? सुधारणेला विरोध करनार्या तुमचा आयडी खरंतर बॅन केला पाहीजे, हिंदूंवर ऊपकार होतील. तुम्हीच खरे धर्म मी राष्ट्रविरोधी आहात.
सुधारणेला विरोध करायचे नी जातीवाद्यांची तळी ऊचलायचे पिरकार कृपया थांबवा वामन सर नी हिंदूंवर ऊपकार करा.

वामन देशमुख's picture

8 Dec 2023 - 9:34 am | वामन देशमुख

शेणपट्ट्यात दुर्दैवाने कुठलीही विचारधारा नाहीये.

म्हणजे कुठे? बेडरूममध्ये?

वामन देशमुख's picture

8 Dec 2023 - 11:10 am | वामन देशमुख

पेरियार ह्यांची सशक्त विचारधारा

म्हणजे या पेरियारने प्रभू श्रीराम यांच्या शान-में-गुस्ताख़ी केली तरी तुम्ही त्यांचे समर्थन करत आहात?

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली

ती त्यांच्या पध्दतीची धर्मचिकीत्सा होती. हिंदूधर्मात चिकीत्सेली स्थान आहे. (काही सनातनी कट्टरवादू सोडले तर) आणी मी समर्थन केलं न केल्याचा काहीही फरक पडत नाही. तमीळनाडूतल्या हिंदूंत त्याचं स्थान पहा. आता म्हणू नका तमीळ हिंदू देश धर्म द्रोही नी तुम्हीच एकटे धर्मप्रेमी. पेरियार ह्यांच्या सुधारणा स्विकारून तमीळनाडू नी फुले शाहु आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा स्विकारून महाराष्ट्र कुठं गेलाय नी विचारदारीद्र्य असेलला शेणपट्टा अजूनही मागेच आहे.

वामन देशमुख's picture

9 Dec 2023 - 8:16 am | वामन देशमुख

ती त्यांच्या पध्दतीची धर्मचिकीत्सा होती.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2023 - 11:51 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. पण तीन दिवसांनी मोदींच्या गुरूंचा वाढदिवस येतोय. तेयांना शुभेच्छा द्या. :)

रामचंद्र's picture

9 Dec 2023 - 2:14 am | रामचंद्र

जिथे जिथे प्रादेशिक अस्मिता प्रबळ आहे, तशा भावनेने सर्व धर्मांचे एक होतात, तिथे भाजप अथवा मातृसंस्थेचा तितकासा शिरकाव फारसा होताना दिसत नाही. म्हणून दक्षिणेत अजून फार यश मिळालेले नसावे.
पेरियार यांचा प्रभाव प्रामुख्याने तामिळनाडूत आहे. कर्नाटकात हिंदू धार्मिकता चांगली रुजलेली आहे. आंध्र (आणि तेलंगणात) आणि केरळातही हिंदूधर्मविरोधी वातावरण आहे असं वाटत नाही. अर्थात कर्नाटकात दलित चळवळ सक्रिय वाटते पण तिथे लिंगायत पंथ प्रबळ असून त्यांनी आम्ही हिंदू नसून स्वतंत्र धर्म असल्याचेही अलिकडे जाहीर केले होते. मात्र शैव मताची घट्ट पकड एकूणच दक्षिणेत दिसते.
ज्या चिकाटीने संघाचे कार्य आज इतकी वर्षे चालत आले आहे ते पाहता अजून दहा वर्षांतच ते दक्षिणही सर करतील असे वाटते. आणि केंद्रातील सत्तेमुळे साधनसंपत्तीची आता अजिबातच कमतरता नाही.
प्रादेशिक वैविध्यानुसार हिंदू धर्माचे वेगवेगळ्या छटांचे रूप बदलून किंवा न बदलता संघ हिंदू धर्म कसा एकजिनसी करण्याचा प्रयत्न करील ते पाहणं खरंच रंजक ठरेल.

रात्रीचे चांदणे's picture

8 Dec 2023 - 9:30 pm | रात्रीचे चांदणे

हिंदू दहशतवाद नंतर हिंदुत्ववादी आणि अत्ता सनातनी अशा शब्दांचा जाणून बुजून उपयोग करून हिंदूना टार्गेट करून मुस्लिमांची मते मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. पण हा त्याचाच अंगलट येणार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2023 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

कैच्याकै

अहिरावण's picture

9 Dec 2023 - 3:19 pm | अहिरावण

सहमत आहे. आणि नेमके हे न समजता काही टिनपाट आपण आगरकर, कर्वे यांच्या पंक्तीतले आहोत असा आव आणून त्यांची घरची तडफड आणि मळमळ मिपावर ओकत असतात. त्यांना गेट वेल सून अशा शुभेच्छा !

