निरोपाच्या क्षणी . . …

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जे न देखे रवी...
28 Jul 2023 - 8:07 pm

निरोपाच्या क्षणी . . …

निरोपाच्या क्षणी अश्रू डोळ्यातील चटका लावून गेले,

मन कातर, हळवे हळवे करून गेले.

म्हणालो, “वेडे, ह्या जन्मी जरी जमले नाही तरी पुढच्या जन्मी नक्कीच जमवू.

हातात हात घालून चालू,

एकच कॉफी मागवून, ऊष्टी ऊष्टी पिवू,

चंद्राच्या साक्षीने बिलगून वाळूत पाऊल खुणा ऊमटवू,

पावसात भिजू, ऊन्हात तापू.

मिठीत एकमेकांच्या जगाला विसरू टाकू.

चल पुसून टाक ते अश्रू, का चातकासारखे पिऊ ?”
…………..
………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..

“हात वेड्या, अरे आनंदाश्रू आहेत ते, चल, सुटले एकदाची”
……………………..
……………………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..
……………………..

“तिच्यामारी”

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

28 Jul 2023 - 10:04 pm | कर्नलतपस्वी

एकदम यु टर्न.....

थोडे पुढे जाऊन त्यानेही सुस्कारा सोडला असेल.

आवडली.

चलत मुसाफिर's picture

29 Jul 2023 - 10:04 am | चलत मुसाफिर

मजेदार.

हे माझ्या 'निरोप' या कवितेचे आशयात्मक विडंबन आहे असे मी आनंदाने गृहीत धरतो. शुभेच्छा. :)

निरोप
https://www.misalpav.com/node/51437

सौन्दर्य's picture

31 Jul 2023 - 6:45 pm | सौन्दर्य

क्षमा करा, मी तुमची 'निरोप' ही कविता आधी वाचली नव्हती, तुम्ही लिंक पाठवली म्हणून आत्ताच वाचली. छानच लिहिली आहे तुम्ही ती कविता.

तुमची कविता आधी न वाचल्यामुळे 'विडंबन' नव्हते केले. हा फक्त एक योगायोग आहे. खरं म्हणजे हल्ली फेसबुकच्या रिल्सवर अनेक ब्रेकअपचे व्हिडियो पाहिले त्यावरून ही कविता सुचली.

चलत मुसाफिर's picture

1 Aug 2023 - 7:59 am | चलत मुसाफिर

सौंदर्य (भाऊ/ ताई?),

असेच नियमित लिहीत रहा. धन्यवाद

सौन्दर्य's picture

1 Aug 2023 - 6:24 pm | सौन्दर्य

मी भाऊ आहे.

मला कल्पना आहे की ह्या नावावरून गैरसमज होऊ शकतो. मुख्यते दक्षिण भारतात हे नाव स्त्रियांचेच असते. माझ्या नावावरून झालेले गोंधळ मी एका लेखात मांडले होते. जमले तर तो लेख मिपावर पोस्ट करीन म्हणतो.

आभार.

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2023 - 9:23 pm | चौथा कोनाडा

छान !

कुमार१'s picture

1 Aug 2023 - 6:48 am | कुमार१

छान !