तुझ्या डोळ्यातील
आसवं होवून
तळहातावर विसावावं
क्षणभर...
पण तु मात्र
तटस्थ उभी असतेस
पापण्यांच्या काठावर
तुझ्या केसातील
गजरा होवून
अलगद ओघळावं
मांडीवर...
पण तु मात्र
निस्पर्श असतेस
मिटलेल्या देहावर
तुझ्या अनावर वेगाचं
भान व्हावं क्षणभर
पण तु मात्र
पाठमोरी उभी असतेस
अधीरल्या डोहावर
प्रतिक्रिया
8 May 2009 - 5:00 pm | राघव
साधी सोपी सरळ रचना.. तरीही पोचणारी!
खूप मस्त लिहिलंय!! :)
राघव
8 May 2009 - 6:47 pm | क्रान्ति
खूप खूप आवडली कविता.
:) क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
9 May 2009 - 8:48 am | मनीषा
छान कविता ...