'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष
आमे तैयार छे, गुजरात दक्ष
पाकीस्तानातून भारतात,
बेकायदेशीर! नाही विजा,
आहे ना सोबत गडगडाट,
तेजाळ लखलखाट विजा!!
कडेकडेनेच निघून जा,
हा विनंती अर्ज
पीकपाणी नुकसान नको
फिटलं नाही कर्ज.
करु नको विस्थापीत,
नको उडवू घराचे पत्रे,
हवामान महासंचालक,
कशी वाचवावी लक्तरे?
प्रतिक्रिया
13 Jun 2023 - 5:58 pm | कर्नलतपस्वी
इथे पुण्यात एवढे जोरात वारे वाहातायत किनारपट्टीवर काय परिस्थिती असेल.