गाभा:
राम राम मंडळी,
यू ट्यूब किंवा तत्सम चित्रफितीचा तुकडा कृपया कुणीही मिसळपाववरती डायरेक्ट चढवू नये. त्यामुळे काही मंडळींच्या संगणकावर संबंधित लेखच काही तांत्रिक अडचणींमुळे उघडणे शक्य होत नाही व गैरसोय होते. काही संगणकावर ही अडचण येत नाही, परंतु काही संगणकांवर येते.
तरी कुणाचीच गैरसोय होऊ नये म्हणून या पुढे मिसळपाववर चित्रफितीचा तुकडा परस्पर चिकटवू नये, त्या ऐवजी संबंधित चित्रफितीचा दुवा द्यावा अशी आग्रहची आणि कळकळीची विनंती..
कळावे,
आपला,
सरपंच.
प्रतिक्रिया
23 Feb 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरपंच साहेब,
अधुन-मधुन अशा सुचनांची गरज असतेच असे वाटते आणि ते सांगत चला बॉ :) आमची लै पंचायत होते कोणालाच विचारता येत नाय आम्हाला या तांत्रिक अडचणी.
आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ?
23 Feb 2008 - 9:54 am | सरपंच
आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ?
हो, हा त्याचाच परिणाम आहे. तिथे बहुदा कुणीतरी युट्यूबची चित्रफित चढवलेली असावी. त्यामुळे आमच्याकडेही आता हा लेख उघडत नाही. मागे एकदा उपक्रमावरही आम्हाला हीच अडचण आली होती.
सरपंच.
23 Feb 2008 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरपंच साहेब,
आभारी आहोत !!!
23 Feb 2008 - 8:30 pm | स्वाती दिनेश
हे पान माझ्या संगणकावरही उघडत नाही :(
स्वाती
23 Feb 2008 - 9:17 pm | सुधीर कांदळकर
संगणकावरून 'आज जाने की जिद ना करो' हा तात्यांचा लेख उघडेनासा झाला. आज तर 'वाटचाली'त दिसत देखील नाही. कारण काय असेल.
24 Feb 2008 - 11:09 am | चतुरंग
माझ्या संगणकावर "इंटरनेट एक्स्प्लोरर ६.०" आवृत्ती आहे. त्या आधीची किंवा नंतरची आवृत्ती असल्यास असे काही होऊ शकते का?
(मायक्रोसॉफ्टचा अशा बर्याच अतर्क्य जादू करण्यात हातखंडा आहे म्हणून शंका आली इतकेच.:))
चतुरंग
24 Feb 2008 - 12:34 pm | ॐकार
हे उद्योग त्यांचेच. तांत्रिक बाबींमध्ये डोकावल्यास आय.ई. मध्ये डॉम ऑब्जेक्ट तयार व्हायच्या आधी जावस्क्रीप्टद्वारे एडीट करायला गेल्यास असा संदेश येतो. थोडक्यात - आय.ई. आणि जावस्क्रीप्टचे याबाबतीत सख्य नाही.