पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
प्रतिक्रिया
8 Jan 2023 - 8:33 pm | चित्रगुप्त
बावरा जीव, चांदणे, ओठांची लाली, बटा कुरवाळणे, हवेची झुळूक, केस वार्यावर सोडणे, तिची चाहूल, पाने बहरणे, दवांनी ओले झालेले गवत, बिलगणे, गंध तनुचा वगैरे वर्णनातून "कुच कुच होता है" एवढे समजले.
या निमित्ताने आठवलेले लता-मुकेश यांनी गायलेले, जी.एस. कोहली यांच्या संगीताने नटलेले १९६५ चे हे सुंदर गीत ऐका -
https://www.youtube.com/watch?v=g6U4GmmnMpw
8 Jan 2023 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्र पाहिजे होतं यावर एखादं भारी...!
-दिलीप बिरुटे
9 Jan 2023 - 11:49 pm | प्रसाद गोडबोले
कुछ कुछ होता है =)))
कुच ह्या शब्दाचा मराठीत अर्थ वेगळा आहे ;)
बरेच दिवसांनी उत्तम विनोद पाहिला , बेक्कर हसतोय =))))
8 Jan 2023 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता. मला प्रेम कविता आवडतात, म्हणून ही कविताही आवडली.
लिहिते राहा....!
ख्वाहिशें कुछ कुछ यू भी अधूरी रही.
पहले उम्र नही थी , अब उम्र नही रही.
-दिलीप बिरुटे
(इश्क मे डूबा ) ;)
9 Jan 2023 - 8:26 am | कर्नलतपस्वी
मस्त दिपक भौ,
शायर नसिर काजमी जी की एक गझल याद आयी,
दिल में इक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी
गुलाम अली जी की बेहतरीन आवाजाने इसे चार चांद लगाये है l
https://youtu.be/VoAlBP16mG8
बाकी कवीता वाचताना खालील शब्द अपसुकच आले.
तुझ्या येण्यानं सखू
काळीज माझं धडधडतयं
तुझ्या पिरतीच पांखरू मनात
बघ कसं फडफडतयं
9 Jan 2023 - 4:22 pm | Deepak Pawar
चित्रगुप्त सर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, कर्नलतपस्वी आपले मनःपूर्वक धन्यवाद.
चित्रगुप्त सर आपण लिंक दिलेले गाणे ऐकले खूप छान आहे.
कर्नलतपस्वी सर आपण लिंक दिलेली गजल सुद्धा ऐकली छान आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर आपण नेहमीच प्रोत्साहन देता त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार.