वाजे लडिवाळ घुंगूरवाळा
चरितसे गोजिरी कपिला |
धरती गळा फुलांच्या माळा
फुलपाखरांनी श्वास रंगला |
वाहे धीरगंभीर निर्झर निळा
नाद ,सृष्टी मंदिरा घुमला |
स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा
पाकळ्यांची बरसात रान सजला|
अवचित पावा वाजला सावळा
समाधी मनीची ,हरी हसला |
-भक्ती
प्रतिक्रिया
23 Oct 2023 - 8:13 am | उग्रसेन
रचनेतून एक असा अर्थ लागत नाही.
23 Oct 2023 - 9:16 am | Bhakti
एक मुलगी सृष्टीची किमया- गोजिरी गाय,झरे,फुलपाखरे,वारा त्याचा कोमल स्पर्श,फुलं, त्या फुलांच्या रंगीत पाकळ्या या साऱ्याने मोहून गेली,एक समाधीचं तेव्हा चित्तात 'हरी'म्हणजे कृष्णाचा भास होतो आणि या सखीच्या अवस्थेला तो मोहक स्मित देतो :)
टीप-खुप दिवसांनी मुक्त कविता सुचली होती! प्रतिसादासाठी धन्यवाद!
25 Oct 2023 - 12:15 pm | मुक्त विहारि
छान आहे...
23 Oct 2023 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवचित पावा वाजला सावळा.
छान.
लिहिते राहणे.
-दिलीप बिरुटे
26 Oct 2023 - 1:19 am | राघव
आवडली! पुलेशु. :-)