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2023 - 5:49 pm | अमरेंद्र बाहुबली

टिनपाट
प्रातशाखीय संस्कार दुसरं काय? महीरावण हा पाच महीणे जूना फेक आयडी बनवून कुणीतरी भक्त शिवीगाळ करतोय. ऊडाला आयडी तरी त्याचं काय जातंय म्हणा? फेकच तर आहे.

अहिरावण's picture

9 Dec 2023 - 7:26 pm | अहिरावण

संस्कारहीन असण्यापेक्षा कुठले का असेना चांगले संस्कार असणे महत्वाचे. असो.

विवेकपटाईत's picture

11 Dec 2023 - 4:50 pm | विवेकपटाईत

मला वाटते राजकीय धागा पुनः सुरू करवा.

अहिरावण's picture

14 Dec 2023 - 2:42 pm | अहिरावण

म्हणजे तुमची कुचंबणा थांबेल. नाही का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Dec 2023 - 11:44 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क. दिल्लीत भाजपला धोबीपछाड देऊन आप सत्तेत कशी आली ह्याचा अभ्यास झाला का पटाईत सर?

विवेकपटाईत's picture

27 Dec 2023 - 12:11 pm | विवेकपटाईत

दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही आणि मतदान कमी होते. बाकी ६० टक्यांच्यावर मतदान झाले तर भाजप जिंकणार. ( कारण २० टक्के ८९ टक्के मतदान करतात). बाकी dtc महिलांसाठी फ्री पाच लाख व्होट. हे वेगळे गेल्या वर्षी ९१ कोटी प्रवासी आणि ३३०० कोटी तोटा झाला. प्रति प्रवासी ३४ रू. ह्या ईमानदारीची अजून चर्चा झाली नाही. याशिवाय एक एक खोलीचे घर भाड्यावर देणारे मालक जे भाडेकरू पासून दहा रू unit घेतात आणि आपला एसी फ्री चालवतात.
बाकी लोकसभेत भाजप सर्व जागा जिंकणार फक्त मतदान ६० टक्यांच्या वर झाले तर. एमसीडीत फक्त ५० टक्के झाले होते.

विवेकपटाईत's picture

27 Dec 2023 - 12:11 pm | विवेकपटाईत

दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही आणि मतदान कमी होते. बाकी ६० टक्यांच्यावर मतदान झाले तर भाजप जिंकणार. ( कारण २० टक्के ८९ टक्के मतदान करतात). बाकी dtc महिलांसाठी फ्री पाच लाख व्होट. हे वेगळे गेल्या वर्षी ९१ कोटी प्रवासी आणि ३३०० कोटी तोटा झाला. प्रति प्रवासी ३४ रू. ह्या ईमानदारीची अजून चर्चा झाली नाही. याशिवाय एक एक खोलीचे घर भाड्यावर देणारे मालक जे भाडेकरू पासून दहा रू unit घेतात आणि आपला एसी फ्री चालवतात.
बाकी लोकसभेत भाजप सर्व जागा जिंकणार फक्त मतदान ६० टक्यांच्या वर झाले तर. एमसीडीत फक्त ५० टक्के झाले होते.

दिल्लीत भाजपचे नेतृत्वच नाही, हे विधान पटत नाही. कारण दिल्ली आणि परिसरात संघाचे चांगलेच जाळे आहे. शिवाय मदनलाल खुराणा, साहिबसिंग वर्मा, जेटली, स्वराज असे कितीतरी भाजपचे नेते हे खास दिल्लीचे म्हणून ओळखले जात होते.
कदाचित 'आप'ने सवलती, शिक्षण आणि दवाखाने इ. च्या माध्यमातून रिक्षावाले, सफाई कामगार, अन्य अंगमेहनत करणारा वर्ग आणि मग त्याच्याच जोडीला वाढता मध्यमवर्ग असा आपला हक्काचा मतदार तयार केला असावा.
केजरीवालांना सत्ता राखण्यासाठी दिल्लीतच अडकवून देशात अन्यत्र फारसा शिरकाव न करू देण्याचे दीर्घसूत्री धोरण असावेसे वाटते.