स्टेजवरची वज्रमूठ,
मेजवरती ठरली झूट,
मतपेटीतलं भूत,
मेले नाही।।
सुपारी फुटायच्या आत,
बुंदी खायची घाई,
मतदारच बाप अन् आई
विसरले।।
कमळ विकसले,
काका आकसले,
नाना प्रकाशले,
बुध्दिबळे।।
भांडे लपवले ताका,
बोबडले ते काका,
नाही राहीला धाका,
पक्ष-फूटी।।
सत्तेसाठी ता ता थय्या,
भाजप व विरोधक एकशय्या
'समान नागरी' ची नैय्या
पार पडो।।
प्रतिक्रिया
3 Jul 2023 - 10:56 am | मुक्त विहारि
दिगू कधीच वेडा झाला...
3 Jul 2023 - 11:01 am | कर्नलतपस्वी
का.. का.. घड्याळ सांगा कुणाचे..
माझे की माझ्या ताईचे
बाजीगर भौ, पुढे वाढवा.
(भाजी आगारातील बाजीगर)
11 Jul 2023 - 6:23 am | बाजीगर
पक्षाशी पक्ष तीन जुळताना
निधी हा सारा ची गिळताना
हासते नाचरे नेते सारे
हासते अप्पर कोर्ट का रे?
काका सांगा कुणाचे?
काका माझ्या ताईचे ( हा हा हा)
ताई सांगा कुणाची ( हा हा हा)
11 Jul 2023 - 6:26 am | बाजीगर
ताई मालक पक्षाची ( हा हा हा)
3 Jul 2023 - 11:27 am | चौकस२१२
असंगाशी संग भाग २.
चॉकलेट ची गॅन्ग सिल्वर ओक पासून वर्षा कडे
3 Jul 2023 - 11:31 am | चौकस२१२
ना मैने सिग्नल देखा ना तुने सिग्नल देखा , रब्बा रब्बा ऍक्सीडेन्ट हो गया
3 Jul 2023 - 7:16 pm | खिलजि
Nana patekar बोलले
आहेर नक्की कुणाला द्यायचा? हा प्रश्न आता तमाम भारतीयांना पडलेला असेल.. हे नेतेमंडळी काहीही करतात.. मतदारांनी मतदानाचा कार्यक्रम करायचा की नाही हा यक्षप्रश्न!!!
5 Jul 2023 - 12:33 pm | चौकस२१२
आता २ सभा चालू आहेत , स्प्लिट टीव्ही स्क्रीन पैसे वसूल
6 Jul 2023 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा
छान जमले हो .
11 Jul 2023 - 6:47 am | विवेकपटाईत
बंद झाला राजकारण धागा जरीही. कवितेचा मार्ग आहे मोकळा. दोन भंवरे एक फूल, सिनेमा आज आहे लागला.