डॉ.एम.एस.स्वामिनाथन (१)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Sep 2023 - 4:28 pm

A
भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि जगाला 'झिरो हंगर' या परिस्थितीत आणणारे डॉ. स्वामिनाथन यांचे २८ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

स्वामिनाथन यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामिनाथन असे होते.मित्रांमध्ये आणि जगभर ते डॉ.एम एस (Dr.MS) म्हणून लोकप्रिय होते.त्यांचा जन्म तामिळनाडू चेन्नई त्यावेळच्या मद्रासमधील कुंभकोणम येथे ७ आगस्ट १९२५ ला झाला.वडील सर्जन एम के स्वामिनाथन आणि आई पार्वती सांबशिवन गृहिणी होती.स्वामिनाथन यांच्या वडिलांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव हे त्यांना शेतीत रस असण्याचे कारण होते. या दोघांमुळेच त्यांनी कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कुंभकोणममध्येच झाले.परंतू वयाच्या ११ व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले.,आणि काकांनी त्यांची पुढील जबाबदारी घेतले.लहानपणापासून स्वामिनाथन विवेकानंदांच्या विचाराने आणि महात्मा गांधी यांच्या सर्वोदय , अंत्योदय या विचारांचा प्रभाव होता. १५ व्या वर्षी कऐथलइक लिट्ल फ्लॉवर हायस्कूलमधून ते मैट्रिक झाले.वडिलांप्रमाणे त्यांनाही डॉक्टर व्हायचे असल्याने त्यांनी झूलौजी (प्राणीशास्त्र) विषयात त्रावणकोर विद्यापीठातून पदवी मिळवली (१९४४).हे घडले नसते तर तो पोलिस अधिकारी झाला असता. खरं तर, 1940 मध्ये त्यांनी पोलीस अधिकारी होण्यासाठी परीक्षाही उत्तीर्ण केली होती.
परंतू बंगाल दुष्काळाच्या परिस्थितीचे भीषण स्वरूप पाहून त्यांचे मन उद्विग्न झाले आणि त्यांनी कोईमतूर कृषी विद्यापीठातून कृषी पदवी १९४७ ला मिळवली.पुढे ते IARI Indian Agricultural Research Institute
मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी सायटोजेनिटिक्स मध्ये प्राप्त केली.
स्वामिनाथन - ज्यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते - यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) मध्ये बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी. पिकांवर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि त्यांना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

त्यानंतर १९४९ ला ते बटाटा वरील सायटोजेनिटिक्स संशोधनसाठी कृषी विद्यापीठ वेगेनिनजन , नेदरलँड्स येथे गेले.डॉक्टरेट अभ्यासासाठी ते १९५२ ला केंब्रिज विद्यापीठाच्या कृषी विद्यालयात वनस्पती प्रजनन संस्थेत शिक्षण घेण्यासाठी गेले. पीएचडी केल्यानंतर, त्यांनी डॉक्टरेटनंतरच्या संशोधनाचा भाग म्हणून यूएस सरकारचे बटाटा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विस्कॉन्सिन विद्यापीठातील जेनेटिक्सच्या प्रयोगशाळेत पंधरा महिने घालवले. यामध्ये जैविक आणि अजैविक (बायोटिक-कीटक व्हायरस,जीवाणू आणि अबायोटिक-उ्ष्ण थंड तापमान,कमी अधिक पाणी प्रमाण, जमिनीतील न्यूट्रइंएन्ट कमतरता) घटक रेझिस्टंट प्रजाती बनविण्यावर भर दिला.
A
याकाळात त्यांचे बटाट्यावरील संशोधन पेपर Nature, Genetics, Journal of Heredity,American Journal of Botany अशा विविध प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते.
विस्कॉन्सिन विद्यापीठात त्यांनी 'Alaska potato Frost resistance' ही प्रजाती तयार केली.जी फ्रीजिंग तापमानाखाली ही जोमाने वाढू शकत होती.
स्वामीनाथन यांच्या अचाट कामगिरीवर खुश होऊन त्यांना तिथेच मोठ्या हुद्द्यावर संशोधक म्हणून काम करण्याची विनंती करण्यात आली पण त्यांनी ती अमान्य केली आणि
एक वर्षानंतर, त्यांनी त्यांचे संशोधन पूर्ण केले आणि IARI मध्ये पुन्हा सामील होऊन भारतात परतले.
-भक्ती

विज्ञान

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली

इंग्रजी लेखाचं मराठीत भाषांतर केलंय गूगल वरून?

आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली

इंग्रजी लेखाचं मराठीत भाषांतर केलंय गूगल वरून?

आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी

Bhakti's picture

30 Sep 2023 - 7:51 pm | Bhakti

नाही दोन तीन पेपर वापरून लिहिली आहे.तेवढा परिच्छेद गुगल ट्रान्सलेट केला आहे.तो संपादन करायचा राहिला.
स्वामिनाथन - ज्यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते - यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) मध्ये बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी. पिकांवर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि त्यांना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

संपादकांना विनंती आहे वरील परिच्छेद खाली दिल्याप्रमाणे संपादित करावा.

स्वामिनाथन यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये संशोधनाचे विशेष प्राविण्य प्राप्त केले होते . त्यांना बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती . बटाटा पिकांवर होणारा अजैविक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि नवीन बटाटा प्रजातींना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

कंजूस's picture

30 Sep 2023 - 8:01 pm | कंजूस

हे ठीक.

पण पंजाबातील 'हरीत क्रांतीचे जनक' याबद्दल हवे आहे.

आता तिकडे ओरड आहे म्हणतात. ठराविक काळानंतर रासायनिक खते,बायो टेक तंत्रज्ञान सूस्त पडते. (जसे अँटिबायोटिकस अतिवापरानंतर अकार्यक्षम होतात तसे)

Bhakti's picture

30 Sep 2023 - 9:18 pm | Bhakti

Evolution is key to survival!
कीटक ,व्हायरस जे जैविक घटक आहेत ते स्वतः मध्ये बदल घडवून परत पिकावर जोमाने हल्ला करतात.
डास पूर्वी DDT ने मरायचे आता DDT त खुशाल लोळतात :)
गुड नाईटही काही मरत नाही. इलेक्ट्रिक bat वापरावी लागते.
सर्दीचे व्हायरस पण हुशार असतात,लवकर अडाप्ट होतात.

अवांतर -एक गंमत सांगते मी असं वाचलंय की खुद्द माणस किंचित उत्क्रांत झालाय.आताशी survival फेजमधून बाहेर पडून त्यांच्या मेंदूचा काहीसा भाग उत्क्रांत झालाय.
जेवढा सिंपल तेवढा लवकर उत्क्रांत जेवढा कोम्प्लेक्स तेवढा उशीर उत्क्रांत होतो.
पण इथे अजैविक घटक रेझिस्टंट प्रजाती त्यांनी तयार केल्या आहेत.

ही आपल्या देशाच्या मागासलेपणाची प्रमुख समस्या आहे. समाजाला पुढारी, प्रशासकीय अधिकारी, कलावंत, खेळाडू यांच्यासारखं व्हावं असं वाटणं हे त्यातून मिळणारे पैसे आणि प्रतिष्ठा यापायी हे होत असावं.

स्वामीनाथन यांच्या कर्तृत्वाचा सी. सुब्रमण्यम या पुढाऱ्यांचा पाठींबा होता. परंतू हरीत क्रांतीचं श्रेय म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो सी. सुब्रमण्यम यांना. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांची यादी पाहिली की अजूनही विज्ञान, तंत्रज्ञान, मानव कल्याण यांच्यासाठी काम करणारे फारच कमी व्यक्ती आहेत. स्वामीनाथन आणि वर्गिस कुरीयन यांनाही हे पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.

साहना's picture

1 Oct 2023 - 11:13 am | साहना

https://pro.bookstruck.app/nonrmn-borlong-bhaartiiy-tsec-vaishvik-hritkr...

स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्वाचे असले तरी हरित क्रांती ज्यामुळे शक्य झाली त्यासाठी अमेरिकन नॉर्मन बोरलॉग (मूळ नॉरवे वंशाचे) ह्यांचे खूप मोठे योगदान आहे. बोरलॉग ह्यांनी भर भारत पाकिस्तान युद्धांच्या काळांत दोन्ही देशांत काम करून हरित क्रांती घडवून आणली. स्वामिनाथन सारखे भारतीय अधिकारी कर्तव्यनिष्ठ होते म्हणून हे शक्य झाले. बोरलॉग ह्यांना त्यांच्या कामासाठी नोबेल सुद्धा मिळाले. बोरलॉग ह्यांनी भारत पाकिस्तान शिवाय मेक्सिको इत्यादी देशांत सुद्धा काम केले.

विजुभाऊ's picture

13 Oct 2023 - 10:49 am | विजुभाऊ

वडील सर्जन एम के स्वामिनाथन आणि आई पार्वती सांबशिवन गृहिणी होती
हे घडले नसते तर तो पोलिस अधिकारी झाला असता.

ही वाक्ये देखील खटकतात. व्याकरणदृष्ट्या

नक्कीच खुप चुका आहेत.
लवकरात लवकर इतरही भाग लिहिता येईल असे वाटलं होतं पण वेळेअभावी जमलं नाही.
दुसरा भाग कागदावर लिहिला आहे , अजून काही भाग होतील.तेव्हा ह्या पहिल्या भागावरपुन्हा संस्कार करून परत प्रकाशित करेन.