पाच राज्यातील निवडणूक निकाल

महिरावण's picture
महिरावण in राजकारण
3 Dec 2023 - 11:02 am

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू होताना दिसतेय. अनुक्रमे १३७ आणि ११६ जागा मिळताना दिसत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये ममुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच1 होण्याची शक्यता दिसते, विशेषतः राजस्थानात स्वतंत्र वृत्तीच्या वसुंधराराजे असल्याने तिथे डोकेदुखी वाढणारच.

छत्तीसगडमध्ये मात्र भाजप काँग्रेस ७/८ जागांच्या फरकाने तुल्यबळ लढत होताना दिसतेय. ,काँगेस जिंकली तर बघेल मुख्यमंत्री होतील, भाजप जिंकले तर रमणसिंह पुन्हा होतील का?

तेलंगणमध्ये मात्र काँग्रेस केसीआरवर भारी पडतेय. केसीआर यांचा प्रभाव आणि बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसतेय, भाजपला ह्याचा फायदा लोकसभेत होऊ शकेल.

मिझोरामची मतमोजणी मात्र उद्या आहे.

एकंदरीत पाहता हिंदी पट्ट्यातले भाजपचे वर्चस्व दिसून येतंय. कठीण वाटणारी लोकसभा निवडणूक मोदींसाठी आता थोडी सोपी झाली असा आजचा निकाल पाहता म्हणता यावे.

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

6 Feb 2024 - 9:11 pm | विवेकपटाईत

तो काळ गेला. विधानसभा आणि नगर निगम झालेले अल्प मतदान दिल्ली भाजप जवळ नेता नाही मतदार मत द्यायला आले नाही. लोकसभेत ६० टक्के मत पडले नाही तर ...